Skip to main content

माझ्या मनातला एक ना-पाक प्रश्न

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 03/10/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले. पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा. ३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व ४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने! तुम्हाला काय वाटतं?

वाचने 27698
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

बोकोबा, तुमचे स्वतःचे मत चलाखीने लपवून लोकांच्या प्रतिक्रिया घेणार की राव तुम्ही. पण तुमचे या लेखातील प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. आपण भारतीय लोक फार हळवे आहोत हो. छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या भावना लगेच उफाळून येतात. त्यातून गोष्ट कोणतीही असो, राजकीय पक्षांनी/ नेत्यांनी त्यावर लगेच भूमिका घेऊन प्रतिक्रिया देणे हे त्यांना त्यांचे कर्तव्य वाटते. एकदाका एखाद्या गोष्टीत राजकारणाचा प्रवेश झाला की त्याची कशी माती होते हे आपल्याला माहित आहेच. तात्विकदृष्ट्या कलाकारांवर बंदी नसावी हे कोणीही मान्य करेल. आणि आपण भारतीय लोक जगभरातील लोकांचे खुल्या मनाने स्वागत करतो हासुद्धा हजारो वर्षांचा इतिहास आहे. पाकिस्तान आणि तेथील कलाकार या गोष्टीला अपवाद असण्याचे कारण नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या कलाकारांचे भारतात राहणे काही लोकांना अजिबात रुचत नाहीये आणि मी त्यांना त्याबद्दल अजिबात दोष देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांनी भारतात यावे किंवा नाही हे पूर्णपणे सरकारी निर्णयावर अवलंबून असते कारण जर या कलाकारांना भारतात राहण्याचा आणि काम करण्याचा व्हिसाच मिळाला नाही तर ते इथे येऊच शकणार नाहीत. जर बहुसंख्य लोकांना पाकिस्तानी कलाकारांनी भारतात येऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी त्यासाठी त्या कलाकारांना त्रास देण्यापेक्षा भारत सरकारवर दबाव आणावा असे मला वाटते. एकीकडे भारतीय कलाकारांनी भारताशी एकनिष्ठता दाखवून ती प्रदर्शित करण्याची अपेक्षा आपण करतो आणि दुसरीकडे पाकिस्तानी कलाकार त्यांच्या देशाशी एकनिष्ठ राहिल्यास आपल्याला राग येतो हा दुटप्पीपणाच नाही का? मला जर एखाद्या कलाकाराची कला आवडत असेल तर मी तिचा निखळ आनंद घेतो, मग तो कलाकार भारतीय असो किंवा पाकिस्तानी.

उरी घटना हि दहशतवादी हल्ला आहे त्याचा स्पष्ट शब्दात निषेध करणे कोणत्याही देशाच्या विरुद्ध नव्हते, इथे येऊन इथल्या लोकांच्या जीवावर कमावून इथल्या लोकांच्या भावनांचा आदर न करणे हे अजिबात मान्य नाही, ह्यात कोणत्याही देशाच्या सरकारचा संबंध नाही, लोकांना वाटले त्यांनी पाकिस्तान्याना हाकलून लावावे, सरकार त्यांना संरक्षण देते कि लोक भावनेचा आदर करते हा सरकारचा प्रश्न, मला अजून बोलायाचे आहे, परत येतो..

In reply to by संदीप डांगे

पॅरीस हल्ल्याचा उघड निषेध करणारे उरी हल्ल्याचे वेळी सोयीस्कर मौन बाळ्गतात्,फवाद खान इथून तिथे गेल्यावर काय बोलतो ते पहा. फवाद खान पाकिस्तानमध्ये 'एम. एस. धोनी'वर बंदी! मुजोरपणा आणि तरीही कलाकार खेळाडूंना यापासून लांब आहेत हे सांगणार्यांची फक्त कीव वाटते. सुस्पष्ट नाखु

की जो न्याय एका पाकिस्तानी कलाकाराला लावायचा तोच सगळ्यांना लावायला हवा. तरच त्याला न्याय म्हणता येईल. म्हणजे पाकिस्तानच्या कुठल्याही कलाकाराला भारतात बंदी आणि ज्या भारतीय कलाकृतींमध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत, त्यांच्यावरही बंदी. नाहीतर मग सरळ आपण biased आहोत आणि आपल्याला फवाद खान आणि राहत फतेह अली खान यांच्यात फरक करायचा आहे हे मान्य करावे.

In reply to by बोका-ए-आझम

मी तरी असा फरक करत नाही, मला पाकिस्तानी कलाकारांचं - ते कितीही ग्रेट असले तरी- बॉलिवूड सॉरी हां हिंदी चित्रपट सृष्टीतील घुसखोरी कधीच आवडली नाही, राहत फते मुळे कैलास खेर सारख्या गुणी गायकावर अन्याय झाला आहे, गरज नसतांना अनेक ठिकाणी झालेली ही घुसखोरी प्रत्यक्ष जाणवते, दाऊद तिकडे गेल्यापासून हा प्रकार सुरू झाला, जो पाकिस्तानी कलाकार पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कारवायांचा निषेध करत नाही त्याला भारतात येऊन कामे व कमाई चा अधिकार नाही, ह्यात न समजण्यासारखे काय आहे?

In reply to by संदीप डांगे

संदीप, आपण मूळ लेखातील खालील मुद्यांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाहीत?
बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. ४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने!

In reply to by संदीप डांगे

हेही घुसखोरीचं उदाहरण म्हणायला हवं. जगजीत सिंगऐवजी गुलाम अली किंवा मेहदी हसन ऐकणं हेही चुकीचंच की. कैलाश खेरवर राहत फतेह अली खानमुळे कसा अन्याय झाला ते कळलं नाही. ते सांगाल का?

In reply to by संदीप डांगे

असे प्रश्न लोक ना पडू शकतात , याचेच आश्चर्य वाटते अगदी क्रूड उदाहरण द्यायचे तर, माझ्या नात्यातल्या किंवा मित्र चा एकाने खून केला, त्या कुटुंबाला त्रास दिला इ इ , तर त्या अपराधी कुटुंबातील दुसऱ्या व्यक्ती बरोबर मी प्रेमाने वागावे का विशेषतः जेंव्हा ती व्यक्ती झाल्या प्रकार बद्दल काहीही खेड व्यक्त करत नाही तेंव्हा? तिथे हि हाच न्याय लावावा का? कि गुन्हा करणारी व्यक्ती दुसरी आहे हि नाही। चांगुलपणा आणि मूर्खपणा , यात सीमा रेषा आहे , हे काही लोक च्या लक्षात येत नाही

In reply to by बोका-ए-आझम

की जो न्याय एका पाकिस्तानी कलाकाराला लावायचा तोच सगळ्यांना लावायला हवा.
गृहितक चुकीचे आहे असे वाटते. भारतीय नागरीक आणि परकीय नागरीक ( पाकीस्तानी ) ह्यांना एकच न्याय लावायचे काहीही कारण नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बोकासाहेब, लेख आणि प्रतिसाद, दोन्हींशी सहमत. काही वर्षांपूर्वी युरोपातल्या दोन युद्धमान देशांपैकी (नक्की कोणते देश ते खात्रीने लक्षात नाही) एका देशाने दुसऱ्या देशाचं संगीत ऐकणं सुद्धा सोडून दिल्याचं वाचनात आलं होतं. मी स्वतः पूर्वी राहत फतेह अली खानची गाणी ऐकायचो पण आता सोडून दिलंय.

कसं आहे की जेव्हा मोर्चा निघतो आणि पोलीस लाठी चालवितात तेव्हा जो समोर असेल त्याच्यावर लाठी पडते. माझ्या मागच्याला, पुढच्याला, उजव्या डाव्या बाजुच्याला का मारले नाही असा प्रश्न विचारणे लॉजीकल नसते. तुमच्या प्रश्नाचे साधारण तसेच आहे. जो समोर दिसला त्याला ठोकला जेव्हा दोन्ही देशांत तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हाच उद्रेक उफाळून येतो व तो रास्त असतो. परिस्थिती निवळल्यावर तुम्ही परत गळ्यात गळे घालायला मोकळे की. मग राह्त फतेह अली खान ऐका, सलमान ला पाहा. सब चलता है ! स्कोअर सेटलींग फक्त ठराविक वेळीच होत असते. हीच दुनियेची रीत आहे.

In reply to by धर्मराजमुटके

मग तशी परिस्थिती तर फाळणीच्या काळापासून आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात त्यांच्या निर्मितीपासून तणाव आहे. मग अशी बंदी आधीपासून असायला हवी होती. उरीचा हल्ला झाल्यावरच तणावाची परिस्थिती आहे याचा साक्षात्कार झाल्यासारखं जे लोक वागताहेत त्याबद्दल आश्चर्य वाटतं.

In reply to by बोका-ए-आझम

होय. तणाव तर फाळणीपासून आहेच मात्र जेव्हा जेव्हा असे तात्कालिक कारण घडते तेव्हा हा साक्षात्कार जास्त लोकांना होतो इतकेच. शिवाय विविध बातमीपत्रे, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटसअप इ. बाबींच्या वापरामुळे प्रतिसादांचे प्रमाण लक्षणीय दिसते. उदाहरणा दाखल सलमान खान च्या केस चा निकाल लागल्यावरच्या दोन दिवसातील वर्तमानपत्रांतील बातमीखालील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून पहा. मात्र हेच पब्लीक महिन्या दोन महिन्यांनी त्याचा रिलीज झालेला सिनेमा बघायला तुफान गर्दी करतं.

In reply to by धर्मराजमुटके

सलमानच्या चित्रपटांना गर्दी करणारं आणि तो निर्दोष सुटल्यावर हा अन्याय आहे आणि त्याला शिक्षा मिळाली असती तरच न्याय झाला असता असं म्हणणारं पब्लिक हे वेगळं आहे. Indifferent public पण आहे त्यात - ज्यांना काहीही फरक पडत नाही.

तुमच्या लेखातील मतितार्थ आणि सलमान चे उदाहरण घेऊन तोच विषय थोडा पुढे न्यायचा म्हटला तर सलमान खानचे चित्रपट न पाहणे यावरच बंदी घालून चालणार नाही. सलमान खानला काम देणार्‍या निर्माता, दिग्दर्शकावर, त्याच्यासाठी गाणारे गायक यांच्या इतर चित्रपटांवर पण बहिष्कार घातला पाहिजे कारण त्यांच्यामुळे सलमानला संधी मिळते असे कोणी म्हणाले तर ते नक्कीच लॉजीकल होईल पण प्रॅक्टीकल होणार नाही. (म्हणजे वास्तवात तसे होत नाही. हाच विचार तुमच्या लेखातील मुद्द्याला लागू होईल असे मला वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

पण जसं आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू घेतले जात नाहीत त्याप्रमाणे भारतात कुठेही पाकिस्तानी कलाकार घेतले जाणार नाहीत असं ठरवणं कठीण नाही. हा न्याय फक्त चित्रपटांनाच लावणं चुकीचं आहे. वर्गात जर एक मुलगा/मुलगी गडबड करत असेल तर सगळ्या वर्गालाच शिक्षा करणं हे जसं चुकीचं आहे तसं. त्या मुलाला/मुलीला वर्गाबाहेर जायला सांगून प्रश्न सोडवता येतो. In short, पाकिस्तानी कलाकार - मग ते गायनासारख्या वैयक्तिक कलेत असोत किंवा चित्रपटासारख्या सामुदायिक कलेत - त्यांना सरसकट बॅन करा किंवा मग कला या सामरिक आणि राजकीय विषयापासून दूर ठेवा. दुर्दैवाने आपण इथेही मध्यममार्ग स्वीकारतोय. चित्रपट कलाकार हे सरळसरळ दिसून येतात, त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जातंय पण इतर क्षेत्रातील पाकिस्तानी - गायक, संगीतकार, लेखक - यांना सोडलं जातंय. हा भेदभाव आहे आणि अन्यायसुद्धा.

मला तरी अशी अधिकृत बंदी नसावी असे वाटते पण लोकांनीच बहिष्कार घालावाच म्हणजे सरकारसुद्धा बोलायला मोकळे कि बघा आमचे अधिकृत धोरण बंदी नसावी असे आहे पण लोकच बघत नाहीत शिस्तीत चोराच्या उलट्या बोंबा टाइप करावे

पुर्ण पाकीस्तानी कलाकारी वर बॅन घाला तिच्यायला फक्त आमच्या लाडक्या "खुदा के लिये" ह्या फवाद खानने काम केलेल्या अन नसीरुद्दीन शाह (की शहा) ने अक्षरश: जगवलेल्या सिनेमावर बॅन घालणे आम्हाला मंजुर नाही, कींबहुना रॅडीकलायझेशनच्या तळ्यातमळ्यात असलेल्या सगळ्या तरण्या मुसलमान पोरांस बसवुन दाखवावा असा हा चित्रपट आहे पेशे खिदमत है, खुदा के लिये.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरे रे रे रे, व्हिडीओ एंबेड करताना जरा धिंगाणा झाला, प्रिय संपादक मंडळ कृपया हे झ्यांगाट थोडे निस्तरावेत अन व्हिडो तासात आणावातही नम्र विनंती!!!.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चांगला होता. आम्ही २००८ मध्ये जयहिंद काॅलेज आॅडिटोरियममध्ये तो नासिरुद्दीन शाहच्या उपस्थितीत दाखवला होता. त्याला मुस्लिम मुलींची उपस्थिती भरपूर होती.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

एक नंबर चित्रपट आहे हो "खुदा के लिये." आणि नसीरुद्दीन शाह तो क्या कहने ,कोर्टातील युक्ती वाद पण जबरा आहे . नसीरुद्दीन शाहच्या तोंडी एक डॉयलॉग आहे " दीन में दाढी है ,दाढी में दीन नहीं ".

समोरचा डायरेक कम्बरड्यात लाथ घालत अस्ला तरी त्याचे पाय चाटण्याची भारतियांची सवय नविन नाय. हे सल्मान खान आणि कंपनीला म्हायताय. गुन्हा केल्यावर महागडे वकील करून भार्तिय कायद्याला टूक टूक केला तरी नितीबितिची काळजी न कर्ता निब्बर पब्लिक पैसे भरुन आपला सिनेमा पाहतेय, आसा अन्भव त्येला हाय. जन्तेला लाम्ब आटवण नस्ती. तिचि आक्कल बोलिवुड बराबर वल्खून हाय.

लेखातील सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर मनसेसारख्या मारझोड पक्षाला कंत्राट द्यावे लागेल.

अदनान सामीचं काय करायचं मग? जोपर्यंत पाकिस्तानी नागरिक होता तोपर्यंतच्या (म्हणजे परवापरवाच्या) गाण्यांवर बंदी घालायची, भारतीय नागरिकत्वच रद्द करायचं की सूट द्यायची?

In reply to by मिहिर

मग आधीचं सगळं संगीत आता भारतीय आहे. शिवाय अदनान सामीने कधीच भारतावर टीका वगैरे केलेली नाही. अदनान सामी is reformed now.

गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत.
बोकेश राव या महान कलाकारांची आणि फवाद खान, गळेकाढू आतिफ अस्लम, मायरा खान यांची तुलनाच अशक्य आहे.

In reply to by महासंग्राम

पाकिस्तानी अभिनेत्यांना ते महान कलाकार नाहीयेत म्हणून नव्हे, तर त्यांच्या देशाच्या सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे आपल्या देशाचे जवान मारले गेले त्याचा निषेध म्हणून बॅन केलं जातंय. मग तो निर्णय इतर पाकिस्तानी कलाकारांनाही लागू का नको व्हायला? साधं उदाहरण आहे. जर सलमान खानऐवजी अमिताभ बच्चन गाडी चालवत असते आणि त्यांच्या गाडीखाली येऊन काही लोक मरण पावले असते तर आपण महान कलाकार म्हणून अमिताभ बच्चनना सोडून दिलं असतं का? जो न्याय एकाला तोच सगळ्यांना. तरच त्याला न्याय म्हणता येईल. Selective Justice is tantamount to injustice.

In reply to by बोका-ए-आझम

आपल्या देशाचे जवान मारले गेले त्याचा निषेध म्हणून बॅन केलं जातंय. मग तो निर्णय इतर पाकिस्तानी कलाकारांनाही लागू का नको व्हायला?
पण,ज्यांना बंदी घातली आहे त्यांच कलाकार म्हणून योगदान किती हा मुद्दा सुद्धा राहतो ना.

In reply to by महासंग्राम

http://jagatapahara.blogspot.in/2015/12/blog-post.html यात असं म्हटलंय "दोनच महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. जगजितसिंग या गझल गायकाच्या पुण्यतिथी निमीत्त गुलाम अली या पाकिस्तानी गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खुद्द जगजितसिंग यांनीच आपल्या हयातीत पाकिस्तानी कलावतांना इथे आणू नये, असा आग्रह धरला होता. त्याचे कारण पाक कलावंत पक्के भारतद्वेषी असतात, असाच त्यांचा आरोप होता. किंबहूना त्याच कारणास्तव गुलाम अली याच्यावर भारतात यायला प्रतिबंध लागू झाला होता. ही माहिती आपल्यापर्यंत माध्यमांनी कशाला पोहोचवू नये? शिवसेनेने त्याला विरोध केल्यावर गदारोळ माजवला गेला. पण गुलाम अली याच्याविषयी किती सत्य आपल्यासमोर आणले गेले? एकदा भारतातून मायदेशी परत जाणारा हा गुलाम अली शेजारी बसलेल्या भारतीय दूतावासातील अधिकार्‍याशी गप्पा मारू लागला. तो अधिकारीही त्या गायकाचा चहाताच होता. मात्र हा प्रवासी भारतीय आहे याची गुलाम अलीला किंचितही कल्पना नव्हती, म्हणून तो मनमोकळा बोलत होता. अगदी खास पंजाबी भाषेत त्याने भारतीयांची काफ़ीर कुत्ते अशी अवहेलना चालवली होती. आपण सच्चे मोमीन म्हणजे मुस्लिम असल्याने काफ़ीरांचे पैसे, बायकांची मजा लुटतो, असे गुलाम अलीने मन मोकळे केले. मात्र इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यावर त्या अधिकार्‍याने आपली खरी ओळख या गायकाला करून दिली. तेव्हा गुलाम अली गयावया करून माफ़ी मागू लागला. कारण शेजारचा प्रवासी पाकिस्तानी आहे अशा विश्वासाने त्याने मनमोकळे केले होते. पण त्यातून संभवणारा तोटा लक्षात आल्यावर गुलाम अली गांगरला होता. अर्थात अधिकार्‍याने त्याला दमदाटी वगैरे काही केली नाही. पण भारत सरकारला त्याविषयी माहिती दिल्यावर गुलाम अलीच्या भारतात येण्यावर वा कार्यक्रम करण्यवर प्रतिबंध लावण्यात आला. त्याचा फ़ारसा कुठे गाजावाजा झाला नाही. पण अनेक वर्षे हा प्रतिबंध कायम होता." हे जर खरे असेल तर तर आपण गुलाम अलीचे कौतुक कसे करायचे?

बोकशेठ, कलेला धर्म जात देश प्रांत नसतो पण कलाकारांना असतो, या वाक्यात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत,

In reply to by संदीप डांगे

तुमचं म्हणणं चुकीचं नाही, पण मग प्रश्न हा उद्भवतो की कला ही कलाकारापासून वेगळी काढता येते का? विशेषत: सादरीकरणप्रधान कला (performing arts) या कलाकारांपासून वेगळ्या काढता येतील का? आणि तसं जर नसेल तर कलेला धर्म, प्रांत, जात, देश हे नसतात पण कलाकारांना असतात याला काय अर्थ आहे? याचा अर्थ त्या कलाकाराची कलाही या सगळ्या बंधनांत अडकणार. मी तेच तर म्हणतोय. एक तर ही बंधनं अजिबात मानू नका, किंवा मग पूर्णपणे मान्य करा आणि सगळ्यांवर ती लागू करा. काही जणांना ती लागू आणि काही जणांना नाही हे जाॅर्ज आॅरवेलच्या All people are equal but some are more equal या वाक्याप्रमाणे होईल आणि तो दांभिकपणा असेल.

In reply to by बोका-ए-आझम

कलाकार हा आधी कोणत्यातरी देशाचा नागरिक असतो नंतर कलाकार असतो, जे कलाकार स्वतः देशाची, प्रांताची बंधने पाळत नाहीत त्यांच्याबद्दल निषेधाचे, बंदीचे विचार येणार नाहीत, ज्या कोणा पाकिस्तानी कलाकाराने पाकिस्तानच्या कारवायांचा विचारूनही निषेध केला नाही ती लोक कलेपेक्षा आपल्या देशाला महत्त्व देत आहेत हे स्पष्ट आहे, अशावेळेस ते कलाकार नसून नागरिक म्हणून वागत आहेत मग त्यांच्याशीही आपण नागरिक म्हणून व्यवहार करायला हवा, ह्यात त्यांनी सादर केलेली कला अभिनय गायन हे येऊ नये, पण त्यापासून त्यांना एक व्यावसायिक म्हणून होणारा फायदा त्यांना घेऊ देऊ नये, I hope i m not confusing you more, even it may feel like!

In reply to by संदीप डांगे

ती लोक कलेपेक्षा आपल्या देशाला महत्त्व देत आहेत हे स्पष्ट आहे त्यांनी कलेला देशापेक्षा जास्त महत्व दिले तरी आपण देऊ नये. उद्या ते कलाकार चांगले वागले तरी आपण त्यांची ठासली पाहिजे. कारण ते पाकिस्तानी आहेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

कारण ते पाकिस्तानी आहेत.
ते पाकिस्तानी आहे म्हणून नव्हे तर ते दहशतवादाचं समर्थन करतात म्हणून बंदी घातली पाहिजे. तुम्ही म्हणता त्या प्नन्यायाने अदनान सामी वर बंदी घातली पाहिजे कारण तो आधी पाकिस्तानी नागरिक होता. ( आता तो भारतीय नागरिक आहे हा भाग वेगळा )

In reply to by संदीप डांगे

ज्यांनी मत व्यक्त केलेलं नाही, त्यांना काही वाटत नाही हे कशावरून? म्हणूनतर हाकलायचं तर सगळ्यांना, नाहीतर कुणालाच नाही. बरं, प्रांतांची बंधनं न पाळणं ठीक आहे, पण देशांची बंधनं न पाळणं आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये अशक्य आहे. विशेषतः दहशतवाद हा प्रमुख धोका असताना.

जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने! साहेब तुम्ही स्वतःच प्रश्नाच उत्तर दिल आहे. जे जे पाकिस्तानी आहे त्या सगळ्यावर कायद्याने बॅन असावा. आणि या संस्थळापुरत बोलायच तर असल्या बुद्धिभेद करणार्‍या धाग्यांवर सुद्धा बॅन असावा. 'खुदा के लिए' वर सुद्धा बॅन असावा. सैयोनी, हंगामा वर पण बंदी असावी. फार काय पाकिस्तानी रेसिपीवर सुद्धा. रच्याकने - एका अमेरिकास्थित पाकिस्तानी माणसाची कंपनी जिचे भारतात हपिस आहे.तगडा पगार देते. त्याचे इंटर्व्हू कॉल आल्यावर मी 'नॉट इंटरेस्टेड टू वर्क इन युअर कंपनी' असे देतो. 'इफ पॉसिबल यु अल्सो सर्च सम गुड जॉब' असे उत्तर एचार ला देतो. सर्जिकल स्टाईक शी संबंध नाही. आधीपासूनच. हाडवैर आहे तर त्यात ऑनेस्टी असावी.

In reply to by अप्पा जोगळेकर

पाकिस्तानी रेसिपीवर सुद्धा.
त्या सगळ्या मुळात भारतीय आहेत. पाकिस्तानी रेसिपी असं काही अस्तित्वात नाही.
आणि या संस्थळापुरत बोलायच तर असल्या बुद्धिभेद करणार्‍या धाग्यांवर सुद्धा बॅन असावा
That's news to me. बुद्धिभेद कसा काय?

In reply to by अप्पा जोगळेकर

प्रत्येक वाक्याशी सहमत...!! "हाडवैर आहे तर त्यात ऑनेस्टी असावी." विशेष आवडलं. केलं तर आरपार कर हागरं काही ठेवू नगं - इति आमची इरसाल आजी

शहीद होणाऱ्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का?
इति. ओम पुरी. अधिक बातमी इथे

हे ह्यांच्याकडून अपेक्षीतच होतं. एका मर्यादेनंतर प्रसिद्धी ची नशा हवेत घेवून जाते. बोकोबां सारख्या सुलझ्या व्यक्तीला असे प्रश्न पडणं पटत नाही. आता असं बघा कुठलाही कलाकार त्या कलेव्यतिरीकत एरवी सामान्य नागरिकच असतो की, जरी तो स्वतः ला कााहीही समजत असला तरी. बाकी लोकभावना तात्कालीक असते आणि भावनेचा बाजार करणारे सर्वकालिक.

In reply to by झेन

कारण पाकिस्तानच्या इतर कलाकारांबद्दल कोणीच काही बोलत नाहीये. कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराच्या कलेला आपण आश्रय देणार नाही हे एकदा ठरवा की. मग पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं, पाकिस्तानी संगीतकार आणि गायकांच्या सीडीज, पाकिस्तानी चित्रकारांनी काढलेली चित्रं - या सगळ्या गोष्टी भारताबाहेर काढायला हव्यात. पण आपण फक्त चित्रपट अभिनेत्यांबद्दल action घेतोय. बाकीच्या कलाकारांचं काय? ते कमी पाकिस्तानी आहेत का? जर पाकिस्तानी या एका कारणावरून आपण एकाला बाहेर काढणार असू तर तोच न्याय सगळ्यांना लावायला हवा. मग एखाद्या पाकिस्तानी रुग्णाला, मग भले तो लहान मुलगा का असेना, आपल्या देशात उपचार नाकारायला हवेत. कराची बेकरी किंवा चंदू हलवाई कराचीवाला ही दुकानं बंद करायला हवीत किंवा जबरदस्तीने त्यांची नावं बदलायला हवीत. तरच पूर्णपणे बॅन ही संकल्पना प्रत्यक्षात येईल. नाहीतर मग आपण selective ban करणार हे मान्य करुन आपला दांभिकपणा चालू ठेवावा. मध्यममार्ग अशा बाबतीत चालणार नाही.

In reply to by बोका-ए-आझम

कराची बेकरी किंवा चंदू हलवाई कराचीवाला ही दुकानं बंद करायला हवीत किंवा जबरदस्तीने त्यांची नावं बदलायला हवीत. कराची बेकरी चालवणारा किंवा चंदु हलवाई हा कराचीतुन आणतोय का गोष्टी विकायला?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मग पाकिस्तानवर बॅन तर पाकिस्तानी शहराचं नाव असलेल्या दुकानाचंही नाव बदलायला नको का?

In reply to by बोका-ए-आझम

ही कुस्कुटं नंतर काढू शकतोच हो, पण सद्ध्या जे सहज शक्य आहे ते तर आधी करा! इथे येऊन, इथल्या नाटक सिनेमांत काम करुन, पैसे कमवून, भरपूर लाड पदरात पाडून जर कोणी हिंदुस्थान के लोगोंके दिल छोटे हैं वगैरे बोलत असेल, तर पहिले त्याला बॅन करा.

In reply to by यशोधरा

बोकाजी आज वेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत. "घटं भिद्यात, इ इ." करून काही जणांनी अनेक शतकी प्रतिसाद मिळवलेले पाहून तेही खवळले आहेत, अशी कुणकुण ऐकली आहे =)) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बंदी आणा किंवा बॅन करा हे सोशल मिडियावर इतक्या सवंगपणे वापरलं जातंय (फेसबुक, whatsapp, इत्यादी) त्यावरून हा एक विचार मनात आला. म्हटलं जरा पाहू या लोकांची काय प्रतिक्रिया येते.

In reply to by बोका-ए-आझम

आम्हास * पाकिस्तानी * नकोयत. तिथलं नाव गाव मुळ असलेल चालेल की. त्यांना सहानुभुती असणारेही नकोत. कलेशी खेळाशी कायीयेक वावड नाहिये, त्या खेळाडुंशी, कलाकारांशी वावड आहे.

In reply to by यशोधरा

मग जे जे पाकिस्तानी आहे त्या सगळ्यावर बॅन टाकायला हवा, बरोबर? त्याशिवाय देश श्रेष्ठ आहे यावर शिक्कामोर्तब कसं होणार?

In reply to by बोका-ए-आझम

नुसते बुद्धीभेद करणारे प्रश्न विचारण्यापे़क्षा सुरुवात करायची. मी माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करते, खास करुन एखा/दी कलाकार त्याची 'कला' विसरुन स्वतःच्या देशाशी प्रामाणिक राहून माझ्या देशाबद्दल वाईट साईट बोलतो, तेव्हा माझ्यातल्या नागरिकाने त्याच्या कलेची पत्रास का करावी? तुम्ही?

In reply to by यशोधरा

आणि समोरचा त्याच्या देशाशी प्रामाणिक राहात असेल तर त्याचा निषेध करायचा? ठीक आहे. माझं सुरूवातीपासून एकच म्हणणं आहे - एकतर इस पार या फिर उस पार. हाकलायचं तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांना हाकला आणि त्यांच्या कलाकृतींचंही भारतात नामोनिशाण ठेवू नका. मग ज्यांनी तोंड उघडलेलं नाही तेही लोक सुटता कामा नयेत. किंवा मग कला ही देश, धर्म वगैरेच्या पलिकडे असते असं म्हणा आणि ते पाळा. आपल्याकडे काय होतंय की लोक फवाद खानला हाकलताहेत पण आतिफ, राहत, गुलाम अली यांना ठेवताहेत. त्यांची गाणी ऐकताहेत. त्यांनी गायलेली गाणी स्पर्धेत म्हणताहेत. हे चुकीचं आहे. तेही पाकिस्तानी आहेत. हाकलायचं तर सगळ्यांना. कुणाला एकाला हाकलायचं आणि बाकीच्यांसाठी पायघड्या पसरायच्या यात अर्थ नाही. हा माझ्या मते दांभिकपणा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

आणि समोरचा त्याच्या देशाशी प्रामाणिक राहात असेल तर त्याचा निषेध करायचा?
च्च!च्च! ऐसन काहे करत हो? स्वतःच्या देशाशी प्रामाणिक रहायला दुसर्‍या देशाला, जिथे आपली रोजी रोटी सुद्धा मिळते, त्याला शिव्या घालायला लागतात? आणि त्याच्या देशाशी प्रामाणिक राहूदेत हो, अगदी छाताडावर गोळ्या (खर्‍या, फिल्मी नाही) खाऊदेत - गुड फॉर हिम, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण माझ्या देशाला शिव्या घालू नकोस. इतकं सोपं आहे.

In reply to by यशोधरा

की ज्या पाकिस्तानी कलाकारांनी/लेखकांनी असं कोणतंही मत दिलेलं नाही, त्यांना का सोडायचं? लताऐवजी नूरजहानचं गाणं ऐकणं, जगजीतऐवजी गुलाम अली आणि मेहदी हसन ऐकणं हेही थांबवायला हवं. Ban everything that is associated with Pakistan - right from 14th August 1947.

In reply to by बोका-ए-आझम

थोडे दिवस थांबा, २०१७ चा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यासाठी पाकिस्तानच नसणार अशी व्यवस्था चालली आहे अशी खबर आहे. (कधी मधी अर्णव गोस्वामीचे कार्यक्रम पहात जा हो ! ;) :) ) पाकिस्तान नाही तर पाकिस्तानीही नसणारच. मग तर कोणाला बॅन करावे आणि कोणाला नाही हा प्रश्नच उरणार नाही =))