पिंग पिंनिंग ..पिंग पिनिंग ...
मोबाईलात सहाचा गजर झाला. धडपडत उठून ब्रश केलं, तोंड धुतलं आणि फ्रीज उघडल. दुध कालच संपलेलं. पन्नासची नोट आणि कॅरी बॅग घेऊन दुधवाल्याकडे गेले. दुधाचे दुकान कॉलनीच्या त्या टोकाला. लीटरचा पाउच घेतला आणि पन्नासची नोट त्याच्या हातावर टिकवली
‘छे रुपया छुट्टा देव भाबी.’
‘सुबे सुबे कैसा छुट्टा ? अब्बी तो निकली.’
‘तो चार रुपयेका क्या दू बोलो.’
‘कुच्च नको मेरेको..’
‘तो ठैरो अब्बी दुसरा गिराक आये तब लेना.’
घरात पडलेली सकाळची कामं आठवत तिथेच उभी राहिले. पाच सात मिनिटांनी चार रुपये हातात पडले. पळत सुटले.
‘एक कोल्हापूर.’ मी पन्नासची नोट कंडक्टरच्या हातात ठेवली.
‘ओ म्याडम, सहा रुपये द्या की सुट्टे.’
‘नाहीत. एक द्यू का ? पाच द्या परत.’
‘दिले की होते तेवढे पब्लिकला. आता सगळ्यांना कुठल्या कॉईनी वाटू ? टांकसाळ घालायला पायजे.’
‘सुट्टे झाल्यावर द्या.’
कंडक्टर साहेब करवादून गळ्यातला लघु-तिकीट-छापक सावरत पुढे सरकले.
प्रवास संपला. सुट्टे-घेणेकरी, खाली उतरलेल्या कंडक्टरशेजारी लाईन लावून उभे राहिले. काहींना मिळाले काहीना एकमेका साह्य करून आडजस्ट करावे लागले. हिशेब लवकर मिटण्याची लक्षणे दिसेनात, तसे घाईत असलेले काही जण सुट्ट्यांवर पाणी सोडून तसेच पळाले. काही अडेलतट्टू मात्र ‘बा’चा’बा’ची वर आले.
मी ‘घाईत’ वाल्या गटात. पळत जाऊन रिक्षात बसले. हापिसची वेळ जेमतेम गाठली.
‘पंचवीस द्या म्याडम’ रिक्षावाला.
दहाच्या तीन नोटा त्याच्या हातात ठेवल्या.
‘पाच सुट्टे द्या.’ लगेच आकाशवाणी झाली.
‘सुट्टे नाहीत.’
‘सकाळी सकाळी मी कुठून आणू सुट्टे ? भवानी झाली नाय अजून..’
‘तीस सुट्टे होते, ते दिले की. नाहीतर शंभरची नोट दिली असती.’
‘च्यायला सकाळी सकाळी पनवती, सुट्ट्यांची, गिरायकाच्या टायमाला खोळंबा ..’ पुटपुटत रिक्षावाला रस्त्यापलिकडच्या पानपट्टीत गेला. साताठ मिनिटं झाली तरी त्याचा पत्ता नाही. ऑफिसला उशीर म्हणून मी घायकुतीला. अखेर आला बाबा एकदाचा. पाचचे कॉईन हातात ठेवले आणि घुश्शातच टर्रर्र करत गेला.
पाच रुपयांपायी आज तीस मिनिटांचा खोळंबा. लेट मार्क. बॉसची बोलणी.
छ्या ! काय खरं नाय. ऑफिसचं काम सुरु असताना डोक्यात विचार. ‘आयला, हे रोजचंच गाणं झालंय की.’ रोज या तिन्ही चारी ठिकाणी जावंच लागतं. तिकीट, वस्तूंचे दर तेच ! काय करावं, टाईम लै जातो सुट्ट्यांपायी.
दुपारी शिपायाला शंभराची नोट घेऊन कॅशिअरकडे पाठवले. ‘पाच रुपयांची कॉईन आण सगळी.’
पाचच मिनिटात शिपाई परत आला.
‘मॅडम, त्यांच्याकडे तीनच आहेत...तीपण लागतात म्हटले.’
प्लॅन नं. १ चा बोऱ्या वाजला. प्लॅन नं. २.. बँकेत गेले. तिथंही तीच मागणी केली. तिथेही नन्नाचा पाढा. तिथला कॅशिअर ऑफिसवाल्या भाईबंदापेक्षा पोचलेला. तो म्हणाला ‘मॅडम, आमच्याकडे अशी गठ्ठ्याने येत नाहीत हो, कॉईन्स..!’
झाले. आता काय करावे ?
दुसऱ्या दिवशी दुधाला जाताना पन्नासची नोट आणि एक रुपयाचं कॉईन घेतलं.
‘पाच रुपये देणा जरा...’ दूधवाला.
‘एक रुपया दिया है ना ? आप पाच रुपये देदो.’ मी
‘मेरे पास होते तो तुमारेसे क्यू मांगता ?’
झाले. आजपण दहा मिनिटे खोळंबा.
बसमध्ये तोच प्रकार.
रिक्षाचा स्टॉप ठराविक. रिक्षावाला रिक्षात बसायच्या आधीच म्हणाला, ‘मॅडम, पाच सुट्टे आहेत नव्हं ?’
सगळीकडे पाचची पाचर ! आज काहीतरी तजवीज केलीच पाहिजे या पाचांची !
दिवस धावपळीत गेला आणि रात्री झोपताना आठवण झाली सकाळच्या पाचांची. झोप मरणाची आलेली. जाउदे म्हटलं आणि गाढ झोपी गेले.
सकाळी वेगळाच फंडा केला.
दुधवाल्या भय्याला सांगितलं. पन्नास घे आणि वहीत लिहून ठेव आजचे पाच रुपये तुझ्याकडे अनामत. उद्या-परवा कधीतरी दूध घेताना हिशेब कर.
भय्यानं आनंदानं मान्य केलं आणि मी रोजच्यापेक्षा लवकरच दूध घेऊन परत आले.
कंडक्टर मॅडम ना म्हटलं, ‘नाहीत का पाच ? राहूदे तुमच्याकडे. कधीतरी गाठ पडली तर द्या म्हणे परत.
मॅडमनी पहिल्यांदाच माझा चेहेरा नीट निरखून बघितला. ‘आणि नाहीच गाठ पडली तर ?’
‘तर काय ? राहूदे की. माझ्या पाच रुपयांनी काय तुम्ही घरावर माडी बांधणार आहात का मी बांधणार आहे ?’
‘बघा हं, तुम्हीच तक्रार कराल नाहीतर..?’
‘नाही, बाई.’ मी निरागसपणे म्हटले. कंडक्टर मॅडम च्या कपाळावरच्या एकूण चार आठ्यांपैकी दोन विरघळल्या. त्यांचा करवादलेला आवाज जरा मऊ झाला आणि त्या चक्क हसल्या. ‘झाले सुट्टे तर देईन हो उतरताना.’
रिक्षातही तोच प्रकार.
‘भाऊ, ठेवा तुमच्याकडे पाच रुपये. मी रोज या स्टॉपवर येत असते. कधी सुट्टे होतील तेव्हा द्या मला.’
रिक्षावाला प्रसन्न झाला. ‘मॅडम, आठवणीनं देतो हां नंतर.’
...आता दूधवाला पटकन दूध देतो, कंडक्टर हसून नमस्कार करतो आणि झटपट तिकीट हातात ठेवतो.
आणि रिक्षावाल्याला मी तीस रुपये दिले तर सुहास्यवदनाने त्यातले दहा मला परत करतो. ‘मॅडम, तुमचेच पाच आहेत माझ्याकडं, हे ठेवा.’
मी विचार करतेय, असेच कितीतरी रुपये वायफळ खर्च होत असतील, पण हे सोडलेले पाच रुपये मला कायकाय मिळवून देताहेत...?
..हसून नमस्कार करणारा कंडक्टर, दोन केळी जादा घालणारा फळवाला, पार्किंगमध्ये मधली सुरक्षित जागा राखून ठेवणारा पार्किंगबॉय, गेटच्या आत ऑफिसपर्यंत खुशीनं आणून सोडणारा रिक्षावाला, नवीन धान्ये आली की एक पोते बाजूला काढून ठेवणारा डिपार्टमेंटल स्टोरवाला आणि सुट्ट्याचा प्रॉब्लेम म्हणून एकाऐवजी दोन कॅडबर्या मिळाल्या म्हणून गोड हसून दोन्ही गालांची पप्पी देणारी तीन वर्षाची गोड भाची.
हे सगळं पाच रुपयांत ..? सौदा महाग आहे म्हणता ... ?? बोला आता !!
वाचने
16735
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला
IT वाले याच कारणाने शिव्या
गोष्ट आवडली.
मस्त लिहिले आहेस. आवडले.
मस्त लेख आहे. खरच कधी कधी
मस्त
पाचा
सुट्ट्याचा प्रॉब्लेम म्हणून
चांगला लेख आहे. असे मनात
मस्त लिहिलंय.
छान..
खूप छान लिहिलंय. आवडला लेख.
हॉटेलला असताना एक पोतराज आणि
जगणंं सोपंं करून देणारा हा
मस्त लिहिलंय!!!!!!!!
आवडले
लेख मस्त
" वढ पाचची " डायलॉग आठवला.
मस्स्त लेख!
मस्स्त लेख!
आवडलं आपल्याला
लेख आवडला
मारवाडी आहे गं !
In reply to लेख आवडला by पैसा
ओह!
In reply to मारवाडी आहे गं ! by सस्नेह
चांगलं लिहिलंय, इकडे जर्मनी
काही लोक मात्र बिल भरताना
In reply to चांगलं लिहिलंय, इकडे जर्मनी by शब्दबम्बाळ
हाहा! एक्क नंबर आहे तो!
In reply to काही लोक मात्र बिल भरताना by अभ्या..
सुट्टे
In reply to चांगलं लिहिलंय, इकडे जर्मनी by शब्दबम्बाळ
#Paytmkaro
गोष्ट पाच रुपयांची
किती गोड लिहिलेय. आवडले
मस्त लिहिलंय
आमचे आजोबा पुण्यात सोमवार
त्यांची अट अशी आहे कि तुम्ही
In reply to आमचे आजोबा पुण्यात सोमवार by सुबोध खरे
ते विचारावे लागेल
In reply to त्यांची अट अशी आहे कि तुम्ही by आदूबाळ
वाहवा! भारी लेख!
मस्त लेख.
छान लेख
चांगले लिहिलेय.
अॅल्यूमिनियमची नाणी.
In reply to चांगले लिहिलेय. by अभिजीत अवलिया
मस्तच
भारी !
मस्त
हा हा. भारी. आमचा दूधवाला
सौदा चांगला आहे. लेखन आवडले.
लेख एकदम मस्त. सुरुवातीच्या
मस्त लिहलयं... कोल्हापुरात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Why the world fears Russia’s S-400 Triumf missile defence system that India is buyingलोल !
In reply to मस्त लिहलयं... कोल्हापुरात by मदनबाण
आवडला लेख
भारी लेख !! बाकी इजारीच्या
मला रोज पाच लागतात !
In reply to भारी लेख !! बाकी इजारीच्या by किसन शिंदे
इथ बरयं
मस्त ले़ख.माझे सुट्ट्या
लेख सुंदर!
आवडले मुक्तक!
मस्त लेख!
छान लिहिलय!
छान
लेख आवडला.
लेख आवडेश... अगदी पटेश.....
आवडले लिखाण
छान लिहिलं आहे!
छान.
नाण्यांची मशीन्स.
पी एम टी....