✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पोलीस यंत्रणा नेहमी व्हिलन सारखी का वागते?

व
वटवट यांनी
Mon, 10/17/2016 - 12:10  ·  लेख
लेख
खूप दिवस ही मळमळ मनात खदखदत होती... मिपाचा हा प्लॅटफॉर्म एखादा विषय चर्चिण्यासाठी अगदी योग्य आहे. आणि मुळात, मला माझे मत बदलायचे आहे ह्यासाठी हा विषय मी इथे मांडत आहे... पोलीस कायद्याचे रक्षक आहेत. ते आपल्यासाठी आहेत. ते आपल्यासाठी त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. ते खूप हालअपेष्टा सोसत असतात. त्यांचा पगार खूप कमी असतो. तरी ते आपल्यावर उपकारासारखं काहीतरी करत असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आपण पोलीस मित्र म्हणून वागलं पाहिजे. आपलं संरक्षणखातं आणि पोलीस खातं एकंच काम करतं. ते बाहेरच्या शत्रूंच्या विरोधात लढतात आणि हे आतल्या शत्रूंच्या विरोधात... वगैरे वगैरे... लहानपणापासून हेच ऐकत आलोय. वर्तमानपत्रातून... रेडिओवर... चर्चासत्रांतून... सोशल मीडियातून हाच सूर दिसतो. पण माझं निरीक्षण खूप वेगळं आहे. कदाचित सगळ्यांचंच तेच निरीक्षण असेल. १. पोलीसखातं महसूल खात्यासारखंच अत्यंत करप्ट आहे. बहुतेक पोलिसांचं पोट उगाच वाढलेलं नसतं. जे उन्हातान्हातून ट्रॅफिक आणि गर्दी कंट्रोल करतात ते जास्त करून झीरो पोलीस असतात, कॉन्ट्रॅक्टबेसिस वरचे. तेही अधूनमधून हात मारतच असतात. पुण्यात जवळपास बर्याच पोलीस स्टेशन जवळ ऑनलाईन मटका जोरात चालतो. तिथले पोलीस आंधळे नसतात. दणक्यात मलिदा मिळतो... अगदी कमिशनर पर्यंत हे पैसे जातात असं ऐकलंय... नॉन-करप्ट पोलीस माझ्यातरी पाहण्यात नाही. आमच्या गावातल्या एका पोलिसांचं प्रकरण तर विधानसभेत गाजलं होतं.. आता त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. २. पोलीस कधीही आपले मित्र म्हणून वागत नाहीत. उलट त्यांचे हात मोकळे करायचे साधन म्हणजे सामान्य जनता, बऱ्याचदा असंच त्यांचं वर्तन असतं. अश्यातला माझा अनुभव सांगतो.. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रकरण घडलं होतं. मुलीच्या तक्रारीवरून मुलाला वाकड पोलीस चौकीवर बोलावलं. तिच्या नुसत्या तक्रारी वरून मुलाला बेदम मारलं.. एक दिवस कस्टडीत पण होता तो. आम्ही फॅकल्टी म्हणून तिथे गेलो होतो. त्यांनी आम्हाला विचारलं "इथे कशाला #$%$ घालायला आला आहात?" आम्ही म्हणालो कि आमचा विद्यार्थी आहे तो म्हणून आलोय. मग ते म्हणाले "मग काय त्याला आमच्या $%# वर बसवू" आंम्ही म्हणालो "अहो तो मुलगा लहान आहे हो आणि काहीच चौकशी नं करता का त्याला मारताय?" त्यांनी आमचा अजून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि आमच्या अंगावर "जाता कि नाही आता" म्हणून आले. आम्ही निघालो. दुसर्या दिवशी त्याला बेल मिळाली. एक आठवड्यात त्याने कॉलेज मधून टीसी घेतला. कॉलेजची बदनामी नको व्हायला म्हणून आम्हाला शांत बसायला सांगितलं गेलं. निदान मला तरी तुलनेने कायदे जरा जास्त माहिती आहेत. काय उपयोग? फाटायची ती फाटलीच कि... सामान्य माणसाची काही वेगळी गत असते? नुसत्या तक्रारीवरून कुठलीही चौकशी नं करता मारहाण करायचा त्यांना परवाना दिलेला असतो. ३. कुठलाही नवीन कायदा पास झाला कि ह्यांना चरायला कुरण सापडतं. ह्यांना खायच्या संधी मिळतात. साधारण आरोपी जरी असला तरी त्याला नं मारण्यासाठीसुद्धा पोलीस पैसे घेतात. बलात्काराचा आरोपी असला तर विचारायलाच नको. त्यातल्यात्यात जेंव्हा डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट पास झाल्यापासून तर त्यांना दाबून पैसे कमावण्याची संधी प्राप्त झालीये. एका केसमागे कित्येक लाख मिळतात, तेही बिनबोभाट... खरंतर इतकि उदाहरणे मला व्यक्तिशः माहित आहेत पण असल्या गोष्टींचे पुरावे नसतात कधीच म्हणून इथे लिहिता येत नाहीत... जर कोणी गरीब ह्या भानगडीत फसला तर मेलाच म्हणून समजा... हे खातं गरिबांसाठी नाही... आताच ट्रॅफिकरुल्स अजून कडक केलेत आणि दंडाची रक्कमपण वाढलीये...सो.. पोलिसांचा भाव पण वाढलाय. ४. जेल ऍडमिनिस्ट्रेशन आणि तिथे चालणारे गोंधळ ह्यावर तर एक मोठा प्रबंध होऊ शकेल. श्रीमंत आणि सेलिब्रिटी गुन्हेगारांना प्रचंड ऐषाराम कसा मिळतो आणि त्यावर कसं त्यांचं अर्थपूर्ण जीवन अवलंबून असतं हे सर्व ओपन सिक्रेट आहे. अबू सालेम ने जेलमधला महागडा असा टीव्ही फोडला होता. कोण त्याला बोलल्याचं ऐकिवात नाही. त्याने त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती, हे चालवून घेतलं जातं? त्यांच्यादृष्टीने देशद्रोही बिशद्रोही असलं काही नसतं... त्यांचा देश आणि धर्म एकंच... पैसा. ५. काही पोलिसांना मारलं कि लगेच सगळ्या देशातून पोलिसांच्या बाजूने आवाज सुरु लागला. अर्थात मी पोलिसांना मारण्याच्या बाजूने अजिब्बात नाही. पण त्याहीपेक्षा पोलिसांनी निरपराध लोकांना बेदम मारहाण केल्याची असंख्य उदाहरणे मी पहिली होती, पाहत आहे. त्यांना असे लायसन्स दिली आहेत. ६. गेल्या महिन्यात बाणेरच्या यशदामध्ये माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग दिग्दर्शित आणि लिखित "क्या यही सच है" ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग होते. तेंव्हा मी आमच्या कॉलेजच्या मुलांना घेऊन तिथे गेलो होतो. चित्रपट तांत्रिक आणि अभिनयाच्या बाबतीत फार काही उच्च वगैरे नाही. अगदीच साधारण आहे. पण ज्या काही गोष्टी दाखवल्या त्या खूप हॉरिबल होत्या. काही गोष्टींचा अंदाज येणं वेगळं आणि त्याच गोष्टी खऱ्या आहेत ह्याची खात्री होणं वेगळं. कमिशनरच्या नेमणुकीला स्पॉन्सर लागतात आणि त्याचा जो काही रेट असेल तो ते स्पॉन्सर देतात, हे मला नवीन होतं. चित्रपट दाखवून झाल्यावर मी खुद्द वाय.पी. सिंग ह्यांनाच मी प्रश्न विचारला होता कि, जर एव्हढं हे खातं भ्रष्ट आहे तर आम्ही त्याच्यावर विश्वास का आणि कसा ठेवावा? त्यावर त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ टाळली. मला काय ते उत्तर मिळायचं ते मिळालं. ७. बांधकाम क्षेत्रात आज कित्येक अंडरवर्ड डॉन्सचे पैसे गुंतले जात आहेत आणि पुण्यात तरी बहुतेक एजंट्सना ते माहित आहे. पोलिसांना माहित नसेल? ८. अंतर्गत सुरक्षा खरंच ते सांभाळतात? ह्यावर मला खरंच शंका आहे. कारण पोलीस खातं हे नेहमी नेहमी विकलं जाऊ शकणारं खातं आहे. ९. मुळात मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच. ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत. (माझी ही मते फक्त पोलिसांसंबंधीच आहेत)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20390 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

बूलशिट!!

चांदणे संदीप
Tue, 10/18/2016 - 14:21 नवीन
अतिशय एकांगी अशी 'वटवट' इथे चाललेली पाहून मनाला फारच क्लेष झाले. या अशा तद्दन फालतू चर्चांमुळे आणि विखारी विचारांना उथळ खळखळाटायला मिळते हे पाहूनच मिपावरचा वावर कमी केलाय हल्ली! मला कधी पोलीसांना पाहून भीती नाही वाटली. उलट रस्त्यावर कधी कोणाला पत्ता विचारायचा असेल तर मी रस्त्यावर उभा असलेला पोलीसच प्रेफर करतो. इथे कोणाला अशाही वेळी पोलीस व्हिलन का वाटावेत समजत नाही. असो... प्रतिक्रिया देणारही नव्हतो पण इथे काही महाभाग, पोलीसांना मारल्यावर खूष होतायत काहींना पोलीसांना जीवे मारल्यावर आनंद होतोय हे पाहिल्यावर संताप संताप होतोय माझा. माझ्या समोर उभा राहून कोणी हे बोलत असत तर माहित नाही काय झाल असतं माझ्या हातून! पोलीसांच्या माजोरडेपणाचा, लाचखाऊपणाचा अनुभव मीही घेतलेला आहे पण असे विचार बाळगून मी फिरत नाही व तसा प्रचारही करत नाही आणि करणारही नाही. दुसऱ्या बाजूला काय असत हे पाहण्याचा प्रयत्न कधीतरी इथे विखारी प्रतिसादकर्त्यांनी केला आहे काय?? करणार काय?? उत्तर नाही असेल तर मुस्काड आवरा! मूर्ख लेकाचे! Sandy
  • Log in or register to post comments

शांत

नाखु
Tue, 10/18/2016 - 14:30 नवीन
शांत गदाधारी शांत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

शांत व्हा सँडी भाऊ, शांत व्हा

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 10/18/2016 - 14:55 नवीन
शांत व्हा सँडी भाऊ, शांत व्हा. म्हणूनच मी कमी बोलायचे नियम पाळले इथे. शेवटी एकच प्रश्न विचारावा वाटतो, जर पोलीस इतकेच माजुरडे हलकट हरामखोर मरण्यालायक आहेत तर एकदा विचार करा जर पोलीस खातेच बंद केले तर काय होईल? अधिक माहिती करता जमल्यास पर्ज हा सिनेमा नक्की पहा ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

वकील लोक तर पोलिसांपेक्षा महा

विशुमित
Tue, 10/18/2016 - 15:40 नवीन
वकील लोक तर पोलिसांपेक्षा महा माजुर्डे. वरच्या धाग्या मध्ये पोलिसांनी केलेल्या कारनाम्याला कळस चढवणारे कोण असतील तर भिकार, महा माझुर्डे, कपटी, हलकट आणि पैशाला हपापलेले वकील च असतात. वटवट करून 3-4 हिअरिंग मध्ये निकाल लागू शकणारी केसेस 15-20 वर्ष चालवतात आणि बेइंग ह्यूमन ची बिरुद मिरवणाऱ्याना "बिग बॉस " मध्ये घर मिळवून देतात... (वटवट हा शब्द धागा कर्त्याला उद्देशून वापरला नाही, गैरसमज करून घेऊ नये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

पोलीस खातेच बंद केले तर काय

वटवट
Tue, 10/18/2016 - 15:57 नवीन
पोलीस खातेच बंद केले तर काय होईल?>> सोन्याभाऊ कोण म्हणतंय हे खातं बंद करायला... व्यवस्थित काम नाहीये ते करत हा विषय आहे ह्या धाग्याचा.... झाल्यास "क्या यही सच है" बघा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आपले जर काही चांगले अनुभव

वटवट
Tue, 10/18/2016 - 15:54 नवीन
आपले जर काही चांगले अनुभव असतील तर टाका कि दादा मग... अर्थात पोलिसांना मारणे आणि त्यात आनंद मिळणे ह्याचं समर्थन कधीच होत नाही... ह्या धाग्याचा तोच विषय नाहीये... तुम्हाला पोलिसांची भीती वाटली नाही हा तुमचा वैयक्तिक अनुभव.. जर चांगल्या अनुभवाचं प्रमाण जास्त असलं असतं तर तोही धागा निघाला असताच कि... काय म्हणताय? आणि दुसरी बाजू कितीही काळी असली तरी परिणाम जर घाणेरडा असेल तर त्या परिणामांचं समर्थन नाही ना होत... ऑ?? काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

परफेक्ट

वरुण मोहिते
Tue, 10/18/2016 - 15:10 नवीन
हेच बोलायचं होतं काही चांगलं असलं कि का बोलत नाही कोण ..असतील ना वाईट अनुभव पण आय ऍग्री . पण हे मेल्यावर समाधान किंवा मारल्यावर समाधान हे काय आहे
  • Log in or register to post comments

मावळच्या शेतक-यांमागे धाऊन

Ram ram
Tue, 10/18/2016 - 19:58 नवीन
मावळच्या शेतक-यांमागे धाऊन गाेळीबार करणारे पोलिस पाहून माझे मत बनलेले आहे हे लक्षात घ्यावे हि विनंती
  • Log in or register to post comments

हो का?

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 10/18/2016 - 22:25 नवीन
मग काेणताही पाेलिस मेल्याची बातमी मी वाचतो तेव्हा मला खूप समाधान वाटते. हा (तुमचाच) नियम लावला तर, मावळ मध्ये पोलिसांनी गोळीबार केला म्हणून काश्मीरात आंदोलनकरत्यांचे दगड पेट्रोलबॉम्ब खाऊन मेलेला पोलीसही तुम्हाला समाधान देत असेल नाही का? राग मावळ पोलिसांवर आहे तर तसे स्पष्ट लिहा, असले सार्वत्रिकरण कश्याला? तुम्ही काही मावळ मधला एखादा पोलीस मेला तर मला समाधान वाटते म्हणले असते तर वैयक्तिक अनुभव म्हणून सोडून देता आले असते (तसे पाहता तेही आमच्यालेखी अक्षम्यच आहे पण तितके म्हणायचा तुमचा अनुभवसिद्ध अधिकार आहे हे लगोलगी मान्यच करून टाकतो कसा)
  • Log in or register to post comments

भावनाओको समझो बापुसाहेब, दिल

संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 00:11 नवीन
भावनाओको समझो बापुसाहेब, दिल कि भडस है, त्यांचे खरोखर असे मत का झाले हे ऐकण्यास उत्सुक आहे, अर्थात त्यांच्या सरसकट मताला माझे अजिबात समर्थन नाही हे लक्षात घेणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

वो मै समझ गया डांगे बुआ, मावळ

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 10/19/2016 - 08:16 नवीन
वो मै समझ गया डांगे बुआ, मावळ मध्ये जेव्हा हे शेतकरी आंदोलन झाले तेव्हा मी खुद्द तळेगाव दाभाडेत राहत असे, तेव्हा एसपी संदीप कर्णिक होते, गोळीबार झाला होता पण त्याचे डायनॅमिक्स खूप वेगळे होते, पोलिसांवर खापर फोडणे सोपे आहेच, पण त्या आंदोलनादरम्यान एका "लाल मारुती स्विफ्टवर" खूप मोठे प्रश्नचिन्ह लागले होते त्यावर रामराम बुआ बोलतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ते काय?

संदीप डांगे
Wed, 10/19/2016 - 08:57 नवीन
ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बापू साहेब आझाद मैदान मोर्चा

Ram ram
Wed, 10/19/2016 - 18:04 नवीन
बापू साहेब आझाद मैदान मोर्चा विषयी आपण मत का बरे मांडले नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

काही दिवसापूर्वी लोकसत्तेत

दिगोचि
Wed, 10/19/2016 - 09:00 नवीन
काही दिवसापूर्वी लोकसत्तेत अर्थतज्ञ प्रोफेसर अविनाश दिक्षीत यान्ची मुलाखत वाचली त्यात ते म्हणतात, "नोकरशहा आणि राजकारणी यांच्याकडून भ्रष्टाचार दूर होण्याची अपेक्षाच करता नये. याचं कारण- तेच याचे सर्वात मोठे वाटेकरी आहेत. तेव्हा स्वत:च्या हातानं ते आपल्या उत्पन्नावर हातोडा पाडून घेणार नाहीत". पोलिस पण त्यातलेच.
  • Log in or register to post comments

केस मिटवामिटवी करणारे एजंट ....

बबन ताम्बे
Wed, 10/19/2016 - 12:35 नवीन
केस मिटवामिटवी करणारे एजंट आहेत. बहुतेकांचे राजकीय लागेबांधे असतात. "अडल्या हरी.." कडून पैसे घेऊन स्वतःच्या आणि पोलिसांच्या तुंबड्या भरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि

"नोकरशहा आणि राजकारणी

मराठी_माणूस
Wed, 10/19/2016 - 12:48 नवीन
"नोकरशहा आणि राजकारणी यांच्याकडून भ्रष्टाचार दूर होण्याची अपेक्षाच करता नये. याचं कारण- तेच याचे सर्वात मोठे वाटेकरी आहेत.
नोकरशहा आणि राजकारणी हे तर प्रत्येक देशात असतात . मग इथेच ही समस्या एव्हड्या मोठ्या प्रमाणात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि

बाकी ठिकाणी

नाखु
Wed, 10/19/2016 - 12:59 नवीन
बाकी ठिकाणी वचक असतो आणि भ्र्ष्टाचाराला समाजमान्यता नसते, म्हणजे बघा "अ"ने ओळखी पाळखीतून किंवा पैसे देऊन एखादे काम करून घेतले की तो प्रौढी मारून कसे पैश्याने काम करून घेतले ते सांगतो.(लायक व पात्र नसताना). तेच पैसे घेणारा चार ठिकाणी (दानधर्माचे) थेंब उडवून बाकी उजळ माथ्याने उडवत फिरतो,कारण ज्या समाजात राहतो त्याची त्याला साथच असते (सोबत बसण्याची).आणि म्हणून्च जे विकले जाऊ शकत नाहीत ते मारले जातात सतीश शेट्टीसारखे. या पैसे खाऊंवर त्यांच्या घरच्या लोकांचाच सत्सत्विवेकाचा वचक्/प्रेमळ धाक नसतो तर मित्रांची/जात बांधवांची/समाजाची कसली आली आहे चाड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

बाडीस

सुबोध खरे
Wed, 10/19/2016 - 18:12 नवीन
बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा