वेगवेगळ्या वाहिन्यांवरील वृत्तानुसार व वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील बातमीनुसार भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी आज पहाटे भारत व पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील काही अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करून काही अतिरेकी व सैनिकांना मारून भारतीय सैनिक सुखरूप भारतीय प्रदेशात परतले. काही वाहिन्यांवरून ५ अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले केले असे सांगण्यात येत आहे. काही वाहिन्या हीच संख्या ६ व ७ असे सांगत आहेत.
आपले २ सैनिक मारले गेले व काही जखमी झाले असे पाकिस्तानने जाहिररित्या मान्य केले आहे. परंतु भारताने सीमारेषा ओलांडलेली नाही असा त्यांचा दावा आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिकांनी ३०-३५ अतिरेकी मारले असेही आकडे वाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे.
एकंदरीत प्रत्येक वृत्तसंस्था वेगवेगळे आकडे सांगत आहे.
इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार, (http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-conducted…)
ndia conducted surgical strikes last night along the LoC to safeguard our nation, the Defence Ministry said on Thursday. “Significant casualties have been caused to terrorists and those trying to shield them. We don’t have a plan to further conduct such strikes. India has spoken to Pakistan,” DGMO Lt Gen Ranbir Singh said.
“… Now, based on very specific and credible information we received yesterday, that some terrorist teams had positioned themeselves at launch pads along the LoC with an aim to carry out infiltration and terrorist strikes in J&K and various other metros in our country. There were launch pads at the LoC where terrorists were present waiting to infiltrate the nation and attack areas in Kashmir and metros across the country,” the DGMO said. No Indian casualties occurred during the surgical strikes that were carried out last night by the Indian Army.
Meanwhile, Pakistan, in a statement issued has said: At least two Army men were killed as Indian and Pakistani troops exchanged fire over the Line of Control in “Azad Jammu and Kashmir”. The exchange of fire began at 2:30am, ISPR said, and continued till 8:00am. “Pakistani troops befittingly responded to Indian unprovoked firing on the LoC in Bhimber, Hotspring Kel and Lipa sectors,” the statement said.
दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे मंत्री जॉन केरी यांनी सुषमा स्वराजांची २ वेळा भेट घेऊन "पाकिस्तानबरोबरील वाद चिघळवू नका" असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर दोनच दिवसात हा हल्ला झाल्यामुळे भारत या हल्ल्याची तयारी करीत आहे असा अमेरिकेला अंदाज आलेला असावा. या हल्ल्याची व्याप्ती वाढली तर त्याचे छोट्या युद्धात रुपांतर होऊ शकते व त्यामुळे अमेरिकेच्या भारतीय उपखंडातील हितसंबंधावर परीणाम होऊ शकतो. म्हणूनच केरी यांनी जाहीररित्या हा सल्ला दिला असावा.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/india-pakistan-…
_________________________________________________________________________
असे हल्ले करण्याशिवाय भारताकडे पर्यायच शिल्लक नव्हता. आपली वाट लागली तरी चालेल, पण भारताला सुखाने जगू द्यायचे नाही हा विडा उचललेल्या पाकिस्तानला इतर कोणत्याही मार्गाने थोपविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी, संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानवर टीका, ट्रॅक २ डिप्लोमसी, पीपल-टू-पीपल कॉंटॅक्ट, बस-ट्रेन सेवा, मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा, भूतकाळातील सर्व युद्धात झालेले पराभव . . . अतिरेक्यांना प्रशिक्षण देऊन व शस्त्रे व इतर सर्व तर्हेची मदत देऊन भारतात पाठवून दहशतवादी कारवाया घडवून आणणे व अतिरेक्यांना आपल्या देशात आश्रय देण्याचे धोरण पाकिस्तान बदलायला तयार नाही. त्यामुळे जशास तसे उत्तर देणे हा एकमेव पर्याय शिल्लक होता.
आधी पठाणकोट हल्ला आणि आता झालेला उरी हल्ला यामुळे मोदींना जोरदार टीकेचा सामना करावा लागला. आपल्यात व आधीच्या सरकारमध्ये काहीच फरक नाही, आपण नुसते बोलघेवडे आहोत इ. स्वरूपाच्या टीकेमुळे मलीन झालेली आपली प्रतिमा बदलण्यासाठी हा हल्ला करणे आवश्यकच होते.
परंतु असे हल्ले करून शत्रूला जरब बसविण्यामागे जी प्रगल्भता लागते ती अजूनही भारताकडे आलेली दिसत नाही. मागील वर्षी आणि परत यावर्षी सुद्धा भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये प्रवेश करून फुटीरतावाद्यांना मारले होते. सिंधू पाणीवाटप करार रद्द करावा यासाठी चर्चा सुरू आहे. आणि आता आज पहाटे हा हल्ला झाला. या प्रत्येक घटनेनंतर प्रकर्षाने दिसतोय तो प्रसिद्धीचा उतावीळपणा. असे हल्ले गुपचूप करून हल्ले केल्यावरसुद्धा त्याची जाहिरात किंवा गाजावाजा केला नाही तर ते योग्य ठरेल. गतवर्षी म्यानमारमधील कारवाईनंतर लगेच लष्कराने पत्रकार परीषद घेऊन हल्ल्याची माहिती दिल्यावर लगेच म्यानमारने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अतिरेकी किंवा शत्रूच्या सैनिकांवर ज्या कारवाया केल्या जातात त्याची वाच्यता करण्याची गरज नाही. जुलैमध्ये सुरक्षा दलांनी काश्मिरमध्ये अतिरेकी बुर्हान वाणीला मारल्यानंतर लगेच ते जाहीर केले होते. त्यामुळे काश्मिरमध्ये जनतेला भडकावण्यात येऊन आजही तिथली परिस्थिती अशांत आहे. बुर्हान वाणी ७-८ महिने फरारी होता. त्याला मारल्यानंतर ते जाहीर न करता त्याचा अंत्यविधी गुपचुप उरकला असता तर तो मेल्याचे बाहेर समजले नसते व त्यामुळे पुढील समस्याही निर्माण झाल्या नसत्या. निदान भविष्यात तरी अशा कारवाया शेवटपर्यंत गुपचूप ठेवल्या तर नवीन समस्या निर्माण होणार नाहीत.
आजच्या कारवाईची जाहीर माहिती देऊन मोदी सरकारला आपली प्रतिमा उजळून घेण्यास मदत झाली असेल. परंतु त्यातून जिन्गोइझम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आता पुढील काही दिवसात अत्यंत बेजबाबदार वाहिन्यांवरून वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी व माजी लष्करी अधिकारी एकत्र बोलावून चर्चांचा कीस पाडला जाईल. भाजपचे प्रवक्ते स्वतःची पाठ थोपटून घेतील व काँग्रेसमध्ये असे करायची हिम्मतच नव्हती असे टोमणे मारतील. काँग्रेसवाले बांगलादेश मुक्तीचे उदाहरण देऊन आम्हीचे कसे ग्रेट होता व आमच्या काळातसुद्धा अशा कारवाया होत होत्या, पण आम्ही जाहिरातबाजी करीत नव्हतो असे प्रत्त्युत्तर देतील. यातून युद्ध होऊन दोन्ही देशातील नागरिकांना त्रास होईल व म्हणून अशा हल्ल्यांऐवजी चर्चा करावी असा सल्ला पाकिस्तानप्रेमी निधर्मांध देतील (मराठी वाहिन्यांवर प्रकाश बाळ, जतीन देसाई, हेमंत देसाई इ. मंडळी यात आघाडीवर असतील). भारताने काय करायला हवे याबाबत अनेकांचे सल्ले सुरू होतील. एकंदरीत पुढील काही दिवसात वाहिन्यांवरून प्रचंड धुरळा उडणार आहे.
आज झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान वठणीवर येईल व भारतावर हल्ले थांबवेल असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताने अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात, परंतु त्याचा गाजावाजा करू नये.
वाचने
73322
प्रतिक्रिया
290
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि
In reply to राधामोहन सिंग हे केंद्रीय by श्रीगुरुजी
सत्तेच्या राजकारणात कृषी
In reply to कृषीमंत्रालय महत्वाचे नाही by कैलासवासी सोन्याबापु
गुर्जींच्या म्हण्या प्रमाणे
In reply to सत्तेच्या राजकारणात कृषी by श्रीगुरुजी
हलक्या दर्जाचे किंवा
In reply to गुर्जींच्या म्हण्या प्रमाणे by विशुमित
दर्जा काय आणि महत्वाचे काय,
In reply to हलक्या दर्जाचे किंवा by श्रीगुरुजी
खालच्या क्लासचं नाही हो,
In reply to दर्जा काय आणि महत्वाचे काय, by विशुमित
कृषी हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे.
In reply to कृषीमंत्रालय महत्वाचे नाही by कैलासवासी सोन्याबापु
बोका साहेब- पवारांच्या
In reply to कृषी हा राज्यांच्या अखत्यारीतला विषय आहे. by बोका-ए-आझम
हे प्रसिद्धीपत्रक पवारांच्याच
In reply to बोका साहेब- पवारांच्या by विशुमित
म्हणजे हे खोटे किंवा अतिरंजित
In reply to हे प्रसिद्धीपत्रक पवारांच्याच by श्रीगुरुजी
सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!
In reply to म्हणजे हे खोटे किंवा अतिरंजित by विशुमित
हे हे, हा हा, हो हो!
In reply to हे प्रसिद्धीपत्रक पवारांच्याच by श्रीगुरुजी
मला वाटते या पुढे गुरुजींच्या
In reply to हे हे, हा हा, हो हो! by संदीप डांगे
हे हे, हा हा, हो हो!
In reply to हे हे, हा हा, हो हो! by संदीप डांगे
आप समझे नही,
In reply to हे हे, हा हा, हो हो! by श्रीगुरुजी
"मंत्र्यांच्या खात्याने
In reply to आप समझे नही, by संदीप डांगे
बरोबर, फक्त मंत्री कोण होता
In reply to "मंत्र्यांच्या खात्याने by श्रीगुरुजी
बरोबर, फक्त मंत्री कोण होता
In reply to बरोबर, फक्त मंत्री कोण होता by कैलासवासी सोन्याबापु
एखादं उदाहरण भाजप मंत्र्यांचे
In reply to बरोबर, फक्त मंत्री कोण होता by श्रीगुरुजी
तुम्ही शोधा की, सापडल्यावर
In reply to एखादं उदाहरण भाजप मंत्र्यांचे by संदीप डांगे
आम्हाला शोधायला गुरुजींइतका
In reply to तुम्ही शोधा की, सापडल्यावर by मोदक
>>> आम्हाला शोधायला
In reply to आम्हाला शोधायला गुरुजींइतका by संदीप डांगे
तुम्ही यच्चयावत प्रत्येक
In reply to >>> आम्हाला शोधायला by श्रीगुरुजी
त्यात काय सिद्ध करायचंय.
In reply to तुम्ही यच्चयावत प्रत्येक by संदीप डांगे
अहो गुरुजी, "यच्चयावत
In reply to त्यात काय सिद्ध करायचंय. by श्रीगुरुजी
तेच सिद्ध करतोय की. टेराबायटी
In reply to अहो गुरुजी, "यच्चयावत by संदीप डांगे
ओके! माझं विधान सिद्ध करताय..
In reply to तेच सिद्ध करतोय की. टेराबायटी by श्रीगुरुजी
वेगळी जाहिरात करण्याची गरजच
In reply to ओके! माझं विधान सिद्ध करताय.. by संदीप डांगे
??
In reply to हे हे, हा हा, हो हो! by श्रीगुरुजी
विरोधी पक्षाचे व नेत्याचे जे
In reply to बोका साहेब- पवारांच्या by विशुमित
मलाही तेच म्हणायचं आहे.
In reply to विरोधी पक्षाचे व नेत्याचे जे by संदीप डांगे
हा प्रतिसाद पवारांच्या
In reply to विरोधी पक्षाचे व नेत्याचे जे by संदीप डांगे
+ अनुमोदन
In reply to हा प्रतिसाद पवारांच्या by अप्पा जोगळेकर
ह्या धाग्यावर नाही...
In reply to हा प्रतिसाद पवारांच्या by अप्पा जोगळेकर
कसं आहे, काँग्रेसच्या राज्यात
In reply to विरोधी पक्षाचे व नेत्याचे जे by संदीप डांगे
अंदाधुंद प्रतिसाद, मी व्यक्त
In reply to कसं आहे, काँग्रेसच्या राज्यात by बोका-ए-आझम
सोबतच
In reply to बोका साहेब- पवारांच्या by विशुमित
पवारांबाबत फक्त द्वेष दिसतो
In reply to बोका साहेब- पवारांच्या by विशुमित
एक कृषीमंत्री म्हणून हे करणं
In reply to पवारांबाबत फक्त द्वेष दिसतो by बोका-ए-आझम
तुम्ही कशाला आम्हीच म्हणतो.
In reply to एक कृषीमंत्री म्हणून हे करणं by संदीप डांगे
बोका-ए-आजम...
In reply to तुम्ही कशाला आम्हीच म्हणतो. by बोका-ए-आझम
सर्वात पहिली गोष्ट - भाषा सुधारावी.
In reply to बोका-ए-आजम... by विशुमित
बरोबर! सैन्य सत्ताधारी
In reply to सर्वात पहिली गोष्ट - भाषा सुधारावी. by बोका-ए-आझम
जे चुकीचे आहे त्याचे समर्थन
In reply to बरोबर! सैन्य सत्ताधारी by कैलासवासी सोन्याबापु
मी फक्त वस्तुस्थिती सांगितली आहे बापू.
In reply to जे चुकीचे आहे त्याचे समर्थन by कैलासवासी सोन्याबापु
लोकशाही तत्वधनात तुम्ही वर्णन
In reply to मी फक्त वस्तुस्थिती सांगितली आहे बापू. by बोका-ए-आझम
मला वाटतं हा आजच्या ET मध्ये आलेला लेख तुम्ही वाचावा.
In reply to लोकशाही तत्वधनात तुम्ही वर्णन by कैलासवासी सोन्याबापु
असं काहि नाहि बापुसाहेब...
In reply to बरोबर! सैन्य सत्ताधारी by कैलासवासी सोन्याबापु
बोका साहेब
In reply to सर्वात पहिली गोष्ट - भाषा सुधारावी. by बोका-ए-आझम
डाॅक
In reply to बोका साहेब by सुबोध खरे
<<<<<<शिव्या देण्यामुळे
In reply to सर्वात पहिली गोष्ट - भाषा सुधारावी. by बोका-ए-आझम
जर तुम्ही शिव्या देत नव्हतात
In reply to <<<<<<शिव्या देण्यामुळे by विशुमित
सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला
In reply to बोका-ए-आजम... by विशुमित
म्हणजे NDTV सुद्धा खोटा आणि
In reply to सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केला by श्रीगुरुजी
तुम्हीच. तुमच्या प्रत्येक
In reply to म्हणजे NDTV सुद्धा खोटा आणि by विशुमित
युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत.
या स्ट्राईक्सची माहिती उघड
In reply to युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत. by डॉ सुहास म्हात्रे
जर कधी पुरावे जाहीर झालेच तर
In reply to या स्ट्राईक्सची माहिती उघड by अप्पा जोगळेकर
जर कधी पुरावे जाहीर झालेच तर ते बहुधा सेन्सर्ड असतील(अ) अश्या कारवाईचे सेन्सर्ड पुरावे हे "डॉक्टर्ड" आहेत असे म्हणणे विरुद्ध पार्टीला सोपे असते (आणि पाकिस्तान तर १००% सबळ पुराव्याला, तो पुरावाच नाही असे म्हणतो असा आतापर्यंतचा अनुभव म्हणतो, नाही का? ) या प्रकरणात तर अधिकाधिक माहिती उघड व्हावी म्हणुन तो नकाराच्या अनेक क्लृप्त्या वापरेल हे सूर्याहून जास्त सत्य आहे !! आणि (आ) पुरेसे सबळ पुरावे देण्यामध्ये कारवाईची गुप्तता आणि प्रक्रिया उघड होते, जे करणे आत्मघातकी होईल. तज्ञ लोक शीत पाहून पूर्ण भाताचे पातेले ओळखतात, हे सांगायला नकोच ! ++++++++++++++लादेनच्या कारवाईच्या चित्रफीती कोणीही न मागता उपलब्ध करुन दिल्या गेल्या.लादेनची कारवाई कही शेकडा किमी पाकिस्तानच्या हद्दीत शिरून केलेली होती. अशी कारवाई पाकिस्तानी सैन्यदलाच्या सहकार्याशिवाय होणे शक्य नाही. कारण देशाच्या इतक्या आत अनेक हेलिकॉप्टर्स शिरतात आणि त्यांचा सुगावा रडार्सच्या अनेक रांगांना लागू शकत नाही, इतकीही पाकिस्तानी फौज बुळी नाही ! पाकिस्तानी सैन्याकडे लादेनच्या घराचा पुरेसा पुरावा देऊन "ही कारवाई तुम्ही करा किंवा ती आम्हाला विनाअडथळा करू द्या" अन्यथा "तुमच्या अबोटाबाद या महत्वाच्या सैनिकी तळाशेजारी होणारी ड्रोन/रॉकेट हल्ल्याची तयारी ठेवा व त्यामुळे होणारी नामुष्की सोसा" असा काहीसा सज्जड दम दिला गेला होता असे अंदाज आहेत. पाकिस्तानी सैन्याकडे लादेनला मारण्याचे श्रेय/आरोप पचविण्याची ताकद/धमक/तयारी नव्हती. तसे केले असते तर पाकिस्तानातले सर्व रंगांचे सर्व अतिरेकी गट उलटून त्यांचे जानी दुष्मन होण्याचा धोका होता. या ऑपरेशन नंतर कोणाही लष्करी अधिकार्यावर कामचुकारीच्या आरोपावरून कारवाई झाली नाही. फक्त लादेनच्या जागेची माहिती देणारा सिविलियन डॉक्टर कैदेत खितपत पडला आहे आणि अमेरिका त्याला सोडविण्याची अजून धडपड करत आहे; यावरून काही बोध होऊ शकतो. राहता राहिला प्रश्न चित्रफितीचा. ती जाहीर केली किंवा न केली असती तरी तात्कालीक गदारोळ सोडता (आणि तो झालाच ! ) काही फार फरक पडला नसता. अमेरिकेने "बनवलेल्या" कोणत्या पुराव्याला कोणता महत्वाचा देश चुकीचा म्हणतो ? आणि जे चिल्लर लोक त्याला चुकीचा म्हणतात त्यांना भीक घालायची गरज अमेरिकेला वाटत नाही. "वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनच्या पुराव्यांच्या" आधारे इराकवरचा हल्ला केला गेला तेव्हा त्यांना कोणी फारसा विरोध केला नव्हता. इथे तर ओसामाचा खातमा व्हावा असे, अतिरेकी गट आणि पाकिस्तान या दोघांना सोडून, बहुतेक सर्व जगाला वाटत होते. अर्थातच, अमेरिकेने दिलेला भलाबुरा कोणताही पुरावा खोटा आहे असे म्हणून स्वतःला अवलक्षण करून घ्यावे असे कोणा महत्वाच्या देशाला वाटले नाही, आणि ज्यांनी त्या पुराव्यावर विश्वास ठेवला नाही त्यांची दखल घ्यावी असे इतरांना वाटले नाही... उलट "गुड रिडन्स" असे म्हणत जगाने सुस्कारा सोडला. याला जागतिक राजकारण म्हणतात ! :)मस्त!! +1111
In reply to जर कधी पुरावे जाहीर झालेच तर by डॉ सुहास म्हात्रे
माहितीपूर्ण प्रतिसाद.
In reply to जर कधी पुरावे जाहीर झालेच तर by डॉ सुहास म्हात्रे
वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश
In reply to युपिएच्या काळात "सर्जिकल स्ट्राईक्स" झाले नाहीत. by डॉ सुहास म्हात्रे
+१११
In reply to वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश by डॉ सुहास म्हात्रे
वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश
In reply to वरचे आवांतर लिहिण्याचा उद्देश by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रेसाहेब, व्याख्या
तीव्र असहमत !
In reply to म्हात्रेसाहेब, व्याख्या by संदीप डांगे
जागतिक राजकारनावर या तांत्रिकतेने खूप फरक पडतो हे थोडा वेळ नाही मानले तरहा राजकारणी तांत्रिकतेचा भाग नाही "रोजच्या ओढाताणीत धक्काबुक्की करणे" आणि "घरात घूसून हातपाय तोडून व काहींना यमसदनाला पोचवणे" या दोघातला फरक आहे. यातून पुढे एस्कॅलेशन होत होत फुल स्केल युद्ध होऊ शकते... व त्या सगळ्याची जबाबदारी भारतामध्ये पंतप्रधानांवर पडते, त्यात कोणतीही सारवासारवी किंवा कारणे चालत नाहीत. याच कारणांसाठी... अ) १९६५ च्या युद्धाच्या आदेशाचे श्रेय योग्य रितीने श्री लाल बहादूर शास्त्रींना दिले जाते. आ) १९७१ च्या युद्धाच्या आदेशाचे श्रेय श्रीमती इंदिरा गांधींना दिले जाते. त्यावेळेस, वाजपेयींनी सर्वात पुढे राहून इंदिरा गांधींना दुर्गादेवीची उपमा दिली होती हे विसरता कामा नये. मात्र, इ) कारगिल युद्धाचे श्रेय "तेवढ्याच मोकळ्या मनाने" श्री वाजपेयींना दिले गेले असे दिसले नाही, आणि ई) आताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर, सद्याची राजकीय अवस्था पाहूनच असावे बहुतेक राजकीय गदारोळ टाळण्यासाठी, मोदींनी नाही तर भारताच्या DGMO नी पत्रकार परिषद घेऊन ती बातमी सांगितली. (आठवण असू द्या : अमेरिकेची दर लष्करी कारवाई व ओसामाच्या प्रकरणातही त्यांच्या प्रेसिडेंटने ती बातमी सर्वप्रथम सांगताना त्या प्रत्येक कारवाईचे श्रेय "माझ्या आदेशाने झालेल्या कारवाईने" अश्या अर्थांच्या शब्दांनी घेतले आहे.) असे असतानाही, "किमान पाकिस्तानला दाखविण्यासाठी तरी देशाची एकता स्पष्ट व्हावी इतकीही प्रगल्भता न दाखवता" केवळ राजकिय पोळी भाजण्यासाठी, (भारत सरकार नव्हे तर) भारताचे DGMO यांनी जे सांगितले आहे ते कसे विश्वासू नाही आणि त्या दाव्याचे पुरावे द्यावे" अश्या अर्थाची वक्तव्ये देऊन, वर आमचा सैन्यावर पूर्ण विश्वास आहे पण तरीही सरकारला दोष द्यायचा आहे असा जगावेगळा पवित्रा घेतला आहे. एकंदरीत, भारतात किती दुही आहे आणि तात्कालिक स्वार्थासाठी आम्ही शत्रूला मदत होईल असे वागायलाही कमी करणार नाही याचे पुरावे दिले आहे. याचा भारतिय सैन्याच्या मनोबलावर काय परिणाम होईल आणि याचा उपयोग पाकिस्तान सरकार, सैन्य आणि माध्यमे पुरेपूर करतील / करत आहेत याचे आपल्या राजकारण्यांना काही देणे घेणे पडलेले दिसत नाही. पाकिस्तानात याबद्दल आश्चर्ययुक्त (इतर वेळी ठीक आहे पण आताही तेच या अर्थाने) आनंद होत असेल हे नक्की. हे वरचे सर्व लिहिण्याची कारणे अशी आहेत... अर्थात, अशी कारवाई हे केवळ सैन्यबळावर शक्य नसते. अश्या कारवाईमुळे होणारे परिणाम (जगातल्या इतर देशांचा विरोध आणि ज्यावर हल्ला केला त्याला प्रतिहल्ला करण्यास दिलेले कारण) टाळण्यासाठी जागतिक पटलावर पार्श्वभूमी तयार करावी लागते... जी गेल्या दोन-अडिच वर्षात झाली आहे. मोदींच्या परदेश दौर्यांवर टीका करणार्यांची अडचण होणे आणि त्यामुळे धागा हायजॅक होणे हे टाळण्यासाठी हा मुद्दा मी मुद्दामहून टाळला होता ! जागतिक राजकारणात अथवा अर्थकारणात यशस्वी व्हायचे असले तर पुढची २५-३० वर्षे पाहून खेळ्या खेळाव्या लागतात. त्यामानाने गेल्या दोन-अडिच वर्षांत या सरकारने जागतिक स्तरावर मिळवलेल्या पतीमुळेच, माध्यमांतल्या बातम्यांवरून पूर्वी न दिसणारे खालील संकेत दिसत आहेत... (अ) भारताने आक्रमक कारवाई केली असली तरीसुद्धा कोणत्याही देशाने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही. अगदी चीनही स्पष्टपणे हल्ल्यांविरुद्ध बोललेला नाही. (आ) उलट, सर्व महत्वाच्या देशांची वक्तव्ये भारताच्या बाजूची आहेत. (इ) पाकिस्तानातले मुलकी सरकार सैन्यदलाला अतिरेक्यांना मदत करू नका असे म्हणण्याची धमक दाखवू लागले आहे. (इ) पाकिस्तानच्या लोकसभेत अतिरेक्यांच्या विरोधी स्पष्टपणे बोलले जात आहे. असो, त्याच त्याच मुद्द्यांवर खूप चर्वण झाले. समझदार को इशारा काफी है । परत परत तेच न विचारता / लिहिता, इतर काही वेगळा मुद्दा आला तरच लिहायला आवडेल.प्रतिसाद उत्तमच आहे आणि पूर्ण
In reply to तीव्र असहमत ! by डॉ सुहास म्हात्रे
प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी
In reply to प्रतिसाद उत्तमच आहे आणि पूर्ण by संदीप डांगे
प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी विरोधक काय म्हणतायत (ज्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे) ते बिल माझ्यावर फाडले जात आहे असे दिसते.. तेही न झाले तर बरेच होईल, ;)माझे लेखन नेहमीच व्यक्तीकेंद्रित नसून मुद्दाकेंद्रित असते. विष्लेषण सर्वसमावेशक व पूर्ण होण्यासाठी अनेकदा 'अगोदर पुढे आलेले' आणि 'न आलेले' असे दोन्ही प्रकारचे मुद्दे त्यात समाविष्ट करणे आवश्यक होते. त्यामुळे, प्रतिसादात मी जर/तर, जेव्हा/तेव्हा, जो/तो अशी वाक्यरचना नेहमी वापरतो. त्यामुळे, जो मुद्दा ज्याला लागू असेल त्यांच्या नावेच त्यातले बिल 'सकारण' फाडले जाते ('बिल फाडणे' हा वाक्पचार मला नवीन आहे, पण आवडला म्हणून वापरला आहे :) ) . तुम्ही जर एखाद्या गटांत नसाल, तर त्यावरची टिप्पणी तुम्ही स्वतःवर ओढून घेण्याची गरजच नाही :)वोक्के सर, गॉट इट!
In reply to प्रस्तुत स्ट्राईक वर इतर मोदी by डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टर साहेब
In reply to तीव्र असहमत ! by डॉ सुहास म्हात्रे
बाकी प्रतिसादाशी सहमत,
In reply to डॉक्टर साहेब by सुबोध खरे