वरदा,
प्रत्येकाने आपापली मिसळ-पाककृती येथे द्यावी ही तुझी कल्पना छानच आहे. परंतु प्रथम तुझी मिसळीची पाककृती येथे देऊन याची सुरवात तूच करावीस असे वाटते! :)
तात्या.
नुसती ठिकाणं सांगतात्..आम्ही इथे अमेरिकेत बसून काय करायचं त्यांचं
प्राजु बरं झालं सांगितंलंस्...बरीच मागे गेल्याने पाहिली नाही मी रेसिपी..झकास आहे एकदम्...आता ह्या विकएन्ड ला करतेच ट्राय...
तात्या मला येत असती तर दिली असती रेसिपी ...मी झणझणीत उसळ बनवून वर कांदा टॉमॅटो, फरसाण टाकते की झाली माझी मिसळ तयार.....जास्तीत जास्त म्हणजे गोड आणि तिखट चटणी टाकते त्यावर असेल तर...
पण लोक खूप वेगवेगळे प्रकार करतात्..माझ्या एका मैत्रीणीकडे साबुदाणा, खारे शेंगदाणे वगैरे घालायचे त्यावर..
म्हणून म्हटंलं विचारून पहावं सगळ्यांना...
ठाण्याचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या मामलेदार च्या मिसळीची कृती:
साहित्य -
कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,१ बोटभर आल्याचा तुकडा
तेल १.५वाट्या,तिखट १.५वाटी,गरम मसाला ४ चमचे
१०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
चवीनुसार मीठ
कृती -
हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण व आले वाटून पेस्ट करावी,उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.
पापडी कुटून घ्यावी व पाण्यात भिजत घालावी.
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १.५ वाटी तिखटातील ३/४ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.पाणी घालून उकळू द्यावे.
उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात बारीक चिरलेले २ कांदे घालून परतावे,उरलेले तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हे मिश्रण वेगळे ठेवावे.
वरुन घालायसाठी कांदे बारीक चिरावे,उकडलेले बटाटे चिरावे.
खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.
"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळी तर्री वरुन घ्यावी.
वि.सू.
१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो ,पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.नंतर ताक प्यावे.
अतिशय महत्त्वाचे:
२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.
स्वाती,
ह्या महिनाअखेर भारतात जाईन तेव्हा मामलेदारची भेट पहिली!
(माममेदारप्रेमी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
स्वाती,
तुमची ही मिसळ झक्कास्स्स्स्स्स्च आहे.
माझ्याकडून मी ह्यात काही (माझ्या तिखट चवीशी सुसंगत असे..) बदल केले आहेत.
१) आले-लसूण बरोबर काही हिरव्या मिरच्या वाटून घेणे.
२) रंग आणि तिखटपणा ह्यांचा सुंदर प्रितीसंगम व्हावा म्हणून 'काश्मीरी मिरच्या' + 'गुंटूर मिरच्या' असे १:१ असे किंवा अधिक तिखट हवे असेल तर १:३ असे प्रमाण घ्यावे.
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
आजपर्यंत कुठल्याच पाककृतीचे मानले नाहीत इतके ह्या मिसळ पाककृतीचे अगणित धन्यवाद.
तुमच्या मेनू मधे ही डीश ऍड करा.. भारतात आलोकी लगेच भेट देतो..
स्वातीताई.. तोंडाला पाणी सुटल. नुसता जळफळाट झाला.. साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
केशवसुमार, अगदी सहमत!
फक्त युके ऐवजी जर्मनी वाचा...
स्वाती
अवांतरः येता का युकेतून जर्मनीला एखाद्या विकेंडला,मिसळ कट्टा करू,:)
स्वातीताई कट्ट्याच्या आमंत्रणा बद्दल मनापासून धन्यवाद..
पण आता भारतात परतायचे दिवस जवळ आले आहेत त्याची आवरा आवर चालू आहे..तेव्हा तुम्हीच सगळे भारतात या झकास कट्टा जमवू..
(२० दिवसांनी भारतात परतणारा) केशवसुमार
रंग आणि तिखटपणा ह्यांचा सुंदर प्रितीसंगम व्हावा म्हणून 'काश्मीरी मिरच्या' + 'गुंटूर मिरच्या' असे १:१ असे किंवा अधिक तिखट हवे असेल तर १:३ असे प्रमाण घ्यावे
मी सहसा बेडगी आणि संकेश्वरी यांचे मिश्रण वापरतो. आता तुमच्या प्रतिसादाप्रमाणे काश्मिरी + गुंटूर वापरून बघेन.
(लवंगी मिरची आवडणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
असे वर्णन वाचूनच आता परत एकदा मिसळ करावीशी आणि खावीशी वाटावी असे तोंडाला पाणी सुटले आहे, पण केशवसुमार म्हणतात त्याप्रमाणे जर्मनीच्याही भरपूर फुल्या फुल्या...चांगले फरसाण,पापडी,शेव मिळेल तर शपथ!
स्वाती
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
वाचुनच तोंडाला पाणी सुटले. :)
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
काय पण झ्याक लिवलय राव!! तोंडाला पाणी सुटलं.. बाकी स्वतीताई रेसिपि बी झ्याक :)
-(झ्याकप्याक)ऋषिकेश
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
प्रभाकररव, वेळ जात नाहिये का? कशाला असं झक्क्क्क्कास वर्णन लिहायचं.. आणि आम्हांला जळवायचं?
असो.. वर्णन बाकी एक्दमच.. भन्नाट..!
- प्राजु
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
असं उन्मनी अवस्थेत नेणारं लिहू नका हो आणि ते ही सकाळी, सकाळी!
अहो हे वाचून मी आज माझ्या प्रेझेंटेशनला गेलो आणि इंट्रोडक्शन मधे 'सँपल्-पाव' असं काहीतरी बरळलो!
माझा मॅनेजर मराठी नसला तरी भारतीय आहे, काय "सँपल" माणूस आहे असा चेहरा करुन तो बघायलाच लागला!!
अवांतर - हलकेच घ्या, हे सगळं उन्मनी अवस्थेत वाटून गेलं असावं - खरं खोटं "सॅंपल्-पाव"च जाणे!!
चतुरंग
श्री. केशवसुमार,
ही डिश माझ्या (सिंबॉयसिस) कॅन्टीनच्या मेन्यू मध्ये डिसेंबर २००७ पासूनच ऍड केली आहे. भारतात आलात की जरूर भेट द्या.
श्री. सुनील,
गुंटूरचा 'दणका' काही औरच आहे. प्रेमातच पडाल.
श्री. मनिष,
खवैय्या त्यालाच म्हणतात.
श्री. ऋषिकेश,
ह्यात माझं श्रेय काही नाही. हा सर्व त्या प्रतिभा चेतविणार्या तेजतर्राट लालबुंद उकळत्या सँपलचा महिमा आहे.
हा: हा: प्राजु,
तुमच्या 'जळण्यात' मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो आहे.
श्री. चतुरंग,
सँपल-पावचेच प्रेझेंटेशन द्या.......सर्वांचे मन जिंकून घ्याल.
माझ्या प्रतिसादावरील सर्वांच्या प्रतिक्रियांचे मनःपूर्वक आभार.
मि.पा वरील.. मिसळप्रेमींना माझे आमंत्रण..
रविवार दि. ३ फेब्रु. २००८ रोजी मी घरी मिसळपाव करणार आहे. अस्सल कोल्हापूरी..! तेव्हा इथे मँचेस्टर मध्ये मिसळ कट्टा (बर्फात) करू. आपण सर्वांनी जरूर यावे. आपापल्या भाडे खर्चाने यावे ही विनंती...
आपली स्नेहांकित,
प्राजु.
प्राजु,
तुमचे निमंत्रण म्हणजे माझ्या सारख्या गरीब भारतियाला 'न खात्या देवाला नैवेद्य' असे आहे. तरी पण आपल्या निमंत्रणात आपल्या मनाचा मोठेपणा दिसतो. मनापासून धन्यवाद.
झाला रे.. एकदम फुल्टूच झाला..
लविन फोटोही इथे..
वरदा,
वाट पाहीली बाई तुझी येशील म्हणून.. पण मग नाहिस ना आली मग हा घास तुझा अस समजून मी च खाल्ली मिसळ तुझ्या वाटणीची...:)))
- प्राजु
स्वाती,
मामिची पाककृती येथे दिल्याबद्दल तुझे आभार मानून परके करत नाही!
इथे केव्हा येते आहेस? तू इथे आल्यावर आपली मामिची एक डेट नक्की! :)
तुझा,
(शाळूसोबती) तात्या.
प्रभाकरशेठ,
आपण मिपाचे सभासदत्व घेऊन मिपाच्या टपरीवर नव्या जोमाने कार्यरत झालात याचे बरे वाटले. आपलीही मिसळीची पाककृती झक्कासच आहे! अर्थात, अहो बोलूनचालून पट्टीचे बल्लवाचार्य तुम्ही! त्यामुळे आपली पाककृती झकासच असणार हे ओघानेच आले. आपल्या हातची खाल्लेली बिर्याणी आणि सुकामटण आजही आम्हाला याद आहे. आता आपल्या हातचं सुग्रास भोजन चापायला पुन्हा पुण्याला केव्हा येऊ तेवढं सांगा! :) बाय द वे, आपण, आपल्या सौ, आणि आपले चिरंजीव ठाण्याला एकदा आमच्यासोबत मिपा खायला आला होतात ते आम्हाला अजूनही याद आहे! पुन्हा केव्हा येता तेवढं सांगा! आम्ही वाट पाहात आहोत! अवांतर - बाय द वे, वहिनींना भेटून तेव्हा खूप बरं वाटलं होतं. एवढ्या साध्या, सोज्वळ बायकोला इतका डांबीस नवरा कसा काय मिळाला, देव जाणे! :) असो..!
मंडळी,
इथे दिवसेंदिवस मिपाच्या अधिकाधिक पाककृती येत आहेत हे पाहून संतोष वाटला. प्राजूच्या घरीही मिपा खायला जायची माझी इच्छा आहे, परंतु अमेरिकेचे विमान भाडे आमच्यासारख्या गरीबाला कसे परवडणार? त्यामुळे प्राजूकडे जायचं सध्या रहीत केलं आहे! :)
असो,
सगळ्यांनी मिळून मिपाधर्म वाढवावा हीच सदिच्छा!
आपला,
(मिसळवेडा) तात्या.
--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे |
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)
आपण मिपाचे सभासदत्व घेऊन मिपाच्या टपरीवर नव्या जोमाने कार्यरत झालात याचे बरे वाटले.
तात्यांचे कार्य आणि आम्ही येणार नाही? कसे शक्य आहे.....?
आपलीही मिसळीची पाककृती झक्कासच आहे!
ही पाककृती माझी नाही हे नम्रपणे सांगू इच्छितो. स्वाती दिनेश ह्यांच्या कडूनच मनोगतावर शिकलो. मिसळीच्या पाककृतीचे श्रेय १००टक्के त्यांचेच आहे.
आता आपल्या हातचं सुग्रास भोजन चापायला पुन्हा पुण्याला केव्हा येऊ तेवढं सांगा!
कधीही या. मात्र मांसाहारी डोहाळजेवणासाठी आधी फोन करून सर्व 'आलबेल' आहे ह्याची खातरजमा करून घ्यावी.
एवढ्या साध्या, सोज्वळ बायकोला इतका डांबीस नवरा कसा काय मिळाला, देव जाणे!
ह्हा:..ह्हा:...ह्हा:.... दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं.
या वीकएंडला मी मिसळ करून पाहीन. जर चव बराब्बर जमली तर माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायांत घालीन!!
अहो, गेली एकवीस वर्षे मी या मिसळीसाठी तळमळतोय हो! :(((
कॉलेजात असतांना ती आमचे मुख्य अन्न होती!!
..
..
आधी प्रत्येक ट्रीपला ठाण्याला जायचं जमायचंच असं नाही, आणि नंतरनंतर बाधण्याची (मिसळ नाही हो, तिथलं पाणी)भिती वाटे.
आजवर हताश असलेला,:(
पण आता हुरूप आलेला,:)
पिवळा डांबिस
स्वातीजी धन्यवाद!
आता पर्यंत हजारदा ठाण्यास गेलो असेन.
मा.मि.ची किर्ती लहानपणा पासुन ऐकतोय.
परंतु, त्याचा पत्ता नेमका सापडत नाही.
जेव्हां वेळ असतो तेव्हा हातात भलि मोठी टूलबॅग असते, ती घेउन पत्ताही शोधता येत नाही.
त्यामुळे मा.मि.ची तल्लफ त्या कुंजविहारीचा वडा खाउन भागवतो.
आता मात्र ठरलं. शेंडी तुटो वा पारंबी! मा.मि.चा पत्ता शोधणारच.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
केशवकुमार तुम्ही यु,के. मधे कुठे राहता माहीत नाही. पण इथे "साया" मधे फरसाण मिळतात( चांगल्या प्रकारचे).शिवाय हलदीरामचे सर्व प्रॉडक्ट मिळतात.
साया ची दुकाने खूप ठिकाणी आहेत.
माझ्या घरी जवळजवळ आठवड्याला मिसळ बनतेच. अगदी "कोल्हापूरी".
आता जेव्हा कधी यु.के. मधे याल तेव्हा साया ला भेट द्या.
माझ्याघरी मिसळ खायलासुध्दा....
नावच एक खेड आहे मॅन्चेस्टर नावाच्या शहराजवळ .. तिथे राहतात आस्मादिक.. काय म्हन्जे काय बी मिळत नाय स्वातीताई इथे( दारू आणि प्राण्यांची प्रेते सोडून) बाजार हटिला एतवारी मॅन्चेस्टरला २० मैलावर जाव लागतया..
(युके मधला खेडूत) केशवसुमार
बाय द वे.. बर्मिंगहाम मधून काल झकास फरसाण आणि पापडी आलेली आहे ( २ पाउंडाचा फरसाण आणि २५ पाउंड्चा प्रवास, काय करणास साला जिभेचे चोचले ) त्यामुळे ह्या शनिवारी हुर्रे.. ढाकू माकूम ढाकू माकूम ढा.....मिसळ पाव
(आनंदित)केशवसुमार
(सगळ्यांच्या मिपाच्या नावाने दोन घास काढून ठेवतो अस हवर्या सारख बघू नका.. नाहीतर साला आमचंच जुने एक विडंबन म्हणायची वेळा यायची
मिसळीवर मज राग भयंकर
दुसर्या दिवशी आग भयंकर)
साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथकेशवसुमार, अगदी सहमत!
फक्त युके ऐवजी जर्मनी वाचा...
स्वाती
अवांतरः येता का युकेतून जर्मनीला एखाद्या विकेंडला,मिसळ कट्टा करू,:)
आम्हालाही मिसळ खायला बोलवा...
यु.के. मधील आणि यु.के.बाहेरील सर्व लोकांना मी मिसळ पाव खाण्यासाठी आमंत्रण देते.
मी ग्रेटर लंडन मधे राहते. मला इथून खूप इंडियन दुकाने जवळ आहेत.
तसेच वेम्बली , साऊथ हॉल (छोटे इंडिया) ३० मिनिटावर (कारने) आहेत.
साया वरील २ ठिकाणी, तसेच अल्पटन,वुड्फर्ड ही मला माहीत असलेली ठिकाणे.
दोन आठवड्यांनी अस्मादिक सहकुटुंब लंडनला येणार आहेत चार दिवसांसाठी.
रॅडिसन माउंटबॅटन हाटेलात मुक्काम आहे. तेथून जवळपास काही भारतीय जेवणाची ठिकाणे आहेत का, ते कृपया कळवा.
पत्ता: 20 Monmouth St. Covent Gard London WC2H 9HD GB
- सर्किट
म्हणजे आता आपले यु.के. आणि यु. एस. मधे दोन नविन मि. पा. कट्टे तयार झाले म्हणायचे....आता आपल्याला ठाणे आणि कोल्हापुरच्या मिसळीच्या ठिकाणांची नुसती नावं ऐकून गप्पं बसायला नको...स्वाती ती रेसिपि करून पाहिली ह्या विकएन्ड्ला...एकदम झकास...थँक्यू गं...
म्हणजे आता आपले यु.के. आणि यु. एस. मधे दोन नविन मि. पा. कट्टे तयार झाले म्हणायचे....
वा वा! वरील वाक्य नुसतं वाचूनच सार्थक झाल्यासारखं वाटलं!
मिपाधर्म वाढवा, महाराष्ट्र धर्म वाढवा!
मिसळपाव मस्तकी धरा, अवघा हलकल्लोळ करा...! :)
हे असे जगभर मिपाकट्टे भरलेले पाहावेत हीच इच्छा होती, संत तात्याबांचे हेच जिवीतकार्य होते, आणि याच करता तात्याबांनी अवतार घेतला होता! आता आमचे कार्य पूर्ण होत आले! :)
वरदा, प्राजू, तुमच्यासारख्या प्रामाणिक मिसळधर्मीयांच्या हाती मिपा सोपवून आता मी सुखाने वैकुंठात जाईन! (तुकोबांकरता जसा आला होता तसा एखादा गरूड उडत उडत येण्याची वाट पाहतो आहे! :)
हेचि दान देगा देवा, मिपाचा विसर न व्हावा
विसर न व्हावा, देवा विसर न व्हावा
मिसळ खाईन आवडी,
हेची माझी सर्व जोडी....
माझी सर्व जोडी, हेचि माझी सर्व जोडी..
तात्या म्हणे आता
मिसळ खायाला घालावी
खायाला घालावी, मिसळ खायाला घालावी
न लगे मुक्ति आणि संपदा मिसळसंग देई सदा...!
सर्वांनी आपापले राग लोभ प्रेम माया ममता आदि षड्रिपू मिसळीच्या रश्श्यात बुडवावेत आणि मिसळीशी एकरूप व्हावे हीच संत तात्याबांनी जगाला दिलेली शिकवण सर्वांनी आचरणात आणावी! :)
आता मिसळीकडे पाहून संत तात्याबा इतकंच म्हणतील,
भेटी लागी जीवा, लागलिसे आस!
:)
आपला,
(मिपाधर्मी) तात्या.
हे असे जगभर मिपाकट्टे भरलेले पाहावेत हीच इच्छा होती, संत तात्याबांचे हेच जिवीतकार्य होते, आणि याच करता तात्याबांनी अवतार घेतला होता! आता आमचे कार्य पूर्ण होत आले! :) वरदा, प्राजू, तुमच्यासारख्या प्रामाणिक मिसळधर्मीयांच्या हाती मिपा सोपवून आता मी सुखाने वैकुंठात जाईन! (तुकोबांकरता जसा आला होता तसा एखादा गरूड उडत उडत येण्याची वाट पाहतो आहे! :)
तात्याराम महाराज, नका हो अस॑ निर्वाणीच॑ बोलू...
तुम्ही जर वैकु॑ठाची भाषा करायला लागलात तर आम्हा बालका॑चे कस॑ होणार. हे असल॑ हृदयाला घर॑ पाडणारे बोल सोडा तात्याबा !
अहो, तुम्ही वैकु॑ठाला गेलात तर आम्हाला तर्रीदार लेखन कुठुन नशीबी व्हावे? तिखटजाळ प्रतिक्रिया कुठे वाचायला जायच॑ आम्ही पामरा॑नी? (आयला हे लै म्ह॑जी लैच स्वार्थी होतय काय?)
हा॑...कस॑ होणार त्या मामलेदाराच॑? तुमच्याशिवाय त्याच्या मिसळीची खुमारी काय रहाणार?
----
बाकी हे एकदम झक्कास हा॑... यु.के. आणि यु.एस. मध्ये मिपाकट्टे !!! येकदम ज॑क्शन वाटल॑ बॉ :)
आपला
- (तात्याबा॑चा भक्त, अजाण लेकरु)
ध मा ल.
अहो आत्ता कुठे आम्ही तुमच्याकडून शिकायला सुरुवात केलेय्... ही काय निर्वाणिची भाषा....आपला ठाण्याचा कट्टा कोण सांभाळणार मग?
ते काही नाही सगळे मिळून धमाल करूया असं लिहा....हे सोपवून मोकळं होणं काही चालणार नाही.....
आनी ती झक्कास झाली रं झाली!!!!!
ही रेशेपी वापरून आमी मिसळ केली. आनी तिच्यायला आमच्या जिभेनं येकदम जंक्शन दाद दिली! :)
आता जगाच्या पाठीवर कुठंही रहायला मोकळा झालो. अर्थात, जिथे गुजुभाय फरसाण विकत असेल तिथे...म्हणजे जगात कुठेही!!! :)
मन फार, फार म्हणजे अगदी तुडुंब प्रसन्न झालंय! पोटही तुडुंब भरलंय!!
स्वाती आणि प्रभाकर, माझ्या कातड्याचे जोडे करायला टाकले आहेत, तयार झाले की फेड्-एक्सने पाठवून देईन.
आपला,
(उन्मनी अवस्थेतला) पिवळा डांबिस
कालच केली होती. कसली मस्त झाली होती.
थोडावेळ तिच्याकडे विविध कोनातून बघतच राहीलो.शेवटी राहवेना. फडशाच पाडला. आणि नुकतीच 'शिकार' चट्टामट्टा केलेल्या 'वनराजा'सारखी मस्त ताणून दिली.
श्री. केशवसुमार,
तुमच्या सर्व फुल्या-फुल्यांना मी 'फुले' समजून स्विकारले आहे. मिसळीच्या तिखट तर्री इतकेच आपले मिसळीवरील प्रेम मनस्वी आहे ह्याची खात्री पटली.
श्री. विसोबा खेचर,
पुण्यात कट्टा जमवाच. सर्व उपस्थितांना स्वखर्चात मिसळ खाऊ घालेन.
श्री. चतुरंग (आणि इतर मिसळप्रेमी)
कधीही या. एकत्र बसून मिसळ चापू.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
प्रतिक्रिया
हे चांगलं केलंत!
सहमत..
In reply to हे चांगलं केलंत! by पिवळा डांबिस
सुरवात..
अगं..
हो ना
ही घ्या मा.मि. ची पाकृ..
हम्म्म
In reply to ही घ्या मा.मि. ची पाकृ.. by स्वाती दिनेश
झक्कास्स्स्स्स.....
पेठकरशेठ,
In reply to झक्कास्स्स्स्स..... by प्रभाकर पेठकर
जर्मनी
In reply to पेठकरशेठ, by केशवसुमार
धन्यवाद
In reply to जर्मनी by स्वाती दिनेश
मिरची मिश्रण
In reply to झक्कास्स्स्स्स..... by प्रभाकर पेठकर
वावा..क्या बात है!
In reply to झक्कास्स्स्स्स..... by प्रभाकर पेठकर
क्या बात है!!!
वाव
झ्याक
का हो..
प्रभाकरपंत,
धन्यवाद...
समस्त..
धन्यवाद...
In reply to समस्त.. by प्राजु
रविवार दि. ३ फेब्रु. २००८ ला
In reply to समस्त.. by प्राजु
झाला रे..
In reply to रविवार दि. ३ फेब्रु. २००८ ला by केशवसुमार
आभार..
ह्हा: ह्हा: ह्हा:.....
In reply to आभार.. by विसोबा खेचर
प्राजु
ये गं..
अरे वा
थ्यांकू हां, स्वाती आणि प्रभाकर,
ही घ्या मा.मि. ची पाकृ..
सजय,
यु.के. मधे
मॅकल्सफिल्ड..
In reply to यु.के. मधे by स्वाती राजेश
हे 'साया'
In reply to यु.के. मधे by स्वाती राजेश
२२ फेब्रुवारी २००८
In reply to यु.के. मधे by स्वाती राजेश
नाही जमले तर...
स्वाती ताई.. आम्हीही जर्मनीत आहोत
कधी येता?
In reply to स्वाती ताई.. आम्हीही जर्मनीत आहोत by सख्याहरि
आमंत्रण
स्वातीताई
In reply to आमंत्रण by स्वाती राजेश
पत्ते
In reply to स्वातीताई by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तारीख?
In reply to पत्ते by स्वाती राजेश
अरे वा
सार्थक..!
In reply to अरे वा by वरदा
लै भारी
In reply to सार्थक..! by विसोबा खेचर
हे असे जगभर मिपाकट्टे भरलेले पाहावेत हीच इच्छा होती, संत तात्याबांचे हेच जिवीतकार्य होते, आणि याच करता तात्याबांनी अवतार घेतला होता! आता आमचे कार्य पूर्ण होत आले! :)
वरदा, प्राजू, तुमच्यासारख्या प्रामाणिक मिसळधर्मीयांच्या हाती मिपा सोपवून आता मी सुखाने वैकुंठात जाईन! (तुकोबांकरता जसा आला होता तसा एखादा गरूड उडत उडत येण्याची वाट पाहतो आहे! :)
हाहाहाहा)))))))
ह. ह. पु. वा.
संत तात्याबाचा लाडका शिष्य
प्रा.डॉ.............
मिसळपाव नाही...
In reply to सार्थक..! by विसोबा खेचर
तात्या...तात्याबा...
काय हे तात्या
धमाल?
In reply to काय हे तात्या by वरदा
पोष्टकार्ड..
In reply to धमाल? by धमाल मुलगा
मा मि
अरे
आरं केली रं, मिसळ केली!
१० नंबर..
In reply to आरं केली रं, मिसळ केली! by पिवळा डांबिस
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..............!
फुल्या ..फुल्या ..
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..............! by प्रभाकर पेठकर
सहमत..
In reply to फुल्या ..फुल्या .. by केशवसुमार
पंत, फार त्रास दिलात!
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स..............! by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
आलोच
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
काय हे