Skip to main content

चिबडाची दह्यातली कोशिंबिर

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 23/09/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी! चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो. chibud हा चिरल्यावर आतून असा दिसतो. chibud साहित्यः एक मध्यम आकाराचा चिबूड, पाव लिटर दुधाचे घट्ट दही, पाच सहा ओल्या मिरच्या, मीठ, चार पाच चमचे साखर, दोन चमचे तूप, हिंग , जीरे. chibud कृती: बाहेरची साल पूर्ण पिवळी झालेला चिबूड घ्यावा. बिया आणि साल काढून फोडी करून घ्याव्या. दह्यात मीठ, साखर घालून सारखे करावे. तूप गरम करून जीरे, मिरची तुकडे, हिंग घालून फोडणी करावी. जेवायला बसताना आयत्यावेळी सगळे एकत्र करावे. चिबडाच्या फोडीत मीठ, साखर घातल्यास पाणी सुटते, म्हणून आयत्यावेळी सारखी करावी. याला एक प्रकारचा वास असतो, काहींना तो आवडत नाही. पण ज्यांना आवडतो ते वाट बघत असतात, कधी मिळतोय चिबूड याची! या कोशिंबीरीला साखरेची पुढे चव चांगली वाटते. फोडणी नको असेल तर मिरच्या वाटून घालाव्या. chibud

वाचने 21428
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

In reply to by त्रिवेणी

वाळकं हे नसावं ते राउंड छोट्या काकड्या टैप असते , ह्याला बहुधा शेंदाड म्हनतात.

मससससससस्त! लै दिसानी पहाण्यात आली . @चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो.››› हो.. तसाच खाल्लाय बय्राचदा.

In reply to by आदूबाळ

"भीषण" पण वेगळ्या अर्थाने...चिबूड कुठल्याही स्वरुपात आवडत नाहि. पोळिबरोबर तर हि कोशिंबीर डोक्यात जाते.

In reply to by Nitin Palkar

मस्क मेलोन वेगळे. फॅमीली/कुळ मेलोनचेच पण ह्याला बहुतेक मॅश मेलोन किंवा चिबुड मेलोन असे म्हणतात.
>>> अनन्यातै हे मात्र खरे. ज्याना आवडतो त्याना भयंकर आवडतो आणी नाही त्यांना वासही सहन होत नाही. मि पहील्या कॅटेगरीतला :) :)

In reply to by Nitin Palkar

मस्क मेलन म्हणजे खरबुज. आतून अबोलीच्या रंगाचे असते ते. वरुन पांडरेटेक्शर्ड

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नाही नाही.. स्क्वॅश म्हणजे भोपळा. बटरनट स्क्वॅश हा भोपळा कॅटिगरीमध्ये आहे.

In reply to by विशाखा राऊत

खरबूज (Cantaloupe, मेलन प्रजातीतील एक फळ)...  आणि बटरनट स्क्वॅश (भोपळा प्रजातीतील एक फळभाजी)...

बाय द वे, या वेळचे फोटो कोणी काढलेत? फार सजावट नसल्याने, साहित्य आणि तयार पदार्थ अधोरेखित होऊन सुंदर दिसतंय.

In reply to by सूड

मायक्रोमॅक्स ए १०७ या माझ्या मोबाईलने. सगळे फोटो मोबाईल कॅमेय्रानेच काढते मी! थँक्स!!!!!

चिबुड आतापर्यंत पूर्ण पिकलेला असल्यास तसाच किंवा फारतर मीठ कावून खाल्ला आहे. हा नवीन प्रकार करून बघायला हवा.

आमच्या कडे याच चिबुडाचा शिकरण टाईप पदार्थ पण केला जातो. चिबुड कापून त्यच्या फोडी कोमट किंवा गार दुधात मिक्स करायच्या. त्यात साखर आणि भरपूर ओलं खोबरं घालून तो खायचा. चिबुड कापला कि लगेच संपवावा लागतो. नाहीतर कडवट चव होते त्याची.

म्हणूनच साधी पाकृ असूनही मी चिबडाच्या फोटोसहित दिलीय. मी लहानपणापासून बघतेय मला हा कोणाला माहित नसेल असं वाटतच नव्हतं.

ह्याचं रसायन पण मस्त होतं. दुपारवेळी वाटीभर रसायन म्हणजे झोप आलीच समजा. रेसिपी इथेच देते. पाकृ करताना फोटो काढायचा पेशन्स नसल्याने ही पाकृ इथेच देते. चिबडाची सालं काढून अगदी पातळ फोडी करुन घ्यायच्या आणि त्याला गुळ लावायचा. मग पाणी सुटु लागत. तोवर खोबर््याचा रस आणि वेलची पूड करुन घ्यायची आणि त्यात घालायची. आणि एकजीव करुन घ्यायचं. रसायन तयार.

In reply to by अनन्न्या

केळ्याचे आंब्याचे, फणसाचे कसली कसली करतात. थोडक्यात नारळाच्या दुधात शिकरण केल्यासारखे.

असे वाटते. आई म्हणते हे सेंदाड आहे. :( पण पाककृती भारी. चिभूड आणून ट्राय करायला हरकत नाही. धन्स. -दिलीप बिरुटे

कोशिंबीर माहीत आहेच रसायन नव्याने समजले करावे लागेल. यातील कोशिंबिरीचा अजुन एक प्रकार सांगतो ,अशीच कोशिंबीर करुन त्यात थोडी मोहरी पावडर फेसुन टाकायची . चिबडाचा स्वताचा स्वाद आणि मोहरीचा झणझणित पणा वेगळीच लज्जत आणतो . कोकणातल्या ग्रामिण भाषेत याला चिबडी म्हणतात.

मस्त रेसीपी. करून पहायला हवी. आम्ही ह्याला "शिबूड" म्हणतो व नेहमी असंच किंवा वरून साखर/मध टाकून खातो.

नाहीतर अगदीच अनुल्लेखाने मारण्यातले फळ हे. साखरेची पुढे चव चांगली वाटते......हे मस्त. आमच्याकडे हेच वाक्य “साखर थोSSSड़ी अधिक करायची “ असं म्हणायची श्टाईल आहे.

मी परवा गोव्याला गेले होते, तिथे नाश्त्याला खरबुजाचे तुकडे होते, पण तीथली मुलगी म्हणाली. चिबूड. पण हे वेगळं दिसतंय आकाराला

मी ऐकलेली आख्यायिका म्हणजे खरखरीत सालीचे म्हणजे खरबूज आणि गुळगुळीत सालीचे ते चिबूड. बाकी चिबूडच्या तुकड्यात थोडी साखर मीठ आणि सैंधव घालून फार छान लागते. चिबुडचा रस पण उत्तम लागतो. त्यात फ्रिज मधील घट्ट फुल क्रीम दूध आणि साखर घालून "मस्क मेलन स्मूथी" छान लागते. असं इंग्रजी शब्द वापरले कि आपणही अद्ययावत आणि अत्याधुनिक ( सॉफीस्टिकेटेड ) झाल्यासारखे वाटते.

आज मी होल व्हीट पॅन केक अँड बनाना स्मूथी खाल्ले ( म्हणजे शिकरण पोळी) म्हटले कि कसे सॉफीस्टिकेटेड झाल्यासारखे वाटते.