छप्पन इंचाच्या ह्या 'उरी'
भोसकली अठरा इंची सुरी
बधिर मन ऐकून शब्दफुरफुरी
मानवत नाही श्रद्धा अन सबुरी
नेहमीच का आमच्या हातावर तुरी
का सहन कराव्या ह्या कुरबुरी
फोडून टाका तो जबडा आसुरी
चमकवा तोफा, बंदुका, कुकरी
माजवा हल्लकल्लोळ शत्रूच्या पुरी
न ठेवावी कोणतीच मोहीम अधुरी
होउदे जयघोष दाखवा बहादुरी
लढाईच ही अछ्छी वा बुरी
पुरे झाल्या हो त्या चर्चा संतुरी
मागतो अखंड विजयाची कस्तुरी
-संदीप डांगे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3179
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता म्हणून ठीक आहे.
कवितेच्या आशयशी सहमत.
+1000
कविता मस्त आहे पण बाकी हिडीस
+११११
In reply to कविता मस्त आहे पण बाकी हिडीस by कैलासवासी सोन्याबापु
+१०००
In reply to कविता मस्त आहे पण बाकी हिडीस by कैलासवासी सोन्याबापु
जुनी कविता
कवितेमागचा त्रागा, घटनेबद्दल
तुमचं निरीक्षण अचूक आहे,
In reply to कवितेमागचा त्रागा, घटनेबद्दल by प्रचेतस
डांगेअण्णा
चालेल!
In reply to डांगेअण्णा by चांदणे संदीप
___/\___
In reply to चालेल! by संदीप डांगे
+१११११११११