Skip to main content

मैत्रीण ....... !!!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 10/10/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.

मैत्रीण ....... !!!!

माझ्याकडे दिवस डोक्यावर असताना
तु चांदणे पाहत असतेस कदाचित ,
तुझ्या नि माझ्या देशातले ऋतूही
सारखेच आहेत म्हणे ....
ऋतूंबरोबर मैत्री बदलत नाही ....
ती तिचा ओलावा कायम ठेवते, हे किती बरंय नाही ?

कुठलातरी ढग कधीतरी गच्च भरलेला
इथे माझ्या अंगणात येऊन बरसतो
रापलेल्या इथल्या तृणांमधून तो,
वाट काढत काढत दिशाहीन वाहत राहतो .......
'तो 'ढग तुझा होता;
ते मला कळत नाही, हे किती बरंय नाही ?

कधी इथल्या उन्हाची झळ पोचत असेल तुला
अन तुझ्या फुंकरीने थंड होऊन जात असेल,
तू दारात शिंपडलेल्या सड्यामधले
काही थेंब इथे मला चिंब करून टाकतात ,
त्या झळे मागे धावणारे एक मृगजळ होते ,
ते तुला कळत नाही, हे किती बरंय नाही ?

हा ! कधीतरी होतेच कि ग भेट,
तुझ्या डोळ्यातल्या अक्षरांबरोबर
माझ्या न बोलणाऱ्या शब्दांची,
अन आपल्या नजरेमध्येच दाटलेल्या त्या रिकाम्या ओळीत
ती अक्षरे नि शब्द, कंठ फुटल्यासारखे उमटतात
रिकामी ओळ गच्च भरून टाकतात .... डोळे बंद करेपर्यंत

तेव्हा ,

ते इतर कुणाला कळत नाही , हे किती बरंय नाही ?

------------ फिझा

लेखनविषय:

वाचने 2972
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अप्रतिम अप्रतिम. अतिशय आवडली.
माझ्या जीवलगे, तू हे वाचते आहेस का?


कविता मोठी होतेय..मस्तचं
असेच लिहीत रहा.