Skip to main content

रव्याची कचोरी

लेखक इशा१२३ यांनी मंगळवार, 04/10/2016 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
K साहित्य : सारणासाठी :- बटाटे उकडलेले २ मटार ,गाजर,लाल,हिरवी व पिवळी ढब्बु मिरची,गाजर,कांदा प्रत्येकी :एक छोटी वाटी आले :अर्धा चमचा मिरच्या :आवडीप्रमाणे बारीक तुकडे चाट मसाला :अर्धा चमचा धणे पुड ,गरम मसाला:अर्धा चमचा कोथिंबीर व लिंबुरस जिरे,मीठ,तेल. S आवरणासाठी साहित्य :बारिक रवा :एक वाटी पाणी :दोन वाट्या ओवा :२ चिमूटभर S कृती :प्रथम कढईत तेल तापवून जिरे हळदीची फोडणी करावी.मिरचिचे तुकडे व आले घालावे.त्यात कांदा गुलाबी परतून घ्यावा.कांदा परतून झाल्यावर त्यातच वाफवलेले मटार,ढब्बु मिरच्या,वाफवलेले मटार, गाजर घालून परतावे.त्यात चाटमसाला,धने पावडर,तिखट (हे मि मिरचि कमि वाटल्याने ऐनवेळी टाकले)आणि मीठ घातले. त्यातच उकडलेला बटाटा कुस्करून टाकला.आता परत सगळे एकत्र करुन परतले. शेवटी कोथिंबीर व लिंबू पिळून एकत्र केले.हे सारण गार होण्यास ठेवावे. R आता आवरणासाठि दोन वाट्या पाणी उकळत ठेवावे.त्यात उकळी आल्यावर एक वाटि रवा आणि ओवा घालावे.छान एकत्र करुन वाफ आणावी व गार होण्यास ठेऊन द्यावे.गार झाल्यावर जरा मळून त्याचे गोल करावेत. Sahity आता हातावर याची एक पारिकरुन त्यात सारण भरावे. हलकेच बंद करुन कचोरी तयार करुन घ्याव्यात. Ss कढईत तेल चांगले तापवून घ्यावे. नंतर आच कमी करुन एक एक कचोरी बदामी रंगावर तळून घ्यावी. Kachori गरमागरम, खुसखुशित कचोरि चटणी,सोस कशाबरोबरही छान लागते!

वाचने 18375
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

उपम्याचा मलाही कंटाळा आलाय. खुशखुशीत लागत असणार आणि ह्या कचोर्‍या! ह्या रेसेपीत काही फसण्यासारखे दिसत नसल्याने कचोर्‍या करुन पहाण्यात येतील. ;)

In reply to by पिलीयन रायडर

नाही कसं? तो रवा करपू शकतो :प आणि मी यायच्या आत सराव कर २-३ वेळा. रेसिपी भारी हो इशा तै ! कधी येऊ फ्लॉवर विरहीत कचोर्‍या खायला (पिरा ने मुद्दाम करपवुन खायला घातलं तर बॅक अप असलेला बरा) ?

In reply to by स्रुजा

खरंय. जर बेसन भात करपु शकतो तर रव्याची कचोरी जळु तरी शकतेच. पण मी प्रयत्न करेन जमवायचा!

In reply to by पिलीयन रायडर

पिराबाई रेसिपि करणार असाल तर लेख हवाच मग ती कशी का होवो. (फकस्त मला ब्लेम द्यायचा नाहि.स्रुजा आहे ना, तिला देऊ शकतेस(हि स्वतः पोळ्या करायला लागेस्तोवर तिच्यावर कसलाही ब्लेम करता येईल) कर तु करच!

In reply to by पिलीयन रायडर

श्या ! तुमचा तुमच्या कर्तबगारीवर पुरेसा विश्वासच नाय ! काय हे :) ;) (पुढच्या फसलेल्या प्रयोगाचा खुसखुशीच लेख वाचायला मिळावा ही सकारात्मक इच्छा यामागे आहे हो. दुसरे काssssssयबी नाssssssय :) )

In reply to by पिलीयन रायडर

हि प्रति मोदकाची उकड आहे. रव्याची उकड हलके गरम असतानाच नीट मळली नाहि तर एक तर त्याची पारी होणार नाहि आणि त्याला तडे जाण्याची शक्यता फार आहे. हा पण तुझ्या ब्लेमगेम साठि जरुर ट्राय कर....आम्हि वाचायला उत्सुक आहोत.

कचोरी मस्त दिसतेय, तोंपासु.. स्वाती

कचोरी मस्त दिसतेय. पण कटलेटही शॅलो फ्राय करतांना विरघळवणे,मोडणे या सगळ्यात एक्सपर्ट असल्याने करायची हिंमत नाही आहे.

अत्यंत खुशखुशीत दिसत आहेत कचोर्‍या. सकाळी सकाळी असले फोटो ऑफिसात बसून पाहणे हा निव्वळ अत्याचार आहे.

वेगळी रेसिपी

दिसत आहेत

जबार परकार हाय! बायकूला कराया लावनार मंजी लावनार.

जबरा दिसताहेत. पण या खुश्खुशीत होतात की मोदकाप्रमाणे /कटलेप्टप्रमाने मऊ होतात?