अमेरिका, चीन व भारत
**
डिस्क्लेमरः पूर्ण काल्पनिक परिस्थिती
**
अमेरिकेने भारताच्या पश्चिमेकडील सर्व देश इराक-इराण-अफगाणिस्तान-पाकिस्तान-उजबेकिस्तान-कजाकिस्तान इत्यादी त्यांच्या 'संयुक्त संस्थानात' विलीन केले आहेत.
चीनने पूर्वेकडील देश नेपाळ, भूतान, बांग्ला देश, म्यानमार त्यांच्या पोलादी पकडीत दाबून ठेवलेत.
दोन्ही देश भारतावर दबाव टाकताहेत की भारताने त्यांचे एक राज्य म्हणून सामिल व्हावे. म्हणजे युएसएचे एक्सष्टावे राज्य म्हणून अमेरिकेचा हिस्स व्हावे किंवा चीनचा चोपन्नावा प्रांत म्हणून चीनचा भाग व्हावे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विरोधात आहेत. त्यांना भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र ठेवायचंय.
अमेरिका व चीन यांच्या सीमा इतक्या जवळ आल्या असताना दोघांनाही हा सामरिकदृष्ट्या महत्वाचा प्रदेश स्वतंत्र राहू द्यायचा नाहीये. दोघांनाही भारत आपलं राज्य म्हणून सामील व्ह्यायला हवाय.
काही दिवस वाट पाहून चीनने अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीमच्या बाजूने एकदम आपलं बरंचसं सैन्य घुसवलंय. पूर्वोत्तर राज्ये, बंगाल, बिहार, झारखंड, छत्तिसगड पुर्णपणे चीनच्या ताब्यात गेलेत. उत्तरप्रदेशमार्गे ते दिल्लीच्या दिशेने निघालेत. आता मात्र पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ व इतर राजकीय पक्षाचे नेते मिळून निर्णय घेतात की चीनने आपल्याला गिळंकृत करण्यापेक्षा आपल्याला जास्त अनुकुल असणार्या अमेरिकेत आपण सामील होऊ. ते अमेरिकेकडे मदत मागतात. अमेरिका आपले बलाढ्य आरमार, भेदक वायूदल व सक्षम सैन्यदलासहित भारतात उतरून चीनच्या सैन्याला रोखून मागे ढकलायला सुरुवात करते.
बराक ओबमांना सर्वंकष युद्ध नकोय, म्हणून ते संयुक्त राष्ट्रसंघात दाद मागतात. तिथे दोन्ही देशांना युद्धबंदीचा आदेश मिळतो.
भारताचा आलमोस्ट एक तृतियांश प्रदेश ताब्यात आलेला चीन हसत हसत युद्धबंदीला मान्य करून एकतर्फी युद्ध संपवतो.
काही वर्षे जातात....
चीनने त्यांच्या ताब्यातील भारतावर त्यांचे साम्यवादी साम्राज्य लादून तो प्रदेश त्यांच्या मुख्य भूमीसारखा असल्यासारखा केलाय. अमेरिका जरी त्यांच्या देशाचा नकाशा पुर्ण भारतासहित दाखवत असला, तरी प्रत्यक्षात त्यांच्या ताब्यात भारताचा दोन तृतियांश प्रदेशच आहे. चीन त्यांच्या ताब्यातील भारतीय प्रदेशात नक्षली गट उभे करून, त्यांना प्रोत्साहन, हत्यारे व प्रशिक्षण देऊन त्यांना अमेरिकेच्या प्रदेशात कारवाया करायला पाठवतोय. अमेरिकेने त्यांच्या इतर राज्यांप्रमाणेच भारतालाही एक समृद्ध राज्य बनवण्याचा प्रयत्न चालवलाय.
पण भारतातील काही डाव्या, साम्यवादी विचारांचे लोक चीनचे पाठीराखे, समर्थक आहेत. आणि अमेरिकेतील काही लोक 'मानवतावादी दृष्टीकोनातून' भारतातील या चीनवादी जनतेचं समर्थन करताहेत.
भारतातील जनता अजूनही मनाने पुर्णपणे अमेरिकन झालेली नाहिये. अमेरिकन जनतेच्या पैशाने भारतीय प्रदेशाचा विकास करूनही भारतीय प्रदेशातील बहुतेक लोक, विशेषतः काही परंपरावादी लोक, अमेरिकाविरोधी आहेत. आपण ज्या देशाचा भाग आहोत, ते मान्य न करता ते भारताला स्वतंत्र करण्यासाठी झटताहेत. त्यांना स्वतंत्र भारत हवाय. चीन स्वत:च्या स्वार्थासाठी अशा अमेरिकन-भारतीयांना पाठिंबा देतंय. त्यांच्या मदतीसाठी चायना-ऑक्युपाईड-भारतातून चीन प्रशिक्षित नक्षली अमेरिकेच्या भारत राज्यात कारवाया करताहेत. अमेरिकेने मोठे लष्कर तैनात करूनही अमेरिकन-भारतातील फुटिरतावादी लोक व चीनी नक्षल्यांच्या कारवाया वाढताहेत.
मग आता... ?
भारतातील बर्याच (बहुतांश नव्हे!) जणांना भारताने अमेरिकेचा भाग व्हावे, हे पटलेले नाही. ते भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी लढताहेत. अमेरिकेच्या भारत या राज्यातील इतर सामान्य जनतेने त्यांच्याशी कसे वागावे?
अमेरिकन मुख्य भूमीतील जनतेचा भारतीय प्रदेशातील दोन्ही प्रकारच्या लोकांविषयी कसा दृष्टिकोन असेल/असावा?
***
सर्व संवेदन्शील लोकांची आधीच माफी मागून ठेवतो.
पिवळ्या, हिरव्या, भगव्या, लाल, निळ्या चष्मेधारी व्यक्तींना जरी वाटू शकले, तरी, मी विकृत नाही.
खरंच!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
आता पुढची काल्पनिक स्टोरी
we are just pawn in the game
सध्या
ते इंग्रजी वाक्य मी वेगळ्या
आवडलं
एक शंका
मूळच्या काल्पनिक
नै जम्या
ह्या लेखातील घटना घटण्याची
वरील संपूर्ण लेखात आणि
अमितदादा
> अमेरिकन मुख्य भूमीतील
आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर केंव्हा देणार ?
जाऊ द्या हो..