Skip to main content

चीज शंकरपाळे

लेखक इशा१२३ यांनी मंगळवार, 25/10/2016 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
शंकरपाळे साहित्य : मैदा :दोन वाटी चीज किसलेले :एक वाटी जिरे जाडसर पुड :एक चमचा मीठ : चविनुसार तेल :दोन चमचे खायचा सोडा : चिमुटभर Sahity कृती : प्रथम मैदा व सोडा चाळून घेणे.त्यात किसलेले चीज,जिरे पुड,मीठ घालून एकत्र करावे.या मिश्रणात तेल गरम करुन घालावे.आता हे तेल मैद्यास चांगले चोळून घ्यावे. या मिश्रणात बेताने पाणी घालत घट्ट मळून घ्यावे.अर्धा तास हा भिजलेला गोळा तसाच ठेऊन द्यावा. Sahity १ एक गोळा पोळपाटावर लाटून त्याचे शंकरपाळे कातुन घ्यावेत.कडकडीत तेल तापवून त्यात अलगद कापलेले शंकरपाळे सोडून मंद आचेवर एकसारखे तळून घ्यावेत.तळलेले शंकरपाळे गार होउ द्यावेत.गार झाल्यावर छान कुरकुरीत होतात. शंकरपाळे आता मस्त एखाद्या डिप मधे बुडवून नाहीतर चहा बरोबर शंकरपाळे खा.नुसतेही छान लागतात. लहान मुलांनाही हे शंकरपाळे खुप आवडतात.

वाचने 19113
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

वाह ! हवीच होती हुकुमी शंकरपाळ्यांची कृती. मैद्या ऐवजी कणिक चालते का? की मऊ पडतील शंकरपाळे?

छान दिसत आहेत ग चीज शंकरपाळे, स्वाती

वाह! बरे झाले ही पाकृ समजली. नैतर रोज दुपारी काय खायला द्यायचे हा प्रश्न असतो. फोटू पाहून लगेच करायला घ्यावेत असे वाटतेय.

मिपा मालक आणि संपादक लोक कुठे गेले? इथे एक तिन चार आयडी बॅन करायचे हेत. लगेच केडी, इशा यांना बॅन करावे ही नम्र विनंती. सध्या गणपा, सानिका थोडे शांत आहेत त्यांना राहू द्या.

दिवाळीत तुमच्या घरी एक चक्कर टाकायला हवी :-)

अगदी चीज होत असेल असे वाटते. पा कृ आवडली फराळी मदतनीस नाखु

सोपी पाककृती,फोटोपण मस्त आलेत.

वा.. मस्तच.. फराळ बनवून पाकृ टाकायलाही जमवत आहेस म्हणून खास कौतुक! :)

मस्त.. रेडीमेड चीज बाईट्स वगैरे प्रकार घेण्यापेक्षा कधीही चांगले.. करायला सोपी पाकृ आवडली.

दिवाळीत नाही पण नक्की करून बघणार, आणि तुला फोटो पण पाठवणार!

केल्या केल्या केल्या काल केल्या....कणीक, बारीक रवा, चीज, चिली फ्लेक्स, ईटालिअन हर्ब घातले झक्कास झाल्यात. धन्यवाद ग ईशा.

छान दिसत आहेत.

धन्यवाद सगळ्यांना! हो ग,हर्ब्ज घालुन छान होतात,मी तशा लांब पट्ट्या कापून तळते, मस्त दिसतात.

धन्यवाद सगळ्यांना! हो ग,हर्ब्ज घालुन छान होतात,मी तशा लांब पट्ट्या कापून तळते, मस्त दिसतात.

पीझझा टॉपिंग आणि काळी मिरी घालून केले.. मस्त झाले आहे.

आपण मीठा ऐवजी साखर किंवा गुळ वापरून केलेल्या पाळ्यांना ही शन्करपाळे (हिंदीत शक्करपारे) म्हणतो . तरी यांना चीझ नमकपारे म्हणावे का ? चीझ शक्करपारे चांगले लागतील असे वाटत नाही.