कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
लेखनविषय:
काव्यरस
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..
ओळखीचं हसून बोलायला हवं..
किती ती धूळ गैरसमजांची,
मनाला स्वच्छ झाडायला हवं..
कुठंतरी आत सलतंय का काही?
समजूतीचं मलम तिथं लावायला हवं..
जे झालं ते झालं, ते होणारच होतं
अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं..
पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय
आनंदानं जीवन आता जगायला हवं..
अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं
एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..
वाचने
4367
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
साधी पण छान आहे
बर्याच खपल्या काढणारी कविता.
आवडली!
This is like day dreaming.
साधी, सुंदर..
सोप्या ओळी, सुंदर अर्थ.
सुरेख कविता
In reply to सुरेख कविता by पैसा
............
In reply to ............ by शिव कन्या
त्यातलं हे कडवं तर अगदी जीव घेणं
खुपच छान झालीय कविता.....
कविता आवडली.
छान कविता.
In reply to छान कविता. by सस्नेह
बाडिस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
छान आहे.
आवडली...
जुन्या जखमा वर आणणारी कविता.
सर्वाना धन्यवाद.