✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनाच्या कुपितले-पडदा पडताना

व
विनायक पाचलग यांनी
Wed, 01/28/2009 - 21:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5138 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अप्रतिम

प्राची
Wed, 01/28/2009 - 21:51 नवीन
>>त्याला प्रेक्षकांना भेटणारा ईश्वर देखील दिसतो तो त्यांच्या खळाळत्या हास्यातून वा टपटप गळणाऱ्या आसवातून. अप्रतिम :) अवांतरः खरोखरच,२६ आणि २७ जानेवारीला झालेला सा रे ग म प (शुरा मी वंदिले) पंडित ह्र्दयनाथ मंगेशकरांनी एका वेगळ्याच उंचीवर नेला आणि त्याला जोड मिळाली ती वीरमाता,वीरपिता आणि वीरपत्नींनी साधलेल्या संवादाची.पंडित ह्र्दयनाथांकडून प्रत्येक गाण्याबद्दलची आठवण्,इतिहास ऐकणे हे आपले भाग्य होते,असे क्षण दुर्मिळ असतात. या कार्यक्रमाची सी डी निघण्याची आपली इच्छा लवकरात लवकर पूर्णत्त्वास येवो.
  • Log in or register to post comments

अगायायायाया.....

भडकमकर मास्तर
गुरुवार, 01/29/2009 - 03:09 नवीन
तपश्चर्या, ईश्वराशी संवाद,समाधी अवस्था, ईश्वरभेट ...... :O :O :O :O :O पहिला प्रयोग होताना असा समाधीचा अनुभव येणे म्हणजे अगायायाया... आमच्या डोळ्यांत टच्कन पाणीच आले.... हृदय फाटले. खळाळून हसू आले... काळजात चर्र झाले. वाचनरंगी रममाण होत ईश्वराशी संवाद सुरू झाला. समाधी अवस्था आली. ईश्वरभेट घडते की काय असं वाटायला लागलं. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मागितला नसताना एक सल्ला...

भडकमकर मास्तर
गुरुवार, 01/29/2009 - 03:03 नवीन
१.उपमांचा भडिमार टाळा २. छोटी का होईना नवीन माहिती द्या.... एखादा वेगळा किस्सा लिहा..... ३. लेखात जेन्युइनिटी असूद्या हो.... ( मला शंका आहे की तुम्हाला नाटकातला कलाकार ईश्वराशी संवाद करतो आणि समाधी अवस्थेत जातो , यावर विश्वास आहे)... उगीच शब्दाला शब्द जोडणं म्हणजे फार खोटंखोटं वाटतं हो ... या दहावीच्या निबंधाच्या शैलीतून बाहेर या एकदा... आता नाटक कसे तयार होते हे सार्‍यांनाच माहिती आहे.... त्यात तुमचे नुसते " हे म्हणजे जणू ते " " ते म्हणजे जणू हे" असल्या उपमांनी भरलेली वाक्ये वाचून फार त्रास होतो कारण नवीन माहिती शून्य.... मोठमोठे कलाकार म्हणतात की पहिले आठ दहा प्रयोग चाचपडण्यात जातात.... हे बरोबर आहे की नाही, ते नीट होईल की नाही, अमुक गोष्ट बॅकस्टेजवाले वेळेत करतील की नाही, लाईट नीट येइल की नाही वगैरे वगैरे शंभर गोष्टी डोक्यात असताना कसली आलीय समाधी आणि कसली आलीय ईश्वरभेट राव?? पूर्वी तुम्हाला सल्ला देणार्‍या गोगोल सरांची काही वाक्ये... काय आहे ना की विद्वत्ता असणे आणि उगाच मोठाले शब्द वापरुन त्याचा आव आणणे यात खूप फरक आहे. दुर्दैवाने आज काल असा प्रयत्न लोकांना लगेच कळतो........................................ .......... यावर तुम्ही लिहिले आहे की मी उपमांचा अनावश्यक वापर टाळणार आहे.... या लेखावरून तरी तसे वाटत नाही... असो.. तुमच्या वाटचालीला शुभेच्छा... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

माझी शाळेतली चोपडी

धनंजय
गुरुवार, 01/29/2009 - 04:24 नवीन
आईबाबांना माळ्यावरती सापडली. त्यावेळी मी गीतेतला ज्ञानमार्ग वगैरे गोष्टींनी भारावलो होतो. मग स्वतःच जीवनविषयक भाष्य वगैरे लिहिलेले आहे. साहित्यिक दृष्टीने खूपच निकृष्ट दर्जाचे, वैचारिक दृष्टीने बालिश असलेले, तरी पण मनापासून लिहिलेले प्रामाणिक मासले त्यात आहेत. काव्यालंकारांचा सोस त्या वयात खूप होता. मला वाटते स्नो-पावडर किती लावली तर भडक? हे कळायची सौंदर्यदृष्टी मुलींनाही थोड्या फसलेल्या प्रयोगांच्या नंतर येत असावी! मोठमोठाले शब्द आणि उपमा वापरून फसलेल्या प्रयोगांशिवाय ते अलंकार सुंदररीतीने चढवण्याचे कौशल्य कसे येईल? तुमचे आणि गोगोल सरांचे सर्व मुद्दे विनायकने लक्षात घ्यावे. घ्यावेच. (पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. माझी बाल-पौगंड-चोपडी आता बघितल्यानंतर मला तरी असे वाटते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

+१

चित्रा
गुरुवार, 01/29/2009 - 06:01 नवीन
पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. असेच म्हणते. मला माझे लहानपणचे लिखाण (डायरी, आणि काही लेख) आता वाचून खूप हसू येते. पण ते तेव्हा खरेच अगदी मनापासून लिहीले होते असेही जाणवते. मला विनायक यांचे लेखन आवडले. अकरावीत असताना मी असे विविध उद्योग (नाटकांना संगीत देणे तर दूरच!) केले नव्हते, त्यामुळे माझे अनुभवांचे क्षेत्र मर्यादित होते असे जाणवते. विनायकना पुढच्या लेखनासंबंधी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

+२

सहज
गुरुवार, 01/29/2009 - 06:19 नवीन
भडकममास्तरांचे म्हणणे योग्यच आहे तरीही मा. विनायक यांनी हे त्यांना योग्य वाटते असेच लिहले आहे :-) पुढील लेखनात ते नक्की वरील सुचना अमंलात आणतील व गोगोलसर व भडकमकर मास्तरांना सुखद धक्का देतील याची खात्री वाटते. शाळेतले लेखन सोडाच,प्रेयसीला [आताची बायको] लिहलेली माझीच (बाळु )पत्रे पाहुन, मी तिला विचारले हे असे मी लिहले तरी तु कसे काय मला पसंद केलेस, तुला इतर कोणी मिळाले नाही का? ती देखील आयुष्यात सर्वात अवघड आव्हाने स्वीकारायचे ते वेडे वय होते, फसले म्हणून बोलुन घेते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

+३

अवलिया
गुरुवार, 01/29/2009 - 09:38 नवीन
सहमत *वरिल सुचनांचा मला पण उपयोग होईल असे वाटते. * --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+४

छोटा डॉन
गुरुवार, 01/29/2009 - 09:47 नवीन
मा. विनायक व इतर अनेक शिकाऊ अगर अनुनभवी लोकांनी भडकमकर मास्तर आणि धनंजयशेठ ह्यांचा सल्ला खरोखर मनापासुन अभ्यासावा. अतिशय सोप्या भाषेत ह्या लोकांनी "नक्की कसे असावे" ह्यासंबंधी मस्त लिहले आहे. इनफॅक्ट मी सुद्धा बर्‍याच गोष्टी मनात नोंदवुन ठेवल्यात आणि भविष्यात ह्या सल्ल्याचा सदुपयोग जरुर करीन ... अनुभवाचे बोल आहेत हे राजा, मनावर नक्की घेच. बाकी तुझे चांगले आहे ह्यात वाद नाही, पण जास्त अलंकारिक, उपमा वापरुन, अगम्य आणि अतर्क्य लिहण्याचा नादात वाचकांशी जवळीक हरवु नकोस हीच अपेक्षा. बाकी पुढील लेखनास शुभेच्छा ...! ( भोचकपणाबद्दल क्षमस्व व स्पष्ट बोलल्याबद्दल राग मानु नये ... :) ) ------ ( तुझ्यासारखाच शिकाऊ ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

(पण आपणही

भडकमकर मास्तर
Fri, 01/30/2009 - 00:53 नवीन
(पण आपणही थोडासा बटबटीतपणा त्या प्रायोगिक वयाचे नैसर्गिक लेखन म्हणून स्वीकारले पाहिजे. ) हो .. ते तसे बराच काळ स्वीकारलेही... या नाटकावरच्या लेखानंतर अगदीच राहवेना म्हणून लिहिले... "हीच ती आपली छान शैली" असा गैरसमज वाढीला लागू नये , ही प्रामाणिक इच्छा होती... अर्थात सल्ल्याचं काय करायचं हा सर्वस्वी लेखकाच्या मर्जीचा प्रश्न.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

एकूण काय तर विनायकाच्या

चतुरंग
Fri, 01/30/2009 - 01:08 नवीन
लिखाणातला उपमाअलंकाराच्या सोसाचा आणि जीवनविषयक भाष्याचा साहित्यिक बोळा निघाला की पाणी वाहते होईल! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हेच म्हणतो

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 01/30/2009 - 03:09 नवीन
पुलंनी गटणे कुणा खर्‍या व्यक्तीवरून ल्लिहिला किंवा नाही हे मला माहिती नाही. आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पण

कवटी
Fri, 01/30/2009 - 14:15 नवीन
पण विनायकाचे लेखन वाचताना मात्र राहून राहून "हा गटण्याचा पुनर्जन्म" हेच वाटत आले आहे. सहमत. माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. =)) =)) =)) कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

माझी

शंकरराव
Fri, 01/30/2009 - 14:28 नवीन
माझी सखाराम_गटणे(टी एम) ला विनंती आहे, की त्याने आपला टी एम काढून ते सदस्यनाम विनायकाला जाहीरपणे दान करावे. + १ सहमत =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

भडकमकरांशी सहमत

मिहिर
गुरुवार, 01/29/2009 - 23:16 नवीन
भडकमकरांशी मी पूर्णपणे सहमत आहे. मला आधी तसेच वाटले होते, फक्त बोललो नव्हतो. अवांतरः सकाळमध्ये केवळ एकांगी आणि ibn लोकमत वरचे चांगले असे तुला वाटते का ? ब्राह्मण समाजाला आरक्षण नको हा संमेलनातील मुद्दा मला पटला. मात्र सकाळ अग्रलेखातील मते मला पटली. ब्राह्मण हितालाच प्राधान्य द्यावे आणि आंतरजातीय विवाह करू नयेत हे ठराव आगरकरांसारख्या समाजसुधारकांच्या मताशी फारकत घेणारे आहेत.
  • Log in or register to post comments

जड पण चांगला

संदीप चित्रे
Fri, 01/30/2009 - 01:22 नवीन
लेख मनापासून लिहिला आहे ते खूप आवडलं. बाकी मास्तर आणि धनंजय यांनी योग्य सल्ला दिला आहेच. नाटक, संगीत, पुस्तके.... व्वा.. वेगवेगळ्या प्रकाराने अनुभव ज्ञान वाढतंय ते महत्वाचं :)
  • Log in or register to post comments

मी लेख

नीधप
Fri, 01/30/2009 - 13:48 नवीन
मी लेख पूर्ण वाचू शकले नाही. उपमा, अलंकारिक भाषा, रूपके यातून नक्की काय म्हणायचंय ते सापडेनासं झालं आणि मी प्रतिक्रियांवर आले. भडकमकर मास्तर आणि धनंजय यांच्या प्रतिक्रिया मात्र नीट वाचल्या आणि पटल्या. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

खरतर मी

सखाराम_गटणे™
Wed, 02/04/2009 - 13:48 नवीन
खरतर मी कधीकधी बहकतो या विषयावर कारण ४८ साली ब्राम्हणाना उकळत्या गुळाच्या पाकात टाकताना बघीतलेय तुम्ही वयाच्या मानाने खुपच तरुण दिसता, संतुर लावता का? दुसरी काय जडी बुटी असेल तर, मिपावर शेअर करा, प्लीज.
  • Log in or register to post comments

विरामचिन्हांचं महत्त्व...

भडकमकर मास्तर
Wed, 02/04/2009 - 17:10 नवीन
पूर्णविराम नसल्याने गोंधळ झाला बहुतेक... असे असावे वाक्य... .....बघीतलेय माझ्या पुर्वजानी . ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

अग आई ग !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/04/2009 - 17:36 नवीन
खरतर आज मी हा लेख लिहिणार नव्हतो दुसरा लेख तयारही होता एक अजुन लेख ? #:S |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

नमस्कार

विनायक पाचलग
Wed, 02/04/2009 - 21:04 नवीन
आपणा सर्वाना माझा सादर प्रणाम प्रथम आपणा सरर्वांचे मनापासुन आभार यासाठी की आपण या पामराचे लिखाण न कंटाळता वाचता आणि त्यावर प्रतिक्रिया देता. आता काही महत्वाचे १. महत्वाचे म्हणजे सदरचे नाटक हे प्रायोगीक होते त्यामुळे याची एकुण दहा प्रयोग होतील की नाही हहीदेखील शंक आहे आता म्हणाल तर हे कल्पनाविस्तारात्मक लिखाण आहे आणि उपमांचा वापर करायचे /व्हायचे कारण असे की हा लेख एका वेगळ्या ट्रांस मध्ये लिहिलेला आहे ्आ लेख लिहिताना मी शाम मनोहरांचे वाचन ऐकुन आलो होतो साहजीकच त्यामुळे वेगळ्या विश्वात होतो आणि आपणाला माहित आहे की माझी मुळ प्रव्रुती उपमात्मक लिखाणाची आहे त्यामुळे हे जरा अतीच लिखाण झाले यापुढे आपणाला असे लिखाण वाचावयास लागणार नाही याचा नकी प्रयत्न करेन. आणि शैली बरी म्हणाल तर माझी कोणतीच शैली नाही ना माझ्याकडे अनुभवांचे गाठोडे आहे की वाचनाची शिदोरी त्यामुळे मनाला येइल तसे व ते लिहितो(मनाच्या कुपितले म्हटले आहे ते त्याचसाठी) बाकी नकी प्रयत्न करेन पण मला सहानभुती दाखवल्याबद्दल आभार आणि महत्वाचे म्हणजे येथुन पुढे माझा कोणताही लेख मला न विचारता उडवायचा अगदी कोणत्याही कराणासाठी मी एक चकार शब्द विचारणार नाही. २.आणि गटणे म्हणाल तर चांगले आहे की हो दीवस दीवसभर गेम खेळेत पडण्यापेक्षा वा वाया जाण्यापेक्षा गटणे झालेले काय वाईट( ही बोलणे सत्य असुन माझ्या संगणकावर एकही गेम नाही) ३.बाकी IBN चा विषय येथे नको कधीतरी त्यानाही सविस्तर फाडीन ब्राह्मण्मु द्याबद्दल खरडीचा वापर करावा ही नम्र विनंती पुन्हा एकदा असा बंडल लेख लिहिल्याबद्दल जाहीर माफी आपला (साधासुधा लेखक) विनायक विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा