Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रतापराव on Mon, 10/17/2016 - 19:56
नमस्कार मंडळी, लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे. कारण नं २ मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर. ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.
  • Log in or register to post comments
  • 39069 views

प्रतिक्रिया

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/18/2016 - 13:13

In reply to देवयानी खोब्रागडे यांचे by शाम भागवत

Permalink

आरक्षणातून संधी मिळून

आरक्षणातून संधी मिळून त्याद्वारे त्यांच्या हातून दैदिप्यमान अशा काही गोष्टी घडाव्या लागतील ^^^ पार स्फोटक काडी आहे, शामराव! आरक्षण भीक नाही, हे आता कितीवेळा सांगावे
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 10/18/2016 - 14:27

In reply to आरक्षणातून संधी मिळून by संदीप डांगे

Permalink

आरक्षण भीक नाही, हे आता

आरक्षण भीक नाही, हे आता कितीवेळा सांगावे
हे वाक्य तुम्हाला का लिहावेसे वाटल हे माहित नाही पण मला तरी आरक्षण म्हणजे शेकडो वर्षे झालेला अन्याय दूर करण्यासाठी उचलेले पाऊल वाटते. मला तरी ती भीक वाटत नाही तर ती एक अत्यावश्यक बाब वाटते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/18/2016 - 15:08

In reply to आरक्षण भीक नाही, हे आता by शाम भागवत

Permalink

शाम जी , तुमचं जे वाक्य वर

शाम जी , तुमचं जे वाक्य वर उद्धृत केलंय त्यावरून आरक्षण हे संधी उर्फ भीक आहे असे दिसतं, तसे नसेल तर क्षमस्व! लायकी नसतांना संधी मिळते असा अर्थ होत आहे असं वाटलं!
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 10/18/2016 - 15:35

In reply to शाम जी , तुमचं जे वाक्य वर by संदीप डांगे

Permalink

लायकी नसतांना संधी मिळते असा अर्थ होत आहे

नाही. नाही. अजिबात तस नाही. दलितांसाठी आरक्षण ही अत्यावश्यक गोष्ट आहे. पहिली पिढी ही या सहाय्याने वर येइल. (ज्याला माणसासारखे जगायची संधी अस कोणीतरी म्हटलेय. अन्यथा तिथपर्यंत येणे ही अशक्य आहे.) पुढची पिढी त्याही पुढे. असे करत काहीतरी दैदिप्यमान असे काहीतरी घडावे. असा तो विचार मांडला होता. सामाजिक व मानसिक उत्थानासाठी असे घडणे आवश्यक असते. अन्यथा माणूस कितीही मोठा झाला तरी हे शल्य त्याला बोचतच राहते. असो. पण जास्त काही स्पष्टीकरण न देता येथेच थांबतो. तेच योग्य राहील.
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on गुरुवार, 10/20/2016 - 15:19

In reply to आरक्षणातून संधी मिळून by संदीप डांगे

Permalink

बाबासाहेब

बाबासाहेबांबद्दल बोलताना जात बघितली जात नाही -कार्य - दर्जा बघितला जातो. त्यामुळे तुमचे विधान पटत नाही की जातच बघितली जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 10/18/2016 - 13:50

In reply to देवयानी खोब्रागडे यांचे by शाम भागवत

Permalink

तुमच्या प्रार्थनेला आक्षेप.

तुमच्या प्रार्थनेला आक्षेप. साधे माणूस म्हणून जगायची सोय आणि परवानगी मिळाली तरी पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 10/18/2016 - 14:33

In reply to तुमच्या प्रार्थनेला आक्षेप. by एस

Permalink

तुमच्या प्रार्थनेला आक्षेप.

तुमच्या प्रार्थनेला आक्षेप.
मला वाटते कोणतीही जात असो. त्या जातीत एक तरी दिप स्तंभासारखा एखादा माणूस असावा जो सतत स्फूर्ती देत राहील. याहेतूने केलेली ती प्रार्थना होती.
साधे माणूस म्हणून जगायची सोय आणि परवानगी मिळाली तरी पुरेसे आहे.
ते तर सर्व गरजूंना मिळायलाच पाहिजे पण त्याही पुढे जाऊन केलेली प्रार्थना होती ती. तरी पण माझ्या प्रार्थनेबद्दल जो त्रास झाला त्याबद्दल क्षमस्व. मला काथ्याकुटात रस नाही. मी आता थांबतो.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 10/18/2016 - 12:23

Permalink

लेखातील मूळ मुद्द्यावर भाष्य

लेखातील मूळ मुद्द्यावर भाष्य : दलित हिंदू आहेत की नाहीत. या प्रश्नाचे उत्तर हिंदू धर्मग्रंथ आणि हिंदू तत्त्वज्ञानाचा इतिहास धुंडाळल्यावर 'नाही' असे येईल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत सर्व वर्ण हे आर्य होते. दलित हे या वर्णव्यवस्थेच्या बाहेर होते. जातिव्यवस्था ही वर्णाश्रमाच्या अपूर्णतेचे सुधारित (?) रूप आहे. ती विकसित होताना वर्णव्यवस्थेबाहेरील समाजगटांना अस्पृश्य ह्या वर्गात सामावून घेतले गेले.* *अभिनिवेश आणि पूर्वग्रहरहीत चर्चेचे स्वागत आहे. त्याव्यतिरिक्त कुठलाही सहभाग नोंदवला जाणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by chitraa on Tue, 10/18/2016 - 12:42

In reply to लेखातील मूळ मुद्द्यावर भाष्य by एस

Permalink

अग्गोबै !

हिंदूनी कध्धी कध्धी कुणावर गुलामी लादली नाही , या दाव्याचे काय होणार मग ?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 10/18/2016 - 12:41

Permalink

मुळात दलित म्हणजे काय?

दलित हा एकगठ्ठा (monolithic) गट नाही. त्यातही अनेक भेद आणि उपप्रकार आणि पोटजाती आहेत. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो - किरवंत, जे अंत्यविधी करतात, तेही जातीने ब्राम्हण असले तरी व्यवहारात समाजाची त्यांच्याशी असलेली वागणूक ही दलितांना मिळते तशीच उपेक्षेची आहे. पण त्यांना आरक्षण मिळणार नाही कारण ते जातीने ब्राम्हण आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रतापराव on Tue, 10/18/2016 - 12:57

In reply to मुळात दलित म्हणजे काय? by बोका-ए-आझम

Permalink

किरवंतांना शिवत नव्हते कि

किरवंतांना शिवत नव्हते कि पाणी प्यायला मज्जाव होता?. त्यांच्या व्यवसायाला हलके समजले जात असेल. किरवंत हि जात नाही व्यवसाय आहे त्यांनी व्यवसाय सोडला तरी ते समाजात व्यवस्तिथ राहू शकतात.मात्र ज्या मागास जाती आहेत त्यांनी जुन्या काळातले व्यवसाय सोडले त्यांचा पोरगा इंजिनेर झाला तरी त्याची जात हलकीच समजली जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Tue, 10/18/2016 - 13:54

In reply to किरवंतांना शिवत नव्हते कि by प्रतापराव

Permalink

सहमत..

सहमत..
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 10/18/2016 - 19:57

In reply to किरवंतांना शिवत नव्हते कि by प्रतापराव

Permalink

किरवंतांना शिवत नव्हते कि

किरवंतांना शिवत नव्हते कि पाणी प्यायला मज्जाव होता?.
दोन्हीही. तुम्हाला किरवंतांबद्दल कितपत माहिती आहे ते माहित नाही, पण त्यांच्यावर जवळपास सामाजिक बहिष्कार घातल्यासारखी अवस्था होती.
किरवंत हि जात नाही व्यवसाय आहे त्यांनी व्यवसाय सोडला तरी ते समाजात व्यवस्तिथ राहू शकतात.
जातच आहे. ब्राम्हणांमधली. इतर कुठल्या जातीचे किरवंत आढळलेत का तुम्हाला? आणि काही जाती या व्यवसायांवरुनच आल्या आहेत. समाजाने त्यांना व्यवसाय सोडायची परवानगी दिली नाही. जशी इतर जातींनाही दिली नाही. मुळात समाज इतका लवचिक असता तर जातिव्यवस्था कधीच नष्ट झाली असती. वंशपरंपरागत तोच व्यवसाय हा जातिव्यवस्थेतला महत्वाचा मुद्दा आहे.
मात्र ज्या मागास जाती आहेत त्यांनी जुन्या काळातले व्यवसाय सोडले त्यांचा पोरगा इंजिनेर झाला तरी त्याची जात हलकीच समजली जाते.
हे दुर्दैवाने खरं आहे आणि त्याबद्दल दुमत नाही, पण किरवंत हे ब्राम्हणांमधले दलित आहेत यात शंका नाही, आणि ते दोन्हीही बाजूंनी भरडले गेलेले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रतापराव on Tue, 10/18/2016 - 12:52

Permalink

मला आपल्या समाजात दलितांबद्दल

मला आपल्या समाजात दलितांबद्दल नेहमीच दुजाभाव आढळतो. लग्न हा प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे. परंतु वर्तमानपत्रातील जाहिरातीत स्पष्टपणे लिहिलेले असते एस सी एस ती क्षमस्व. ह्याने चित्र असे उभे राहते कि ज्या वधू अथवा वराने हि जाहिरात दिलीय त्यांना दलित समाजाकडून आपल्या जाहिरातीला उत्तर येईल कि काय अशी भीती वाटत असते. स्वतंत्र भारतात जर दलितांना कोणी तारले असेल तर आरक्षणाने . आपल्यासाठी आरक्षण आहे त्यामुळे शिकायला पाहिजे हि भावना त्यांच्यात बळावत गेली. मी काही जणांची आत्मचरित्रे वाचली त्यात आमच्या घरी फार गरिबी होती वडील शाळा मास्तर होते कारकून होते असे उल्लेख आढळतात. इथे आम्हाला आमचा आजा, पणजा काय करायचा ते माहित नाही. वडिलांनी आजच्या जेवणाची सोया केली तरी दिवाळी वाटायची.त्यामुळे ती आत्मचरित्रे हास्यास्पद वाटतात. थोडक्यात एखादा दलित शहरात राहतो नोकरी करतो तो जेव्हा गावी जातो तेव्हा त्याच्या राहणीमानात फरक पडलेला गाव पाहते. तो शहरात नेमका कुठल्या खुराड्यात राहतो त्याच्याशी त्यांचा संबंध नसतो. हे आपल्याकडून मागून खाणारे लोक आज श्रीमंत बनत आहेत आपले पोर मात्र शेतात राबत आहे हि सल असते. आणि ह्याला कारणीभूत ते आरक्षणाला धरतात.आर्थिक आधारावर आरक्षण मागणाऱ्यांच्या मनात स्वतःला आरक्षण मिळण्यापेक्षा ह्यांचे आरक्षण कसे काढून घेता येईल हि चिंता असते.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/18/2016 - 13:11

In reply to मला आपल्या समाजात दलितांबद्दल by प्रतापराव

Permalink

प्रतापराव, तुम्ही अधिक लिहिले

प्रतापराव, तुम्ही अधिक लिहिले पाहिजे... प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Tue, 10/18/2016 - 13:49

In reply to प्रतापराव, तुम्ही अधिक लिहिले by संदीप डांगे

Permalink

+१११

+१११
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 10/18/2016 - 13:56

In reply to +१११ by शलभ

Permalink

+२२२२२२२२

+२२२२२२२२ मराठी आंतरजालावर दलित आणि तत्सम वर्गांचे प्रतिनिधित्त्व पुरेसे नाही. त्यामुळे दुसरी बाजू पुरेशा सबळपणे मांडली जात नाही असे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 10/18/2016 - 14:35

In reply to +२२२२२२२२ by एस

Permalink

प्रतापरावांनी

लिहिलेच पाहिजे,किमान सच्च्या अनुभवाच्या मुशीतून आलेले दाहक का असेना पण सत्य माहीती तरी पडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Tue, 10/18/2016 - 14:43

In reply to +२२२२२२२२ by एस

Permalink

आहेत

मराठी आंतरजालावर दलित आणि तत्सम वर्गांचे प्रतिनिधित्त्व पुरेसे नाही. दलित आणि सो कॉल्ड सवर्ण अशा दोन्ही वर्गाचे प्रतिनिधी आंतरजालावर पुरेशा प्रमाणात आहेत. मात्र दलित प्रतिनिधींनी फक्त अन्यायाचेच ढोल वाजवायचे आणि सवर्णांनी आपल्या ९६ कुळाचे ढोल वाजवायचे हेच काम सातत्याने चालवलेले आहे. त्या कोषातून बाहेर पडायची गरज आहे फक्त. चांगली माणसे सर्वत्र आहेत पण आपण नेहमी काळा पिवळा चष्मा घालून फिरायचे ठरले तर कोण काय करु शकतो ? आपापल्या घेटो बाहेर येऊन वावरण्यासाठी अंगी धाडस लागते जे दुर्दैवाने सामान्य माणसाच्या अंगी नसतेच पण सो कॉल्ड विचारवंत ही त्याला अपवाद नाहित. दुसरा वारंवार येणारा मुद्दा म्हणजे लग्नाच्या जाहिरातीतील एस.टी. एस. सी क्षमस्व. याने लोकांचा फारच तिळपापड होतो असे दिसते. मात्र जेव्हा लग्नासाठी जाहिरात दिली जाते तेव्हा त्या कुटूंबाला आपले लग्नाच्या व्यवहाराचे निकष ठरविण्याचा पुर्ण अधिकार आहे. तो त्यांचा वैयक्तीक मॅटर असू द्यावा. जास्तच वाईट वाटत असेल तर विरोधकांनी आपली जाहिरात देतांना ब्राह्मण, मराठा क्षमस्व लिहून टाकावे. हा.का.ना.का. जातीभेद मिटविण्यासाठी रोटी बेटी व्यवहार केलाच पाहिजे या मताशी मी तरी सहमत नाही. मात्र कोणी असा व्यवहार करु पाहत असेल त्याला विरोध करण्याचे अथवा नावे ठेवण्याचा विचार माझ्या मनात येणार नाही याची खात्री आहे. शेवटी रोटी बेटी हा वैयक्तीक व्यवहार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 10/18/2016 - 21:30

In reply to आहेत by धर्मराजमुटके

Permalink

जास्तच वाईट वाटत असेल तर

जास्तच वाईट वाटत असेल तर विरोधकांनी आपली जाहिरात देतांना ब्राह्मण, मराठा क्षमस्व लिहून टाकावे. हा.का.ना.का.
मजेशीर कल्पना... :)
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Tue, 10/18/2016 - 23:22

In reply to जास्तच वाईट वाटत असेल तर by खटपट्या

Permalink

मजेशीर कल्पना... :)

मजेशीर कसली मित्रा, असल्या मजेशीर कल्पना मुळ नावाने लिहिल्याने कदाचित प्रसंगी शाब्दिक / शारिरीक मार देखील खावा लागू शकतो. एखादा डू आयडी घ्यावा म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/18/2016 - 22:06

In reply to आहेत by धर्मराजमुटके

Permalink

जातीभेद मिटवण्यासाठी रोटी

जातीभेद मिटवण्यासाठी रोटी बेटी पेक्षा उत्तम मार्ग नाही असे माझे मत, एकमेकांना चांगले ओळखत असलेल्या अतिशय चांगल्या दोन कुटुंबांमध्ये केवळ जात वेगळी असल्याने लग्न संबंध होऊ शकले नाहीत असे बरेच अनुभव हवेत, त्यांना जातीतलेच म्हणून इतर तडजोड करावी लागते ह्याचा मनस्ताप ज्याला होतो त्यालाच माहित.. बाकी फुकाच्या गप्पा आहेत मुटकेसर..
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/18/2016 - 22:07

In reply to जातीभेद मिटवण्यासाठी रोटी by संदीप डांगे

Permalink

दुरुस्ती: अनुभव आहेत

दुरुस्ती: अनुभव आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Tue, 10/18/2016 - 23:18

In reply to दुरुस्ती: अनुभव आहेत by संदीप डांगे

Permalink

कृपया

कृपया सर म्हणू नका. लाजल्यासारखे होते. अवांतर : नाशिक बंद च्या काळात तीन दिवस नाशकातच होतो पण इंटरनेट बंद असल्यामुळे तुम्हाला कसा निरोप पोहोचवावा हे समजले नाही. जबरदस्तीच्या सुट्टीच्या काळात एक मिपा कट्टा तर सहज करता आला असता.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Tue, 10/18/2016 - 23:46

In reply to जातीभेद मिटवण्यासाठी रोटी by संदीप डांगे

Permalink

मस्तच

आणि आन्तर्जातिय विवाह करणार्यान साठि आरक्शण ठेवावे
  • Log in or register to post comments

Submitted by होकाका on Fri, 10/21/2016 - 03:32

In reply to मस्तच by सुखीमाणूस

Permalink

शासकीय सहाय्य

The State Government has initiated various schemes for removal of untouchability through publicity, educational schemes, organising special programmes and providing opportunities to Scheduled Castes for Social & Economic developments. Grant of financial assistance to Inter-Caste Married Couples is one such programme. Scheme Financial Assistance of Rs. 25,000/- is being given to Inter-Caste married couples. This is a Centrally sponsored scheme where the expenditure is shared equally by the State Government and Central Government i.e. 50:50 Description Financial assistance of Rs. 25,000/- is given to Intercaste married couples. Out of this amount Rs. 12,500/- will be issued in the form of N.S.C. and remaining will be paid in cash. The bonafide of the applicants will be enquired into by Taluk Social Welfare Officer, concerned. The application and the enquiry report are forwarded to the Chief Executive Officer- Zilla Panchayat of the District for consideration through District Social Welfare Officer. Persons seeking such assistance should apply to the Taluk Social Welfare Officer of the concerned Taluk in the prescribed proforma. Eligibility Persons who contract Inter-caste marriage, either of the parties being a Scheduled Caste person. The total income of the couple should not exceed Rs. 24,000/- per annum. The assistance under the scheme shall be given only to the lawfully married couples whose marriage has been registered in a Registration Office, though they might have married under any custom. He/She will not be again eligible for the grant on account of second marriage Documents Marriage Certificate issued by the Sub-Registrar Separate Income Certificate of husband and wife issued by competent authority Caste Certificate in prescribed proforma of husband and wife issued by the concerned authority. Joint photo of the couple. Residential Certificate issued by the concerned authority URL: http://sw.kar.nic.in/co-ordination_files/co-ordination1.htm
  • Log in or register to post comments

Submitted by अंतरा आनंद on Wed, 10/19/2016 - 09:50

In reply to जातीभेद मिटवण्यासाठी रोटी by संदीप डांगे

Permalink

सहमत. अगदी पोटजातीतली लग्नही

सहमत. अगदी पोटजातीतली लग्नही मोडतात वा एकजण मन मारून जगतो त्यामुळे वेगळ्या चालीरिती वैगेरेंचं अवास्तव स्तोम माजवलं जातं ते चुकीचं आहे. सर्रास रोटीबेटी व्यवहार झाल्याखेरीज जात जाणार नाही. आणि जाहिरातीत जातीचा उल्लेख नसणे हे त्या दिशेनं पहिलं पाऊल असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अंतरा आनंद on Wed, 10/19/2016 - 17:38

In reply to सहमत. अगदी पोटजातीतली लग्नही by अंतरा आनंद

Permalink

ही प्रतिक्रिया संदीप डांगे

ही प्रतिक्रिया संदीप डांगे यांच्या प्रतिसादावर आहे. सुखी माणूस यांच्या प्रतिसादाशी सहमत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by nanaba on गुरुवार, 10/20/2016 - 15:33

In reply to जातीभेद मिटवण्यासाठी रोटी by संदीप डांगे

Permalink

तुमचे म्हणणे

जातीच्या द्ऱुष्टीने जितके बरोबर तितकेच बाईच्या दृष्टीने चूक ठरतात. सगळ्या सामाजिक उतरंडीत सगळ्यात खालती असते ती बाई. ' लग्न झालं आता तू फक्त इकडचीच' संस्कृतीत बाईला जातीतल्या वागण्याच्या समजुतीच्या स्वैपाक paddhateechyaa मानापमानाच्या रगाड्यात खूप सोसावं लागतं. जोपर्यंत बाईची सामाजिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत लग्न फाssssssर काळजीपूर्वक करावं ~अनेक फर्स्टहॅंड उदाहरण बघून आलेलं शहाणपण.
  • Log in or register to post comments

Submitted by अंतरा आनंद on गुरुवार, 10/20/2016 - 17:52

In reply to तुमचे म्हणणे by nanaba

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 10/20/2016 - 13:46

In reply to आहेत by धर्मराजमुटके

Permalink

मात्र जेव्हा लग्नासाठी

मात्र जेव्हा लग्नासाठी जाहिरात दिली जाते तेव्हा त्या कुटूंबाला आपले लग्नाच्या व्यवहाराचे निकष ठरविण्याचा पुर्ण अधिकार आहे. नाही. लग्न हा निव्वळ वैयक्तिक व्यवहार नाही. शिवाय कोणत्याही वैयक्तिक व्यवहारात एका पार्टीला दुसर्‍या पार्टीवर अन्याय करण्याचा कायद्याने अधिकार नाही. जातीभेद मिटविण्यासाठी रोटी बेटी व्यवहार केलाच पाहिजे या मताशी मी तरी सहमत नाही. मात्र कोणी असा व्यवहार करु पाहत असेल त्याला विरोध करण्याचे अथवा नावे ठेवण्याचा विचार माझ्या मनात येणार नाही याची खात्री आहे. जातिभेद मिटवण्यासाठी रोटीबेटी व्यवहार हा एकमेव मार्ग आहे. सजातीय विवाह हा दखलपात्र गुन्हा मानला जावा. प्रबोधन करत बसणे वगैरे फालतूपणा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 10/20/2016 - 13:48

In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर

Permalink

शिवाय ते चालिरीती वगैरेची

शिवाय ते चालिरीती वगैरेची कारण न पटण्यासारखी आहेत. जागा भरणे किंवा भरुन घेणे हाच मुख्य लग्न व्यवहार असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 10/20/2016 - 15:06

In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर

Permalink

???

*केवळ पहिल्या मुद्द्याविषयी: जर माझे निकष अमुक रंगाची, अमुक शिक्षण असलेली, अमुक उंची असलेली मुलगी हवी, असे असतील तर त्याने कुणावर अन्याय होणार आहे ? की माझ्यावर 'छे छे! यु काण्ट हॅव द लक्जरी टू प्रेफेर 'अमुक रंगाची/वयाची मुलगी'! यु हॅव टू मॅरी धिस 'तमुक रंगाची मुलगी'. अदरवाइज इट विल बी इन्जस्टिस टू 'तमुक'! अशी जबरदस्ती केली जाईल?
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 10/20/2016 - 16:58

In reply to ??? by तुषार काळभोर

Permalink

जर माझे निकष अमुक रंगाची,

जर माझे निकष अमुक रंगाची, अमुक शिक्षण असलेली, अमुक उंची असलेली मुलगी हवी, असे असतील तर त्याने कुणावर अन्याय होणार आहे ? शिक्षण, रंग, उंची, अवयवांचे माप वगैरे निवडीचे स्वातंत्र्य आणि आंतरजातीय विवाह करणे अथवा न करणे यांचा संबंध समजला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 10/20/2016 - 17:19

In reply to जर माझे निकष अमुक रंगाची, by अप्पा जोगळेकर

Permalink

स्पष्टीकरण

संदीप डांगेंच्या मात्र जेव्हा लग्नासाठी जाहिरात दिली जाते तेव्हा त्या कुटूंबाला आपले लग्नाच्या व्यवहाराचे निकष ठरविण्याचा पुर्ण अधिकार आहे. या वाक्याला तुम्ही असहमती दर्शवली होती. म्हणजे लग्नासाठी जाहिरात देताना कुटुंबाला आपले लग्नाच्या व्यवहाराचे निकष ठरविण्याचा अधिकार नाही, असे तुमचे मत असावे. मग हे निकष रंग, उंची, शिक्षण वा जात असे कोणतेही असले तरी, ते लग्नाळू वर-वधूंच्या कुटुंबियांनी ठरवू नयेत, असा अर्थ त्यातून निघतो. म्हणून मी म्हणालो, की जर माझे निकष अमुक रंगाची, अमुक शिक्षण असलेली, अमुक उंची असलेली मुलगी हवी, असे असतील तर त्याने कुणावर अन्याय होणार आहे ? म्हणजे मी जर अमुक-अमुक-अमुक असे निकष ठरवले, रंग-उंची-शिक्षण-जात यावर आधारित, तर त्याने कोणावर अन्याय होणारे?
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 10/20/2016 - 17:20

In reply to स्पष्टीकरण by तुषार काळभोर

Permalink

दुरुस्ती

मात्र जेव्हा लग्नासाठी जाहिरात दिली जाते तेव्हा त्या कुटूंबाला आपले लग्नाच्या व्यवहाराचे निकष ठरविण्याचा पुर्ण अधिकार आहे. हे वाक्य संदीप डांगेंचे धर्मराज मुटके यांचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 10/20/2016 - 17:32

In reply to स्पष्टीकरण by तुषार काळभोर

Permalink

मी लग्न हा निव्वळ वैयक्तिक

मी लग्न हा निव्वळ वैयक्तिक व्यवहार नाही असे लिहिले होते. याचा अर्थ तो काही अंशी खाजगी आणि काही अंशी सार्वजनिक व्यवहार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 10/20/2016 - 17:40

In reply to मी लग्न हा निव्वळ वैयक्तिक by अप्पा जोगळेकर

Permalink

ओक्के

तुम्ही केवळ मात्र जेव्हा लग्नासाठी जाहिरात दिली जाते तेव्हा त्या कुटूंबाला आपले लग्नाच्या व्यवहाराचे निकष ठरविण्याचा पुर्ण अधिकार आहे. हे हायलाईट केलं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 10/20/2016 - 17:39

In reply to स्पष्टीकरण by तुषार काळभोर

Permalink

म्हणजे मी जर अमुक-अमुक-अमुक

म्हणजे मी जर अमुक-अमुक-अमुक असे निकष ठरवले, रंग-उंची-शिक्षण-जात यावर आधारित, तर त्याने कोणावर अन्याय होणारे? याचा इमिजिएट होणार्‍या न्याय-अन्यायाशी संबंध नाही. हे धोरण म्हणून अंगिकारले पाहिजे (सरकारने. वैयक्तिक नव्हे.) आणि ते कायद्यात अंतर्भूत असावे इतकेच म्हणणे आहे. ७०-८० वर्षांनी आणि त्यापुढे सतत सामाजिक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरु व्हावी यासाठी. जसे २००४ नंतर पेन्शन बंद झाले त्याचा फायदा २०७० नंतर दिसू लागेल तसे.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 10/20/2016 - 17:40

In reply to म्हणजे मी जर अमुक-अमुक-अमुक by अप्पा जोगळेकर

Permalink

आणि मी रंग, उंची शिक्षाण

आणि मी रंग, उंची शिक्षाण लिहिले नव्हते. जात या घटकाबद्दल लिहिले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 10/20/2016 - 17:55

In reply to आणि मी रंग, उंची शिक्षाण by अप्पा जोगळेकर

Permalink

आणि मी रंग, उंची शिक्षाण लिहिले नव्हते. जात या घटकाबद्दल लिहिले

तरीपण... रंग - उंची - शिक्षण - जात कोणताही निकष ठरवण्याचे स्वातंत्र्य लग्न करणार्‍याला/ त्याच्या कुटुंबाला असलेच पाहिजे ना?
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 10/20/2016 - 17:44

In reply to म्हणजे मी जर अमुक-अमुक-अमुक by अप्पा जोगळेकर

Permalink

तरीपण

लग्नासारख्य गोष्टीत कोणावरही 'काय निकष असावेत?' हे लादले जाणे योग्य आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 10/20/2016 - 18:02

In reply to तरीपण by तुषार काळभोर

Permalink

साहेब, हुंडा पद्धती कायद्याने

साहेब, हुंडा पद्धती कायद्याने बंद आहे ना. तसे पाहिले तर तीसुद्धा वैयक्तिक बाब आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on गुरुवार, 10/20/2016 - 15:17

In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर

Permalink

जातिभेद मिटवण्यासाठी रोटीबेटी

कस्काय बुवा? आत्तापोतुर जे जे आंतरजातिय विवाह बघितलेत त्यांनी जाती सोडल्या असलं काही पाहण्यात नाही उलट काही ठिकाणी मुलाच्या जातीचे संस्कार लादण्याचा प्रकार झालाय!!
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 10/20/2016 - 15:29

In reply to मात्र जेव्हा लग्नासाठी by अप्पा जोगळेकर

Permalink

लग्न हा निव्वळ वैयक्तिक -अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादास

लग्न हा निव्वळ वैयक्तिक व्यवहार नाही.
प्रतिसाद तुमच्या प्रतिसादात उद्देशुन असला तरी वैयक्तीकरीत्या तुम्हास नाही याची आवर्जुन नोंद घेणे. लग्नात जावा, नणंदा, नातेवाईकांचे (कधी कधी तर आई वडीलांचेही) म्हणणे देखील न ऐकून घेणार्‍या या काळात लग्न हा निव्वळ वैयक्तीक व्यवहार नाही हे म्हणणे धाडसाचे वाटते.
जातिभेद मिटवण्यासाठी रोटीबेटी व्यवहार हा एकमेव मार्ग आहे.
उदाहरणार्थ (केवळ उदाहरण म्हणून वाचावे) १. मी संपुर्ण शाकाहारी आहे तर मी माझे आहार स्वातंत्र्य जपायचे की समोरच्याला प्रसन्न करण्यासाठी तो जे देईल ते खावे ? २. माझे लग्न झाले आहे. मी माझ्याच समाजातील मुलीशी लग्न केले आहे. मी प्रेम विवाह देखील केला नाही. आता मग माझ्यासमोरील दलितांशी चांगले संबंध ठेवण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत काय ? की रोटीबेटी हा एकमेव मार्ग माझ्यासाठी बंद झाल्याने मी आता आयुष्यभर दलितविरोधी म्हणून शिक्का मारुन घ्यायचा ?
सजातीय विवाह हा दखलपात्र गुन्हा मानला जावा.
का बरे ? तुम्ही सजातीय विवाहास दखलपात्र गुन्हा मानावयास सांगता आहात मग एखाद्याला पुरुषाला / स्त्रीला गे-लेस्बियन राहायचे आहे तर त्याला देखील दुसर्‍या जातीतील पुरुष / स्त्री शोधणे कंपल्सरी करावे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 10/20/2016 - 15:43

In reply to लग्न हा निव्वळ वैयक्तिक -अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादास by धर्मराजमुटके

Permalink

साहेब,

साहेब, तुमच्यासमोरचा दलित आहे हे तुम्हाला कसे कळते? तो दलित असल्याचा अभिमान, माज, गाऱ्हाणं असं काहीही दाखवायला लागला की त्याच्याशी दलित म्हणूनच वागावं. जो स्वतःची जात स्वतः सोडत नाही, त्याने इतरांवर अन्याय केल्याचे आरोप लावूच नये. असो, जात दाखवणारे कुठल्याही पद्धतीने, डोक्यात जातात, क्षमस्व!
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 10/20/2016 - 15:48

In reply to साहेब, by संदीप डांगे

Permalink

जात दाखवणारे कुठल्याही पद्धतीने

जात दाखविण्याचा प्रयत्न माझ्या कोणत्याही प्रतिसादात झाला असेल तर ते माझे भाषिक दौर्बल्य आहे / किंवा सरळसरळ चुक आहे असे समजून माफी मागीन की ! पण असे तुम्हाला नेमक्या कोणत्या प्रतिसादावरुन वाटतेय ? माझा मुद्दा फक्त रोटीबेटी व्यवहार झाला तरच दोन समाजातील तेढ सुटेल या विधानाला आ़क्षेप म्हणून मांडलाय इतकेच.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 10/20/2016 - 16:14

In reply to जात दाखवणारे कुठल्याही पद्धतीने by धर्मराजमुटके

Permalink

तुम्ही जात दाखवताय असे नाही

तुम्ही जात दाखवताय असे नाही म्हटले, जे दलित असल्याचे दाखवतात त्यांना म्हणत आहे, लिहिताना माझ्याकडून चुकले, क्षमस्व!
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 10/20/2016 - 17:08

In reply to तुम्ही जात दाखवताय असे नाही by संदीप डांगे

Permalink

चलताय !

चलताय ! काय प्रॉब्लेम नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 10/21/2016 - 17:04

In reply to तुम्ही जात दाखवताय असे नाही by संदीप डांगे

Permalink

डांगे जी...

<<<<<जो स्वतःची जात स्वतः सोडत नाही, त्याने इतरांवर अन्याय केल्याचे आरोप लावूच नये.>>>>>>> -- प्रचंड सहमत...माझा मराठा मोर्चाच्या चर्चेच्या अनुषंगाने नक्कीच हे मत परिवर्तन झाले आहे. जातीच्या आधारावर कोणी माज पण दाखवू नये आणि लाचारीही. <<<<जात दाखवणारे कुठल्याही पद्धतीने, डोक्यात जातात, क्षमस्व!>>>>> -- जात दाखवणे बिलकुल पटत नाही पण आंतरजातीय रोटी बेटी व्यवहाराला अजून तरी माझे मत अनुकूल नाही. माझ्या पुढच्या पिढी संदर्भात आडकाठी नाही आणार एवढी ग्वाही देऊ शकतो.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com