मॉरल ऑफ द स्टोरी

वडगावकर जनातलं, मनातलं
सुट्टीचा दिवस.... दबाके खाना खाया.... दमआलु और रोटी (पोळीच पण रोटी म्हणालं की त्या पोळीला स्टेटस वाढल्या सारखं,शिवाय त्या दमआलु ला पण उगीच इन्सल्टिंग वाटत नाही ).... आणी आफ्टरनून वॉक साठी बाहेर पडलो.. नदीपात्रा च्या काठावर एक दोन जणं वाकून काहीतरी करत होते... ती पोरं काय करतायेत?..... नको तिथं माझं कुतूहल जागं होतं.... की त्याला नाक खुपसणं म्हणावं?.... जान्दे...ईस बात पर एक मुहावरा ही बना देताना भाई... "आपलं ते कुतुहल आणी दुसर्याच ते नाक खुपसणं" मी घाटाच्या पायऱ्या उतरायला चालू केलं.... पोरांच्या अंगावरचे स्कुल युनीफॉर्म्स.... शाळा नुकतीच सुटली असावी...की शाळेला दांडी मारली होती?.... तीन पोर...नदी पात्रातले मासे पकडत होते.... ऑ?...मी माझाच भूतकाळ पाहतोय कि काय?.... ईस बातपर,एक फ्लॅशबॅक सीन तो बनता है बॉस..... शाळेत असताना ची गोष्ट.... शिवाजी नगर मधली बाग..... एकदा त्या बागेतल्या हौदातले मासे रुमालाने पकडले... मस्त पैकी... प्लास्टिक च्या पिशवीत पाणी टाकून त्यात एक,दोन मासे घालून घरी घेऊन गेलो.... मोठ्या हुशारीने घरी ती पिशवी दाखवली.... घरात शोले और खानदान की ईज्जत सुरु.... क्या समझकर आये थे?...के सरदार बहोत खूश होगा ?,शाबाशी देगा?.... तुने तो खानदान का नाम पुरा मिट्टी मे मिलायी दिया रे... मी आपला खातोय शिव्या..... आणी त्या प्लास्टिक च्या पिशवीतले मासे माझी बेईज्जती बघुन हसतायेत... जा,ते मासे जिथून आणले असशील तिथे सोडून ये.... जी हुकूम सरदार.... माझ्या कडे बघणारे मासे.... ऐसा गुस्सा आयांना भाई.... नॉनव्हेज नव्हतो म्हणुन ते मासे वाचले साले... नै तो उनका फिश फ्राय करके खा डालता था.... रागारागात पाय आपटत बागेत गेलो आणी ते मासे हौदात सोडून आलो.... पिशवी उपडी केली आणी एका क्षणात ते पसार.... तेव्हा पासुन माझी एक ईच्छा आहे.... घरी मस्त पैकी एक ऍक्वेरियम पायजे... त्यात शार्क,पिऱ्हाना,इलेक्ट्रीक ईल सारखे खतरनाक मासे ठेवावेत.... आणी रोज त्यांच्याकडे खुन्नस देऊन हसावं.... फ्लॅशबॅक सीन ऑफ...कम टु द प्रेझेंट.... ते पोरगं....अगदी मन लाऊन मासे पकडत होत... पण मासे अगदीच इटुकले पिटुकले होते.... फारतर पोटभर रक्त पिलेल्या डासाएव्हडे.... आता त्यांना मासे म्हणायचं म्हणजे श्री राहुल गांधी यांना मुरब्बी,विद्वान राजकारणी..... किंवा श्री अरवीन्द केजरीवाल यांना ध्येयवादी,समर्पित मुख्यमंत्री म्हणण्या सारखं.... हे मासे फार लहान आहेत रे....मोठे नाहीत का ? अहं...मोठे कडेला येतच नाहीत... किती पकडलेस?..... दोन!.. तो उस्साहाने म्हणाला.... बघु ? त्याने हातातली प्लास्टिक ची बाटली दाखवली... (मला माझी प्लास्टिक ची पिशवी आठवली) हे तर अगदी मायक्रोस्कोपीक मासे आहेत की... थांब,मी मदत करतो तुला....आपण पकडु... तो जाम खुश.... आपल्याला एखादी वाळकी काठी लागेल....मिळतीये का ते बघतो... नावं काय रे तुझं? श्रेयस,काका... बाजूला पडलेली वाळकी काठी घेतली,बींन कामाचे फाटे तोडले आणी तिचा आकार Y शेप सारखा करून घेतला... त्याच्या चेहर्यावर फुल्ल कन्फ्युजन... हे काये काका? ये मछली पकडनेका जुगाड है भैय्या....अब देखो कमाल... एखादी प्लास्टिक ची कॅरीबॅग बघ.... आजूबाजूला बघून त्याने माती झटकत एक कॅरीबॅग उचलली.... त्या Y च्या वरच्या दोन शिंगात त्या प्लास्टिक च्या कॅरीबॅग चे कान अडकवले.... आणी ते जुगाड अगदी अलगद पाण्यात खुपसलं.... दोन तीन ईंचाचे मासे..पण...साले भयंकर चपळ होते... मी आपला करतोय प्रयत्न.... अहं... शेवटी कसेबसे तीन चिंटू पिंटू मासे पकडून त्याच्या बाटलीत टाकले ए श्र्येया,बस झालं चल,पाच वाजत आलेत.... त्याच्या मित्रांनी त्याला आठवंण करून दिली.... चला काका,थँक्यू...आज पाच झाले...तो खुशीत म्हणाला... चला पोरांनो,आता मी पण निघतो... आम्ही पायर्या चढायला सुरु केलं.... त्यांनी स्टॅन्ड ला लावलेल्या सायकली काढल्या आणी फरार.... एक विचारायचं राहुनच गेलं....त्या पोरांचं मिडीयम.... पण.....बहुतेक मराठी मिडीयमचेच असावेत.... ईंग्लिश मिडीयम ची मुलं एकदम गुडबॉय असतात... स्कुल सुटली की डायरेक्ट घरी...उन्हा-तान्हात बोंबलत फिरत नाहीत.... मम्मी च्या मोबाईल मध्ये नाहीतर डॅडी ने दिलेल्या टॅब मध्ये शांतपणे गेम्स खेळत बसतात.... मी हळूच दार उघडून चोरासारखा आत शिरलो.... आज बराच ऊशीर झाला?....त्याचा अभ्यास घेत तिने विचारले... हं...आज थोडी लांबची चक्कर मारुन आलो.... थोडासा चिख्खल लागलेली चप्पल लपवत मी म्हणालो.... मला पुन्हा एकदा खानदान की ईज्जत चं नवीन आणी ट्रीपल स्ट्रॉंग व्हर्जन ऐकाचं नव्हतं.... मुख्य म्हणजे तिचं प्रत्येक स्टेटमेंट,आरोप मला तंतोतंत पटतो (हा माझा प्रांजळपणा म्हणावा की तिची कन्व्हींन्सिंग पॉवर?) मॉरल ऑफ द स्टोरी : माणसाचं वय कितीही वाढलं तरी अंगभूत ऊनाडपणा पूर्णपणे कधीच जात नाही,तो फक्त बाहेर येण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहात असतो. (वा! धिस ईज द बेस्ट मॉरल ऑफ द स्टोरी आय एव्हर रीड......आज,मला माझाच अभिमान वाटतोय)
वर्गीकरण
लेखनप्रकार

5 टिप्पण्या 1,725 दृश्ये

Comments

वडगावकर नवीन

In reply to by टवाळ कार्टा

टका सर,आपला काहीतरी गैर समज झाला बघा. तुलना पोळी आणी रोटी (माझ्या इवलुशा माहीती प्रमाणे हा हिंदी शब्द) मध्ये आहे आणी ती दमआलु च्या संदर्भात.दमआलू बरोबर नांदायचं म्हणाल्यावर तिला स्वताच: नाव बदलावंस वाटलं आणी त्यामुळे तिला स्वता:च स्टेटस वाढल्या सारखं वाटत (देवाशपथ सांगतो,माझी काय चूक नाय हो)