रायडिंग नॉस्टॅल्जिया
रॉयल एनफिल्डच्या धाग्यावर मी एक कमेंट केली होती. त्यातच नवीन धागा असावा असे मला (उगाचच) वाटून गेलं. म्हणून हा प्रपंच. तुमच्या आठवणीच्या जुन्या बाईक्स/स्कूटर्स असतीलच ना. त्यातलं काय आवडलं, काय आता हवं आहे त्यासाठी हा नवीन धागा.

जावा, येझ्दी या बाईक्सचा एक काळ होता. नंतर राजदूतने त्यांचं मार्केट खाल्लं. पण अजूनही त्या गाड्या पाहिल्या की कुठं तरी काळजाचा ठोका चुकतो राव. आजच्या जेन-वायच्या पोट्ट्यांना खरेच या गाड्या किती अपील होतील कुणास ठाऊक. टाईमलेस क्लासिक डिझाईन आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ साधून महिंद्राला काही जादू करता येईल काय? आजपावेतो तरी त्यांच्या टू व्हीलर डिव्हिजनला हवे तसे रुपडे लाभले नाहीये. कदाचित जावा आणि बीएसए हे दोन ब्रॅंड विकत घेऊन महिंद्रा ते करु शकेल. आनंंद महिंद्रा आणि त्यांच्या थिंकटॅंकने काहीतरी भारी प्लॅन नक्की आखला असावा. (अवांतर: यासाठी एक नवाच धागा हवाय)माझ्या आवडत्या गाड्यांपैकी काही म्हणजे रॉयल एनफिल्ड, जावा, येझ्दी आणि सुझुकीच्या सामुराई/शाओलिन. व्हेस्पा/प्रिया स्कूटर. यातील रॉयल एनफिल्डने नव्या तंत्राचा मेळ घालून साधारण तसे डिझाईन्स पुन्हा यशस्वीरीत्या आणले आहेत. व्हेस्पादेखील पिआजिओ स्कूटर्सच्या माध्यमातून यशस्वीरीत्या जुन्या स्कूटर्सचा चार्म आणते आहेच. महिंद्राने आपल्या Classic Legends Private Limited या कंपनीमार्फत गेल्या दोन दिवसांत BSA आणि Jawa दोन जुने लिजेंड ब्रॅंड्स विकत घेऊन या सेगमेंटमध्ये श्रीगणेशा केला आहे.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
महिंद्राने आपल्या Classic
आवडीच्या विषयावरचा धागा...
बुलेटच्या धाग्यावरील प्रतिसाद
हेच लिहायला आलो होतो. रम्य
म्हणूनच टाईमलेस क्लासिक
+1
यामाहा आरएक्स-१००/१३५,
आणि वर ५-स्पीड गियरबॉक्स
५ स्पीड फक्त शाओलीन आणी
माझ्याकडे १९९५ ची shogun हाय
टोट्टल अॅग्री.
महिंद्रा काहीही करणार नाही.
मला तरी असे वाटत नाही.
सरजी तुम्ही लै भारी आवडीचा
अहो नाय केले तर
अवांतर: नोस्टलजिया वरून आठवलं
जगाचा नियम आहे डांगे साहेब,
सौ टका सहमत!
आता स्टबल म्हणजे माचो म्हणून
बघणारे सोडा, बघणारी/र्या
बापरे तुम्ही कशाला स्टबल
सध्या बाजारात जे कल्ट
हे फोटो कुठ्ल्याही मोटरसायकल
फोटो पाहिले
चांगला धागा
एखादी पडीक येझ्दी घेऊन
इंजिन ब्लॉकचं आणि
होती माझ्याकडे. खर्च म्हणाल