✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अशी सजेल दिवाळी

न
नूतन यांनी
Wed, 10/12/2016 - 23:35  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ. सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि आनंदाची अशी दिवाळीच मला खुणावू लागली.मग काय विचार पक्का झाला आणि कामाला सुरवात कॆली. दिवाळी म्हटलं की सर्वप्रथम आठवतॊ तॊ आकाश कंदील.तॆंव्हा सादर आहॆ, क्विलींगचा आकाश कंदील.......





आकाश कंदीला पाठॊपठ यॆतॆ ती अंगण सजवणारी रांगॊळी,प्रस्तुत आहॆ रांगॊळी....

आकाश कंदील लागला ,रांगॊळीही काढून झाली. दीपावली म्हणजॆ दिव्यांची आवली.तर मग अमावस्यॆच्या अंधकाराला उजळून टाकणाऱ्या आपल्या पणती भॊवतीची ही सजावट....

मंडळी,या शुभसूचक रांगॊळीनॆ आणि प्रकाशदिव्यांनी आपणा सर्वांचॆ आयुष्य सुखसमृद्धीनॆ आणि आनंदानॆ झळाळून उठॊ,हीच ईश्वर्चरणी प्रार्थना! शुभ दीपावली!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
12657 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाहीयेत. बादवे, लेख

एस
Wed, 10/12/2016 - 23:44 नवीन
फोटो दिसत नाहीयेत. बादवे, लेख कलादालनात हलवा.
  • Log in or register to post comments

गणेशा झालाय माझा.

रेवती
गुरुवार, 10/13/2016 - 04:07 नवीन
गणेशा झालाय माझा.
  • Log in or register to post comments

नाही.. मलाही दिसत नाहीयेत.

रुपी
गुरुवार, 10/13/2016 - 04:23 नवीन
नाही.. मलाही दिसत नाहीयेत. बहुतेक पब्लिक अ‍ॅक्सेस नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मीपण तुझ्याच बोटीत.

यशोधरा
गुरुवार, 10/13/2016 - 07:50 नवीन
मीपण तुझ्याच बोटीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

५-५ kbचे pngफोटोलिंक आहे आणि

कंजूस
गुरुवार, 10/13/2016 - 08:20 नवीन
५-५ kbचे pngफोटोलिंक आहे आणि पब्लिक अक्सेस नाही.
  • Log in or register to post comments

गैरसोयीसाठी क्षमस्व

नूतन
गुरुवार, 10/13/2016 - 08:30 नवीन
फोटो नेहमी प्रमाणे गुगलवर चढवले आहेत आणि मला लॉग इन न करताही दिसत आहेत. काय प्रॉब्लेम असावा? कुणी मार्गदर्शन करु शकेल का?
  • Log in or register to post comments

मला वाटते, सगळ्यांना(पब्लिक)

यशोधरा
गुरुवार, 10/13/2016 - 08:34 नवीन
मला वाटते, सगळ्यांना(पब्लिक) फोटो पाहण्याचा अ‍ॅक्सेस न देण्यामुळे असे झालेय. ते चेक करा प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

१) फोटोवर क्लिक करा

कंजूस
गुरुवार, 10/13/2016 - 10:41 नवीन
१) फोटोवर क्लिक करा २)मोठा दिसल्यावर लिंक कॅाप करा ३)ही लिंक ( गुगल लॅागिन नसताना ) नवीन अड्रेस बारमध्ये पेस्ट करून तो फोटो मोठा दिसतो का पाहा. दिसला तर ती लिंक वापरा. - ४)सध्याच्या लिंक पेस्ट करून पाहिल्या तेव्हा नाही दिसत शिवाय साइज फक्त ५ kb येतेय (thumbnail). मोठे फोटो बहुधा १५० ते ६०० kb असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

मलाही दिसत नाहीयेत फोटो.

नूतन सावंत
गुरुवार, 10/13/2016 - 18:57 नवीन
मलाही दिसत नाहीयेत फोटो.
  • Log in or register to post comments

दिसले दिसले. एक नंबर जबरदस्त

अभ्या..
Fri, 10/14/2016 - 19:29 नवीन
दिसले दिसले. एक नंबर जबरदस्त काम झालेय. आकाशकंदील तर खतरनाक भारी झालाय. अल्टीमेट काम. गणेशचित्रमालेच्या क्विलिंगमास्टरची भारीच कामगिरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

ओह! भारीच सुंदर!

यशोधरा
Fri, 10/14/2016 - 19:27 नवीन
ओह! भारीच सुंदर!
  • Log in or register to post comments

मस्तच

रुस्तम
Fri, 10/14/2016 - 19:29 नवीन
मस्तच आता फोटो दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

सुंदरच!! हा आमचा मागल्या

सूड
Fri, 10/14/2016 - 20:14 नवीन
सुंदरच!! हा आमचा मागल्या वर्षीचा कंदील!! Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

वा! हे फोटोही सुरेख आहेत!

यशोधरा
Fri, 10/14/2016 - 21:26 नवीन
वा! हे फोटोही सुरेख आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सूडक्या, कंदील जबरा जमलाय.

अभ्या..
Fri, 10/14/2016 - 23:14 नवीन
सूडक्या, कंदील जबरा जमलाय. फोटो तर काय पार कंदील बलोच म्हणले असते पण गेली बिचारी. असो. लास्ट फोटो भयंकर आवडलेला हाये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हाही छान झालाय.

अनन्न्या
Wed, 10/19/2016 - 18:43 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खुपच सुंदर आणि सुबक!!!

कंजूस
Fri, 10/14/2016 - 20:32 नवीन
खुपच सुंदर आणि सुबक!!! ( आताचे फोटो सुमारे १३० kb JPEG आले आहेत) मला वाटतं jpeg फोटोत नाव /watermark नाही केले तर अधिक kbचे येतील.
  • Log in or register to post comments

सूड , तमारापण बहु सारो छे।

कंजूस
Fri, 10/14/2016 - 20:34 नवीन
सूड , तमारापण बहु सारो छे।
  • Log in or register to post comments

लेखातल्या आणि सूड दोघांच्याही

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/14/2016 - 20:35 नवीन
लेखातल्या आणि सूड यांच्या, दोन्हीही कलाकृती खूप सुंदर आहेत !
  • Log in or register to post comments

जबरी फोटो आहेत..

पिंगू
Fri, 10/14/2016 - 20:50 नवीन
जबरी फोटो आहेत..
  • Log in or register to post comments

फोटो दिसले. फारच छान. सूड

एस
Fri, 10/14/2016 - 22:51 नवीन
फोटो दिसले. फारच छान. सूड यांचेही फोटो छान आहेत.
  • Log in or register to post comments

जबराट केलेय राव सगळे. सूडचा

किसन शिंदे
Sat, 10/15/2016 - 11:53 नवीन
जबराट केलेय राव सगळे. सूडचा कंदील आधी पाहीला होताच, तुमचंही क्विलिंग वर्क किलर दिसतंय अगदी
  • Log in or register to post comments

इथे ऑनलाईन क्विलिंग शिकवता

यशोधरा
Sat, 10/15/2016 - 12:11 नवीन
इथे ऑनलाईन क्विलिंग शिकवता येईल का?
  • Log in or register to post comments

+१

किसन शिंदे
Sat, 10/15/2016 - 12:17 नवीन
+१ आम्हालाही शिकवा की, तुम्ही कसं करता ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वा..

स्वाती दिनेश
Sat, 10/15/2016 - 12:32 नवीन
सुंदर आहेत ग तुझ्या सगळ्या कलाकृती, सूड, तू केलेला कंदिलही सुरेख. स्वाती
  • Log in or register to post comments

मूळ धाग्यातल्या कलाकृती आणि

सस्नेह
Sat, 10/15/2016 - 12:55 नवीन
मूळ धाग्यातल्या कलाकृती आणि सूडची, दोन्ही सुंदर आहेत !
  • Log in or register to post comments

सुंदर!!!

सानझरी
Mon, 10/17/2016 - 12:33 नवीन
सुंदर!!!
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख!

उल्का
Mon, 10/17/2016 - 12:36 नवीन
अतिशय सुरेख!
  • Log in or register to post comments

सुंदर....

बरखा
Mon, 10/17/2016 - 13:01 नवीन
खुपच सुंदर आहेत सर्व फोटो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नूतन
Tue, 10/18/2016 - 09:44 नवीन
प्रतिसाद आणि कौतुकासाठी मनापासून आभार. ऑनलाईन क्विलिंग शिकवता येणं जरा कठीण आहे, पण एखाद्या मिपा कट्ट्यावर जरूर शिकवेन. दिनांक २२ आणि २३ ऑक्टोबरला ठाणे येथे आयोजीत एका प्रदर्शनात माझ्या क्वीलींगच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी मी सहभागी होत आहे.सर्वाना आग्रहाचे निमंत्रण.
  • Log in or register to post comments

स्टॉलचे, कलाकृतींचे फोटो टाका

अभ्या..
Tue, 10/18/2016 - 11:09 नवीन
स्टॉलचे, कलाकृतींचे फोटो टाका इथे नूतनताई, प्रदर्शनाचा वृत्तांत आल्यास अतिउत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

हो जरुर टाका फोटो.

यशोधरा
Tue, 10/18/2016 - 18:15 नवीन
हो जरुर टाका फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ठाण्यात कुठे?

किसन शिंदे
Tue, 10/18/2016 - 17:47 नवीन
ठाण्यात कुठे? गावदेवी मैदान कि घंटाळी मैदान कि शिवसमर्थ शाळेचे पटांगण??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन

प्रदर्शन

नूतन
Tue, 10/18/2016 - 23:58 नवीन
दिनांक २२ शनिवार व २३ रविवार नौपाडा हिंदू भगिनी मंडळ पूजा अपार्टमेंट, हरी कृष्ण लेन ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

क्विलिंग वर्क अगदी किलींग आहे

सही रे सई
Tue, 10/18/2016 - 18:52 नवीन
सुड आणि नुतन, क्विलिंग वर्क अगदी किलींग आहे. आम्हाला पण शिकवा की. याच साहित्य कुठे मिळत?
  • Log in or register to post comments

जबरी आहे सगळी कलाकुसर.

त्रिवेणी
Tue, 10/18/2016 - 20:11 नवीन
जबरी आहे सगळी कलाकुसर. @सुड तुमचा ही आकाशकंदिल मस्त. पुण्यात मिळतील का असे आकाशकंदिल.
  • Log in or register to post comments

सुन्दर कलाकुसर

अमिता राउत
Wed, 10/19/2016 - 00:11 नवीन
अप्रतिम , नवीन प्रकारचा आकाश कंदील पाहायला मिळाला .
  • Log in or register to post comments

सर्व फोटू मस्त. सुडकूचाही

रेवती
Wed, 10/19/2016 - 02:40 नवीन
सर्व फोटू मस्त. सुडकूचाही फोटू छान.
  • Log in or register to post comments

अप्रतिम काम आहे!

अनन्न्या
Wed, 10/19/2016 - 08:27 नवीन
सहीच! ठाण्याला बहिण असते माझी नौपाड्यातच तिला सांगते.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पैसा
Wed, 10/19/2016 - 16:41 नवीन
सगळेच फोटो फार सुरेख आलेत. जबरदस्त कलाकृती आहेत या!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा