मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशी सजेल दिवाळी

नूतन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ. सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि आनंदाची अशी दिवाळीच मला खुणावू लागली.मग काय विचार पक्का झाला आणि कामाला सुरवात कॆली. दिवाळी म्हटलं की सर्वप्रथम आठवतॊ तॊ आकाश कंदील.तॆंव्हा सादर आहॆ, क्विलींगचा आकाश कंदील.......





आकाश कंदीला पाठॊपठ यॆतॆ ती अंगण सजवणारी रांगॊळी,प्रस्तुत आहॆ रांगॊळी....

आकाश कंदील लागला ,रांगॊळीही काढून झाली. दीपावली म्हणजॆ दिव्यांची आवली.तर मग अमावस्यॆच्या अंधकाराला उजळून टाकणाऱ्या आपल्या पणती भॊवतीची ही सजावट....

मंडळी,या शुभसूचक रांगॊळीनॆ आणि प्रकाशदिव्यांनी आपणा सर्वांचॆ आयुष्य सुखसमृद्धीनॆ आणि आनंदानॆ झळाळून उठॊ,हीच ईश्वर्चरणी प्रार्थना! शुभ दीपावली!

वाचने 12726 वाचनखूण प्रतिक्रिया 40

नूतन 13/10/2016 - 08:30
फोटो नेहमी प्रमाणे गुगलवर चढवले आहेत आणि मला लॉग इन न करताही दिसत आहेत. काय प्रॉब्लेम असावा? कुणी मार्गदर्शन करु शकेल का?

In reply to by नूतन

कंजूस 13/10/2016 - 10:41
१) फोटोवर क्लिक करा २)मोठा दिसल्यावर लिंक कॅाप करा ३)ही लिंक ( गुगल लॅागिन नसताना ) नवीन अड्रेस बारमध्ये पेस्ट करून तो फोटो मोठा दिसतो का पाहा. दिसला तर ती लिंक वापरा. - ४)सध्याच्या लिंक पेस्ट करून पाहिल्या तेव्हा नाही दिसत शिवाय साइज फक्त ५ kb येतेय (thumbnail). मोठे फोटो बहुधा १५० ते ६०० kb असतात.

In reply to by नूतन

अभ्या.. 14/10/2016 - 19:29
दिसले दिसले. एक नंबर जबरदस्त काम झालेय. आकाशकंदील तर खतरनाक भारी झालाय. अल्टीमेट काम. गणेशचित्रमालेच्या क्विलिंगमास्टरची भारीच कामगिरी.

रुस्तम 14/10/2016 - 19:29
मस्तच आता फोटो दिसत आहेत.

In reply to by यशोधरा

अभ्या.. 14/10/2016 - 23:14
सूडक्या, कंदील जबरा जमलाय. फोटो तर काय पार कंदील बलोच म्हणले असते पण गेली बिचारी. असो. लास्ट फोटो भयंकर आवडलेला हाये.

कंजूस 14/10/2016 - 20:32
खुपच सुंदर आणि सुबक!!! ( आताचे फोटो सुमारे १३० kb JPEG आले आहेत) मला वाटतं jpeg फोटोत नाव /watermark नाही केले तर अधिक kbचे येतील.

स्वाती दिनेश 15/10/2016 - 12:32
सुंदर आहेत ग तुझ्या सगळ्या कलाकृती, सूड, तू केलेला कंदिलही सुरेख. स्वाती

नूतन 18/10/2016 - 09:44
प्रतिसाद आणि कौतुकासाठी मनापासून आभार. ऑनलाईन क्विलिंग शिकवता येणं जरा कठीण आहे, पण एखाद्या मिपा कट्ट्यावर जरूर शिकवेन. दिनांक २२ आणि २३ ऑक्टोबरला ठाणे येथे आयोजीत एका प्रदर्शनात माझ्या क्वीलींगच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी मी सहभागी होत आहे.सर्वाना आग्रहाचे निमंत्रण.

In reply to by नूतन

किसन शिंदे 18/10/2016 - 17:47
ठाण्यात कुठे? गावदेवी मैदान कि घंटाळी मैदान कि शिवसमर्थ शाळेचे पटांगण??

In reply to by किसन शिंदे

नूतन 18/10/2016 - 23:58
दिनांक २२ शनिवार व २३ रविवार नौपाडा हिंदू भगिनी मंडळ पूजा अपार्टमेंट, हरी कृष्ण लेन ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे धन्यवाद

त्रिवेणी 18/10/2016 - 20:11
जबरी आहे सगळी कलाकुसर. @सुड तुमचा ही आकाशकंदिल मस्त. पुण्यात मिळतील का असे आकाशकंदिल.

पैसा 19/10/2016 - 16:41
सगळेच फोटो फार सुरेख आलेत. जबरदस्त कलाकृती आहेत या!