मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गर्यांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गर्यांचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात.
साहित्यः
एक वाटी ताक, एक वाटी पाणी, मीठ, दोन चमचे गर्यांचे पीठ, पाव चमचा जीरे, एक चमचा तूप, एक ओली मिरची, चिमुटभर साखर.
फोटो आंतरजालावरून साभार.
कृती:
एका भांड्यात ताक, पाणी, मीठ एकत्र करा. हवी असल्यास साखर घाला. आता यात दोन चमचे गय्राचे पीठ नीट मिसळून घ्या. गोळी राहता कामा नये. या मिश्रणाला तूपाची जिरे आणि मिरचीची खमंग फोडणी द्या. मंद गॅसवर उकळायला
ठेवा. ढवळत रहा. दाटपणा आला की गॅस बंद करा. गरमागरम प्या. नाचणीच्या आंबिली सारखीच लागते. कोथिंबीर वापरत असाल उपासाला तर वरून घाला.

वाचने
6518
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्याच प्रकारे ज्वारीची आणि
नवा पदार्थ आहे माझ्यासाठी.
खरंतर तुला माहित हवा ताई
मस्त.. तुझ्याकडे खजिना आहे
तयार मिळते?
हो मिळते बहुदा
In reply to तयार मिळते? by प्रभाकर पेठकर
गर्यांचा फार उग्रस वास येत
In reply to हो मिळते बहुदा by अनन्न्या
नाही येत
In reply to गर्यांचा फार उग्रस वास येत by सूड
ओक्के, मिळालं कुठे तर बघतो.
In reply to नाही येत by अनन्न्या
अगदी वेगळा पदार्थ आहे. छान
काय काय वेगळंच असतं बाबा
कोकणक्विन अनन्न्याची नवी झकास
हो अजया खरच करतेय
In reply to कोकणक्विन अनन्न्याची नवी झकास by अजया
वेगळा पदार्थ आहे!
झकास!