आज खूप दिवसांनी "रंजीश-ही सही " ही मेहंदी हसन साहेबांची अजरामर गज़ल ऐकायचा योग आला . "गज़ल" .. खरं तर हा असा गायन प्रकार आहे की हा न आवडणारा प्राणी विरळाच सापडेल . मग ती जगजीत ची "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो " असो किंवा अगदी अलिकडची हरिहरन ची "मरीज-ए- इश्क " असो . गज़ल हा प्रकारच गारुड करणारा आहे . तर अश्या अनेक गझलांपैकी एक अत्यंत आवडणारी गज़ल म्हणजे अहमद फराज साहेबांची "रंजीश ही सही ".
अहमद फराझ यांच्या तशा खूपश्या गज़ल , रचना अत्यंत सुरेख आहेत. पण अत्यंत लोकप्रिय अशी म्हणावी ती ही गज़ल. ओघवतं काव्य अत्यंत सोपी सुरेख मांडणी , समजायला सोपं आणि एक "कशीश” असलेलं लेखन म्हणजे अहमद फराज.
मग ते
“हो गई रुखसत घटा बारीश के बाद ,
ईक दिया जलता रहा बारीश के बाद !!”
असेल किंवा
“अभी तो ईश्क़ मे ऐसा भी हाल होना है ,
के अश्क़ रोकना तुम से मोहाल होना है !!” असेल .
आपण म्हणतो ना काटा रुतलेला दिसत नाही पण बोच कायम राहते. फराजजींच्या लेखनातली ही खुबी मला फार आवडते. “रंजिश-ही-सही” ही तशातीलच एक रचना.
बांधणी राग यमन अन सोपा पण डौलदार ताल दादरा मध्ये केलेली. आणि मेहदी हसन साब , रुना लैला , फरीदा खानम , इक्बाल बानो यांनी अजरामर केलेली रचना.
ही गझल म्हणजे एका प्रियकरानी केलेली प्रेयसीची हट्टी विनंती ... जितकी गोड तितकीच बोचणारी . पण गम्मत अशीये की फराज साहेबांनी प्रेमी युगुला मधला “ईगो” इतका खुबीने पकडलाय की ऐकतांना मजा येते . म्हणजे “तुझ्या वाचून जमेना “ हे तर मान्य आहे पण जाहीर ही करायचं नाहीये.
या गझल मधले काही शेर मला फार आवडतात. ( हे खरं तर नूतन का मधुबाला ? या प्रश्नाच्या उत्तराईतके अवघड आहे , शेर सगळेच एक से एक मोती आहेत पण तरी काही वरचढ ठरतात )
अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ रंजिश ही सही...आहाहाहा ... बघा ना ... अजून ही “दिल-ए-खुशफेहेम” तुझ्या कडूनच आस लावून बसलंय ... अजून ही तू दिलातच आहेस. विसरलेलो नाहीये मी तुला. (तुला ही माझी आग , माझी तडप दिसतच नाही का ?) फक्त एकदा ये ... ही शेवटची धग विझवायला, शेवटची आशा संपवायला का होईना ... पण ये ... बास्स ईतकीच अपेक्षा ... बाकी काही नको !! पुढे प्रियकर म्हणतो
माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ रंजिश ही सही...मला माहीत आहे ... तुही मला अजून विसरू शकलेली नाहीयेस ... पण तू ही माझ्यासारखीच हट्टीयेस !! प्रेम जरी भावनेतून व्यक्त होत असलं , शब्दांनी व्यक्त करायची गरज नसली ... तरी मला भेटायला म्हणून का होईना ये ... मला हे तुझ्याकडूनच ऐकायचय ... कधी तरी ये आणि हे माझ्याशी असलेलं ईश्क़ “जता मुझसे “”!! क्या बात .... आग बराबर की लगी है ... आधी ईधर भी आधी उधर भी ... धुआं बराबर उठा है .. थोडा ईधर भी थोडा उधर भी ... आणि या रचनेचा Epitome … म्हणजे
किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ ...भले जियो .... तुही हट्टी आहेस ... मी सुद्धा “झिद” सोडणारा नाही ... दोघेही दूर आहोत ... पण “जमाना” सारखा तुझ्याबद्दल मला विचारतो ... (तुला ही विचारत असेलच माझ्याबद्दल हे ही मला माहित आहे ) .... “जुदाई का सबब” तरी काय सांगू प्रत्येकाला ? त्यापेक्षा तूच एकदा ये ... मान्यय की तू “खफा” आहेस ... पण या “जमान्या” ची तोंडं बंद करण्यासाठी का होईना .... तू ये .. येशील न ? क्या बात है !! किती सुंदर आणि सोपी रचना ? पण किती व्याकुळ करणारी भावना ? आणि त्याच वेळेला खट्याळपणा सुद्धा भरून राहिलाय या गझल मध्ये .. वा !! या गझले बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट पण ऐकिवात आहे (खरी खोटी माहित नाही). पण ही कळण्या आधी मी ही गझल कायम “प्रियकर-प्रेयसी” मधील “तकरार” म्हणूनच ऐकत आलो. पण अस ही ऐकलं, की मधील काही “वख्त” फराजजींच्या आयुष्यात असा आला की जणू “लव्ज खफा हो गये !!” . कल्पनाच करवत नाही की अश्या ताकदीच्या माणसाची प्रतिभा आटली . अन मग असं म्हणतात, की या तडप अन कशीश मधून व्यक्त झाली ती None Other Than “रंजिश-ही-सही” ही रचना. हा किस्सा कळल्या नंतर मी ही गझल परत ऐकून पहिली . आणि कळलं की खरच की .. या रचनेत प्रेयसी ऐवजी “गझल” सुद्धा तितकीच परिणामकारक प्रेयसी ठरते. काही असो , ही रचना म्हणजे खरच गझलप्रकारा मधील रचनांचा “सुवर्ण”योग ठरवा अशीच आहे !! या गझलेने नि:संशय अनेक मेहफिली , अनेक Gatherings , अनेक एकट्या रात्री आणि सतत भरले जाणारे पेले व्यापले असतील . अनेक गायक जसे मेहदी हसनजी , गुलाम अलीजी , इक्बाल बानो , फरीदा खानम यांनी ही गझल सादर अन लोकप्रिय केली. पण त्यात सगळ्यात जास्त आवडलेली वर्जन खाली लिंक मध्ये डकवत आहे. आणि त्यांची सौंदर्यस्थळे पण नमूद करतोय ... नक्की आनंद लुटा ... https://www.youtube.com/watch?v=wRG2XJcmhDc या वर्जन मध्ये “तबला” हा Not to Miss पार्ट आहे. गझल जितकी सुरेख गायलीये तितक्याच ताकदीचा तबला. क्या बात है. https://www.youtube.com/watch?v=Jra_myoiskE या वर्जन मध्ये हसन साहेबांनी गझलेची सौंदर्य स्थळे , यमन आणि यमन कल्याण या बाबत केलेलं विवेचन केवळ शब्दातीत ... https://www.youtube.com/watch?v=SfjFzNk7QPQ हे वर्जन माझं अत्यंत आवडत आहे. हे गायलंय “इक्बाल बानो” यांनी आणि याची विशेषता अशी की या गाण्यात त्यानी मूळ सांगीतिक-रचनेचा पूर्ण “ढंग”च बदलून टाकलाय. ९९% ठिकाणी ही रचना “यमन” (काही ठिकाणी “यमन कल्याण”) मध्ये गायली जाते/गेलीये. पण येथे .. “देस” मध्ये अनपेक्षित प्रेझेन्टेशन अत्यंत सुखद धक्का देतं. आणि देस हा राग तसा “आळवणी”पूर्ण राग असल्याने गझल रचनेची पूर्ण ढबच या वर्जन मध्ये बदलून गेलीये . https://www.youtube.com/watch?v=ZxSde6et0_U हे अत्यंत अलीकडचे वर्जन. गायक माझ्या आवडीच्या गायकांपैकी एक. याच्या आवाजात काही गाणी ऐकणे हीच एक मेजवानी आहे. गायक आहे पपोन (अंगराग महंता ) . सिम्पली ऑफ बीट आणि अफलातून “एम-टीवी” अन्प्लगड वर्जन !! तर आता मी घेतो आपली रजा .... या रचनेशी जोडलेल्या खूप साऱ्या आठवणी , खूप सारे किस्से आणि रविवार रात्र माझी वाट पाहतेय ... !!
इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरया से भी महरूम ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ रंजिश ही सही...आपलाच – ज्याक ऑफ ऑल ...
वाचने
4517
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय आवडती गजल.
शतशः धन्यवाद!
लेख आणि साहनाजींचा प्रतिसाद
In reply to शतशः धन्यवाद! by साहना
वाह .. कमेंट लिखाणापेक्षा ही सुंदर..
वाह .. कमेंट लिखाणापेक्षा ही सुंदर..
वाह .. कमेंट लिखाणापेक्षा ही सुंदर..
वाह .. कमेंट लिखाणापेक्षा ही सुंदर
छान लिहिलं आहे. ऑल टाइम
___/\___
In reply to छान लिहिलं आहे. ऑल टाइम by रातराणी
मी असे ऐकले आहे की "फराज"
हा अँगल नवीन आहे
In reply to मी असे ऐकले आहे की "फराज" by गंम्बा
अप्रतीम !!!! असे काहि
__/\__
In reply to अप्रतीम !!!! असे काहि by निनाव
उत्तम लेख....
धन्यवाद .... मंडळ आभारी आहे ...
In reply to उत्तम लेख.... by चिनार
कुछ तो मेरे पिंडार-ए-मुहब्बत का भरम रख - बहुदा पिन्दार असावं
In reply to उत्तम लेख.... by चिनार
छान लिहीलेत,
क्या बात है!! फराज़ माझेही
वा .... यु मेड दी डे
In reply to क्या बात है!! फराज़ माझेही by मनिष
आणि हो ... मेहंदी ... चुकून
In reply to वा .... यु मेड दी डे by ज्याक ऑफ ऑल
माझं सगळ्यात आवडतं व्हर्शन
संध्याकाळी मूड लायटिंग मध्ये
In reply to माझं सगळ्यात आवडतं व्हर्शन by ट्रेड मार्क