✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वल्पविराम... चित्रमालेचा.

अ
अभ्या.. यांनी
गुरुवार, 09/15/2016 - 19:19  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी अगदी साष्टांग दंडवतच म्हणा की, नुसते एक आवाहन करतो काय अन ह्ये दणकून चित्रे, फोटो, कविता येतात काय. जब्बरदस्तच काम आपल्या मिपाकरांचे. आभार त्या सार्‍या कलाकारांचे, प्रतिभावंताचे की आम्हाला इतक्या सुंदर कलाकृतींचे बॅनर बनवायची संधी मिळाली. कित्येक जण तर माहीतही नव्हते. अगदी मनापासून आभार. तर मंडळी सांगायची गोष्ट अशी की ह्या सगळ्या प्रवेशिका आल्या कशा स्वरुपात याचे कुतुहल सर्वांनाच आहे. तर त्या आल्या अशा a मेलवर आलेल्या ह्या इमेजेसना आम्ही फक्त थोडे एडिटिंग केले, फ्रेममध्ये बसवले आणि पब्लिश केले. झाले. नंतर रोज एक बॅनर पब्लिश करायचे अन धागा अपडेट काम मात्र आपल्या प्रशांतरावांनी केले, बाकी आल्या त्या तुमच्या स्तुतीपर प्रतिसादाच्या लाटा. मस्त वाटले वाचून. नेहमीच आमचे बॅनर असतात. सर्वांनी मिळून बनवलेल्या बॅनरची मज्जा वेगळीच. ते सजवायचे काम करायची मज्जा तर अधिकच. नूलकरकाकांचा ओरिगामी गणपती म्हणा की नूतनचा क्विलिंगबप्पा म्हणा, इतका देखणा दिसत होता आला त्याच वेळी की बस्स. सूडक्या, स्पावड्या, वल्ल्या, मंदार आणि स्वच्छंदी मनोज ह्या मित्रांकडून दर्जेदार काम येणारच ह्याची खात्री होती. सरप्राइज दिले ते यशोमैय्या, घासकडवी गुर्जी आणि झुमकुल्याने. मोक्षदांचा आणि अमोलगवळींचा बाप्पा, माधुरी विनायकांचा काव्यलेखनाने आणखी बहार आली. नीलमोहोरांनी एकाच चित्रात लुकच बदलला. हॉट कलरस्कीम मधला गणेश त्यांनी एकदम कूल माय फ्रेंड गणेशा केला. शिवकन्याताईंचे कोलाज वेळेअभावी बॅनरमध्ये नाही घेता आले पण ते आहेच इथे. sk तसेच आपला कलाकार मिपाकर जोशी_ले दरवर्षी थर्मोकोलचे मखर स्वतः बनवतो. इलेक्ट्रीकल इंजिनिअर असणार्‍या जोशी_ले ची कलाकारी पाह्यली की त्याचा देव कसा प्रसन्न दिसतो ते कळते. sk2 काही मिपाकरांनी त्यांच्या पाल्यांची चित्रे पाठवली, पण त्यांना नाराज ना करता त्यांचे इथे कौतुक करुयात. न जाणो थोड्या वर्षांनी रंगभुषा मंडळात असतील ही बच्चे कंपनी. हे चित्र आहे मिपाकर पद्माक्षींच्या लाडक्या शुभंकराचे. sk1 आणि हे बनवणारे चिमुकले हात आहेत हेमंत जकातेंच्या दिनेशचे. sk3 आता ह्या सार्‍या कलाकारांच्या मेहनतीतून, कलासाधनेतून साकारली गेली यंदाची गणेशचित्रमाला. त्या सर्वांचे आभार. वाचकांचे, प्रतिसादकांचे आभार. असाच लोभ राहु द्या. शेवटी आपल्या अजून एका प्रतिभावंत मिपाकर संदीप चांदणे यांच्या सुंदर गणेशचित्राने अन तेवढ्याच प्रभावी काव्यपंक्तींनी ह्या चित्रमालेचा समारोप....अहं...स्वल्पविराम देतो. sk4 बुर्‍या बुरसटल्या सुटेनात चाली केली ही मतीही हव्यासाच्या हवाली जना खेळविती शहाणे मदारी आणि काय सांगू गणेशा तुला रे? वाजत-गाजत बाप्पा पुन्हा ये जल्लोष-हर्ष आसमंती भरू दे उपचार नको फक्त उत्सवाचा सदाचार आचार होवो जनांचा इतुकेच मागणे हे गणेशा तुला रे! . धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6035 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

गणपतीबाप्पा मोरया!

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/15/2016 - 19:22 नवीन
पुढच्या वर्षी लवकर या! Virtual चित्रप्रदर्शन फारच सुंदर _/\_!रंगभूषामंडळ ठेसात! बाप्पा जोसात!
  • Log in or register to post comments

+११११

मोदक
गुरुवार, 09/15/2016 - 19:24 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

प्रचंड सहमत + ११११११११११

सही रे सई
गुरुवार, 09/15/2016 - 19:25 नवीन
प्रचंड सहमत + ११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

+१११

पथिक
Fri, 09/16/2016 - 11:33 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

जबरदस्त

स्वच्छंदी_मनोज
गुरुवार, 09/15/2016 - 19:31 नवीन
जबरदस्तच. भारीच. चित्रमालेची कल्पना बघणार्‍या, ती राबवणार्‍या आणी कौतूक करणार्‍या सर्वांना __/\__. खास आभार प्रशांत आणी अभ्याचे, त्यांच्या मेहेनतीबद्दल. ही फक्त सुरुवात आहे हे लक्ष्यात असुद्या :)
  • Log in or register to post comments

येस्स्स, अगदी सहमत.

पद्मावति
गुरुवार, 09/15/2016 - 19:31 नवीन
येस्स्स, अगदी सहमत.
  • Log in or register to post comments

बेष्ट होती गणेशचित्रमाला.

यशोधरा
गुरुवार, 09/15/2016 - 19:33 नवीन
बेष्ट होती गणेशचित्रमाला.
  • Log in or register to post comments

सर्वच कलाकॄती खुप छान आहेत

सिरुसेरि
गुरुवार, 09/15/2016 - 19:43 नवीन
सर्वच कलाकॄती खुप छान आहेत . शुभेच्छा .
  • Log in or register to post comments

व्वा..

स्वाती दिनेश
गुरुवार, 09/15/2016 - 19:47 नवीन
रोज उत्सुकता असे की आज कोणते गनेशरुप पहायला मिळणार? कोणाचा आगळावेगळा छंद वाचायला मिळणार आणि प्रसाद काय असणार? सगळा उपक्रमच देखणा झाला. 'स्वल्पविराम' ही आवडला. थोड्या विश्रांतीनंतर दिवाळीअंकाचे वेध लागतीलच.:) स्वाती
  • Log in or register to post comments

वा! छानच! पुढच्या वर्षीसुद्धा

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/15/2016 - 19:51 नवीन
वा! छानच! पुढच्या वर्षीसुद्धा असेच सुंदर बॅनर पहायला मिळोत!
  • Log in or register to post comments

जोरदार चित्रे आलीयेत. सगळीच

रेवती
गुरुवार, 09/15/2016 - 19:52 नवीन
जोरदार चित्रे आलीयेत. सगळीच आवडली. त्यांना नेटक्या स्वरुपात सादर केल्याबद्दल अभ्याचे आभार.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो!

जव्हेरगंज
गुरुवार, 09/15/2016 - 20:07 नवीन
हेच म्हणतो! अगदी आकर्षक पायंडा आहे हा! अश्या चित्रमाला वारंवार येवो!
  • Log in or register to post comments

निमोताईंच डिजेवाला गणपती

जव्हेरगंज
गुरुवार, 09/15/2016 - 20:09 नवीन
निमोताईंच डिजेवाला गणपती कुठेय?
  • Log in or register to post comments

हो ना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/15/2016 - 20:17 नवीन
किती वेळचा शोधतोय. डिजेवाला रॉकस्टार गणेशा ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

भाऊ त्यांनी आक्खे रेडीमेड

अभ्या..
गुरुवार, 09/15/2016 - 20:18 नवीन
भाऊ त्यांनी आक्खे रेडीमेड बॅनरच दिले ना. ते लावले की बोर्डावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

जब्राट

टवाळ कार्टा
गुरुवार, 09/15/2016 - 20:28 नवीन
जब्राट
  • Log in or register to post comments

आमचा पण आहे याच्यात misalpav

लालगरूड
गुरुवार, 09/15/2016 - 21:15 नवीन
आमचा पण आहे याच्यात misalpav पासून बनवलेला
  • Log in or register to post comments

छान उपक्रम

अमित खोजे
गुरुवार, 09/15/2016 - 21:28 नवीन
अगदी मस्त उपक्रम होता हो हा. आवडला. फोटोवर कलाकुसर करून अगदी रुपच पालटवून टाकले गणपतीचे. अगदी छान बॅनर बनवलेत. असाच प्रयोग दिवाळीलासुद्धा करा!
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख चित्रमाला झाली.

प्रचेतस
गुरुवार, 09/15/2016 - 21:46 नवीन
अतिशय सुरेख चित्रमाला झाली. मिपाकरांच्या उत्तमोत्तम कलाकृती आणि त्यांना तितक्याच सुरेख रितीने सजवून ब्यानरस्वरूपात आणणाऱ्या रंगभूषा मंडळाचे ख़ास आभार.
  • Log in or register to post comments

खूप छान

खटपट्या
गुरुवार, 09/15/2016 - 21:46 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

छान उपक्रम होता. सहभाग घेणार्

रुपी
गुरुवार, 09/15/2016 - 21:48 नवीन
छान उपक्रम होता. सहभाग घेणार्‍या सर्वांचे आणि रंगभुषा मंडळाचे अभिनंदन आणि धन्यवाद! यानिमित्ताने आपल्यातले अजून लपलेले कलाकार बाहेर येतील ही आशा!
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम

पैसा
गुरुवार, 09/15/2016 - 21:57 नवीन
भाग घेणार्‍या सर्व मंडळीना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

काय बोलायचं राव! कल्पना

संदीप डांगे
गुरुवार, 09/15/2016 - 22:03 नवीन
काय बोलायचं राव! कल्पना आपल्याला ऐकताक्षणीच आवडली व्हती. सगळ्यांनी भरभरुन सहकार्य केलं, एक से एक कलाकृती दिली. लय झ्याक वाटलं... सर्वांचे हा आनंद दिल्याबद्दल अनेक आभार! _/\_ _/\_ _/\_ गणपतीच्या काळात (बोले तो धंदेके टएममेंच) अभ्यावर ह्या सगळ्याचा किती ताण आला असेल ह्याची व्यवस्थित कल्पना आहे. जियो मेरे शेर और रंगभूषामंडळ! तुमचे कष्ट अनसंग हिरोजप्रमाणे आहेत. _/\_
  • Log in or register to post comments

+१११११११

महासंग्राम
Fri, 09/16/2016 - 16:38 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अप्रतिम प्रकल्प !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/15/2016 - 22:33 नवीन
अप्रतिम प्रकल्प ! मिपाकरांमध्ये अनेक उत्तम छुपे कलाकार आहेत हे गुपित या निमित्ताने बाहेर आले !
  • Log in or register to post comments

अप्रतिम! सूडचा ग्लास पेंटिगचा

रातराणी
गुरुवार, 09/15/2016 - 22:38 नवीन
अप्रतिम! सूडचा ग्लास पेंटिगचा गणपती यात अॅड करायचा राहिलाय का? तो पहायला आवडेल. छोट्या दिनेशचा गणपती गोड आहे!
  • Log in or register to post comments

हा फ्रेम केल्यानंतरचा!!

सूड
गुरुवार, 09/15/2016 - 23:24 नवीन
Image removed. हा फ्रेम केल्यानंतरचा!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सुरेख! मोदक काय करता, चित्र

रातराणी
गुरुवार, 09/15/2016 - 23:29 नवीन
सुरेख! मोदक काय करता, चित्र काय काढता, कविता काय लिहिता! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

नीलमोहर
Fri, 09/16/2016 - 00:02 नवीन
खूप सुंदर दिसतेय चित्र फ्रेमसकट, ते मोदक तर घरच्यांनाही दाखवले, बघा असे करतात उकडीचे मोदक म्हणून, ती स्टेप बाय स्टेप कृती, त्या खतरनाक कळ्या पाहून पेठेतील अस्सल सुगरणींनाही कॉम्प्लेक्स येईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

फ्रेम अप्रतिम आहे. मी जर

सतिश गावडे
गुरुवार, 09/15/2016 - 23:51 नवीन
फ्रेम अप्रतिम आहे. मी जर सश्रद्ध असतो तर एक फ्रेम माझ्यासाठी बनवायला सांगितली असती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मालक

चांदणे संदीप
Fri, 09/16/2016 - 11:06 नवीन
दंडवत घ्या! ___/\___ Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चित्रमालेची कल्पना मस्त होती.

अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/15/2016 - 22:46 नवीन
चित्रमालेची कल्पना मस्त होती.
  • Log in or register to post comments

अतिशय स्तुत्य उपक्रम होता हा.

सतिश गावडे
गुरुवार, 09/15/2016 - 23:53 नवीन
अतिशय स्तुत्य उपक्रम होता हा. या निमित्ताने मिपाकरांचे वेगळेच कला गुण पाहायला मिळाले. कविवर्य संदिपभाऊ चांदणे-पाटील यांची कविताही खुपच सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

सर्वांचे अभिनंदन,

नीलमोहर
गुरुवार, 09/15/2016 - 23:53 नवीन
चित्रमालेची कल्पना एक नंबर होती,आणि ती प्रत्यक्षात उतरलीही अगदी सुंदररित्या, एकसे एक सुरेख चित्र, फोटो पाठवलेत मिपाकरांनी. त्यांना अजून सुंदर बनवणाऱ्या अभ्या डब्या जब्याचेही तेवढेच कौतुक !! शिवाय अनेक आभार मालक नीलकांत प्रशांत यांचेही, इतका सुंदर आनंदाचा ठेवा लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल :) मिपावर भविष्यात असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले जावोत यासाठी शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

मिपामध्ये इतके छुपे कलाकार

बॅटमॅन
Fri, 09/16/2016 - 00:19 नवीन
मिपामध्ये इतके छुपे कलाकार आहेत हे माहिती नव्हतं. एक नंबर! अभ्याचं अँकरिंगही मस्तच. कॉलेजात करायचास काय बे अँकरिंग?
  • Log in or register to post comments

संपूर्ण गणेश चित्रमाला तर

अजया
Fri, 09/16/2016 - 07:01 नवीन
संपूर्ण गणेश चित्रमाला तर आवडलीच पण कलाकारांची ओळख करुन देणेही भावले. दरवर्षी अशी चित्रमाला बघायला आवडेल.
  • Log in or register to post comments

सुंदर कलाक्रुती आणि तितकाच

स्मिता चौगुले
Fri, 09/16/2016 - 09:54 नवीन
सुंदर कलाक्रुती आणि तितकाच सुंदर हा ओळख लेख .
  • Log in or register to post comments

जोरदार काम आहे अभ्या भौ !!!

A.N.Bapat
Fri, 09/16/2016 - 16:39 नवीन
जोरदार काम आहे अभ्या भौ !!! लय भारी
  • Log in or register to post comments

फारच सुंदर 'स्वल्पविराम'!

अनिता ठाकूर
Fri, 09/16/2016 - 17:20 नवीन
फारच सुंदर 'स्वल्पविराम'!
  • Log in or register to post comments

सगळेच banners एक से एक झालेत

शिव कन्या
Mon, 09/19/2016 - 19:06 नवीन
सगळेच banners एक से एक झालेत हा अभ्या. खूप आवडले काम. रच्याकने , बाप्पांनी आणखी एखाद दिवस मुक्काम वाढवला असता तर आमचे नामधारी गणेश पण अवतरले असते काय कि! :):)
  • Log in or register to post comments

तुमचा बाप्पा अवश्य अवतरला

अभ्या..
Mon, 09/19/2016 - 20:04 नवीन
तुमचा बाप्पा अवश्य अवतरला असता शिवकन्याताई. तुमचाच भाऊ ना तो. ;) बाकी इतर पण लैनीत होते, तुमचा कोलाजचा एकमेव होता आणि मस्त दिसत होता. फक्त दिवस एखादा वाढवून घ्यायला पाहिजे होता बाप्पाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

सुंदर आणि समावेशक असा उपक्रम.

एस
Mon, 09/19/2016 - 20:10 नवीन
सुंदर आणि समावेशक असा उपक्रम.
  • Log in or register to post comments

मस्तच काम केलंय की सगळ्यांनी!

शब्दबम्बाळ
Tue, 09/20/2016 - 18:14 नवीन
मस्तच काम केलंय की सगळ्यांनी! अभिनंदन सगळ्यांचेच! सुंदर सुंदर कला आहेत मिपाकरांकडे! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा