Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रतापराव on Mon, 10/17/2016 - 19:56
नमस्कार मंडळी, लेख वैगरे लिहणे हे नेहमीच मला माझ्या आवाक्याबाहेरचे वाटते. मनात बरेच विचार असतात एखाद्या विषयावर मत असते पण ते शब्दबध्द करणे जमेलच याची खात्री नसते.वटवट ह्या आयडींचा हिंदच धर्मावर आधारीत एक लेख आहे त्यात ते हिंदच धर्माचे समर्थक का आहेत याची त्यांनी कारणे लिहलित. क्रमांक २चे कारण मला पटले नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चा करण्यासाठी त्यांनी दुसरा धागा काढावा त्यावर चर्चा करु असे म्हटले म्हणुन हा धागाप्रपंच.मला एकतर निट चर्चा करता येत नाही सखोल अभ्यासाचा अभाव हे त्यामागचे कारण असावे.तरी इतरांनीही ह्या मुद्दयावर प्रतिक्रिया देउन अज्ञान दुर करण्यास सहाय्य करावे. कारण नं २ मध्ये एका फेसबुकपोस्ट वर वाचलं होतं कि ह्या भारतात फक्त तिघांच्याच मरणाची दाखल घेतली जाते. एक तर दलित, मुस्लिम किंवा जनावरे... हिंदूंच्या मरण्याची दखल कोणीच घेत नाही. आणि तसेच आहे वास्तवात सुद्धा... इतरांच्या मरण्याची दखल घेणाऱ्यांना विचारवंत आणि धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. आणि हिंदूला जर कोणी मारलं आणि जर कोणी त्याबद्दल आवाज उठवला तर त्याला हिंदुत्ववादी म्हणून हिणवलं जातं, हेतुपुरस्सर. ह्यावर मी त्यांना दलित हिंदुत येत नाही का?असे विचारले होते.
  • Log in or register to post comments
  • 39069 views

प्रतिक्रिया

Submitted by वटवट on Mon, 10/17/2016 - 20:11

Permalink

प्रतापराव...

प्रतापराव... आत्तापर्यंतच्या राजकारणात जर तुम्ही जर बघितलत तर तुमच्या दिसेल कि व्होटबँक पॉलिटिक्स मध्ये मुस्लिम व्होटबँक, हिंदू व्होटबँक, आणि दलित व्होटबँक ह्या वेगवेगळ्या मानल्या जातात. त्यासोबत इतर पण काही आहेत अल्पसंख्यांक समाजाच्या जसं कि जैन व्होटबँक, शीख व्होटबँक, गुजराथी व्होटबँक..... तसं जर बघितलं तर मुस्लिम सोडले तर कायद्याच्या दृष्टीने सगळे हिंदूच आहेत. पण राजकारणाच्या दृष्टीने ते सर्व हिंदू नाहीत. मान्य करा वा नका करू वस्तुस्थिती तशीच आहे ... आणि ही पद्धतशीर फोडाफोडी सर्वमान्य आहे... आणि माझी पोस्ट त्याच अनुषंगाने होती... कृपया गैरसमज करून घेऊ नका... कितीही सेक्युलर व्हायचा प्रयत्न केला तरी ही व्यवस्था सेक्युलर होऊ देत नाही हेच खरं... माझा राग व्यवस्थेवर आहे, माणसांवर नाही... पुन्हा एकदा.... खरंच गैरसमज करून घेऊ नका..
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Mon, 10/17/2016 - 23:55

Permalink

खर आहे

आता तुमचा प्रोब्लेम चान्गला कळतो आहे आपण नाकारले गेलो की कसे वाटते ते समजते आहे. मराठ्याना आज सन्खेच्या बळावर जे मागता येते आहे ते ईतर उच्चवर्णीय जोर लावुन मागु शकत नाहित. ही एक प्रकारचि सामजिक हतबलता आज मराठेतर उच्चवर्णीय हिन्दु समाज अनुभवतो आहे. जोपर्यन्त आरक्शन सम्पत नाहि व लोकसन्ख्या आटोक्यात येत नाहि तोपर्यन्त असेच चालणार. पुढच्या पिढ्यान्च्या भल्या साठि आरक्शन मागणारे हे समजत नाहित की हा तात्पुरता उपाय आहे. तुम्हि हिन्दु आहात असे तुम्हाला म्हणावेसे वाट्ते ही खुप सकारात्मक गोष्त्ट आहे. Actually I always thought that by my kids generation this caste system will not remain as strong as it was earlier. But sad part is that it is getting glorified.
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Tue, 10/18/2016 - 03:37

Permalink

दलित हिंदू आहेत ह्यांत काहीही

दलित हिंदू आहेत ह्यांत काहीही शंका नाही. दुर्दैवाने एकगठ्ठा मतांचा नादा पोटी अनेक जातीच्या लोकांना फक्त दलित म्हणून संबोधले जाते आणि त्यांच्या मूळ जातीच्या इतिहासाचा विसर पडला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 10/18/2016 - 09:28

In reply to दलित हिंदू आहेत ह्यांत काहीही by साहना

Permalink

सहमत

प्रत्येक जातीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त एक मतगठ्ठा बँक म्हणून पाहिले गेले आहे. अगदी अपवाद म्हणजे मधु दंडवते सारखे ऊमेदवार जे आप्ल्या कार्याने निवडले गेले. दलित हिंदू आहेतच आणि ते हिंदूच राहणार फक्त त्यांना तुम्ही वेगळे आहात हे (सतत)दाख्व्वणार्या नेत्यांचा आणि पुढार्यांच्या सगळ्यांबरोबर धिक्कार केला पाहिजे, दुकाने आपोआप बंद होतील
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Tue, 10/18/2016 - 10:06

In reply to दलित हिंदू आहेत ह्यांत काहीही by साहना

Permalink

एक प्रश्न :

एक प्रश्न : बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यावेळी त्यांचे अनुयायी पण बौद्ध धर्मात गेले. मग बौद्ध आणि हिंदू धर्मातले असे वेगवेगळे दलित आहेत का ?
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 10/18/2016 - 10:27

In reply to एक प्रश्न : by चिनार

Permalink

अगदी योग्य प्रश्न

चिनारजी अगदी योग्य प्रश्न विचारलात... हिंदू धर्म मान्य नाही म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म पत्करला. पण कायद्याने जर हिंदूधर्माची व्याख्या जर बघितली तर त्यात बुद्ध येतातच... (हिंदू म्हणजे हिंदू, बुद्ध, शीख, जैन)... तर धर्मांतराचा काय फायदा झाला???
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Tue, 10/18/2016 - 10:38

In reply to अगदी योग्य प्रश्न by वटवट

Permalink

संघटन

संघटन. आधी हिंदू-दलितांमध्ये पण जाती होत्या/आहेत. त्यातही काही हेवेदावे, फूट पडण्यास अनुकूल कारणे असतील. एकदा हे सर्व एका होडीत आले हि त्यांत फूट पाडणे (छोटी व्होट बँक) कठीण होईल - असे उद्दिष्ट असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 10/18/2016 - 10:42

In reply to संघटन by sagarpdy

Permalink

ते साध्य झाले??

ते साध्य झाले??
  • Log in or register to post comments

Submitted by chitraa on Tue, 10/18/2016 - 12:05

In reply to अगदी योग्य प्रश्न by वटवट

Permalink

...

कुठल्या कायद्यात लिहिले आहे की हिंदू म्हणजे हिं जै बौ शीख सगळे येतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 10/18/2016 - 12:48

In reply to ... by chitraa

Permalink

https://indiankanoon.org/doc

https://indiankanoon.org/doc/590166/ अभ्यास वाढवा
  • Log in or register to post comments

Submitted by chitraa on Tue, 10/18/2016 - 13:17

In reply to https://indiankanoon.org/doc by सुबोध खरे

Permalink

त्यापेक्षा जरा आहे तेच व्यवस्थीत वाचा

any child, legitimate or illegitimate, one of whose parents is a Hindu, Buddhist, Jaina or Sikh by religion and who is brought up as a memb त्या कायद्यातच असे शब्द आहेत... या सर्व धर्माना हिंदू विवाह कायदा लागू होइल कारण त्याबाबतच्या त्यांच्या चालीरीतींमध्ये साम्य आहे म्हणुन. पण कायद्याने हे भीन्न धर्म असल्याचेच मान्य केले आहे, अन्यथा हे चार शब्द लिहुन पुढे रिलिजन लिहायची गरज नव्हती. स्वत:च्या सोयीसाठी अ ब क हे एकाच खानावळीत जेवतात तर त्यांचा धर्म एकच आहे असा निश्कार्श निघत नाही. तसेच हे आहे... साम्य असल्याने विवाह कायदा एकच लागतो , आणि हिंदू मेजॉरिटी असल्याने नाव हिंदु विवाह कायदा असे दिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 10/18/2016 - 13:04

In reply to ... by chitraa

Permalink

प्रत्येक हिंदूलॉ ऍक्ट च्या

प्रत्येक हिंदूलॉ ऍक्ट च्या सेक्शन २ किंवा ३ मध्ये तुम्हाला हिंदू धर्माची व्याख्या मिळेल... थोडे कष्ट घ्या आणि वाचा...
  • Log in or register to post comments

Submitted by सतीश कुडतरकर on Tue, 10/18/2016 - 11:47

In reply to एक प्रश्न : by चिनार

Permalink

चिनारजी

चिनारजी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्विकारल्यावर त्यांच्यासोबत मुख्यतः स्वजातीयच गेले. पण सकल दलितांमधील काही जातीमधील लोकांनी बौद्ध धर्म स्विकारलेला नाही, उदा: चर्मकार व भटका समाज. यांना हिंदू दलित म्हणून संबोधले जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Tue, 10/18/2016 - 12:00

In reply to चिनारजी by सतीश कुडतरकर

Permalink

ओके..

ओके.. पण मग जे आरक्षण म्हणतो ते नेमक्या कोणत्या जातींना लागू होते ? आणि हे सो कॉल्ड दलित नेते (मायावती, आंबेडकर,सुशीलकुमार शिंदे वगैरे वगैरे ) नेमक्या कोणाचे प्रतिनिधित्व करतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/18/2016 - 12:02

In reply to ओके.. by चिनार

Permalink

बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व

बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व हिंदू असलेल्या दलित जातींना आरक्षण मिळते, दलित म्हणजे बौद्धच हि समजूत योग्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सतीश कुडतरकर on Tue, 10/18/2016 - 12:21

In reply to बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व by संदीप डांगे

Permalink

डांगेभाऊंशी सहमत

डांगेभाऊंशी सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Tue, 10/18/2016 - 21:47

In reply to बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व by संदीप डांगे

Permalink

दलित म्हणजे बौद्धच हि समजूत

दलित म्हणजे बौद्धच हि समजूत योग्य नाही. समाजात बहुतांश वेळा बौद्ध म्हणजे दलितच असे सरास म्हणलेले ऐकले आहे. अजून एक प्रश्न - मुळ बौद्ध लोक या घडीला आहेत का? कुतुहल म्हणून विचारत आहे. कोणाला माहित असल्यास सांगावे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 10/18/2016 - 22:57

In reply to दलित म्हणजे बौद्धच हि समजूत by सही रे सई

Permalink

अजून एक प्रश्न - मुळ बौद्ध

अजून एक प्रश्न - मुळ बौद्ध लोक या घडीला आहेत का? कुतुहल म्हणून विचारत आहे. कोणाला माहित असल्यास सांगावे.
हा प्रश्न मला नेहमी पडतो. त्या अनुषंगाने मी माझ्या संपर्कात येणार्‍या बौद्ध धर्मीय व्यक्तींना या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना गौतम बुद्धांच्या शिकवणीबद्दल कितपत माहिती आहे, बौद्ध धर्मीय ग्रंथ वाचले आहेत का, भारताबाहेरील सध्याचा बौद्ध धर्म आणि भारतातील सध्याचा बौद्ध धर्म यात काय फरक आहे, दलाई लामा, थिच न्हात हान्ह, पेमा चोड्रॉन यांनी लिहिलेलं काही वाचलं आहे का, धम्मपद माहिती आहे का, बुद्धीस्ट सायकॉलॉजी बद्दल काही माहिती आहे का असे अनेक प्रश्न विचारतो. दुर्दैवाने यातल्या कोणत्याच गोष्टीबद्दल त्यांना माहिती नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Wed, 10/19/2016 - 00:42

In reply to अजून एक प्रश्न - मुळ बौद्ध by सतिश गावडे

Permalink

तुम्ही लिहा ना सर मिपा वर या

तुम्ही लिहा ना सर मिपा वर या बद्दल. त्या धर्मातील गोष्टी त्या निमित्ताने सगळ्यांनाच कळतील आणि हे ही समोर येईल की नवीन काय आहे व इतर धर्माबरोबर सारखे पणा काय आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/19/2016 - 00:44

In reply to अजून एक प्रश्न - मुळ बौद्ध by सतिश गावडे

Permalink

संपूर्ण सहमत गावडे सर!

संपूर्ण सहमत गावडे सर!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Wed, 10/19/2016 - 01:50

In reply to अजून एक प्रश्न - मुळ बौद्ध by सतिश गावडे

Permalink

दुर्दैवाने यातल्या कोणत्याच

दुर्दैवाने यातल्या कोणत्याच गोष्टीबद्दल त्यांना माहिती नसते. --- ह्या गोष्टी कुणा बौद्ध धर्मीय व्यक्तीला माहीत नसल्या तर दुर्दैव का बरे ?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/19/2016 - 03:49

In reply to दुर्दैवाने यातल्या कोणत्याच by अभिजीत अवलिया

Permalink

आपण जो धर्म स्वीकारतो

आपण जो धर्म स्वीकारतो त्याच्या संस्थापकाच्या नावाखेरीज काहीच माहित नसणे दुर्दैवच!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/19/2016 - 03:54

In reply to आपण जो धर्म स्वीकारतो by संदीप डांगे

Permalink

विशेषतः जेव्हा धर्म फार

विशेषतः जेव्हा धर्म फार विचारपूर्वक आणि सखोल अभ्यासातून निर्माण झाला आहे आणि तेवढाच अभ्यास करून स्वीकारण्याचे आवाहन केले गेलेले...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/19/2016 - 10:12

In reply to विशेषतः जेव्हा धर्म फार by संदीप डांगे

Permalink

माझ्या अल्प माहिती प्रमाणे डॉ

माझ्या अल्प माहिती प्रमाणे डॉ आंबेडकरांचे प्रामुख्याने "महार" जातीचे अनुयायी( डॉ आंबेडकर याच जातीतील होते) बौद्ध झालेले आहेत आणि त्यांना नवबौध्द म्हणून आरक्षण दिलेले आहे. मी पाहिलेल्या बहुसंख्य नवबौध्दांच्या चालीरीती अजूनही हिंदूंसारख्याच आहेत. फरक एवढाच कि लग्न करताना ते बुद्ध विहारात होते आणि डॉ आंबेडकरांच्या आणि भगवान बुद्धाच्या फोटो/ मूर्तीच्या पायाशी हे विधी होतात. अन्यथा बहुसंख्य लोकांना त्या ( त्याच कशाला कोणत्याही धर्मा बाबत) जुजबीच ज्ञान असते. तज्ज्ञ लोकांनी खुलासा करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 10/19/2016 - 11:50

In reply to माझ्या अल्प माहिती प्रमाणे डॉ by सुबोध खरे

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे, बौद्ध

माझ्या माहितीप्रमाणे, बौद्ध धर्माची रीतसर दीक्षा (भन्ते कडून औपचारिकपणे, मुंडन वैगेरे करून) घ्यावी लागते, तेव्हाच तो धर्म अंगीकारला आहे असे समजले जाते, गावडे सर म्हणतायत तसेच अनेक बौद्ध धर्मीय मित्र - रीतसर दीक्षा घेतलेले- माहितीत आहेत. त्यांना बुद्धाचे तत्वज्ञान जुजबीही माहित नसते. 'बाबा' वाक्यम् प्रमाणं हा प्रकार अक्षरशः आहे. बाबासाहेब आपल्या जातीचे म्हणून त्यांना आंधळेपणाने मानणे, भक्त बनणे एवढेच बघितले आहे, आघात कि कोणत्या अशाच नावाच्या एका सुंदर मराठी चित्रपटात ह्याबद्दल सुरेख मांडले आहे. त्यातले एक वाक्य मला कायम आठवते ते हे कि "देवांच्या फोटो च्या जागी दुसरे फोटो आलेत, चौकटी तशाच आहेत" असेच काहीसे. बाबांना व बुद्धांना चौकटीच मोडणे अपेक्षित होते, कुणालाही फॉलो न करता 'अत्त दीप भवं' म्हणजे स्वतःच स्वयंप्रकाशित व्हा, दुसऱ्याचे म्हणणे तो कितीही ग्रेट असला तरी प्रमाण मानू नका ही मूळ शिकवणी विपरीत वागणे आहे. त्यापेक्षा मुस्लिम don't question, just follow हे त्यांचे धर्मतत्व कट्टरतेने पाळतात हे जास्त लॉयल समजले पाहिजे, प्रत्यक्षात अतिशय चुकीचे असले तरीही. बुद्धांची शिकवणी अंगिकरण्यामागची विचारसरणी आणि बहुसंख्य नवबौद्धांची प्रत्यक्ष विचारसरणी ह्यात प्रचंड विसंगती आहे. नवबौद्धांनी नवे देव, नव्या चालीरीती अंगिकारल्या पण त्यामागचे उद्देश गडबडले आहेत. अन्यथा आज मागास-दलित जनतेचे चित्र काही वेगळे असते. पण जेवढे मी बघितले तेवढे दोन प्रकारचे बौद्ध दिसले, एकतर हिंदू देव व खासकरून ब्राह्मणांबद्दल प्रचंड तिरस्कार असलेले किंवा बौद्ध असून हिंदूंच्याच चालीरीती, देवदेवक अंधपणे पाळत राहिलेले, दोघांनाही बौद्धधर्माचे मर्म कळलेलं नाही. 'धम्म हा मुक्त करणारा आहे' हे बहुसंख्य बांधून घेतलेल्याना अजिबात कळत नाही जेवढा तो माझ्यासारख्या हिंदूला चटकन समजू शकला आहे. बाकी 99 टक्के जनता फार विचार करणारी नसतेच व ते कोणत्याही धर्माची असली तरी तशीच असते, त्यामुळे तुमच्याही मताला अंशतः सहमत आहेच
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/19/2016 - 15:23

In reply to माझ्या अल्प माहिती प्रमाणे डॉ by सुबोध खरे

Permalink

माझ्या अल्प माहिती प्रमाणे डॉ

माझ्या अल्प माहिती प्रमाणे डॉ आंबेडकरांचे प्रामुख्याने "महार" जातीचे अनुयायी( डॉ आंबेडकर याच जातीतील होते) बौद्ध झालेले आहेत आणि त्यांना नवबौध्द म्हणून आरक्षण दिलेले आहे.
सुमारे ४० वर्षांपूर्वी मराठीत "कार्तिकी" नावाचा कृष्णधवल चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुधीर फडके यांनी संगीत दिलेली त्यातील गीते खूपच श्रवणीय होती. "कशी आज बाई जादूगिरी घडली, माझी शुधबुध का उडली" हे आशा भोसलेंचे श्रवणीय गीत, त्या चित्रपटात गावाबाहेर राहणारी दलित कुटुंबे, पाटलाच्या मुलाचे एका कार्तिकी या दलित मुलीवर बसलेले प्रेम, समाजाचा विरोध, बौद्ध धर्मांतर इ. गोष्टी चित्रित केल्या होत्या. त्या चित्रपटात गावाबाहेरील बहुतेक सर्व दलित कुटुंबे हिंदू धर्म सोडून बौद्ध बनायचे ठरवितात. कार्तिकीच्या कुटुंबियांचा धर्मांतर करायला विरोध असतो. परंतु जातीतील इतरांचा दबाव येत असतो. धर्मांतर करायला लागू नये यासाठी शेवटी ते संपूर्ण कुटुंब गळफास लावून जीव देते असे चित्रपटाच्या शेवटी दाखविले होते. आजच्या काळात हा चित्रपट आला असता तर त्याविरूद्ध आंदोलने होऊन चित्रपटावर बंदी आली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by औरंगजेब on Tue, 10/18/2016 - 08:14

Permalink

जातिय आरक्षण ही खारी समस्या

जातिय आरक्षण ही खारी समस्या आहे असे मी मानतो. आरक्षण हे संपुर्णतः आर्थिक आधारावर द्यावे. जसे की उदा. कुटुंबाचे सकल वार्षिक उत्पन्न प्रमाण मानावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Tue, 10/18/2016 - 10:07

In reply to जातिय आरक्षण ही खारी समस्या by औरंगजेब

Permalink

कैच्याकै. आरक्षण गरीबी हटाओ

कैच्याकै. आरक्षण गरीबी हटाओ नाही. गरीबांना वाजवी दरात कर्ज द्यावं/ शिष्यवृत्ती द्यावी. गरीब असल्याचा आणि आरक्षणाची गरज असण्याचा संबंध नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/18/2016 - 10:39

In reply to कैच्याकै. आरक्षण गरीबी हटाओ by अनुप ढेरे

Permalink

सहमत ,

सहमत , आरक्षणाचा अर्थ चांगल्या शिकलेल्यानाही कळत नाही अजून.. काय करावे?
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 10/18/2016 - 10:48

In reply to जातिय आरक्षण ही खारी समस्या by औरंगजेब

Permalink

असहमत

आरक्षण हे संपुर्णतः आर्थिक आधारावर द्यावे.
याच्याशी असहमत. ज्या जातींना त्यांच्या जातीपोटी शेकडो वर्षे सर्व प्रकारचे हक्क नाकारण्यात आलेले होते, ज्यांना गावकुसाच्या बाहेर वस्ती करायला लागायची, त्यांना जाती आधारावर आरक्षण असले पाहिजे. मात्र त्यात थोडी सुधारणा केली गेली पाहिजे. मराठा समाजाकडे वर्षानुवर्षे सत्ता असूनही काही मोजकी घराणीच संपन्न होत गेली व सर्वसामान्य मराठा मात्र तसाच राहिला. शिवाय या सत्ताधारी मराठा लोकांविरूध्द ब्र काढण्याचीही कधी कोणी हिमंत करू शकले नाही. कारण ते शक्यच नव्हते.आज तेच सत्ताधारी सत्तेपासून पायउतार झाल्यामुळे सर्वसाधारण मराठा समाज त्यांच्या मगरमिठीतून थोडासा मुक्त होऊन आज उस्फुर्त पणे आंदोलन करण्याच्या स्थितीत आला आहे. विशेष करून मंडल आयोगाच्या शिफारशी अमलात आल्यावर तर ही अस्वस्थता कमालीची वाढली पण ज्यांच्याकडे सत्ता होती व जे काही करू शकले असते त्यांनी ह्या अस्वस्थतेची दखलच घेतली नाही कारण त्यांना मंडल आयोगाचा कोणताच दुष्परिणाम भोगावा लागणार नव्हता. अर्थात हा उस्फुर्तपणा लक्षात आल्यावर बाकीपण त्यात सामील होऊन तापल्या तव्यावर आपली पोळी भाजायचा प्रयत्न करणार हेही ओघाने आलेच. तरीही मूळ उर्जेची दखल घ्यावीच लागेल. (१२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राचा विचार करता ३-४ कोटी लोकांचा आरक्षणाचा हा प्रश्न खूप मोठा मानावा लागेल पण १२५ कोटी भारतीयांच्या संदर्भात आरक्षणाचे कायदे केले जातात याचे भानही राखायला लागेल.) अगदी तसेच दलितां मधील काही ठराविक लोकच या आरक्षणाचा फायदा उठवत राहिले आहेत व जे खरे गरजू आहेत त्यांची स्थिती मागासलेपणाचीच राहिली आहे. उदाहरणार्थ देवयानी खोब्रागडे यांचे वडिल व काका मोठे भारतीय प्रशासकीय अधिकारी होते. असे असताना देवयानी खोब्रागडे एका बाजूला व त्यांच्या जातीतील इतर सामान्य उमेदवार यातील कोणाला बरे आरक्षणाचे फायदे मिळतील? याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी जे २-३ पिढ्या आरक्षणाचे फायदे मिळवत आहेत त्यांना रोखले पाहिजे तरच तळागाळातील इतरांना संधी प्राप्त होऊ लागतील. मात्र यासाठी त्यांच्यातीलच लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. इतरांचे येथे काम नाही. आज किंवा उद्या हे नक्कीच होणार आहे पण तोपर्यंत वाट पहाणेच येवढेच इतरांच्या हातात आहे असे मला वाटते. खरे म्हणजे धाग्याचा हा विषय नाही. पण आरक्षणाच्या विरोधात आलेला मुद्दा पटला नाही व राहवले नाही म्हणून लिहिले. त्यासाठी इथे मुद्दामहून स्पष्ट करत आहे की, मी दलितांना हिंदूच मानतो. त्यांचे भारताच्या उत्कर्षात योगदान आहे याचीही मला जाणिव आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 10/18/2016 - 11:07

In reply to असहमत by शाम भागवत

Permalink

आपण जे म्हणता तेच संदर्भ

आपण जे म्हणता तेच संदर्भ आर्थिक आरक्षणालाही लागू होतात... आरक्षण जर आर्थिक निकषावर लागू केलं तर सध्या जे आरक्षणाचा लाभ उठवत आहेत त्यांना तसाही फायदा होणारंच आहे.. त्यांचं आरक्षण तसाही अबाधितच राहील कि.. फक्त जे आर्थिक श्रीमंत मागासवर्गीय आहेत तेच एक्सक्लुड होतील ह्यातून... (अर्थात ह्या देशात आर्थिक निकषावर आरक्षण होण्याची वाट अशक्यतेच्याच वळणावर आहे हे माहित असूनसुद्धा मी हे मत मांडत आहे) असो विषय वेगळाच आहे अर्थात ह्या धाग्याचा...
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Tue, 10/18/2016 - 11:21

Permalink

मला पडलेला प्रश्न ...कोणाकडे उत्तर आहे का.....?

१९४८ साली गांधीजींचे निधन झाले. १९५० साली भारतीय राज्यघटना तयार झाली. या तीन वर्षात गांधीजी हयात असते तर जातीय वा धर्मावर आधारित आरक्षणाचा श्रीगणेशा त्यानी होऊ दिला असता का...... ?
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 10/18/2016 - 11:28

In reply to मला पडलेला प्रश्न ...कोणाकडे उत्तर आहे का.....? by चौकटराजा

Permalink

वपु म्हणून गेले होते... "जर

वपु म्हणून गेले होते... "जर आणि तर शब्दांची सुंदर प्रेते" (गांधीजींनी तर ब्रिटिशांसाठी पण आरक्षण मागितलं असतं बाबा...)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रतापराव on Tue, 10/18/2016 - 11:32

In reply to वपु म्हणून गेले होते... "जर by वटवट

Permalink

गांधीजी असते तर आरक्षणाविषयी

गांधीजी असते तर आरक्षणाविषयी उपोषणाला बसले असते. ते अत्यंत धार्मिक आणि जात धर्म ह्याचा अभिमान बाळगणारे होते. त्यांच्यात दयाळू वृत्ती होती, दलितांबद्दल सहानभूती होती मात्र त्याने दलितांचे प्रश्न सुटले नसते दलितांचे प्रश्न सुटण्याचा एकाच मार्ग होता राजकीय आणि सामाजिक हक्क.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रतापराव on Tue, 10/18/2016 - 11:34

In reply to गांधीजी असते तर आरक्षणाविषयी by प्रतापराव

Permalink

गांधीहजींनी आरक्षणाला विरोध

गांधीहजींनी आरक्षणाला विरोध म्हणून प्राणांतिक उपोषण केले असते
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Tue, 10/18/2016 - 15:37

In reply to गांधीहजींनी आरक्षणाला विरोध by प्रतापराव

Permalink

अधिक विस्ताराने लिहा, शक्य

अधिक विस्ताराने लिहा, शक्य असल्यास. गांधींनी स्वतंत्र मतदारसंघास विरोध केला माहित आहे. आरक्षणास विरोध असल्याचा काही विदा ?
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Tue, 10/18/2016 - 15:42

In reply to अधिक विस्ताराने लिहा, शक्य by sagarpdy

Permalink

स्वतंत्र मतदारसंघाला पर्याय

स्वतंत्र मतदारसंघाला पर्याय आरक्षण असा गांधींनी मान्य केलाच, उलट हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त असावे असा आग्रह धरला.
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Wed, 10/19/2016 - 09:11

In reply to अधिक विस्ताराने लिहा, शक्य by sagarpdy

Permalink

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ आणि १९३५ मध्ये कम्युनल रिप्रेझेंटेशन लागू करण्यात आलं होतं... तेंव्हा गांधीजींनी का नाही बरे रद्दबातल ठरवलं??? आय डाउट ते आरक्षणाच्या विरोधात बसेल असते... उलट दलितांना त्यांनी वेगळं "हरिजन" असं संबोधलं होतं...मग वेगळी वागणूक आरक्षणाच्या नावाखाली कशी त्यांनी दिली नसती???
  • Log in or register to post comments

Submitted by प्रतापराव on Tue, 10/18/2016 - 11:23

Permalink

उद्या एखाद्या श्रीमंताने दारू

उद्या एखाद्या श्रीमंताने दारू पिऊन, छानछोकी करून सारा पैसे उडवला आणि तो गरीब झाला तर त्या अर्थाने तो आरक्षण मागू शकेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रतापराव on Tue, 10/18/2016 - 11:28

Permalink

गरीब प्रत्येक जातीत असतात.

गरीब प्रत्येक जातीत असतात. उच्चवर्णीयातही गरीब असतात आणि दलितातही गरीब असतात. त्यांची आर्थिक स्तिथी समान असली तरी सामाजिक स्तिथीत फरक असतोच. दलिताला गरिबीच्या चटक्याबरोबर आणखी एक चटका बसलेला असतो जातीचा.जात हि सामाजिक असेल तर आरक्षण हि सामाजिक अवस्थेवरच द्यायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by अंतरा आनंद on Wed, 10/19/2016 - 09:46

In reply to गरीब प्रत्येक जातीत असतात. by प्रतापराव

Permalink

सहमत. आणि आर्थिक स्थिती

सहमत. आणि आर्थिक स्थिती चांगली नसणार्^यांना सवलत असते.
  • Log in or register to post comments

Submitted by chitraa on Tue, 10/18/2016 - 11:39

Permalink

... विनोद !

जेंव्हा दलिताना आरक्षण होते तेंव्हा ब्राह्मण व मराठे आरक्षणामुळे गुणवंतांवर अन्याय होतो असे म्हणत होते. आता मराठे आरक्षण मागताहेत व ब्राह्मण संघटना त्याना अनुमोदन देत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 10/18/2016 - 11:42

Permalink

आर्थिक स्थितीवर आरक्षण हा

आर्थिक स्थितीवर आरक्षण हा बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न आहे, माणूस गरीब किंवा श्रीमंत स्वतःच्या कर्माने होतो, जात व जातीनिहाय होणाऱ्या भेदभावाला कोणत्याही प्रकारे टाळू शकत नाही. त्यासाठी आरक्षण असते,
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on Tue, 10/18/2016 - 21:52

In reply to आर्थिक स्थितीवर आरक्षण हा by संदीप डांगे

Permalink

एकदम चपखल उत्तर दिलेत राव..

एकदम चपखल उत्तर दिलेत राव.. +१०००
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Tue, 10/18/2016 - 23:18

In reply to आर्थिक स्थितीवर आरक्षण हा by संदीप डांगे

Permalink

बरोबर डांगे साहेब. हेच मी

बरोबर डांगे साहेब. हेच मी मागे एका धाग्यावर सांगितले होते. माणसाची आर्थिक स्थिती चांगली असली तरी त्याची सामाजिक स्थिती चांगली असेलच असे नाही. बऱ्याच जणांना आरक्षणाची तरतूद का केली आहे हेच माहिती नाही आणी आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी करतात जी मला बिलकुल पटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 10/19/2016 - 07:55

In reply to आर्थिक स्थितीवर आरक्षण हा by संदीप डांगे

Permalink

सहमत आहे डांगेबुआ, बिहारात

सहमत आहे डांगेबुआ, बिहारात ह्याचे वास्तविक चित्र पाहून आहोत, जिथे गावातील प्रतिष्ठित अन मेहनत (भाजीपाला शेती, मखाना फॅक्टरी) करून वर आलेला कूर्मी , पासवान माणूस खाटेच्या खाली बसतो अन दिवसभर विड्या फुकत टाईमपास करणारा भूमिहार पंचायतीत येऊन बसतो कारण तो भूमिहार म्हणजे सामाजिक लेव्हल वर उच्चं ना! तिथे पासवान कूर्मी चा पैसा नाही उपयोगी पडत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user दिलीप सावंत

Submitted by दिलीप सावंत on Tue, 10/18/2016 - 11:47

Permalink

दलित हिंदु नाहित का?

प्रतापराव... तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 10/18/2016 - 12:13

Permalink

देवयानी खोब्रागडे यांचे

देवयानी खोब्रागडे यांचे उदाहरण आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच दिले जाते. भारतीय परराष्ट्र सेवेत वरचे पद मिळवणे व इतर आधिभौतिक प्रगती साधूनही भारतीय जनमानस त्यांची जात काही विसरत नाही. याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते. खोब्रागडे हे केवळ एक उदाहरण झाले. कुठल्याही दलिताने समजा कितीही प्रगती केली, तथाकथित मुख्य प्रवाहात स्वतःला सिद्ध करून दाखवले तरी तो स्वतःच्या जातीपासून मुक्त होऊ शकत नाही हे जातिव्यवस्थेचे सर्वात मोठे व्यवच्छेदक लक्षण आहे, तसाच तो जातिव्यवस्थेचा फार भयावह परिणाम सुद्धा आहे. आरक्षण वगैरे बाबी तर फार दूर राहिल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 10/18/2016 - 12:32

In reply to देवयानी खोब्रागडे यांचे by एस

Permalink

थोडी

असहमती.. देवयानी बाईंनीच कांगावा केला होता मी अमुक तमुक आहे म्हणून सरकार (माझ्या चुकीच्या वागण्यातही) माझ्या बाजूने अमेरिकन वकिलातीशी भांडत नाही म्हणून. म्हणजे गंमत बघा जातीचा जो काही शासकीय फायदा देवयानी यांनी घेतला (अगदी त्यांच्या पिताश्रींनीही) त्याच सरकारला आप्लया चुकीकरीता (भ्लामण) केली नाही की (जातामुळे असे) दूषणे द्य्यायची अजब न्याय आहे हा!

आरक्षणाने एखाद्याची प्रगती (सामाजीक्/शासकीय नोकरी वगैरे) झाली तर त्याची त्याला लाजही असू नये पण माजही असू नये.

  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Tue, 10/18/2016 - 12:43

In reply to देवयानी खोब्रागडे यांचे by एस

Permalink

देवयानी खोब्रागडे यांचे

देवयानी खोब्रागडे यांचे उदाहरण आरक्षणाच्या बाबतीत नेहमीच दिले जाते.
खरे आहे. नेहमी सर्वांना माहित असेल अशीच नावे उदाहरणासाठी दिली जातात. मी मला माहित असलेल्या प्रत्यक्ष घटना न देता हाच मार्ग चोखाळला.
तसाच तो जातिव्यवस्थेचा फार भयावह परिणाम सुद्धा आहे.
सहमत. मात्र
भारतीय परराष्ट्र सेवेत वरचे पद मिळवणे व इतर आधिभौतिक प्रगती
येवढे पुरेसे होणार नाही.आरक्षणातून संधी मिळून त्याद्वारे त्यांच्या हातून दैदिप्यमान अशा काही गोष्टी घडाव्या लागतील तेव्हा मग हाही दृष्टिकोन हळूहळू बदलू लागेल. पण त्याला काही काळ जाऊ द्यावा लागेल. तशी इच्छा निर्मीती त्यांच्यातील कोणाकडून तरी लवकरात लवकर व्हावी ही परमेश्वराप्रती प्रार्थना.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com