पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी! चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो.
हा चिरल्यावर आतून असा दिसतो.
साहित्यः
एक मध्यम आकाराचा चिबूड, पाव लिटर दुधाचे घट्ट दही, पाच सहा ओल्या मिरच्या, मीठ, चार पाच चमचे साखर, दोन चमचे तूप, हिंग , जीरे.
कृती:
बाहेरची साल पूर्ण पिवळी झालेला चिबूड घ्यावा. बिया आणि साल काढून फोडी करून घ्याव्या. दह्यात मीठ, साखर घालून सारखे करावे. तूप गरम करून जीरे, मिरची तुकडे, हिंग घालून फोडणी करावी. जेवायला बसताना आयत्यावेळी सगळे एकत्र करावे. चिबडाच्या फोडीत मीठ, साखर घातल्यास पाणी सुटते, म्हणून आयत्यावेळी सारखी करावी.
याला एक प्रकारचा वास असतो, काहींना तो आवडत नाही. पण ज्यांना आवडतो ते वाट बघत असतात, कधी मिळतोय चिबूड याची! या कोशिंबीरीला साखरेची पुढे चव चांगली वाटते. फोडणी नको असेल तर मिरच्या वाटून घालाव्या.

वाचने
21394
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी अशीच डांगराची कोशिंबीर
मस्त दिसतेय. आमच्या इथे असच
वाळकं हे नसावं ते राउंड
In reply to मस्त दिसतेय. आमच्या इथे असच by त्रिवेणी
चिबुड.. खुप आवडतो. मस्त आहे
मससससससस्त! लै दिसानी
+१
In reply to मससससससस्त! लै दिसानी by अत्रुप्त आत्मा
मस्स्त!
आमच्याकडे साखर लावूनच संपतो
सेम.
In reply to आमच्याकडे साखर लावूनच संपतो by सूड
भीषण लागतं चिबूड!
+१
In reply to भीषण लागतं चिबूड! by आदूबाळ
तुमच्याच अर्थाने भीषण म्हणत
In reply to +१ by दिपक.कुवेत
चिबुड
चिबडाचं इंग्लिश नाव माहित आहे का?
चिबडाचं इंग्लिश नाव
In reply to चिबडाचं इंग्लिश नाव माहित आहे का? by अनन्न्या
नाही
In reply to चिबडाचं इंग्लिश नाव by Nitin Palkar
हो मलाही हेच अर्थ मिळाले
In reply to नाही by स्वच्छंदी_मनोज
मस्क मेलन म्हणजे खरबुज. आतून
In reply to चिबडाचं इंग्लिश नाव by Nitin Palkar
बहुतेक बटरनट स्क्वॅश
In reply to मस्क मेलन म्हणजे खरबुज. आतून by अभ्या..
नाही नाही.. स्क्वॅश म्हणजे
In reply to बहुतेक बटरनट स्क्वॅश by कैलासवासी सोन्याबापु
खरबूज (Cantaloupe, मेलन
In reply to नाही नाही.. स्क्वॅश म्हणजे by विशाखा राऊत
छान माहिती
In reply to खरबूज (Cantaloupe, मेलन by डॉ सुहास म्हात्रे
बाय द वे, या वेळचे फोटो कोणी
मीच काढलेत.
In reply to बाय द वे, या वेळचे फोटो कोणी by सूड
चिबुड पहिल्यांदाच पाहिला.
चिबुड आतापर्यंत पूर्ण पिकलेला
मस्तच
फोटो,पाकृती दोन्हीही चांगले
आमच्या कडे याच चिबुडाचा शिकरण
ग्रेट ग्रेट ग्रेट!
चिबूड कध्हेच ऐकलं/ पाहिलं
चिबुड पहिल्यांदाच बघतेय.
मी पण चिबूड पहिल्यांदाच ऐकलं
कोकणात असताना आणत असे
हो काही गोष्टी त्या भागातच मिळतात!
हे मी पहिल्यान्दाच ऐअकलय
स्लर्प
मस्त!
हे रसायन नाही ऐकलय!
केळ्याचे करतात
In reply to हे रसायन नाही ऐकलय! by अनन्न्या
चिबुड.. खुप आवडतो.
मस्त वाटतेय पाकृ.
अरे वा रसायन पण कळलं!!
चिभडे लहान असतात.
कोकणात तरी याला चिबूड म्हणतात
कोशिंबीर व रसायन
मस्त रेसीपी. करून पहायला हवी.
चिबूड़ास सन्मान मिळाला. बरे वाटले.
चिबूड म्हणजे खरबूज ना?
नाही खरबूज वेगळे
मी ऐकलेली आख्यायिका म्हणजे
आज मी होल व्हीट पॅन केक अँड
मला खरबूज खाल्ले की डायरेक्ट