Skip to main content

राष्ट्र राज्य

अमेरिका, चीन व भारत

Published on मंगळवार, 04/10/2016
** डिस्क्लेमरः पूर्ण काल्पनिक परिस्थिती ** अमेरिकेने भारताच्या पश्चिमेकडील सर्व देश इराक-इराण-अफगाणिस्तान-पाकिस्तान-उजबेकिस्तान-कजाकिस्तान इत्यादी त्यांच्या 'संयुक्त संस्थानात' विलीन केले आहेत. चीनने पूर्वेकडील देश नेपाळ, भूतान, बांग्ला देश, म्यानमार त्यांच्या पोलादी पकडीत दाबून ठेवलेत. दोन्ही देश भारतावर दबाव टाकताहेत की भारताने त्यांचे एक राज्य म्हणून सामिल व्हावे. म्हणजे युएसएचे एक्सष्टावे राज्य म्हणून अमेरिकेचा हिस्स व्हावे किंवा चीनचा चोपन्नावा प्रांत म्हणून चीनचा भाग व्हावे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या विरोधात आहेत.