इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो.
ज्यांना या लिखाणाची अॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये.
या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही.
इशारा संपला!
---
हा लेख येथे का?
पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी. त्यांची आज्ञा पाळून हे लिखाण येथे देत आहे. ते गोड मानून घ्यावे.
लिखाण करताना ते कायप्पा साठी केलेले असल्याने त्यात विस्तारभय आलेलेले आहे म्हणून लेखाची लांबी कमी आहे. यातील अनेक मुद्दे विस्ताराने चर्चा करण्याजोगे आहेत. तशी मुद्द्याला धरून चर्चा झाल्यास विषय अधिक उलगडला जाऊ शकतो. मिपा वर या विषयावर अनेक अधिकारी व्यक्ती आहेत त्यांनी उदार मनाने यावर अधिक लिहावे. तसेच माझ्या लेखनात काही चुका झाल्या असल्यास दाखवून द्याव्यात व त्यासाठी माफ करावे. गुरूदेवांच्या कृपेने हे लिखाण झाले, यात माझे असे काही नाही. त्यामुळे कोणताही प्रताधिकार नाही. (तुम्ही हा लेख आनंदाने कॉपी पेस्ट करून शेयर करू शकता. मात्र लेखनात बदल करण्यापुर्वी माझी परवानगी आवश्यक राहील)
जप
प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान व त्यातील पद्धती वापरल्यास हे मनुष्याचा सर्वांगिण विकास करण्यास मदत करते करते. त्यातले अगदी छोटेछोटे उपायही सबळ असतात आणि मोठा परिणाम करून जातात. उदाहरणार्थ जप.
आता जप केल्याने कसला काय फरक पडणार म्हणून झिडकारून टाकणे सहज शक्य आहे. पण याच वेळी 'करून तर पाहू या' असा विचारही करता येईल. निव्वळ मनाला शांतता म्हणून हवा असल्यास जप कुठे ही करता येतो. जप केला की चटकन मन एकाग्र व्हायला मदत होते. काही वेळा जप केल्याने आपला आत्मविश्वास वाढला असेही अनुभवास येते. जप हा भक्ती मार्गातला साधनेचा सर्वात सोपा प्रकार आहे. फक्त इष्टदेवतेचे स्मरण, असा जप सहज शक्य असतो. किंवा
हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे
हा सर्वगुरू मान्य जपही करता येतो.
पण जप करण्या आधी त्याची पद्धती व्यवस्थित माहिती करुन घेणे आवश्यक राहील.
जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील तीन प्रमुख प्रकार आपण पाहू या. खालील माहिती वाचल्या नंतर लगेच जप करण्याची घाई करू नये. ज्या प्रकार चा जप गुरू ने दिला असेल तोच करावा. यासाठी योग्य गुरू फार महत्त्वाचा असतो. मन एकाग्र करून जप केला पाहिजे. जप ही एक प्रकारची सिद्धी आहे आणि ती साधनेतून मिळवावी लागते हे ध्यानात ठेवावे.
तर अशा या जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी प्रमुख जपांचे प्रकार व परिणाम आपण पाहू या.
वाचिक जप
- वाचेने केलेला जप म्हणजे वाचिक जप. म्हणजे मोठयाने उच्चार करून मंत्रांचे पठण. प्रत्येक शब्द त्यातील वर्ण सुयोग्य प्रकारे अनेकवार उच्चारले जातात. अत्यंत साधी आणि सोपी क्रिया असते. परंतु मनाची एकाग्रता यात अपेक्षित आहे.
वाचिक जप केल्याने मेंदु मध्ये काही घटना घडू लागतात. यामुळे मेंदूतील Broca या विभागावर परिणाम होतो. हा विभाग जप केल्याने उद्दीपित होती असे म्हणतात. ब्रोका हा विभाग मेंदू मध्ये फ्रंटल लोबच्या खाली असतो. ब्रॉडमन एरिया 44 आणि 45 असे त्याचे दोन भाग आहेत. ब्रोका आणि फ्रंटल लोब यांचे एकमेकातील संबंध अजून पूर्णपणे सुस्पष्ट झालेले नाहीत. परंतु ते उद्दिपीत होतात हे आढळते.
पण एरिया 45 हा प्रि फ्रँटल कॉर्टेक्सला जास्त जोडलेला आहे. यांचा संबंध अर्थात भाषा या विषयाशी आहे. आणि वाचिक जप हा भाषेतूनच केला जातो.
त्याच वेळी निर्णय क्षमता हे महत्त्वाचे कार्य फ्रंटल लोब करतो. आणि निर्णय शब्दबद्ध करण्यासाठी ब्रोका विभाग मदत करतो असा त्यांचा एकमेकांशी संबंध आहे हे सिद्ध झाले आहे.
यानुसार वाचिक जपाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
जप कसा करावा याची शास्त्रशुद्ध विवेचन आपल्या ऋषींनी केलेले आहे. ते ग्रंथ शोधून त्याचे अधिक अध्ययन आपण केले पाहिजे असे वाटते.
उपांशु जप
मन एकाग्र करणे आणि भाषिक केंद्राची मदत म्हणून वाचिक जप कार्य करतो. आता उपांशु जप आणि त्याचे परिणाम पाहू या. वाचिक जपामध्ये मन एकाग्र होण्याची प्राथमिक सवय झाली आहे. त्या पलिकडे पोहचण्याची साधना झाली की मग उपांशु जपाची साधना सुरू होते.
वाचिक जप ही जप साधनेतील पहिली पायरी आहे उपांशु जप ही पुढील. हा जप करतांना जिभेची हालचाल होते परंतु स्वर मात्र निव्वळ आपल्याला ऐकु येतील इतके कमी असतात. याचे कारण म्हणजे आता बाह्य आवाज 'दाबून टाकण्याची आवश्यकता' उरलेली नसते. मनाचा ताबा अधिक प्रबळ झालेला असतो.
अर्थात बाह्य जगात कितीही कोलाहल असला तरी मन स्थिर व एकाग्र असल्याने त्याचा आपल्या साधनेवर परिणाम होत नाही. आणि स्थितप्रज्ञता हे कोणत्याही भारतीय अध्यात्मिक साधनेतील उद्देश्य असते.
उपांशु जप करत असताना मेंदुच्या सर्व भागांवर परिणाम होतो. कारण सर्व भाग आपल्याला एकाग्रतेसाठी
मदत करतात. परंतु त्यातीलही मेंदुतील पुढील भागावर म्हणजे फ्रंटल लोबवर जास्त परिणाम होते असे आढळते.
हा विभाग स्वतः वरील नियंत्रण राखण्याचे कार्य करतो. या शिवाय मनाची एकाग्रता ठेवण्यासही
हा भाग मदत करतो. रोज केलेल्या उपांशु जपाने या भागात कायमचे बदल घडतात. हे बदल एकाग्रता आणि स्व-नियमन यासाठी उपयोगी पडतात. या शिवाय काही प्रमाणात सेरेबेलम या स्मरणशक्तीचे नियंत्रण करणार्या भागावरही या जपाचा परिणाम होतो. तसेच ब्रेन स्टेम म्हणजे मेंदुचा मध्य भाग, हा संदेशांची देवाणघेवाण नियंत्रित करतो. हा भाग उपांशु जपात कार्यरत होतो. उपांशु जपामध्ये हा विभाग एकाग्रतेचे संदेश फ्रंटल लोबला देतो आणि मग फ्रंटल लोबला तसे कार्य करण्याची सवय लागते.
मानस जप
अतीव आनंदही नको आणि दु:खी मन:स्थिती ही नको. स्थितप्रज्ञपणे समत्वाने जगाकडे पाहण्याची दृष्टी आणण्यासाठी आपल्या ऋषींनी अनेक साधना विकसित केल्या होत्या त्यातली प्राचीन साधना म्हणजे जप! स्थितप्रज्ञतेकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. पण स्थितप्रज्ञ राहणे फार अवघड आहे. पण मनाला सवय करून जास्तीत जास्त काळ स्थितप्रज्ञ राखता यावे यासाठी सामान्यजनांचा मार्ग जप हा आहे.
वर आपण वाचिक जप, उपांशु जप व त्याचे मेंदूवरील परिणाम पाहिले आहेत. आता आपण सर्वात उच्च कोटींचा जप म्हणजे मानस जप याचा विचार करू या.
हा जप करताना आपल्याला मिळालेल्या गुरूमंत्रावर संपूर्ण एकाग्रता अपेक्षित आहे. त्यातील प्रत्यके अक्षराचा विचार करायचा आहे. वाचिक जपात इतर आवाज आपल्याला येऊ नयेत म्हणून आपण मोठ्याने जप करून स्वतः ला या भौतिक जगापासून वेगळे करतो. उपांशु जप करताना बाहेरील आवाजापेक्षा मनातील प्रभावी एकाग्रता वाढलेली असते. पण मानस जपात निव्वळ विचारांच्या आधारे आपण स्वतःला स्थितप्रज्ञतेकडे नेतो.
या एकाग्रतेचा उपयोग आपल्या मेंदुला अनेक प्रकारे होतो. वाचिक जपामध्ये भाषेचे केंद्र उद्दीपित, उपांशु जपात फ्रंटल लोब कार्यरत तसा मानस जपात प्रि फ्रंटल कॉर्टेक्स आणि इन्फेरियर फ्रंटल जायरस हे विभाग काम उद्दिपित होत असावेत. हे दोन्ही विभाग मेंदुमध्ये विचार प्रोसेस करतात. प्रि फ्रंटल कॉर्टेक्स कपाळापासून ते ब्रह्मरंध्रा पर्यंत हा पसरलेला असतो. हे दोन्ही मिळून आपल्या विचारांना प्रोसेस करण्याचे कार्य करतात. तसेच यांच्या खालचा भाग स्मृती म्हणूनही काम करतो. इन्फेरियर फ्रंटल जायरस हे आपल्या विचारांचा पैलू बदलण्याचे काम करतात. म्हणजे कल्पना सुचण्यासाठी आवश्यक बाबी पुरवत असते. प्रि फ्रंटल कॉर्टेक्स आणि इन्फेरियर फ्रंटल जायरस हे दोन्ही मिळून अतिशय प्रभावी कल्पना सुचू शकतात.
या जपात बहुदा ब्रेन स्टेमही काम करत असावा कारण ब्रेन स्टेम सर्वच मेंदुतील कार्याचे नियोजन करत असतो.
अशा रितीने मानस जपाने आपण आपल्या विचार पद्धतीला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वापरू शकतो.
मेंदुतील न्युरॉन्स जपाने कसे प्रभावित होतात हे सुद्धा तपासून पाहिले पाहिजे. परंतु त्यावर ठाम असे काही लेखन सहजतेने हाती लागले नाही. तज्ञांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
नियम
आता या माहितीमुळे 'आपणही जप करावा' असे वाटत असेल तर लगेच तसे करू नका. कारण याचे काही नियम आहेत. त्याविषयी अधिक विवेचन पुढील भागात.
जप हा कुठेही करता येतो. परंतु साधना म्हणुन करत असल्यास नियम आवश्यक असतात. म्हणून जप नेहमी गुरूदेवांच्या सल्ल्यानेच करावा. जप या साधनेचे तीन प्रकार वाचिक, उपांशु आणि मानस हे आपण पाहिले.
अजुनही जपाचे प्रकार आहेत परंतु ते योग साधनेत मोडतात व प्राणायाम सहीत करावयाचे आहेत जसे रेचक कुंभक इत्यादी. जप करून मनाची एकाग्रता साधण्याची सोपी युक्ती वापरायची आहे. आपली प्रज्ञा आणि बुद्धी तेज करण्यासाठी याचा वापर व्हायला हवा आहे. जप आणि त्याचा मेंदुच्या भागांवर होणारे परिणाम पाहिले आहेत. तेव्हा भारतीय ऋषींनी जप हा साधन म्हणून वापरला आहे असेही कदाचित म्हणता येईल.
आपले गुरू या जप साधना संदर्भात देतील तो मंत्र जपावा. आपल्या गुरूदेवांच्या मार्गदर्शनानुसार जप करावा.
जप शक्यतो सकाळच्या वेळी करावा. आधी गार पाण्याने स्नान करावे. जप करण्यासाठी एक जागा असेल तर उत्तम. ही जागा नित्य स्वच्छ असावी. या जागेवर बसण्यासाठी सुती वस्त्र असावे. जप करण्याचा संख्या संकल्प सोडणार असल्यास संकल्प सोडल्यानंतर त्याची कोणतीही वाच्यता करू नये. कारण एकदा संकल्प सोडला की सोडला!
जपाआधी कुणाचीही निंदा करू नये. हिंसा क्रोध काम मोह आणि असत्य या विकारातून दूर असण्याचा प्रयत्न असावा. भुक अथवा तहान लागलेली नसावी. मन विचारांवर वाहू लागले तर तर त्याला परत एकाग्रतेकडे आणावे.
जपा आधी कुणाशी वाद असू नये तसेच कुणाचे आशिर्वाद घेऊनही जपास बसू नये.
काही प्रसंगी जप पुर्ण होत नाही. सर्वांना संसारीक बंधने असतात. अशावेळी मनाला त्रास असु नये. चित्त स्थिर असु द्यावे. जप झाला नाही अशी रुखरुखही असू देऊ नये. जे झाले ते ईश्वर चरणी सोडावे आणि स्वस्थ मनाने कार्यास लागावे. जी नियतीची इच्छा त्या प्रमाणे होणार आहे हे ध्यानात असावे. परत पुढील वेळी शांतपणे जपास बसावे. जप करण्या आधी मन निर्भय असावे.
थोडक्यात निर्विकार मनाने जपास बसावे. परंतु ईश्वर आणि गुरू यांच्या प्रति श्रद्धा व विश्वास मनात असावा.
माळ
जपा साठी माळ वापरणार असल्यास माळ एकशे आठ मण्यांची असावी असे म्हणतात. माळ सिद्ध करून घेतल्यास उत्तम. यासाठी निरनिराळे मंत्र आहेत. आपले गुरूजी ही माळ सिद्ध करून देऊ शकतील. जप करताना माळेचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये. तसेच माळेचा मध्य - या सुमेरू म्हणतात- तो पार करू नये. त्यावेळी माळ सुलट करून जप पुढे न्यावा. काही वेळा माळ वस्त्राखाली झाकलेली असावी असे म्हणतात. परंतु यावर मतांतरे आहेत.
टिपः माळ कशी वापरावी, कोणत्या बोटांचा कसा स्पर्श करावा या विषयी काही पाठभेदही आहेत. त्यासाठी आपल्या गुरूदेवांचे किंवा गुरुजींची मार्गदर्शन घ्यावे. कदाचित येथे सदस्य ही यावर लिहू शकतील. काही वेळा जप करताना मनावर काही ताण येत आहे असे वाटल्यास जप थांबवावा! मन शांत झाल्यावर परत सुरू करावा.
जप हा आपल्या इष्टदेवतेसाठी आहे तसाच आपल्या आनंदासाठीही आहे हे नित्य ध्यानात ठेवा.
अशा रितीने जप लेख संपन्न झाला.
आपल्याला आपला जप आणि त्यातून मिळणारा आनंद लाभू देत हीच प्रार्थना!
||जय श्री गुरूदेव दत्त||
वाचने
45102
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसादही देऊ नयेत हेही
हा हा हा
In reply to प्रतिसादही देऊ नयेत हेही by एस
खिडकी!!! अरारारा एस भाऊ,
In reply to प्रतिसादही देऊ नयेत हेही by एस
लेख वाचला ह्याची पोच. इशारा
ह्म्म
In reply to लेख वाचला ह्याची पोच. इशारा by यशोधरा
असो :) मला तरी लेख साध्य
In reply to ह्म्म by निनाद
सहमत.
In reply to लेख वाचला ह्याची पोच. इशारा by यशोधरा
+१११
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचक म्हणून इशारा अपमानस्पद
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी फक्त प्रतिसाद वाचले आणि
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान
लेख आवडला. खूप चांगली माहिती
गुरु विन नाही दूजा आधार
कोणत्याही प्रकारचा जप असो
सेफ??????
In reply to कोणत्याही प्रकारचा जप असो by वैभव पवार
सेफ म्हणण्या पेक्षा कानाला
In reply to सेफ?????? by अभ्या..
ओके ओके, मला वाटलं मंत्रांचे
In reply to सेफ म्हणण्या पेक्षा कानाला by विशुमित
हो नक्कीच
In reply to ओके ओके, मला वाटलं मंत्रांचे by अभ्या..
हो नक्कीच
In reply to ओके ओके, मला वाटलं मंत्रांचे by अभ्या..
हा मुद्दा बरोबरआहे.
In reply to हो नक्कीच by वैभव पवार
कोणत्याही प्रकारचा जप असो तो
In reply to कोणत्याही प्रकारचा जप असो by वैभव पवार
हो बरोबर
In reply to कोणत्याही प्रकारचा जप असो तो by शाम भागवत
जप आपोआप व्हायला लागणे ही
In reply to हो बरोबर by वैभव पवार
:)
In reply to जप आपोआप व्हायला लागणे ही by शाम भागवत
धन्यवाद!
..
वॉव
In reply to .. by राघव
अरे वा!
In reply to वॉव by शाम भागवत
पण गुरू कुठून शोधायचा?
जप किंवा नामस्मरण या विषयावर
अधिक
In reply to जप किंवा नामस्मरण या विषयावर by श्रीगुरुजी
नक्की नाव लक्षात नाही. परंतु
In reply to अधिक by निनाद
गुगल प्ले वर जा.
In reply to नक्की नाव लक्षात नाही. परंतु by श्रीगुरुजी
गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा whatsapp group आहे
In reply to गुगल प्ले वर जा. by शाम भागवत
किरुचे प्रवचन वाचनही उत्तम
In reply to गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा whatsapp group आहे by nanaba
३६६ आहेत
जप
सहमत
In reply to जप by चित्रगुप्त
चपखल
In reply to जप by चित्रगुप्त
स्टॉप द जप !
सुई
In reply to स्टॉप द जप ! by संजय क्षीरसागर
दीर्घकालीन साधना भ्रमीष्टावस्थेत नेते...
In reply to स्टॉप द जप ! by संजय क्षीरसागर
एका मित्राच्या वडिलांना दीर्घकालीन जपसाधनेमुळे
In reply to दीर्घकालीन साधना भ्रमीष्टावस्थेत नेते... by nanaba
धन्यवाद
In reply to एका मित्राच्या वडिलांना दीर्घकालीन जपसाधनेमुळे by संजय क्षीरसागर
जपापासुन जपलेलंच बरं
माझ्या अनुभवानुसार आपोआप
सहमत
In reply to माझ्या अनुभवानुसार आपोआप by शाम भागवत
मनात म्हणजे मेंदूत सतत काही तरी अॅक्टीविटी चालू असण्यापेक्षा
In reply to माझ्या अनुभवानुसार आपोआप by शाम भागवत
अति
तुमच्या प्रतिसादात "कुठेही
In reply to अति by निनाद
:)
In reply to तुमच्या प्रतिसादात "कुठेही by संदीप डांगे
अती नाही म्हणजे नक्की किती ?
In reply to अति by निनाद
दणदणीत! वेलकम ब्याक सर!!
In reply to अती नाही म्हणजे नक्की किती ? by संजय क्षीरसागर
बरं!
In reply to अती नाही म्हणजे नक्की किती ? by संजय क्षीरसागर
जप अशक्य नाही, अनावश्यक आहे.
In reply to बरं! by निनाद
हे
In reply to जप अशक्य नाही, अनावश्यक आहे. by संजय क्षीरसागर
निनाद, तुम्हांला जप करण्यात
In reply to हे by निनाद
सहमत!
In reply to निनाद, तुम्हांला जप करण्यात by यशोधरा
जप वेगळा आणि कामाची मानसिक रिहर्सल वेगळी
In reply to हे by निनाद
जप करणे व होणे या दोन
नाम संकीर्तन ... साधन पै सोपे
प्रतिसादातल्या दोन्ही मुख्य गोष्टी अधांतरी आहेत
In reply to नाम संकीर्तन ... साधन पै सोपे by पाणक्या
अजपाजप म्हणजे...
जप करण्याने काही काळ विचार,
तिचा नाव
जप(नाम) महात्म्य
संपूर्ण सहमत
In reply to जप(नाम) महात्म्य by llपुण्याचे पेशवेll
असो,
मी तरी जप करणार बॉ.
In reply to असो, by संजय क्षीरसागर