रिहॅब चे दिवस (भाग ५ )!!!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
असेच दिवस जात होते. २६ वा दिवस उजाडला एक फोन करण्याची परवानगी घेतली . वर गेलो ऑफिस मध्ये आईला फोन लावला . एकट्याला बोलण्याची परवानगी नव्हतीच. फोन एकीकडे आणि रिसिव्हर आपल्याकडे असं होतं. मध्ये ग्रील त्यामुळे वैयक्तिक काही बोलता येणं कठीण होतं. तरीही मी नेटाने माझा मुद्दा बोलो मला काय वाटतं आणि मी परत असं करणार नाही या प्रकारचं. आईने एकच प्रश्न केला काय काम आहे . एका क्षणात बहुराष्ट्रिय कंपनी मध्ये असलेली नोकरी, आपला घरचा व्यवसाय त्या जीवावर आपण दाखवलेला माज गळून पडला. मी पुढे बोलो तरी.." ओके ठीक आहे" डॉक्टरांशी बोलते मग बघु हेच उत्तर आलं . माझे डोळे भरले होते तिथें काही बोलता येत नव्हतं कारण समोर लोकं होती. नर्सिंग च्या विद्यार्थिनी हि होत्या कारण माझ्या मते त्यांना २ ऱ्या वर्षी सायकियाट्रिस्ट हॉस्पिटल ला विझिट देणं असतं. आमचं हॉस्पिटलही त्या अंडर यायचं. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटल ला जाणं आणि अनुभव घेणं होतं. ( जाणकारांनी प्रकाश टाकावा ) त्या समोरच असायच्या ग्रील पलीकडे त्यामुळे काही बोलता आला नाही .लक्षात आलं आई आपल्याशी बोलत नाही तर बाकी ठिकाणी मी किती चुकलो असेन जाणते अजाणते पणी. होणारी बायको जी सतत सोबत होती तिच्याशीही चुकीचा वागलो असेन. आज हे बोलायला सोपं वाटतं पण त्यावेळी आपल्या चुका मान्य करून पुढे जाणं खूप कठीण होतं.
रोज मच्छी मटण चिकन शिवाय जेवण नाही पण इथे पालकाची भाजी हि आवडीने खाल्ली. नॉन व्हेज एकदाचं मिळायचं आठवड्यातून तेही थोडंच. रस्यावरच समाधान असं..
२-४ संस्था होत्या जिथे घरचे काही मदत करायचे त्यावेळी आवडीने जायचो. पुढे सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी च्या माध्यमातून हि जाणं झालं होतं. नोकरी करत असताना. एकदिवस एक संस्था आलेली हॉस्पिटलला त्यांचा एक व्हिडीओ होता तो पाहायला देणार होते आम्हाला . आणि एक छोटं लेक्चर देणार होते . ऐकलं ते पुढे वडापाव हि देणार समजलं तेव्हा चेहरे उजळले आमचे .आमच्या वॉर्ड मधील सर्वांचे .सर्व करोडपती लोकं होती पण शेवटी भूक सर्वात महत्वाची असते हे पुन्हा कळलं. खाल्ला आम्ही वडापाव कारण तो खाऊनही कित्येक दिवस झाले होते. त्यावेळी सगळ्यांना खाली बोलावलेलं पूर्ण हॉस्पिटल ला . छोटंसं गॅदरिंग हि होतं.
एक महिला होत्या ४० च्या आसपास गाणं गात होत्या उंदीरमामा आले गॉगल लावून ...पुढचा ऐकू शकलो नाही माझ्या डोळ्याळून पाणी . नंतर कळलं घरच्यांनी इथे आणून सोडला होतं त्यांना . ३ वर्षांपूर्वी .
काय वाटत असेल त्यांना. असे कित्येक अनुभव चांगल्या चांगल्या घरातली मुलं माणसं कोण मानसिक रुग्ण तर कोणाचा काही अजून प्रॉब्लेम. शेतकरी कुटुंबातले ,नोकरीवाले , कुठेतरी फसलेले, कोणी आयुष्यात पराभूत झालेले, असे भरपूर. सुन्न व्हायला व्हायचं जेव्हा आम्हाला एकत्र बोलवायचे पूर्ण हॉस्पिटल ला खाली . ह्या सगळ्यांना पाहून . पुस्तक बरीच वाचली होती हे काय नवीन नव्हतं पण जेव्हा आपण डोळ्यांनी पाहतो तेव्हा चित्र वेगळा असतं .२-२ वर्ष घरचे घ्यायला येत नाहीत ना फोन करत असं कसं होऊ शकतं लोकांचं पण होतं यावर विश्वास बसला.
थोडे दिवस गेले एके दिवशी दुपारी हाक आली वर बोलावलंय म्हणून नेहमीच चेक अप असावं असं वाटलं मी गेलो वर. समोर होणारी बायको आणि आई बसलेली ऑफिस मध्ये काही न बोलताच होणाऱ्या बायकोकडे पाहून डोळे भरून आले.......
अजून १-२ लोक होती तरी थोडा रडलो ह्यावेळी . काय काय खायला आणि पुस्तक घेऊन आलेल्या मला वाचायला पण तुला इथून घेऊन जाणार कधी बोल्या नाहीत त्या . बाकी सगळं बोलल्या पण मी एकाच मुद्दा पकडून होतो घरी कधी??? हतबल झालेलो मी पण काही उपाय नव्हता.
(बाकी पुढील भागात )
प्रतिक्रिया
सर्व भाग एकदाच वाचून काढले.
एका वेगळ्या जगाची ओळख होत आहे
वाचतोय
तुमच्या होणाऱ्या बायकोला लक्ष
वाचतोय. अगतिकता पोचली.
आहे तसं
+१
भावी सहचरीच्या धैर्याला सलाम
मन विषण्ण झाले
आपल्याला सादर वंदन. आपण आपली
फारच छान लिहीत आहात. तुषार
आधि शक्यतो मि चुकलो होतो
....
वाचतोय... लिहीत रहा..
जबरदस्त लिखाण!
जबरदस्त . आपण आपली हकिगत