✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

होता का मानूस ?

प — पथिक, Fri, 09/23/2016 - 13:38
कोनी म्हन्ते मी मराठा कोनी म्हन्ते मी बामन कोनी म्हन्ते मी हिंदू त कोनी म्हन्ते का मी मुसलमान कोनाले काही व्हाचं आहे त कोनाले काही पन मानूस व्हाचं नाही आहे राजेहो कोनालेच मानूस व्हाले भेतात सगळे काहून का मानूस होनं म्हंजे सोपं काम नाही जाती धर्माच्या मांडीवर बिनधोक बसून दूध पिन्यासारखं मानूस होनं म्हंजे एका बाईची जोखीम घेऊन तरास सहन करून सोतालेच जनम देनं आहे. सांगा आता - होता का मानूस ?

प्रतिक्रिया द्या
1510 वाचन

💬 प्रतिसाद (8)

वा!

पैसा
Fri, 09/23/2016 - 17:54 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments

ज ब र्रा!!!! तुमाले

संदीप डांगे
Fri, 09/23/2016 - 20:24 नवीन
ज ब र्रा!!!! तुमाले आप्ल्याकून येक रोडगा पार्टी वारी हनुमानाले!
  • Log in or register to post comments

वा संदीपभाऊ ! वारी हनुमान अन

पथिक
Mon, 10/03/2016 - 16:43 नवीन
वा संदीपभाऊ ! वारी हनुमान अन रोडगे पार्टी आयकून भलकसं चांगलं वाटलं राजेहो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१

चाणक्य
Sat, 09/24/2016 - 09:06 नवीन
आवडली. विशेषतः शेवटच्या ओळी.
  • Log in or register to post comments

सहमत... छानच कविता...

प्रभास
Tue, 09/27/2016 - 19:12 नवीन
सहमत... छानच कविता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

मानूस होनं म्हंजे एका बाईची

यशोधरा
Sat, 09/24/2016 - 09:16 नवीन
मानूस होनं म्हंजे एका बाईची जोखीम घेऊन तरास सहन करून सोतालेच जनम देनं आहे.
क्या बात!
  • Log in or register to post comments

मार्मिक कविता. खूप आवडली

अंतरा आनंद
Sat, 09/24/2016 - 09:29 नवीन
मार्मिक कविता. खूप आवडली
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद ! हि या

पथिक
Mon, 10/03/2016 - 16:44 नवीन
सर्वांना धन्यवाद ! हि या कवितेची सुधारित आवृत्ती: कोनी म्हन्ते मी मराठा कोनी म्हन्ते मी बामन कोनी म्हन्ते मी हिंदू त कोनी म्हन्ते का मी मुसलमान कोनाले काई व्हाचं आहे त कोनाले काई पन मानूस व्हाचं नाही आहे राजेहो कोनालेच मानूस व्हाले भेतात सगळे ! काहून का मानूस होनं म्हंजे सोपं काम नाई जाती धर्माच्या मांडीवर बसून बोळ्यानं दूद पेन्यासारखं मानूस होनं म्हंजे एका बाईवानी जोखीम घेऊन तरास सहन करून सोतालेच जनम देनं आहे आपलंच रगत देऊन पोसनं आहे त मंग सांगा आता - होता का मानूस?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा