Skip to main content

गर्‍यांच्या पिठाची आंबीलः खास उपासासाठी!

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 19/10/2016 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गर्‍यांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गर्‍यांचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात. साहित्यः एक वाटी ताक, एक वाटी पाणी, मीठ, दोन चमचे गर्‍यांचे पीठ, पाव चमचा जीरे, एक चमचा तूप, एक ओली मिरची, चिमुटभर साखर. फोटो आंतरजालावरून साभार. gare कृती: एका भांड्यात ताक, पाणी, मीठ एकत्र करा. हवी असल्यास साखर घाला. आता यात दोन चमचे गय्राचे पीठ नीट मिसळून घ्या. गोळी राहता कामा नये. या मिश्रणाला तूपाची जिरे आणि मिरचीची खमंग फोडणी द्या. मंद गॅसवर उकळायला ठेवा. ढवळत रहा. दाटपणा आला की गॅस बंद करा. गरमागरम प्या. नाचणीच्या आंबिली सारखीच लागते. कोथिंबीर वापरत असाल उपासाला तर वरून घाला. gare

वाचने 6518
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

गर्‍यांचे तयार पिठ मिळते का बाजारात? करून पाहिली पाहिजे. उपासाची म्हणजे उच्च उष्मांक असणार.

In reply to by प्रभाकर पेठकर

योजक वाले, देसाई बंधु, बेहेरे बंधु या मंडळींकडे असण्याची शक्यता. याची भाकरी पण करते माझी आई! थालिपीठ पण छान होते.

In reply to by सूड

कदाचित लहानपणापासून खात असल्याने जाणवत नसेल, पण थालिपीठ, आंबील यात काहीच कळत नाही. भाकरी मात्र कळते.

In reply to by अनन्न्या

ओक्के, मिळालं कुठे तर बघतो. त्या वासापायी मी वाळवलेले गरे खाणं बंद केलं. म्हणून एकदा विचारावं म्हटलं.

कोकणक्विन अनन्न्याची नवी झकास रेसिपी. पुस्तकाची तयारी कर बयो.वेगळ्या रेसिपी असतात तुझ्या खास कोकणी.

In reply to by अजया

कोकणात पूर्वापार केले जाणारे पण आता लोप पावणारे प्रकार एकत्र करायचा प्रयत्न आहे.