मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव दिवाळी अंक २०१६ - मुखपृष्ठ

अभ्या.. · · लेखमाला

वाचने 37750 वाचनखूण प्रतिक्रिया 62

कंजूस Sat, 10/29/2016 - 09:07
:-) :-) # "website to pdf" type चे अॅप असेल तर त्यात लेखाची लिंक टाका. प्रतिसाद,फोटोंसह सर्व pdf येते.

नूतन सावंत Sat, 10/29/2016 - 13:00
वा! काय सुंदर झालंय मुखपृष्ठ.अगदी बोलतंय बरं का अभ्याभौ.ते रहस्यकथा विशेषांक लिहिलं नसतं तरी समजलंच असतं की,हा रहस्यकथा विशेषांक आहे म्हणून.

लंबर एक मुख्यपृष्ठ. आवडलं. " अरे, चित्र करून करून करणार कोण, अभ्याशिवाय दुसरं कोण" बाय द वे, मिपा अंक येणार त्याच्या जाहिराती चांगल्या होत्या. अभ्या मिपासाठी तू खुप वेळ देतोस. Thank u यार. समीक्षक मोड़ ऑन. मुखपृष्ठावर ज़रा ब्राइटनेसचा फवारा पाहिजे होता. 'रहस्यकथा' हे नाव पिव्वर व्हाइट पाहिजे होतं. खाली दिवाळी अंक २०१६ जसं स्पष्ट दिस्तं तसं पाहिजे होतं, असं वाटलं. एकूण १० पैकी ९ गुण कल्पकतेला देत आहे, अक्षर रंगसंगतीचा एक गुण कापला आहे, बाकी अभ्यास चालु ठेवा. दीपावलीच्या शुभेच्छा हो सेठ....! -दिलीप बिरुटे

चांदणे संदीप Sat, 10/29/2016 - 23:20
वर प्रा. डॉ. सरांनी गुण दिलेलेच आहेत. मला आवडलेल्या गोष्टी सांगतो. - गूढ अंधार - भिंतीवरची पेंटींगफ्रेम डिटेलींगचा उत्कृष्ट नमुना - गुप्तहेराच्या दिमतीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच पारंपरिक अवजारे यांचा समावेश - रहस्यकथा स्पेशल ज्या रंगात किंवा प्रकाशात शोधून वाचावं लागेल जसं की काहीतरी सापडलय, अगदी त्याच ढंगात! फुल मार्क्स! - फक्त ते टेबलावर अलिकडच्या कोपऱ्यात काळं चौकोनी काय आहे ते कळेना? सो, एकूणात अर्धा मार्क शेवटच्या ऑब्जेक्टात कट... साडेनऊ!! \०/ \०/ आता मिपा दिवाळी अंक वाचायला घेतो! :) Sandy

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाखु Mon, 10/31/2016 - 09:38
एखादी तरी प्लेट ठेवली असती तर शेरलॉकने चिवड्याचा बकाणा भरून विचार करायला सुरुवात केली असती आणि वॅटसनसाठी लाडू हवेतच. दिवाळी शुभेच्छा.

ऋषिकेश Sun, 10/30/2016 - 17:07
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे. खूप आवडले. आहे दिवाळी तर चित्रात बसत नसतानाही उगाचच कोपऱ्यात कंदिलांपासून ते पणत्यांपर्यंतची आरास केली नाही हे अधिकच आवडले.

चौकटराजा Sun, 10/30/2016 - 17:26
गूढ रस हा नवरसात येतो की नाही ठाव नाय पण त्या त्याचा रंग बर्न्ट सिन्ना यलो ऑकर यांच्या संकराने सिद्ध होतो. सर्व साधारण पणे रहस्याची उकल म्हणजे काहीतरी लपवले गेलेले जुनाट शोधून काढणे असा होत असल्याने अभ्याला अशा जुनाट पणा दाखविण्याचा रास्त मोह पडलेला आहे. रहस्स्य म्हणजे प्रथम समोर येतो म्हणजे शेरलॉक होम्स त्यामूळे लंडनमधील फोटो दाखवून होम्स चा सन्मान झालाय. नदीच्या वळणावरून तो लंडनचाच दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा नकाशा दिसतोय. या सार्‍या पुराण्या प्रतिकाना लॅपटोप ची आधुनिक सोय देऊन रहस्योद्घाटन हे कालातीत आहे असा संदेश मिळतोय. अभ्या नुसता कलाकार नाही तो साहित्यिक मनाचा माणूस असल्याने त्याचे सादरीकरण असे संमिश्र असते.

चतुरंग Mon, 10/31/2016 - 01:36
माय डिअर वॉटसन! :) अभ्या, एकदम झक्कास झालंय मुखपृष्ठ. दिवाळीअंकाची उत्कंठा वाढवणारं आणि उत्सुकता ताणणारं झालंय! __/\__ (होम्सप्रेमी)चतुरंग

ढंप्या Mon, 10/31/2016 - 11:35
लय भारी .....!!! वर प्रा. डॉ. सरांनी, चांदणे संदीप नी, आतिवास तै ने, चौरा काकांनी आणि भरपूर लोकांनी गुण (आणि अजून काय हवे ते) दिलेलेच आहेच.... खुसपट म्हणून नाय.... आणि लहान तोंडी मोठा घास...... पण (माझ्या पुणेरी डोळ्यांना) जाणवलेल...... आणि अजून मला (हवी आहे असे) वाटणारी गोष्ट म्हणजे....भिंगाच्या पलीकडचे मोठ दिसायला पाहीजे होते का....?? बाकी सगळं लय भारी आहे......!! आता अंक वाचतो.....!!!

मोहन Tue, 11/01/2016 - 10:14
अप्रतीम ! भिंगाच्या सावलीचा पणतीच्या ज्योतीचा आकार दिवाळी अंक असल्याची जाणीव करुन देते. जिओ भाऊ !