!! रावणामुळे दिवाळी !!
!! रवानामुळे दिवाळी !!
स्वामी व्हावे तिन्ही जगाचे मनाशी निर्धार केले,
कठोर तपस्या ध्यान लाउनी भ्रमविद्या सध्य केले,
शंकराने दास व्हावे ऐसा तो शिवभक्त झाला,
देव, ऋषी गण हेवा करिती ऐसा महाविद्वान झाला !!१!!
पण विद्वतेचा महामेरू क्षणामध्ये चूर झाला,
पाहुनी साध्वी सीतेला, तव मनाचा तोल गेला,
अपहरुनी पर सौभाग्येला, रावणाने अनर्थ केला,
अहंकाराच्या तिमिरातून, दानवाचा जन्म झाला !!२!!
राम प्रतिज्ञा बद्ध होते, भले-बुर्याचे द्वंद्व झाले,
वध करुनी दशाननाचे, रामाचे "श्री राम" झाले,
घेउनी भार्या-बंधू नी सेना, अयोध्येच्या वाटा निघाले,
लोटुनी सन वर्षे चौदा, रामराज्या आरंभ झाले !!३!!
पाहुनी वर्षांनी राजा, प्रजा आनंदात न्हाली,
स्वागत कराया रघुरामाचे, दिव्यांची आरास केली,
युगे उलटली काळ बदलले, प्रथा मात्र सार्थ झाली,
ना भुलावे बहुजनांनी, रावणामुळे घडली दिवाळी !!४!!
नमस्कार
नाही मुळीच नाही पण का ?
अगदी योग्य प्रश्न आहे तुमचा
नाही हरकत नाही..हा फक्त
ना भुलावे बहुजनांनी,
मला तसं वाटलं नाही.
मी लिहिताना खरंच एवढा विचार
बोका-ए-आझम - मी तुमच्या मताशी