Skip to main content

ताज्या घडामोडी :भाग २

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 14/08/2016 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?

वाचने 70000
प्रतिक्रिया 306

प्रतिक्रिया

गोव्यामध्ये मध्ये नुकतीच BRICS परिषद पार पाडली, ह्यातून भारताच्या हाती नक्की काय लागलं याची चिकित्सा झाली पाहिजे. मुळात ब्रिक्स हि संघटना जगातील अर्धी लोकसंख्या आणि 25% GDP असणाऱ्या राष्ट्रांचा समूह आहे, परंतु आतापर्यंत तरी यातून ठोस असा निर्णय किंवा दिशा दिलेली दिसून आलेली नाही, याच कारण प्रत्येक देशाचे न जुळणारे डावपेच आणि ध्येयधोरणे. मोठा असा निर्णय म्हणून पाहायला गेलं तर New development bank ची स्थापना हेच दिसून येत त्यातही त्याचा प्रमुख भारतीय असणं एवढच ती काय समाधानाची गोष्ट. मात्र चीन ने आशियाई इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट बँकेची स्थापना केल्यामुळे ब्रिक्स बँक झाकोळली गेली आहे. गोव्यात झालेल्या परिषदेत भारताला भरीव अस काही मिळालं नाही, चीन आणि रशिया ने पाकिस्तान चा उल्लेख करायचा टाळलं तसेच UN ने जागतिक दहशतवादी ठरवलेल्या लष्कर ए तोयब्बा तसेच जैश च सुद्धा उल्लेख नव्हता. त्यातल्या त्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सीरिया मधील एका दहशतवादी संघटनेचा मात्र उल्लेख होता ज्याचा भारताला धोका नाहीये. खरं तर ह्या परिषदेमध्ये व्यापार, पायाभूत सुविधा, गरिबी ह्या मुद्यांना सुद्धा दहशतवाद बरोबर महत्व द्यायला हवं होतं पण असं झालं नाही. अर्थात काहीच झालं नाही असं नाही परंतु ह्यावेळाची परिषद पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद वरती केंद्रित झाली त्यातून भरीव अस काहीच हाती लागलं नाही. आधीच सार्क हि संघटना भारत आणि पाकिस्तान च्या वादाची बळी ठरलीय आता ब्रिक्स हि संघटना भारत आणि चीन वादाची बळी ठरताना दिसतेय. आता भारत BIMSTEC हि संघटना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पाहूया पुढं काय होतंय ते. BRICS Summit: China bulldozed India's security concerns as Russia looked the other way

In reply to by अमितदादा

अमितदादा, माझं मत थोडं वेगळं आहे. ब्रिक्स हा राष्ट्रसंघाप्रमाणे अधिकृत गोट नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक पेढीस पर्याय म्हणून ब्रिक्स विकासपेढी स्थापली जाणं हे मोठंच यश मानायला हवं. चीनने स्वत:ची पेढी स्थापल्याने फारसा फरक पडणार नाही. चिनी पेढी नाणेनिधी व जगत्पेढीस पर्याय नाहीये. पाकिस्तानचा उल्लेख टाळला गेला हे एका अर्थी बरंच झालं. भारत पाकिस्तानास बघून घेण्यास स्वत: समर्थ आहे असा अर्थ सूचित होतो. पाकिस्तानचे राजनैतिक कोंडी करण्यासाठी ब्रिक्स हे व्यासपीठ फारसं प्रभावी नाही. हा गोट म्हणजे जागतिक मतबांधणी करण्याचे साधन म्हणून बघायला पाहिजे. नेमकं अशाच अर्थाचं राजकारण रशियाने केलं आहे. कसं ते पाहूया. अल नुसरा या सीरियाच्या आतंकवादी संघटनेचं नाव घेण्यामागचं कारण माझ्या परीने उलगडून सांगतो. क्लिंटन बाईंचे अल नुसराशी गाढ संबंध आहेत हे जगजाहीर आहे. हे नाव घेण्यामागे रशियास (म्हणजे पुतीन यांना) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी क्लिंटन बाई नको आहेत असं सूचित करायचं आहे. या सूचनेस उर्वरित ब्रिक्स राष्ट्रांचं मूक अनुमोदन आहे. हा यामागचा गर्भितार्थ आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अल नुसरा या सीरियाच्या आतंकवादी संघटनेचं नाव घेण्यामागचं कारण माझ्या परीने उलगडून सांगतो. क्लिंटन बाईंचे अल नुसराशी गाढ संबंध आहेत हे जगजाहीर आहे. हे नाव घेण्यामागे रशियास (म्हणजे पुतीन यांना) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी क्लिंटन बाई नको आहेत असं सूचित करायचं आहे. या सूचनेस उर्वरित ब्रिक्स राष्ट्रांचं मूक अनुमोदन आहे. हा यामागचा गर्भितार्थ आहे.
हे जरी असलं तरी ह्यातून रशिया चे ध्येय साध्य झाले, पाकिस्तान ला दहशतवादावरून एकटं पाढण्याचं जे भारताचं ध्येय आहे त्यात ब्रिक्स ने खोडा घातला. अर्थात भारत आंतराष्ट्रीय पातळीवर हे काम उत्तमरीत्या करत आहे पण ब्रिक्स मध्ये भारताच्या ह्या भूमिकेशी चीन आणि रशिया ने अधिकृत रित्या सहमती दर्शवली नाही ह्या परिषदेत हा माझा मुद्दा होता. असो तुमच्या मताचा आदर आहे.

जयललिताच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे म्हणे. तिची गुंगी/झोप येणारी औषधे थांबविली असून आता ती बसायला लागली आहे अशी माहिती तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली आहे. (AIADMK supporters conduct special prayers for the speedy recovery Tamil Nadu Chief Minister Jayalalithaa, at the Apollo Hospitals in Chennai on Thursday.) http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/jayalalithaa-taken-off… या बातमीखालील काही निवडक प्रतिक्रिया (वरील चित्र पाहून व खालील प्रतिक्रिया वाचून महाराष्ट्र खूपच प्रगल्भ व परीपक्व आहे असं जाणवलं) - - Wow.....! I will celebrate Diwali the moment Amma is discharged from the hospital. - It is a good sign. Mass prayers have their effect. Faith moves mountains. - Lord Arunachala has answered our prayers - The prayers displayed in the picture accompanying your news, have proven effective. - There is no parallel to collective praying which indeed brought about tremendous improvement in Amma's health. I too join millions in praying for her speedy recovery and reoccupy the CM's chair soon to continue her able leadership! - we look forward to her return to power. Astrology has proved itself right. - Great news our state needs her for another 2 term ___________________________________________________________________________ आणि कायअप्पावर फिरणारा हा एक विनोद - In a Tamilnadu school - Teacher: Why were you absent for 3 days? Student: Lakshmi died. Teacher: Who is Lakshmi? Student: My Appa's wife. Teacher: Why don't you say your amma died? Student: If I say amma died, police will arrest me.

'ए दिल है मुश्किल' या चित्रपटावरील बंदीचा वाद आता सुटला आहे. यात एक पाकडा असल्याने हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवू दिला जाणार नाही अशी धमकी मनसेने दिली होती. हा चित्रपट दाखवू नये अशी चित्रपटगृहमालकांना मनसेकडून तंबी देखील मिळाली होती. पाकिस्तान सातत्याने भारतात दहशतवादी हल्ले करत असल्याने पाकड्यांना भारतीय चित्रपटात घेऊ नये अशी भावना जनतेत निर्माण होत होती. मनसेने या जनभावनेचा अचूक फायदा उचलून चित्रपटाविरूद्ध मोहीम सुरू केली. सर्वसाधारणपणे शिवसेना अशा मोहीमा सुरू करते व काँग्रेससारखे पाकिस्तानप्रेमी पक्ष त्याला विरोध करतात असेच आतापर्यंत दिसून आले आहे. यावेळी शिवसेना काही भूमिका घ्यायच्या आतच मनसेने हा मुद्दा उचलल्याने सेनेची पंचाईत झाली व सेनेने या मुद्द्यावर मौन पाळले. दुसरीकडे पाकड्यांविरूद्ध तीव्र जनभावना असल्याने काँग्रेससारख्या पाकिस्तानप्रेमी पक्षांना या भूमिकेला उघड विरोध करता आला नाही व त्यांनी देखील मौन पाळले. महाराष्ट्रात भाजपचे सरकार असल्याने सरकारला चित्रपटगृहांना संरक्षण द्यावेच लागले असते. फडणविसांनी देखील चित्रपटगृहांना संरक्षण देण्याचे मान्य केले. दुसरीकडे सुरवातीला 'कलेला व कलाकारांना देश, धर्म इ. च्या सीमा नसतात', 'कलाक्षेत्राला राजकारणापासून वेगळे ठेवा' इ. नेहमीचीच फार्सिकल विधाने काही चित्रपट निर्मात्यांकडून यायला लागली. परंत चित्रपटाविरूद्ध जनभावना तीव्र असल्याचे लक्षात आल्यावर करण जोहरने संभावितपणाचा आव आणून साळसूदपणे एक चित्रफीत प्रसिद्ध करून आपणही देशभक्त आहोत, आपल्यासाठी देश सर्वप्रथम आहे इ. बाष्कळ बडबड केली. त्याच्या चित्रफितीतील एक वाक्य अत्यंत संतापजनक होते. 'आपण गतवर्षी हा चित्रपट सुरू केला त्यावेळी आजच्या तुलनेत पूर्ण वेगळी परिस्थिती होती, त्यामुळे एका पाकड्याला मी चित्रपटात घेतलं..' असा संतापजनक दावा त्याने केला. पाकिस्तान गेली २५ वर्षे भारतात दहशतवादी हल्ले करीत आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतात आजवर शेकडो अतिरेकी हल्ले करून हजारो निष्पाप नागरिकांचे, पोलिसांचे व सैनिकांचे प्राण घेतले आहेत. पाकड्यांची भारतात दहशतवादी हल्ला केला नाही असे गेल्या २५ वर्षात एकही वर्ष नव्हते. अशावेळी गतवर्षी परिस्थिती आजच्यापेक्षा पूर्ण भिन्न होती असे समर्थन अत्यंत संतापजनक होते. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेवटी फडणविसांनी करण जोहर व राज ठाकर्‍यांबरोबर बैठक घेऊन तोडगा काढला. चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्यातील मृत सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा फलक दाखविण्याचे जोहरने कबूल केले. त्याचबरोबर सैनिक कल्याण निधीला ५ कोटींची देणगी देण्याचेही कबूल केले व भविष्यात एकाही पाकड्याला चित्रपटात घेणार नसल्याचे कबूल केले. फडणविसांनी एकाअर्थी बैठक बोलावून राज ठाकर्‍यांना एक सन्मानजनक सुटकेचा मार्ग दिला. समजा मनसेने ऐकले नसते तर शेवटी पोलिसांना सर्व चित्रपटगृहांना संरक्षण द्यावेच लागले असते. परंतु त्यातून दगडफेक, चित्रपटगृहांचे नुकसान, तोडफोड, लाठीमार इ. होऊन शेवटी चित्रपट दाखविला गेलाच असता व तसे होऊन शेवटी आपलाच विजय झाला या भ्रमातून जोहर व इतर निर्मात्यांनी भविष्यात पाकड्यांना घेणे थांबविले नसते. भविष्यात एकाही पाकड्या नटाला, नटीला, गायकाला, तंत्रज्ञाला चित्रपटात घेणार नाही असे जोहर व निर्मात्यांच्या संघटनेने जाहीर केले आहे. ते आपला शब्द कितपत पाळतील याविषयी माझ्या मनात दाट शंका आहे. मनसेशी तडजोड केल्याने शिवसेनेचा तिळपापड झाला आहे तर फडणविसांनी मनसेसारख्या अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून मनसेचे ब्लॅकमेल सहन केले अशी टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी इ. पाकिस्तानप्रेमी पक्षांनी केली आहे. जनतेचे प्रतिनिधी नसलेल्या अकाल तख्त, अखिल आसाम विद्यार्थी संघटना, मिझोराममधील लाल डेंगा, काश्मिरमधील फुटिरतावादी हुरीयतचे नेते इ. शी बोलणी करून समझोता करताना आपण जनतेचे प्रतिनिधी नसलेल्या अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण गेलो होतो असे काँग्रेसला वाटत नाही. परंतु त्यांच्या मते मनसेशी बोलणी करणे म्हणजे अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण जाणे. असो. काँगेसचा ढोंगीपणा उघड होण्याची ही पहिली वेळ नाही व शेवटचीही नसणार. पाकिस्तान हा देश आपला शत्रू आहे व सर्व पाकिस्तानी आपले शत्रू आहेत. पाकिस्तान भारताला नष्ट करण्याचा गेली ७० वर्षे प्रयत्न करीत आहे. शत्रूबद्दल मनात कायम संतापाची व तिरस्काराचीच भावना असली पाहिजे. त्याशिवाय शत्रूचा पराभव करता येणार नाही. ही भावना बोथट झाली तर आपला प्रतिकारही बोथट होतो व त्यामुळे शत्रूचा पराभव होणे अवघड होते. त्यामुळे भारताने पाकशी कोणतेही संबंध न ठेवता सतत पाकचा प्रतिकारच केला पाहिजे. सीमेवर आपले सैनिक शस्त्रांच्या सहाय्याने पाकशी लढत आहेत. केंद्र सरकार राजकीय पातळीवर पाकशी लढत आहे. सामान्य जनतेने पाकड्यांवर पूर्ण बहिष्कार टाकून व पाकड्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता या लढाईत आपला वाटा उचलला पाहिजे. पाकड्या कलाकारांना दिलेल्या मानधनातून पाक सरकारकडे कराच्या रूपाने त्यातील काही भाग जातो व पाक सरकार त्याच पैशातून दहशतवादी भारतात पाठवून भारतात हल्ले करते. म्हणजे आपण तिकिटांच्या पैशातून जे पैसे निर्मात्याला देतो तेच पैसे शेवटी आपल्याचविरूद्ध वापरले जातात. त्यामुळे ज्या ज्या चित्रपटात पाकडे नटनट्या, गायक इ. आहेत ते चित्रपट कधीही पहायचे नाहीत असा मी खूप पूर्वीच निश्चय केला होता व आजतगायत तो निश्चय पाळलेला आहे. इतरांनी सुद्धा या चित्रपटांवर बहिष्कार टाकून निर्मात्यांचे आर्थिक नुकसान करून त्यांना धडा शिकवावा अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपा सर्कार बोलले होते .... लोकानी बघायचे तर बघा अन्यथा नाही , त्यानी स्वतः ठरवावे. राज ठाकरे हे राज्य / केंद्र सरकारचे अधिकृत अधिकारी / प्रतिनिधी आहेत का ? पाकिस्तानी कलाकाराला त्या १०० रु तिकिटातील एक रुपया जात असेल , तो पैसा - पाक कर - दहशतवादी , हीच लांबड लिंक उरलेल्या ९९ रुपयाला - भारत शासन कर - भारतीय सैन्य अशीही लावता येईल ना ? ६५ वर्षे दहशत सुरुच आहे , हे गुजरात्मध्ये माहीत नाही का ? गुजरात पाक आयात निर्यात सुरुच आहे ना ? अडाणीच्या पॉवर प्रोजेक्टला जर त्यानी पाकला वीज विकली तर हाच नियम लावणार का ? निर्णय घ्यायला राज्य सर्कार एकटे समर्थ नव्हते का ? दुसरा राजकीय पक्ष जो सरकारातही नाही व विरोधी पक्षातही नाही , तो का मदतीला घेतला म्हणे ? ...... उत्तरे द्यायची तयारी नसेल तर नुसते हहपुवा लिहिलेत तरी चालेल.

In reply to by श्रीगुरुजी

अनधिकृत स्टेकहोल्डरच्या मागण्यांपुढे मान तुकवून त्यांना शरण जाणे. असो. काँगेसचा ढोंगीपणा उघड होण्याची ही पहिली वेळ नाही व शेवटचीही नसणार. गुर्जी, काँग्रेसच्या काळात माय नेम ईज खान, जोधा अकबर , बच्चनचा कोणतातरी सिनेमा .. अशा अनेक सिनेमाना विरोध झाला होता. पण सरकारने सिनेमावाल्याना संरक्षण दिले होते. कुणापुढेही मांडवली केली नव्हती. सैन्याला दिलेला वाटा हा एक टिप ऑफ आइसबर्ग असण्याची शक्यता आहे. मांडवलदार / मुम/ मनसे/ बीजेपी असे अनेक इतर वाटेही असू शकतील. बरं, एखादा निर्माता गरीब आहे, त्याचे बजेट कमी आहे, तो पाच कोटी देऊ शकत नाही, त्याचे काय करायचे ?

शत्रूबद्दल मनात कायम संतापाची व तिरस्काराचीच भावना असली पाहिजे.
'साडीच्या' बदल्यात 'शाल' देउन तिरस्कार व्यक्त करायचा. असेच ना?

खुद्द मुख्यमंत्री असली मांडवली करतो हे अत्यंत दुर्दैवी आहे. सैन्यानेच आम्हाला असली मदत नको म्हणून यांना नकार दिला तर आवडेल.

गुर्जी प्लीज, टक्याच्या धाग्याची लिंक द्या न हो, आगाऊ मागणीच नोंदवतो आहे, त्याचं काय आहे मी मोगाचे प्रश्न डांगेंचा उद्वेग अन ढेरेंनी विचारलेले प्रश्न तिघांनाही प्लस वन देतोय. नंतर तुमची गैरसोय व्हायला नको. =))

अमेरिकेतील सूर्याजी पिसाळावर हिरीरीने चर्चा करणार्‍यांसाठी खमंग बातमी. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/varun-under-attack-over-d… संरक्षण दलाची माहिती उघड केल्याचा वरुण गांधींवर आरोप

पाकिस्तानात पुन्हा एकदा अतिरेक्यांनी हल्ला करून ६० जणांना मारले आहे. आपण जे पेरले त्याची इतकी भयंकर विषारी फळे आपल्याला मिळतील हे पाकिस्तानला अतिरेकी जन्माला घालताना अजिबात वाटले नसेल. एवढे होऊनसुद्धा पाकिस्तान सुधारण्याची सुतराम चिन्हे नाहीत. अर्थात आता पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट इतके प्रबळ झाले आहेत की पाकिस्तान सरकार ठरवून सुद्धा त्यांना आवरू शकणार नाही. हा देश असाच नष्ट व्हावा हीच मनोमन इच्छा आहे. http://indiatoday.intoday.in/story/all-you-need-to-know-about-4-hour-qu…

हिंदुत्वाताची पुन्हा एकदा नव्याने व्याख्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सात न्यायमुर्तींच्या बेंचने हा निकाल दिला. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी याचिका दाखल करून हिंदुत्वाची पुन्हा एकदा व्याख्या करण्याचे अपिल केले होते. न्यायालयाने २१ वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाची समीक्षा करण्याचे अपिल केले होते. सेटलवाड यांच्याशिवाय शमसूल इस्लाम आणि दिलीप मंडल यांनी ‘राजकारणापासून धर्माला वेगळे करण्याची’ मागणी केली होती. मुख्य न्यायमुर्तींसमवेत न्यायमूर्ती मदन लोकूर, एस. ए. शोब्दे, ए. के. गोयल, यू. यू. लळीत, डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांचा या बेंचमध्ये समावेश होता. ‘हिंदुत्व ही जगण्याची शैली असून हिंदू हा कुठला धर्म नसल्याचे १९९५ मध्ये न्यायालयाने म्हटले होते. डिसेंबर १९९५ मध्ये न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी हिंदुत्वावर मत मागून लोकप्रतिनिधी कायद्यान्वये उल्लंघन करत नसल्याचे म्हटले होते. न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी आणि आर. वाय. प्रभूसारख्या नेत्यांनी केलेल्या अपिलावर आपले मत व्यक्त केले होते. हिंदुत्वाला केवळ हिंदू धर्माच्या मान्यतेच्या आधारवरच समजू नये. ही भारतीय लोकांची जीवन जगण्याची पद्धत आहे, असे म्हटले होते. या निर्णयांतर्गत न्यायालयाने मनोहर जोशी यांची निवडणूक योग्य ठरवली होती. प्रचारादरम्यान मनोहर जोशी यांनी महाराष्ट्र सर्वात प्रथम हिंदू राज्य बनेल असे म्हटले होते. http://www.loksatta.com/desh-videsh-news/supreme-courts-denies-to-revie…

श्रीगुरुजी, तुम्ही म्हणता की पाकिस्तान हा देश असाच नष्ट व्हायला हवा आहे. मात्र इथे एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की बळी गेलेले लोकं पाकिस्तानी नसून बलुची आहेत. अशा हल्ल्याच्या वेळेस आपण बलुची बांधवांच्या बाजूने उभं राहायला हवं. आ.न., -गा.पै.

डॉ. शरद पवारसाहेबांचे अभिनंदन! लालू, जयललिता यांच्या पाठोपाठ आता पवारसाहेबही डॉक्टर होणार. इतरांच्या तुलनेत फारच उशीरा त्यांना हा सन्मान मिळतोय. 'देर आये लेकिन दुरूस्त आये' असेच म्हणावे लागेल. http://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawar-get-d-litt-honora…

a चीनने असे प्रसिद्धी पत्रक काढलं याचाच अर्थ त्यांना भारतातल्या चीनी वस्तूंवरील बंदीची दाखल घ्यावीशी वाटली. म्हणजेच जरी ते म्हणत असले कि आम्हाला काही फरक पडत नाही तर मग अशी पत्रक काढावीशी का वाटली त्यांना.

लोकहो, रशिया अमेरिका युद्ध सीरिया वा पूर्व युरोप वा इतरत्र भडकू शकेल अशी शक्यता एका रशियन सेनानीने वर्तवली आहे. स्रोत : http://www.express.co.uk/news/world/724252/Russia-US-West-Cold-War-Vlad… वरील बातमीनुसार रशियाने अमेरिकेचा नवा नेता नोव्हेंबरात निवडला जाईपर्यंत सर्व राजनैतिक व्यवहार रोखून धरला आहे. तसेच रशियन शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या परदेशी शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक व्यत्ययाची तमा न बाळगता ताबडतोब घरी परतण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. १४ ऑक्टोबरच्या सुमारास रशियाने ४ कोटी नागरिकांसमवेत अणुयुद्धबचावाचं सरावसंचालन केलं. यापूर्वी इथे व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे काहीतरी घडामोडी होणार का? कुणाला तरी कसलीशी कुणकुण लागलीये का? आ.न., -गा.पै.

In reply to by शाम भागवत

शाम भागवत, तुमचा कयास बरोबर दिसतोय. रशियन विमान तुर्कस्थानने पाडल्यावर घटनांनी वेग घेतला. मात्र त्यांची दिशा पार अनपेक्षित आहे. आ.न., -गा.पै.

लोकहो, अमेरिकेचे अवकाश व क्षेपणास्त्र विभागाचे सर्वोच्च पदस्थ विद्यमान जनरल रोसी यांनी म्हणे आत्महत्या केली. बातमी : http://www.usatoday.com/story/news/politics/2016/10/28/army-generals-de… च्यायला, हे गृहस्थ मेले ३१ जुलै रोजी आणि आत्महत्या जाहीर केली गेली ती ऑक्टोबरात? जनरल रोसी यांचा खून झाला आहे हे रस्त्यावरचं शेंबडं पोरही सांगेल. अनेक प्रश्न आहेत. युरोपातल्या युद्धात अमेरिकाही उतरू पाहतेय का? उत्तर होकारार्थी असेल तर ही वेळ योग्य आहे का? इतका महत्वाचा धोरणात्मक निर्णय कोण घेतो? कसा घेतो? या निर्णयाची वैधता काय? विद्यमान अध्यक्ष बाहेर जायच्या मार्गावर असतांना सांप्रत अत्युच्चपदस्थ सेनाधिकाऱ्याचा खून होतो. याचा अर्थ काय? अर्थ स्पष्ट आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या मतास काडीइतकीही किंमत नाही. अमेरिकी निवडणूक म्हणजे एक सर्कस आहे आणि त्यातून फक्त विदूषकच निवडला जाऊ शकतो. आ.न., -गा.पै.