बऱ्याच लोकांनी विचारलेलं व्यसनाच्या काळात काय झालं . खरं सांगू काही झालं नव्हतं कारण पैसे होते त्यामुळे काही आयडिया करून पैसे मिळवावे कुठेही बसून प्यावी असंही नव्हतं. पित असतानाही काम चालू होतं. प्रामाणिकपणे ते नोकरीला असो कि व्यवसायात . होणाऱ्या बायकोसोबत इथे आलो कि भारतभर फिरत होतो . व्यसन चालू असतानाही. वैयक्तिक मला काही नुकसान झालं नाही रिहॅब चे २ महिने सोडले तर .
पण किती वेळा बायको विचारायची वरुण तू ठीक आहे. नीट वागतो. विश्वासही आहे. पण आमच्या मनात त्यावेळी हि फिरताना किती भीती असते माहित आहे का ? निरुत्तर व्हायचो तेव्हा . वेड्यात काढायचो तिला. आईसोबतही कित्येक ठिकाणी जावं लागायचं . नातेवाईकांना तर माहित होतं पितो पण दुसरीकडे गेल्यावर तिला काय वाटत असेल हा हि विचार केला नाही कधी . कारण मी माझ्याच मस्तीत. कदाचित हा विषय बायकाच समजू शकतात नीट.
वास्तविक घरी कधी ड्रिंक ला ना नव्हती . थोडा कर प्रमाणात कर चालेल . मग ते घरी असो वा कुठेही . प्रॉब्लेम चालू झाला जेव्हापासून मी प्रमाणाबाहेर करायला चालू केलं . सकाळी रात्री कधी पण . तरी आपण चुकीचं वागलोच नाही लोक उगाच ड्रिंक वरून बोलतात असा वाटायचं . तेव्हा बदल न होणं स्वाभाविक होतं. घरच्यांनी बोलण्याचं अजून एक कारण होतं नोकरी निमित्ताने इतक्या देशात फिरत होतो चांगलं करियर होतं पण एका फटक्यात विचार न करता नोकरी सोडलेली बरं व्यवसायात म्हणाल तर मला कधीच रस नव्हता घरच्या व्यवसायात. पण तिथेही त्यामुळे जाणं आलंच . किती छंद होते पण काही करू शकत नव्हतो. वाचन सर्वात महत्वाची आवड पण रोज झोपताना ४-२ पानं वाचली कि उद्या हे वाचणारे अशी स्वतःलाच प्रॉमिस बास. सकाळी उठलो एक दोन पेग झाली की कसलं प्रॉमिस आणि कसलं काय .
बाकी सगळं व्यवस्थीत चालू होतं. एक आत्मविश्वास होता कि इतकं ड्रिंक केला तरी तरी आपलं नीट चालू आहे. पण काही दिवसाने याला तडे जायला सुरवात झाली. पूर्वी रात्री ड्रिंक लागायचं हळू हळू सकाळी रोज लागायला लागलं. कधी अचानक काम असलं आणि बाहेर जायचं असलं तर पिता येत नाहीये म्हणून अस्वस्थ वाटू लागायचं. तरीही स्वतःलाच समजावणं कारण आत्मविश्वास.
समजत होतं कित्येकदा पण आता बाहेर येणं कठीण आहे माहित होतं स्वतःलाच. सगळ्या जवळच्यांनी खूप सांगून पहिला पण ऐकायचं नव्हतं.
अश्यातच रिहॅब ला गेलेलो विचार करायला वेळही मिळाला आणि ड्रिंक ला गॅप हि. मस्त वातावरण ग्रुप अनुभव शेयरिंग सगळं होतं पण प्रत्येकाला मनातून वाईट जरूर वाटत होतं.
आमचा फ्लोर फक्त रिहॅब चा होता बाकी वर हॉस्पिटल काही घटना वर पहिल्या खूप मन ढवळून निघालं. मागील भागात बोललोच आहे लास्ट फ्लोर ला व्यसनाने पार वाया गेलेले लोकं होती त्यांना साधा तंबाखू हि पुरेसा नसे तोच खाऊन परत सुकवून खायचे पाहिलं तेव्हा भडभडून आलं असंही करू शकतात लोकं. मध्ये २ फ्लोर तिथे काय असेल ते तर विचारूच नका मानसिक रुग्ण असलेले. असं खूप काही. दोन महिने पूर्ण झाले तेव्हा घरचे आले नेण्यासाठी. बोलताना निघताना खूप आश्वासनं दिलेली मी . आठवतं होतं आई आणि बायकोचा बोलणं . इथे असताना बायकोचा पहिलाच आलेला व्हॅलेंटाईन डे चा फोन त्यावेळी भरून आलेला मन . बाकी सगळंच. गाडीत जातानाही विचारांवर कन्फर्म होतो.पण एकदा घरी आल्यावर राग उफाळून आला. खरं म्हणजे मला काही दिवस सोडले तर घरच्यांनी सगळी व्यवस्था नीट केली होती खाणं वाचन सगळंच . पण राग का व्यसनाची तीव्रता माहित नाही परत प्यायला चालू केला . मला नं सांगता नेलंच कसं हा प्रमुख राग .तरीही समजून घेतलं. जे केलं ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं बोले. आमचं कुटुंबही मोठे एकत्र राहत नसलो तरी सगळे मनाने एकत्र आहोत सगळेच पाठीशी होते. काही दिवसाने अक्कल येत गेली बदल झाला म्हणजे सगळंच बदललं असं नाही . आजही मी रविवारी ड्रिंक करतो कुठेही असुदे , पिकनिक ला गेलो कि करतो मित्रांसोबत पण एक प्रमाण आहे त्यावर इच्छा असली तरी बायको आठवते आई आठवते आयुष्यभर हे कायम राहील .सिगरेट वर्षातून एखाद दोन वेळी अगदीच ग्रेट मूड असेल तर तंबाखू पूर्ण बंद जो काही दिवस रिहॅब ला खात होतो . प्रयत्न केला तर बदल घडतो . १००% घडावा अशी कोणाचीही अपेक्षा नसते पण थोडं केलं तरी ज्यांची अपेक्षा आहे ते खुश होतात इतकं कळलं. जे बदल झाले त्यात मी आता सुखी आहे कधीपण प्यावी वाटत नाही आणि बरेच काही बदल . माझ्यासाठी तरी हे यश आहे. पुढील बदलांसाठी अजून प्रयत्न करेन बघू जमलं तर. अरे हो सांगायचंच राहिला घरच्या व्यवसायात मला कधीच रस नव्हता त्यामुळे २ महिन्यांनी परत आल्यावर परत वरिष्ठांशी संपर्क केला . काही इंटरव्यू झाले परत झाल्यावर पुन्हा तिथेच रुजू झालो .नव्या जोमाने काम चालू केलं बढतीही मिळाली. वेगळं वाटत आहे आता .असो प्रयत्न केले तर निश्चित होतं. सगळं नाही पण थोडं तरी.
ता. क (मिसळपाव वर कित्येक वर्ष वाचनमात्र होतो तेव्हाही ते कुटुंबासारखा होतं आजही आहे त्यामुळे फक्त इथेच शेयर केला. बाकी लिहिण्याचा कंटाळा त्यामुळे बरेच तपशील राहिले असतील. अजूनही वेगळ्या काही गोष्टींवर लिहायचंय बघू त्यासाठीही प्रयत्न करिन . )
वाचने
11833
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वतःच्या चुकांबद्दल, त्यातही
फारच छान. तुम्ही व्यसनमुक्त
उत्तम!!! ह्या सगळ्यात तुमचे
+१११११
In reply to उत्तम!!! ह्या सगळ्यात तुमचे by पिलीयन रायडर
सोडणार्या माणसालाच काय
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
+111111
In reply to सोडणार्या माणसालाच काय by नाखु
असेच म्हणतो +११११११११
In reply to +111111 by मोदक
फारच छान!
तुम्हाला व्यसनमुक्तीसाठी
मोहिते साहेब
+१११११
In reply to मोहिते साहेब by सुबोध खरे
तीव्र सहमत,
In reply to मोहिते साहेब by सुबोध खरे
+११
In reply to तीव्र सहमत, by संदीप डांगे
बरोबर आहे डॉक
In reply to मोहिते साहेब by सुबोध खरे
प्रयत्न केले तर निश्चित होतं.
छान, वरूणभाऊ! डॉ खऱ्यांच्या
छान,
वाचले सगळे भाग
लेखमाला
तुमचे स्वतःचे अनुभव वाचायला
आजपर्यंत सगळ्या प्रतिसाद देण्यार्यांचे मनापासून आभार .
सगळे भाग वाचले
कीप इट अप
वरुणभाऊ
+१
In reply to वरुणभाऊ by इडली डोसा
कौतुक!