साहित्यः-
१. २०० ग्रॅम पनिर
२. २ कांदे बारिक चिरलेले
३. १ टोमॅटो बारिक चिरलेला
४. १ मिरची बारिक चिरलेली
५. १ चमचा धने-जीरे पावडर
६ अर्धा चमचा गरम मसाला
७. १ चमचा तिखट
८. १ चमचा आल-लसूण पेस्ट
९. तेल, मिठ, हळद
१०. पाव चमचा साखर
११. कोथिंबीर
११. १ चमचा बटर
१. पनिर गरम पाण्यात घालावे व मऊ झाल्यावर कूस्करुन घ्यावे.
२.कढईत तेल गरम करुन त्यात आल-लसूण पेस्ट व कांदा घालून परतावे
३. कांदा गुलाबी झाल्यावर बारिक चिरलेली मिरची, धने-जीरे पावडर, हळद, गरम मसाला व तिखट घालून परतावे .
४. बारिक चिरलेले टोमॅटो, साखर व मिठ घालून परतावे व त्यात कुस्करलेले पनिर घालुन पुन्हा परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी.
५. गॅस बंद करावा व बटर घालावे.
६. कोथिंबीर घालावी व डीश serve करावी.
वाचने
5583
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो दिसत
मला आवडते
फोटू दिसत
.
मस्त.
माझीही खूप आवडती डीश.