✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुख्यमंत्री कायद्याची दलाली करत आहेत का ?

स
साहना यांनी
Tue, 10/25/2016 - 05:33  ·  लेख
लेख
स्वभावाला औषध नसते त्याप्रमाणे केजरीवालने काही तरी मूर्खपणाचे विधान केले, आप चा कुणी आमदार विनयभंगाच्या आरोपात गुंतला, काँग्रेस वाल्याने राहुल गांधींची स्तुती केली, राहुल गांधींनी बोबड्या बोलांत काही तरी घोळ केला, भाजप वाल्यानी विलेक्शन जवळ येताच राम नाम घेतले आणि राज ठाकरे ह्यांनी गुंडगिरी करून शेवटच्या वेळी शेपूट खाली घातली ह्यांत आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. संघ वाल्यानी शेपूट आधीपासून ठेविले अनंते तैसेचि ठेवावे नावाने गुंडाळून ठेवले असल्याने त्यांनी कितीही निष्क्रियता दाखवली तरी आश्चर्य नाही. पण मुखमंत्र्यांनी जाहीर रित्या धमकी देणाऱ्या गुंडाची भेट घेऊन मनधरणी वगैरे करावी हे थोडे आश्चर्यकारक वाटले. त्यातल्या त्यांत खंडणी आर्मी फंडाला वगैरे देण्याचा तोडगा म्हणजे तर कायदा धाब्यावर बसवण्याचे काम वाटते. मुख्यमंत्र्यानी आपली ऑफिस ची शपथ तर तोडली आहेच त्याशिवाय फुटकळ गुंडापुढे जाहीर रित्या लोटांगण घालून खंडणी वसुलीला legitimacy दिली आहे असेच वाटते. हेच सर्व कार्य गुपचूप पडद्या मागे केले असते तरी विशेष आश्चर्य नव्हते. ह्या मुळे इतर गुंडाना बळ चढणार आहे पण असले तोडगे काढायला मुख्यमंत्र्याना भाड्यावर घ्यायला सर्वानाच परवडेल असे नाही. ह्यापुढे सर्वच पातळीवर नगरपालिका, पंचायत, जिल्हा, शहर वार्ड इत्यादी ठिकाणी हे असले फडनसवी दलाल उत्पन्न होऊन कायद्याची दलाली करतील असे वाटते. येथील विचारवंतांना काय वाटते ? ह्या शिवाय आता राज ठाकरे (आणि इतर स्वयंघोषित गुंड मंडळींनी) फडणवीसांशी वाटाघाटी करून आपले रेट कार्ड करावे काय? १. मेहंदी हसनची गझल ऐकली : १००० प्रत्येक गाण्यामागे रुपये आर्मी फंडाला द्यावे. २. आफ्रिदीची विनोदी इंग्रजी ऐकली : १०० रुपये आर्मी फंडाला द्यावे. ३. पाकिस्तानी एंटरटेनमेंट चा अनलिमिटेड पॅक हवा असेल तर महिन्याला ५० हजार रुपये आर्मी फंडाला द्यावे. ४. महिलांनी फवाद खानचे विडिओ पहिले तर तितकाच वेळ अण्णा हजारे ह्याचे असम्बन्ध भाषण youtube वर ऐकावे. ५. पण ह्या सर्व गोष्टी करण्याआधी राज ठाकरे ह्यांच्य कडून NOC आणणे भाग आहे आणि हाताळणी (manhandling) फी म्हणून १% देणे आवश्यक आहे. चीन विरोधी सुद्धा वातावरण असल्याने खालील तोडगे सुद्धा कदाचित फडणवीसांनी आधीच प्री-अप्रूव्ह करावेत. १. हक्का नूडल्स खाल्यानंतर पतंजली गोमुत्राची एक बाटली घेऊन तोंड साफ (gargle) करावे. २. जॅकी चेन/ब्रूस ली किंवा इतर कुंग फु चा चित्रपट पहिला तर त्या नंतर रामदेव बाबा ह्यांचे कपालभाती किमान २ तास पाहावे नाही तर राजीव दीक्षित ह्यांचे वाह्यात कॉन्स्पिरसी थेअरी विडिओ किमान १ तास पाहावेत. ३. घरी फेंगशुई विषयक गोष्टी असतील ३००० रुपये खर्चून नजर रक्षक यंत्र आणि ५००० रुपये खर्च करून श्री यंत्र सुद्धा ठेवावे. आपले काही धोरण नसेल तर इतर लोक आपल्या तोंडांत आपले धोरण कोंबतात आणि ते चालविण्याशिवाय इतर उपाय राहत नाही. सध्या हिंसक प्रवृत्ती असणाऱ्या संघटना, कोर्टांत धुमाकूळ घालणाऱ्या संघटना, मीडिया कंट्रोल करणारे दलाल इत्यादी लोक सरकारला वाट्टेल तसे फिरवत आहेत असे वाटते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8459 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

कुछ भी?

नेत्रेश
Tue, 10/25/2016 - 06:11 नवीन
नाखुच्या हात दाखवून अवलक्षण या धाग्यावरचे गुरुजींचे प्रतीसाद वाचा. मुख्यमंत्र्यांनी केवळ दीवाळीच्या काळात राज्यात शांतता नांदेल सासाठी (कोणताही बेकायदेशीर मार्ग टाळुन) तोडगा काढला आहे.
  • Log in or register to post comments

दिवाळीच्या वेळी कायदे

साहना
Tue, 10/25/2016 - 06:17 नवीन
दिवाळीच्या वेळी कायदे धाब्यावर बसवून खंडणी वसूलणाऱ्या बरोबर वाटाघाटी करणे कायदेशीर आहे असे कुठे लिहिले आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

वाटाघाटी करु नये

नेत्रेश
Tue, 10/25/2016 - 06:18 नवीन
असे तरी कुठे लिहीले आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

मुख्यमंत्रीन्नी फंडात पैसे

हृषीकेश पालोदकर
Tue, 10/25/2016 - 16:33 नवीन
मुख्यमंत्रीन्नी फंडात पैसे टाकणे हा ऐच्छिक विषय आहे सांगितलं होतं. राज ठाकरेंनी त्याला "द्यावेच लागतील"असा पवित्रा घेतला. याबाबत करण जोहर जास्त सांगु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

आणी असे तोडगे

नेत्रेश
Tue, 10/25/2016 - 06:17 नवीन
कोर्ट (कँपा कोला प्रकरण), मुन्सीपाल्टी (बेकायदेशीर इमारती दंड घेउन कायदेशीर करणे) वगैरे सरकारी खाती करतच असतात. माध्यमे संपुर्ण गोष्टीचा आढावा न घेता त्यातील एखादी छोटी गोष्ट घेउन धुरळा उडवीतच असतात. आपण त्यात कीती सामील व्हायचे ते आपणच ठरवायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

"संपूर्ण गोष्ट"

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 08:16 नवीन
"संपूर्ण गोष्ट" मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बसलेल्याकडून ऐकण्यास उत्सुक! बाकी लेख भारी सहनाताई! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

बाकी लेख भारी सहनाताई! ;)

मोदक
Tue, 10/25/2016 - 18:06 नवीन
बाकी लेख भारी सहनाताई! ;) म्हणजे लेखातील प्रत्येक मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात असे गृहीत धरावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काय जबरदस्ती लावलीये राव?

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 18:10 नवीन
काय जबरदस्ती लावलीये राव? प्लिज गिव व ब्रेक! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

प्रश्न सोयीचा नाही म्हणून

मोदक
Tue, 10/25/2016 - 20:01 नवीन
प्रश्न सोयीचा नाही म्हणून ब्रेक हवा आहे का..? तसे स्पष्ट सांगा मग. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मोदकराव! जे मी म्हटले नाही

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 21:08 नवीन
मोदकराव! जे मी म्हटले नाही (लेखातल्या प्रत्येक शब्दबद्दल सहमती इत्यादी) ते माझ्या तोंडात कोंबण्याला ब्रेक द्या म्हणालो! काय चाललंय काय राव? उगीच! तुम्हाला जे गृहीत धरायचे असेल ते गृहीत धरायला तुम्ही स्वतंत्र आहात पण हे आत्ता अति होतंय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मोगा/चित्रा/चंपा यांचा आयडी ब्लाॅक झाला.

बोका-ए-आझम
Tue, 10/25/2016 - 08:59 नवीन
साहना त्याची भरपाई करत आहेत. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 10/25/2016 - 11:16 नवीन
थोडे भाजपाला, थोडे मनसेला व उरलेले सैनिक फंडाला..असा ह्यांचा कयास.
  • Log in or register to post comments

अरे वा

सुबोध खरे
Tue, 10/25/2016 - 11:41 नवीन
अरे वा माईसाहेब फार काळाने अवतरल्या माईसाहेब तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि तुम्हा दोघांना(ह्यांच्यासकट) सा . न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

एक दृश्य

सुज्ञ
Tue, 10/25/2016 - 12:32 नवीन
चित्रपट कोणत्याही चर्चेविना प्रदर्शित होतो . काही चित्रपट गृहांवर तुंबळ हाणामाऱ्या होतात. केजो चे फोटो वगैरे जाळले जातात. अर्थात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतोच. मिपावरील धागे : काय मुख्यमंत्री पाकिस्तान एजंट आहेत. तिकडे आपले जवान लढत असताना हे असले चित्रपट कोणत्याही चर्चेविना मुद्दाम प्रदर्शित होऊ दिले जातात व दंगे होतात याचाच अर्थ यांना दंगे माजवून अशांतता निर्माण करायची आहे. पोलीस ही फक्त बघ्याची भूमिका घेत होते . राज व मुख्यमंत्रांच्यात म्हणूनच चर्चा न होता डील झ्हाली वगैरे वगैरे थोडक्यात काहीही करून आम्हाला आमची गरळ.. खदखद .. हतबलता . जळजळ मोकळी करायची आहे . तुम्ही कोणताही मार्ग निवडा
  • Log in or register to post comments

कोणता कायदा धाब्यावर बसवला कळेल काय?

नया है वह
Tue, 10/25/2016 - 12:56 नवीन
?
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Tue, 10/25/2016 - 15:07 नवीन
अरे बास आता एकच विषय किती पिळाल.
  • Log in or register to post comments

मिपा चर्चा क्रमांक २

सुज्ञ
Tue, 10/25/2016 - 15:20 नवीन
चित्रपट कोणत्याही चर्चेविना प्रदर्शित होतो . काही चित्रपट गृहांवर तुंबळ हाणामाऱ्या होतात. केजो चे फोटो वगैरे जाळले जातात. अर्थात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतोच. मिपावरील धागा : काय मुख्यमंत्री पाकिस्तान एजंट आहेत. (धागाकर्ते / त्या ??) रंभाबाई : इथे सर्वसामान्य लोक मरत असताना आपले पोलीस फालतू चित्रपटास संरक्षण देत बसलेत .. हेच का ते अच्छे दिन. एक्सपीरियन्स फर्स्ट हैण्ड : नक्कीच.. कधी नाही ते मी रंभाबाई शी सहमत काड्यासारू : मराठे मोर्चे , सरकारची ढासळलेली प्रतिमा वगैरेंवरून लक्ष हटवण्यासाठी असले दंगे ठाकर्यांनकरवी घडवले जात आहेत. मुख्यामंत्र्यांची त्यांना साथ आहे . मी किती समतोल : पूर्वीच्या सरकारमध्येही असे दंगे होत होते मात्र त्यावेळी कारणे वेगळी होती . सीमेवर लढनाऱ्या जवानांचा विचार न करता पोलिसांना एखाद्या क्षुल्लक चित्रपटास संरक्षण देण्याच्या कामात उगाच जुंपले जात आहे . असले कोणतेही धागे व प्रतिक्रिया न येता योग्य चर्चेने मार्ग सोडवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. . पोलिसांचे कष्ट वाचवल्याबद्दल तर अजून अभिनंदन .
  • Log in or register to post comments

मिपावरल्या धाग्यांना घाबरून

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 16:21 नवीन
मिपावरल्या धाग्यांना घाबरून मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला असावा असेच म्हणावे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ

तुम्ही तसा अर्थ काढण्यास

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 10/25/2016 - 17:33 नवीन
तुम्ही तसा अर्थ काढण्यास काहीच हरकत नसावी! बाकी सुज्ञ यांच्याशी १००% सहमत! घोडे पे बैठं के गया तो भी प्रॉब्लेम उतरकार उसके साथ चला तो भी प्रॉब्लेम! सिनेमागृह फोडून आंदोलन केली असती तरी प्रॉब्लेम, न करता तोडगा काढला तरी प्रॉब्लेम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हे हे! सिनेमगृह फोडतील ह्याची

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 17:37 नवीन
हे हे! सिनेमगृह फोडतील ह्याची खात्री होती? म्हणजेच मनसे गुंडांची संघटना. गुंडासोबत वाटाघाटी हि कायदा व सुव्यवस्था राखण्याची नविन पद्धत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

सिनेमागृह फोडणे (किंवा

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 10/25/2016 - 18:25 नवीन
सिनेमागृह फोडणे (किंवा आंदोलनामध्ये हिंसक गोष्टी करणे) फक्त हेच एकमेव गुंडगिरीच्या व्याख्येत येत नसल्याने अजून कुठल्या कुठल्या गोष्टी गुंडगिरी या सदरात मोडतात आणि त्यामुळे कुठले कुठले पक्ष गुंड ठरतात हे आपणास सांगणे न लागो! मुळात हा देश अत्यंत कायदेशीरपणे चालू आहे आणि सर्व कायदे हे फक्त जनतेच्या हितासाठीच वापरले जातात असे मानायला मन धजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वोक्के! म्हणजे बीजेपी सरकार

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 18:30 नवीन
वोक्के! म्हणजे बीजेपी सरकार कायद्यानुसार देश व राज्य चालवण्यात कमी पडतंय, त्यामुळे असे आडमार्गाने तोडपाणी करावे लागते हे आपण कबुल करताय, व गुरुजी, हे बघा काय म्हंतायत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

बरीच माहिती आहे की तुमच्याकडे

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 10/25/2016 - 20:48 नवीन
बरीच माहिती आहे की तुमच्याकडे, तोडपाणी वगैरे झाल्याची! अहो 70 वर्षे होत आली कायदा येऊन...बीजेपीचं काय सांगताय! कायदा हा काही फक्त सरकारने दंडुका हातात घेऊन चालवण्याचीच गोष्ट नाही हेही सांगणे न लागो! बाकी तुमचं बिजेपीला झोडपाण्याचं धोरण चालुद्या!!योग्य मुद्दे असतील तेव्हा आम्हीही येऊ तुमच्या साथीला..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

"एखादा चित्रपट तुफान चालला की

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/25/2016 - 15:44 नवीन
"एखादा चित्रपट तुफान चालला की त्याच्या पठडीतले अनेक चित्रपट येतात" असा बॉलिवूड/हॉलिवूडचा शिरस्ता आहे. त्यामुळे, बॉलिवूडसंबंधीच्या धगधगत्या विषयावर धडाधड धागे येऊ लागणे, हे सहजपणे होत असावे ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हा विषय चित्रपट संबंधी आहे?

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 16:19 नवीन
हा विषय चित्रपट संबंधी आहे? लोक नाराज आहेत ते चित्रपमुळे नव्हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मुद्दा, त्याच 'यशस्वी'

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/25/2016 - 18:15 नवीन
मुद्दा, त्याच 'यशस्वी' विषयावर अनेक धागे (पक्षी : माझापण अजून एक धागा !), हा आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हा हा, त्या अँगल ने बरोबर! ;)

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 18:20 नवीन
हा हा, त्या अँगल ने बरोबर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

दिवाळीच्या काळात शांतता हा

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 16:55 नवीन
दिवाळीच्या काळात शांतता हा अगदी तकलादू मुद्दा आहे, जणू सर्व जनता दिवाळी साजरी करायला घरदार सोडून थेटरात जाऊन बसते, कुछ भी?
  • Log in or register to post comments

केजरीवाल आनि राहुल जसे

श्री गावसेना प्रमुख
Tue, 10/25/2016 - 17:25 नवीन
केजरीवाल आनि राहुल जसे प्रत्येक मोदि विरोधी मुद्द्या ला समर्थन देतात तसच डांगे भाऊ व तत्सम मोदींचे वैचारीक? विरोधक असल्या/अशा प्रकारच्या धाग्यात बी जे पी ला झोडायला बघतात की काय.
  • Log in or register to post comments

गुड जोक! अर्थात बीजेपीला

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 17:32 नवीन
गुड जोक! अर्थात बीजेपीला झोडले तेव्हाच लोकांना 'झोडल्या जाणे' दिसतं ह्याला काय म्हणावे बरे? ;) झोडल्या जाण्याची भीती असेल, राग येत असेल तर राजकारण करू नये...शिंपल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

हाच मुद्दा तुम्हालाही लागू पडतो.

बोका-ए-आझम
Tue, 10/25/2016 - 17:36 नवीन
मग नाखुंच्या धाग्यावर तुमची चिडचिड का होत होती म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कधी केली चीडचीड मी? बाकीचेच

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 17:38 नवीन
कधी केली चीडचीड मी? बाकीचेच चिडलेत माझ्यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

संदीप डांगे - Mon, 24/10/2016

मोदक
Tue, 10/25/2016 - 20:00 नवीन
संदीप डांगे - Mon, 24/10/2016 - 22:16 गुरुजी, फालतू टिवटिव बंद करा. घटनात्मक पदावर बसून काय निर्णय घ्यावे ह्याची अक्कल नसेल तर ... असो. डोकं फार तापलं आहे. उगा उणादुणा शब्द निघायचा... रात्री दिलेला प्रतिसाद आहे, नीट आठवून बघा बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हे होय? हे चिडणे रास्तच आहे

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 21:05 नवीन
हे होय? हे चिडणे रास्तच आहे एक सामान्य नागरिक म्हणून... माझ्यावर कुणी टीका केली म्हणून मी चिडलो असं दिसतंय का त्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर

मार्मिक गोडसे
Tue, 10/25/2016 - 18:04 नवीन
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दंगे होणारच नाही कशावरून ? सरकारच्या गाफिलतेचा फायदा घेऊन एखादा 'सर्जिकल हल्ला' होण्याचीच शक्यता जास्त वाटते.
  • Log in or register to post comments

आणखी एक, सत्ताधाऱ्यावर चुकत

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 18:08 नवीन
आणखी एक, सत्ताधाऱ्यावर चुकत असेल तर टीका करणे जनतेचा हक्क आहे, सत्ताधारी चांगले काम करत असेल तर उपकार करत नाहीत, त्यांना त्यासाठीच निवडून दिले आहे! आम्ही मिपावर आलो तेव्हा काँग्रेसच्या सुदैवाने ते सत्तेवर नव्हते, जे कुठेच नाहीत (उदा. राहुल गांधी, कान्हयाकुमार व तत्सम) त्यांच्यावर टीका हवीच असेल तर ते द्वेषस्वरूप आहे! भाजप सत्तेवर येण्याआधी आम्ही मिपावर नव्हतो, आमच्या पूर्व इतिहासाबद्दल, राजकीय भूमिकेबद्दल इथे कुणास ठाऊक नाही त्यामुळे आम्ही 'भाजपचेच कट्टर विरोधक' हा समज बाळगणारे बुद्धिमान आहेत! ;) असो!
  • Log in or register to post comments

जे कुठेच नाहीत (उदा. राहुल

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/25/2016 - 18:20 नवीन
जे कुठेच नाहीत (उदा. राहुल गांधी, कान्हयाकुमार व तत्सम) त्यांच्यावर टीका हवीच असेल तर ते द्वेषस्वरूप आहे! चला आता एक नक्की झाले. निवडणूकीत हार झाली की कोणताही गोंधळ घाला, सगळे गुन्हे माफ ! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मी आत्ता सत्ताधाऱ्यांवर करत

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 18:28 नवीन
मी आत्ता सत्ताधाऱ्यांवर करत असलेल्या टिकेबद्दल बोलतोय, मुद्दा तेवढाच आहे, त्याबाहेर खेचण्याची काय गरज? अर्थात चर्चेत अजून उपस्थित झाले नसलेले व होऊ शकणारे मुद्दे आपण नेहमीच मांडता, आताही तसेच आहे की काय? रच्याकने, मनसे सत्तेत नाही तरी ती करत असलेल्या गोंधळावर मी टीका करत आहे, हे सोयीस्कर टाळणे योग्यच असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ते वाक्य इंट्रेस्टिंग वाटले

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/25/2016 - 18:43 नवीन
ते वाक्य इंट्रेस्टिंग वाटले म्हणून त्याचा होणारा अर्थ 'स्मायल्यांसकट' टाकला. ;) या लेखाच्या विषयावरच्या चर्चेतून 'लघुत्तम एकमत' सुद्धा निघण्याची सुतराम शक्यता नाही असा अंदाज असल्याने तिच्यात भाग घेतला नाही. हिरीरीने चाललेल्या चर्चा वाचण्यात / पाहण्यात मजा येते, यात वाद नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ओके! ;)

संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 18:45 नवीन
ओके! ;) पण काळ सोकावतोना!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

या लेखाच्या विषयावरच्या

सुबोध खरे
Tue, 10/25/2016 - 18:52 नवीन
या लेखाच्या विषयावरच्या चर्चेतून 'लघुत्तम एकमत' सुद्धा निघण्याची सुतराम शक्यता नाही असा अंदाज असल्याने तिच्यात भाग घेतला नाही. हिरीरीने चाललेल्या चर्चा वाचण्यात / पाहण्यात मजा येते, यात वाद नाही. :) डॉक्टर साहेब बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

भाजप सत्तेवर येण्याआधी आम्ही

बोका-ए-आझम
Tue, 10/25/2016 - 21:43 नवीन
भाजप सत्तेवर येण्याआधी आम्ही मिपावर नव्हतो, आमच्या पूर्व इतिहासाबद्दल, राजकीय भूमिकेबद्दल इथे कुणास ठाऊक नाही त्यामुळे आम्ही 'भाजपचेच कट्टर विरोधक' हा समज बाळगणारे बुद्धिमान आहेत! ;)
हे पार बाऊन्सर गेलं. तुम्ही मनसेत होतात हे तुम्ही सांगितलं (खफ वर) म्हणून कळलं. तुम्ही तिथे भ्रमनिरास झाला म्हणून बाहेर पडलात. तुम्ही भाजपचा विरोध करत असताना मिपावर पाहिलं गेलेलं आहे त्यामुळे लोक तुम्हाला भाजपविरोधक समजताहेत. आता तीन पर्याय अाहेत - १. तुम्ही भाजपचे वैचारिक विरोधक आहात. २. तुम्ही सरकारमध्ये जो पक्ष आहे त्याचे विरोधक आहात, मग ते कोणीही असोत. ३. तुम्ही विरोधी मत मांडता - हे जाणून घेण्यासाठी की विरोधक त्यांची मांडणी कशी करताहेत. दुस-या शब्दांत सांगायचं तर Devil's Advocate. या तिघांपैकी काय आहे ते सांगा. दररोज toss करून ठरवत असाल की आज काय भूमिका घ्यायची तर तेही सांगा! ;) (हे ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आश्चर्य

गामा पैलवान
Tue, 10/25/2016 - 22:39 नवीन
साहना,
पण मुखमंत्र्यांनी जाहीर रित्या धमकी देणाऱ्या गुंडाची भेट घेऊन मनधरणी वगैरे करावी हे थोडे आश्चर्यकारक वाटले.
महिला पोलिसांच्या अब्रूवर घाला घातल्याचं आश्चर्य वाटलं नाही का? पोलिसांना पेटवल्याचं आश्चर्य वाटंत नाही का? वाहतूक पोलिसास दंडुक्याने बडवून ठार मारलेलं आश्चर्यजनक आहे का नाही? सहज म्हणून विचारतोय. जमल्यास सांगा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

महिला पोलिसांच्या अब्रूवर

भक्त प्रल्हाद
Tue, 10/25/2016 - 23:27 नवीन
महिला पोलिसांच्या अब्रूवर घाला घातल्याचं आश्चर्य वाटलं नाही का? पोलिसांना पेटवल्याचं आश्चर्य वाटंत नाही का? वाहतूक पोलिसास दंडुक्याने बडवून ठार मारलेलं आश्चर्यजनक आहे का नाही?
आश्चर्य नाही संताप आहे म्हणुनच आज ते सत्तेवर नाहीत. या सरकारकडुन अपेक्षा आहेत म्हनुन हा वाद घालतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वांझोटा संताप काय कामाचा?

गामा पैलवान
Wed, 10/26/2016 - 00:09 नवीन
भक्त प्रल्हाद, तुमचा वांझोटा संताप कुचकामी आहे. याउलट राज ठाकऱ्यांचा संताप मात्र पोलिसांना धीर देणारा आहे. मग पोलीस कशाला राज ठाकऱ्यांवर हात उचलतील? नेमका हाच तिढा फडणवीस जाणून आहेत. म्हणून त्यांना पोलिसी हस्तक्षेप टाळायचा आहे. कायद्याची दलाली वगैरे भातुकलीचे खेळ खेळायला कोणाला वेळ आहे इथे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भक्त प्रल्हाद

विरोध

सुज्ञ
Tue, 10/25/2016 - 23:52 नवीन
ज्यांना विरोधात बोलायचेच आहे त्यांच्यावर इलाज नाही ( कारण त्यांना तेच करायचे आहे ) . मात्र इतरांसाठी, मुख्यमंत्र्यांनी चर्चा का घडवली? त्यात राज ठाकरे ना बोलावले ? राज ठाकरे नी ५ कोटी मागितले तर ते मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच असणार ( कोणतेही पुरावे आधार नसताना ) किंवा पोलीस संरक्षण देण्याचे आधी आणि नंतर कायम असताना अथवा कुठल्याच दंगेखोर वक्त्यव्यासाठी मुख्यमंत्र्यांचे समर्थन नसताना केवळ ते राज ठाकरे यांना भेटले म्हणून ही चर्चा झ्हाल्यावर सरकार संरक्षण देणार नाही , डील झ्हाली वगैरे स्वताच समजून घेणे असले मुद्दे फारच बालिश (अथवा केजरीवाली) वाटत नाहीयेत का ? होय सरकारच्या चुका दाखवल्याचे पाहिजेत परंतु त्यासाठी हा मुद्दा अत्यंत तकलादू आहे. योग्य सारासार विचार करून १००% चुकीचेच काही घडले तर नक्कीच कडाडून विरोध केला जाईल मात्र हे असले फुटकळ मुद्दे उपस्तित करून विरोध करत बसणे म्हणजे ... असो .
  • Log in or register to post comments

मुख्यमंत्री कायद्याची दलाली करत आहेत का ?

अर्धवटराव
Wed, 10/26/2016 - 03:36 नवीन
अजीबात नाहि. मुख्यमंत्र्यांनी जे केलं ते योग्यच होतं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा