Skip to main content

पाकिस्तानचे हल्ले आणि मोदी पर्रीकर

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 20/09/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि आपले काही सैनिक मारले. सगळा देश यामुळे संतप्त आहे. पण याला जरासे वेगळे वळण लागलेले दिसत आहे. काही लोक आज मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना शिकवायला निघाले आहेत. मोदी संघाच्या मूशीतून घडलेले संन्यस्त वृत्तीचे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व आहे. मनोहर पर्रीकर हेही संघाच्याच संस्कारात घडलेले व्यक्तिमत्त्व आहे. ते गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. स्वतः अत्यंत बुद्धिमान आणि आय आय टी चे विद्यार्थी आहेत. तसेच संरक्षण मंत्री झाल्यावर अनेक दूरदर्शी निर्णय त्यांनी घेतले. त्यापूर्वी संरक्षण मंत्री असलेल्या अरुण जेटली यांनीही संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया आणून स्वावलंबनाची सुरुवात केलेलीच होती. (त्या पूर्वीच्या लोकांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेले होते) अजित डोवाल हेही अत्यंत अनुभवी आहेत. १५ ऑगस्टच्या भाषणात मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तान हा जागतिक राजकारणात आधीच एकटा पडला होता. त्यामुळे हे हल्ले नैराश्यापोटी होत आहेत हे उघड आहे. तो देश अंतर्गत अडचणीतही आहेच. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे आवश्यक होते. आपल्यावरचा राग भारताकडे वळवण्यात ते यशस्वी झालेत. पण हे काहीही लक्षात न घेता काही लोकांनी मोदी पर्रीकर यांनाच संरक्षण विषयात सोशल मेडियावर सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मेडियावर सल्ले देणे आणि देशाचा कारभार पाहणे यात फरक आहे. एखादा एखादा हल्ला होणारच. पण नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, अजित डोवाल हे जबरदस्त त्रिकूट आहे. ते निदान पाकिस्तानच्या बाबतीत नवा इतिहास रचल्याशिवाय राहणार नाहीत. ही खात्री प्रत्येक भारतीयाने बाळगायला हवी आणि उथळपणे मोदी पर्रीकर यांना सल्ले देणे थांबवावे. आम्ही निवडू ती वेळ आम्ही निवडू ते ठिकाण हे मनोहर पर्रीकर यांनी फार पूर्वीच सांगितलेले. त्याचा अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21656
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

In reply to by आजानुकर्ण

आणखी एक.... १७ जवान मेले म्हणून ठीक; एखादी गाय मेली असती ना; तर मग पाकिस्तानची काही खैर नव्हती !!

In reply to by नितिन थत्ते

वरील विधान आणि विडंबनचित्र मला वाटते सर्जिकल स्ट्राईक नंतर असंबद्ध (irrelevant) ठरले आहे असे वाटते. असो. आपल्या अशा प्रकारच्या आनंदावर मोदींनी विरझण लावल्याबद्दल.... जाउंदेत, स्वागतच करतो! ;)

In reply to by विकास

अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. नाहीतर तोपर्यंत 'कडी से कडी निंदाच' चालू होती. सोशल मीडियावर सगळा शिमगा सुरु झाल्यावर आता पाऊल उचलणे क्रमप्राप्तच होते. पण मोदींनी विरजण घातल्यानंतर का होईना पाकिस्तानचे नाक ठेचले जात असेल तर आनंदच आहे.

In reply to by आजानुकर्ण

अहो असा दट्ट्या दिल्यानंतरच हे स्ट्राईक झाले आहेत. वरील वाक्यावर आधारीत कल्पना (काल्पनिक) विस्तार करण्याचा मोह टाळता येत नाही, म्हणून करत आहे... :)
पठाणकोट आणि नंतर उरी येथे हल्ला झाल्यावर देखील पंतप्रधान मोदी आपले फारीनच्या ट्रिपा आणि मनकी बाते करत पाकीस्तानला मित्रो म्हणत बसले होते. बाकी आपले सन्माननीय गृह, संरक्षण, परराष्ट्र मंत्री देखील आलेला दिवस पुढे ढकलत आणि अजित देओल कदाचीत व्हिडीओ गेम खेळून युद्धच खेळत आहोत अशी समजूत करून निवांत बसले होते. सगळ्यांनी विचार केला. काय करायचे आहे आपल्याला? आपला देश शांतताप्रिय आहेच. गेले कित्येक वर्षांची अशा हल्यांनंतर काही न करण्याची सवय देखील सरकार आणि जनतेला आहे. आणि त्यात गैर तरी काय? पाकीस्तानी झाले म्हणून काय झाले? ते देखील आपले बांधवच तर आहेत! त्यामुळे आता नऊ दिवस-रात्र उपास करायचा असला तरी नवरात्र आणि दिवाळीच्या तयारीला लागलेले उत्तम असे या सगळ्यांना वाटत होते. पण तेव्हढ्यात समाजमाध्यम म्हणून एक मोठ्ठी माशी शिंकली! अशाच ट्वीट करत असताना मोदींच्या लक्षात आले की पब्लीक चिडले आहे. सुषमा स्वराज यांना कोणी पासपोर्ट-विसा साठी विचारण्याऐवजी उरी वरून भारत-पाक संबंधांवरूनच विचारू लागले. तेव्हढ्यात (मराठी येत असल्याने) पर्रीकरांनी मिसळपावचा हा धागा उघडला आणि कय म्हणता महाराजा? जनतेचा रोष पाहून एकदम घाबरूनच गेले की राव! मग शेवटी २९ च्या दुपारी बारा वाजता सर्वजण आपापले डबे घेऊन जेवायला बसले. जेवताना गप्पा मारत असताना लक्षात आले की प्रत्येकजणालाच जनतेचा दट्ट्या दिसत/लागत आहे... म्हणून मग काहीतरी केलेच पाहीजे. म्हणून मग मोदी-पर्रीकरांनी सैन्याला सांगितले की जारे जरा सीमेपलीकडे जाऊन या... मग सैनिकांनी पण हातातला पत्त्यांचा डाव टाकला आणि गेले सीमेच्या पलीकडे. बाकी जे काही झाले ते आता पाकव्याप्त काश्मिरच्या भुगोलाचा आता एक इतिहास आहे! :)
खरच इतके सोपे होते का?

In reply to by विकास

अगदी अगदी!! ह्यांनी दट्टे लावले की रात्रीतुन बसुन प्लान करुन ही कारवाई केली असल्या खुळ्या कल्पना आहेत की काय लोकांच्या.. टीका करा, पण जे चांगलं केलंय ते मान्य करायचा मोठेपणाही दाखवा की..

In reply to by विकास

“The condition upon which God hath given liberty to man is eternal vigilance.” सरकारवर सतत दडपण आणणे स्वातंत्र्य प्रेमी नागरिकांचे मुख्य कर्तव्य आहेत. मोदी-भक्ती हा त्याला पर्याय नाही. मोदींच्या पाकिस्तान विषयक निर्णयाने सर्वच सुजाण नागरिकांना आनंद झाला आहे. अश्याच प्रकारे इतर विषयांवर (शैक्षणिक गळचेपी, मंदिरांच्या संपत्तीवरील सरकारी नियंत्रण, इत्यादी इत्यादी) आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे.

In reply to by साहना

आम्हा नागरिकांनी दडपण आणले तर मोदीना सुबुद्धी प्राप्त होईल हीच अशा आहे. काय म्हणताय? आरक्षण रद्द होणार? ऍट्रॉसिटी चा कायदा रद्द होणार?काही कोटींचा/ लाखांचा जमाव एकत्र होतोय म्हणून. अर्थात रस्त्यावरच्या माणसाला कोण विचारतोय? तो दबाव काहीच नाही. पण व्हॉट्स अँप ट्विटर आणि फेसबुकवरच्या दबावापुढे हा दबाव म्हणजे किस झाड कि पत्ती. कारण तो सुशिक्षित मानवतावादी सेक्युलर लोकांचा दबाव होता म्हणजे त्याचे वजन कितीतरी जास्त होते. म्हणूनच मोदी साहेबानी लष्कराला सीमापार जायचा हुकूम दिला हो कि नाही साहना ताई?

रेडिफ डॉट कॉम या सन्केत स्थलावर आलेल भद्रकुमार यान्चा आलेला ब्लॉग सन्तप्त भारतीयानी जरुर वाचावा. त्यात त्यानी अमेरीकेचे याबाबतीत काय म्हणणे आहे हे समजावून सान्गितले आहे. भद्रकुमार हे भारताचे वकील म्हणुन २९ वर्षे कार्यरत होते. पाकिस्तानला नमवण्यासाठि अनेक मार्ग आहेत त्यातली एक म्हणजे सर्व भारतीयानी सक्शम राहून आपापली कामे केली पाहिजेत व नियम पाळून राहिले पाहिजे दुसरा मार्ग म्हणजे भारताने पाकिस्तान्ला दिलेला एमएफएन स्टेटस काढून घेतला पाहिजे. तसेच भारतीय लष्कराने पण आपण काय करत आहोत व केले आहे याचा आढावा घेतला पाहिजे.

मोदींनी इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना नुसतं सांगितलं जरी - की पाकिस्तानवर हल्ला केल्यावर ATKT माफ होईल, तर आपले विद्यार्थी जाऊन पाकिस्तानला आग लावून येतील. हाकानाका!

.

(अ) "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात (आ) काही किलोमीटर आतवर घुसून (इ) त्याला पत्ता न लागू देता (ई) त्याचा पत्ता काटून (उ) भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतते... आणि (ऊ) दुसर्‍या दिवशी आपला DGMO फोन करून पाकिस्तानच्या DGMO ला त्या ऑपरेशनची माहिती ठणकावून देतो.

अश्या कृतीचा अर्थ समजावून द्यायला लागतो अश्या व्यक्तीला तो अर्थ समजावून देणे निरर्थक असते... कारण... (अ) त्या व्यक्तीच्या तर्कशक्तीत मूल कमतरता असते आणि/किंवा (आ) तर्क समजाऊन घेणे त्या व्यक्तीला सोईचे नसल्याने ती "झोपेचे सोंग" घेऊन आहे ! :) ******************************************* "आम्ही आणि इतर कोणी दट्ट्या दिला म्हणून केवळ पाच-सात दिवसांच्या कालावधीत ही कृती भारतिय सैन्याने केली" असा दावा करणार्‍यांचे मी अभिनंदन करतो ! कारण... अ) ते एका अर्थाने भारतिय सैन्याच्या कर्तबगारीचे कौतूक व समर्थनच करत आहेत. "हायेस्ट स्टेट ऑफ अ‍ॅलर्ट" वर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात काही किलोमीटर आतवर घुसून त्याला पत्ता न लागू देता त्याचा पत्ता काटून भारतिय सैन्य एकही सैनिक न गमावता परतले. इतक्या कमी वेळात, इतक्या कमी संख्येने असलेले, भारतिय सैनिक इतकी प्रभावी कृती करू शकतात तर मग पुरेसा वेळ दिल्यावर पुरेश्या संख्येने असलेले भारतिय सैनिक शत्रूची काय अवस्था करू शकतील, याची कल्पना करायला फार जास्त कल्पनाशक्तीची जरूर नाही ! :) ;) त्याबरोबरच... आ) असा दावा करणारे लोक "पूर्वीच्या सर्व छटांच्या सर्व भारतिय सरकारांमध्ये धमक व राजकिय इच्छाशक्ती यांचा अभाव होता आणि आताच्या सरकारमध्ये नाही" हे कळत-नकळत कबूल करत आहेत. कारण...

भूतकालात आणि आजही भारतिय सैन्य तेच होते/आहे, फक्त यावेळेस सरकार वेगळे आहे... हाच एक फरक आहे, नाही का ? :)


In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काका अश्याक्षणी पक्षीय बलाबल तपासून पाहणे हे महामूर्ख भक्त अन घराणेशाहीचे पाईक असलेले मूर्ख दोघेही करतात, अश्या जिंगोइस्टिक भरती ओहोटीच्या चक्रात फसण्याची माझी तरी इच्छा नाही, आता सरकारची भूमिका ह्यावर दोन शब्द बोलतो, सरकारने दाखवलेली हिंमत अतुलनीय जबरदस्त आहे, पण त्यात त्यांचा वैयक्तिक भविष्यकालीन लाभ सुद्धा आहे, अर्थात १००% तो लाभ डोक्यात ठेऊनच निर्णय घेतला गेलाय हे म्हणणे सरकारवर अन पर्यायाने मोदींवर अन्यायकारक असेल, ही लाईन जो कोणी धरतोय तो गुर्जीम्हणतात तसा निधर्मांध वगैरे असण्याची दाट शक्यता आहेच, हा निर्णय घेण्यामागे एक प्रेरणा म्हणजे सरकार ने निवडणूक पूर्व काळात केलेली आश्वासने आहेत, ही आश्वासने म्हणजे अगदी मोगाची लाडकी 15 लाखांची मागणी वगैरेचा समजण्याइतका मी तरी हलका नाही ह्याची ग्वाही देतो(च) शिवाय निवडणूक जाहीरनाम्यात एक बोलुन त्याच दिशेला काहीच न करणे इतपत कोडगे हे सरकार नाहीये, अशी पावती ही कारवाई देते असेही मी मानतो, कदाचित हे ऑपरेशन म्हणजे लोकेच्छेचा मान ठेवायचा एक नवा लोकतांत्रिक मापदंड असू शकतो, सामरिक दृष्ट्या मी कायम एक गोष्ट म्हणतो, वित्त अन उद्योगनिती काँग्रेसी (थोडक्यात राव सिंग परिमाणांनुसार) असावी अन परराष्ट्रनीती ही भाजपाची (अटलजी, लुक ईस्ट, आधी बस नंतर करगिलात दिलेला हाग्यामार) असावी. आता सरकारने काय केले आहे ते थोडे विश्लेषण करायचा मोह आवरत नाहीये, सरकारी पातळीवरून कुठेच "आमच्या आधीच्या सरकारने बघा अन आम्ही बघा" अश्या प्रकारचा मिश्याना तूप चोळायचा प्रकार झालेला नाहीये, सरकार ने तो केलेला नाहीये, तर लोकशाहीच्या उदात्त तत्वांना अनुसरून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष सगळ्यांना विश्वासात घेऊन ही कारवाई केलेली आहे, ह्या बद्दल सगळ्याच समर्थनार्थ उतरलेल्या राजकीय पक्षाचे माफक अन सत्ताधारी भाजप सरकारचे विशेष अभिनंदन करायला हवे आहे. कोणाला त्यांचा राजकीय अजेंडा जर विरोधी पक्षांचे "माफक" अभिनंदन करू देत नसेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू देत, पण अजेंड्यावर भारत हीच पहिली प्रायॉरिटी ठेवलेली माझ्यासारखी माणसे मात्र, ह्या बाबतीत सगळ्याच निर्णयकर्त्या सत्ताधाऱ्यांचे "विशेष" अन त्यांना सपोर्ट करणाऱ्या विरोधकांचे "माफक" कौतुक नक्की करेल असे क्लोजींग स्टेटमेंट. (केलेल्या कारवाई बद्दल विरोधीपक्ष नेत्या सोनिया गांधी ह्यांनी माननीय पंतप्रधानांचे अभिनंदन करून त्यांना पाठिंबा असल्याचे बोलले आहे असे ऐकून आहोत, कोणी बातमी अटेस्ट करू शकल्यास उपकृत राहीन). थोडक्यात काय ह्या सरकारचा उजळ माथा फोकस करायला आधीच्या सरकारचे भुंडके कपाळ फोकस करायची गरज नाही/नसावी, धिस इज नॉट अ फेर अँड लव्हली ऍड, धिस परटेन्स टू रन या कंट्री, अँड आय एम हॅपी दॅट द गव्हर्नमेंट हॅज डिस्प्लेड अल्टिमेट मॅच्युरिटी इन दॅट रिस्पेक्ट. काँग्रेस ने एक बारकी रेघ ओढली होती, भाजप ने त्या रेघेला धक्काही लावला नाही, पुसलीही नाही, तिच्या लांबीवर सुद्धा टिप्पणी केलेली नाही, तर ही कारवाई करून तिच्या शेजारीच एक ठसठशीत ठळक अशी जास्त लांब रेघ ओढली आहे असे ह्या निमित्ताने नोंदवतो जय हिंद _____/\_____ बाकी भक्त मंडळीचा च्यु*पा अन विरोधकांची मानसिक झ**व ह्या गटारात उतरायची अजिबात इच्छा नाही असे स्पष्ट करतो आधीच

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आपण खूप लिहीलंत पण त्यात आशय काहीच नव्हता असं म्हणावे लागेल.
काका अश्याक्षणी पक्षीय बलाबल तपासून पाहणे हे महामूर्ख भक्त अन घराणेशाहीचे पाईक असलेले मूर्ख दोघेही करतात,
आपण एकटे निष्पक्ष हा दंभ कशासाठी

In reply to by नर्मदेतला गोटा

मी एकटा असा शब्दप्रयोग दाखवून द्या पूर्ण कॉमेंट मध्ये, उगाच जे मी बोललेलो नाही ते माझ्या तोंडी बसवू नका, निष्पक्ष बरेच आहेत/असतात त्यात काही चूक आहे असेही नसते, चष्मे काढा कळेल :)

In reply to by नर्मदेतला गोटा

असतं हो एकेकाचं, आम्ही रोजच कसरत करतो, अन मुख्य म्हणजे त्यात काही फार उदात्त आहे असेही आम्ही समजत नाही, फक्त बोलायला काही नसले की लोक कसे वैयक्तिक होऊन जातात, हे मात्र पाहायला जाम मजा येते. असो!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बोलायला बरंच काही आहे हो, पण योग्य जागा कोणी देत नाही आहे इथे मिपावर हा मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे... क्या समझे?? ;)

पाकी हल्ले पूर्वीही होत होते. मोदींच्या काळात पठाणकोटसारखे हल्लेही झालेच. पण काहीतरी ठाम उत्तर द्यायला सुरुवात झाली आहे. असे भारतीय लष्कराच्या आत्ताच्या प्रत्युत्तरावरून वाटते. फक्त आपल्यालाच या देशाची चिंता आहे अशा आविर्भातून मोदी पर्रीकरांना सल्ले देणार्‍यांना एवढेच सांगणे आहे.

In reply to by नर्मदेतला गोटा

असो, मोदी अन पर्रीकर हे त्राता भाग्यविधाता वगैरे आहेत असे मानणाऱ्या जनतेला सुद्धा सल्ले देऊनही उपयोग बसतो, म्हणून आमचा पास(च), ज्या गोष्टीसाठी मोदींना/पर्रिकरांना जितके कौतुक दिले गेले पाहिजे तितके दिले गेलेच पाहिजे, बाकी मनुष्याचा देव करणे आम्हाला तरी मान्य नाही, देव केलाच तर जनतेने गांधी-नेहरूंस देव करून झालेला गोंधळ विसरला आहे, असेच म्हणावे लागेल मला तरी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हो पण नाही म्हणजे हो म्हणजे नाही म्हणजे अगदी १००% नाही पण म्हणजे थोडे तरी हो इतकी कसरत का करताय

In reply to by नर्मदेतला गोटा

कसरत रोजच करायला लागते, तुम्हाला ती महत्वाची वाटत नसल्यास एक दिवस कार्यालयात जाताना गाडीचा तोल सांभाळायची कसरत करणे सोडून बघा! एका बाजूला झुकायचे सुंदर परिणाम दिसतील. बाकी ते दंभ वगैरे ऍड होमिनेम फाट्यावर :)