Skip to main content

पनिर भूर्जी

शुक्रवार, 06/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- १. २०० ग्रॅम पनिर २. २ कांदे बारिक चिरलेले ३. १ टोमॅटो बारिक चिरलेला ४. १ मिरची बारिक चिरलेली ५. १ चमचा धने-जीरे पावडर ६ अर्धा चमचा गरम मसाला ७. १ चमचा तिखट ८. १ चमचा आल-लसूण पेस्ट ९. तेल, मिठ, हळद १०. पाव चमचा साखर ११. कोथिंबीर ११. १ चमचा बटर १. पनिर गरम पाण्यात घालावे व मऊ झाल्यावर कूस्करुन घ्यावे. २.कढईत तेल गरम करुन त्यात आल-लसूण पेस्ट व कांदा घालून परतावे ३. कांदा गुलाबी झाल्यावर बारिक चिरलेली मिरची, धने-जीरे पावडर, हळद, गरम मसाला व तिखट घालून परतावे . ४. बारिक चिरलेले टोमॅटो, साखर व मिठ घालून परतावे व त्यात कुस्करलेले पनिर घालुन पुन्हा परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी. ५. गॅस बंद करावा व बटर घालावे. ६. कोथिंबीर घालावी व डीश serve करावी.

वाचने 5583
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाही बरका... बाकी रेसेपी लैच भारी हाये , आवडती अयट्म डिश :-) धन्यवाद

मला आवडते ही भूर्जी. फोटू असता तर मज्जा आली असती. काहीतरी गडबड होतीये वाटतं, फोटू चढवूनही दिसत नाहीये. रेवती

फोटू दिसत न्हाय !!! :( (पनिर पाकृ प्रेमी) मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

सोपी आणि छान पाकृ. आवडली. फोटो असता तर अजून मजा आली असती. --शाल्मली.

पाककृती मी अजुन केली नाही कधी ,करून जरूर पाहिन. :)