कुठेतरी फुललेलं फुलपाखरु आणि लाल फुलांचा सडा असावा
वाटतं मला
काही पक्षी रंगीबेरंगी किडे बाजरीचं कणीस पाणी चौफेर असावं
वाटतं मला
आभाळ झळाळून ऊन पडावं
पंक्चर झालेल्या सायकलला वंगण लावून दमडावं
रीम वाकडी व्हावी चिखलात चाक रुतावं खांद्यावर घेऊन घरला चालत जावं
असावी म्हणून ठेवलेली
दाढी
चांगली हातभर वाढली
जंगलातून भुत बाहेर पडावं
तश्या माझ्या कविता
अचानक आलेल्या
जरीची टोपी घालूनंच
मी कविता लिहायला बसतो
अगदी राजबिंडा
गंजलेल्या पत्र्याच्या घरात कोंबडी अंडी घालतेय टिव्हीच्या खाली
डिरीवरच्या पेंडीच्या पोत्यात आजकाल चांदीची थाळी नाही
मुळात म्हशी राहिल्यात किती?
टंगस्टन दिव्याचा भगभगीत प्रकाश
पेन चालत नाही
लाकडे मसणात गेली
इत्यादी इत्यादी
"अरे थू..."
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4369
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
हान तिज्यामारी.
_/\_ !!!!
गॅटर
आँगळवाणे दिसते पण नाईलाज असतो
In reply to गॅटर by इरसाल
गॅटर
In reply to गॅटर by इरसाल
आम्हाला दुसरा एकच संदर्भ
In reply to गॅटर by तुषार काळभोर
त्यांना दुसरंच म्हणायचय !
In reply to आम्हाला दुसरा एकच संदर्भ by अभ्या..
इरसालबुवा तेवढाअभिप्रेत
In reply to त्यांना दुसरंच म्हणायचय ! by इरसाल
अरे देवा
In reply to इरसालबुवा तेवढाअभिप्रेत by अभ्या..
एक दिन जाना तो है, मगर ऐसे
In reply to अरे देवा by इरसाल
अहो...
In reply to आम्हाला दुसरा एकच संदर्भ by अभ्या..
म्याटर
फक्त दण्डवत।।।
हम्म. नाही कळली.
नीट कळली नाही पूर्ण, पण आवडली
absurdity ची हीच गम्मत असते..
In reply to नीट कळली नाही पूर्ण, पण आवडली by पथिक