Skip to main content

आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं...

लेखक वटवट यांनी मंगळवार, 04/10/2016 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं, कि जरा भीती वाटते.... खरंच.. नाही शब्दात सांगता येत, कि नेमकी किती वाटते... म्हणजे बघ ना.. आता तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि चंद्र, रात्र ह्या सार्यांना टाळून कसं चालेल..? आणि टाळलंच तर साधं पान तरी कसं हालेल..? आता पान हललं कि पानगळ ठरलेली.. मला उद्ध्वस्त करणारी वादळं ठरलेली.. आणि माझ्या रात्रीला तुझ्या स्वप्नांची झळ सुद्धा ठरलेली.. सोसत बसते मग बिचारी मग जेवढं सोसणं होत... मग काय, पुन्हा आभाळ भरून येतं.. बरसू लागतात मग सरींवर सरी.. आणि प्रकर्षानं आठवू लागते तुझ्या-माझ्यातली दरी.. त्या दरीचं एक टोक तू आणि मी एक टोक.. मी व्यवहारात नेहमीच मार खायचो, तुझं मात्र नेहमीच चोख.. म्हणजे बघ ना.. पाहिलेली स्वप्नं, वाहिलेले अश्रू.. सारं कसं तोलूनमापून.. आमचं सारंच अघळपघळ.. सतत हातात काळीज कापून.. आता वाटतंय तेंव्हाच सारा हिशोब जमायला हवा होता.. तोच तर ह्या वर्तमानाचा भविष्याशी असणारा दुवा होता.. हक्कानं रहायला जावं तीच अनोळखी वस्ती वाटते.. . . . खरंच... हल्ली तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि जरा भीती वाटते.. -चेतन दीक्षित
लेखनविषय:

वाचने 3708
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मला ही "फ्रेस" - ( हल्ली तुझ्यावर लिहायचं म्हटलं कि जरा भीती वाटते..) खूप छान वाटली

कचकावून भारी ! काय लिहिलंयस मित्रा ! वाह वाह वाह वाह ! जब्बरदस्त ! एक ताल आहे तुझ्या काव्याला, एक लय आहे, ठहराव आहे, सगळंच कमाल! _/\_ स्वीकारा ! लव्हड इट!

सुरेख कविता!

आता वाटतंय तेंव्हाच सारा हिशोब जमायला हवा होता..
ह्ये ज्याम भारी

व्वाह..

झकास .. मस्त जमली आहे रे चेत्या...