Skip to main content

ताज्या घडामोडी :भाग २

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 14/08/2016 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?

वाचने 70000
प्रतिक्रिया 306

प्रतिक्रिया

एक फेबु पोस्ट ========================= २०१४ साली सत्तेवर आल्यापासून सत्ताधारी पक्षाने ४७ प्रकरणांत एकूण ५८ जणांवर राजद्रोहाचे खटले भरले. त्यातील एकही प्रकरण न्यायालयात टिकले नाही, इतके ते बिनबुडाचे होते. याआधीच्या सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे हे खटले अधिक विखारी आणि विषारी होते. याचे कारण राष्ट्रवादाचा ठेका जणू आपल्या एकट्याकडेच दिलेला आहे आणि अन्य सर्व हे देश बुडवायलाच निघाले आहेत, असे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचे वर्तन असते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने या सत्ताधारी पक्षाचा चांगलाच मुखभंग होईल. त्याची नितांत गरज होती. कारण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांइतकेच, किंबहुना त्याहूनही अधिक बेजबाबदार वर्तन करणारे सध्याचे सत्ताधारी नेते, टीकाकारांवर राजद्रोहाची कुऱ्हाड चालवण्यात मश्गूल होते. सर्वोच्च न्यायालयाने अशांना भानावर आणले असून "देशातील नागरिकांना सरकारविरोधात, त्यांना वाटेल ते, अगदी 'काहीही' बोलण्याचा अधिकार आहे" असे नमूद केले. - गिरीश कुबेर [संपादकीय - लोकसत्ता दि ७/९/२०१६ पृ ७

In reply to by चंपाबाई

थापा. हार्दिक पटेल व JNU gang वरील देशद्रोहाचा गुन्हा न्यायालयाने कायम ठेवलेला आहे.

In reply to by चंपाबाई

"सेंट्रल - ३/ ४ अपवाद" पण दुर्दैव असे कि मिडियावाले हेच हायलाईट करत आहेत भाजपकडून पैसे घेवून

झाकीर नाईकांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ने राजीव गांधी फाउंडेशनला, ज्याचे संस्थापक सदस्य सोनीया, राहूल, प्रियांका आहेत आणि मनमोहन सिंग पण ट्रस्टचे सदस्य आहेत, २०११ मध्ये "रू. ५० लाख फक्त" दान केले होते.... आज ही बातमी बाहेर आल्यावर काँग्रेसला विचारल्यावर तारांबळ उडाली...

In reply to by चंपाबाई

दान कुणीही कुणाला करु शकतो. नक्की ना? मग मोदी साहेबानी आपली "प्रतिमा" अंबानींना दान केलेली चालेल ना ? उगाच काव काव केलीत मागे. किंवा बिर्ला, अदानी, अंबानींनी भाजपाला निवडणूकीसाठी दान केलेले चालेल म्हणता? उत्तम आहे. लक्षात ठेवू.

In reply to by चंपाबाई

हा सल्ला मला बरयाच लोकांनी दिला होता. वकिलीत एक वकील नेहमीच जिंकत असतो मग तो फिर्यादी असो कि आरोपी. डॉक्टरकीत तुम्ही "नियतीशी" झुंज देत असता त्यात तुमची जीत हि नेहमीच "तात्पुरती" असते. परंतु तुमचा हा तात्पुरता विजय कुणाच्या पराभवाच्या खांद्यावर उभा नसतो. तेंव्हा पुढच्या जन्मी पण मला डॉक्टरच व्हायला आवडेल.

रेल्वे तिकिट बुकिंग दर१०% तिकिटानंतर दरवाढ होणार. त्यामुळे शेवटी असलेली तिकिटे विमानापेक्षाही महाग होणार. म्हणजे शेठजी लोकानाच ते पर्वडणार !

इतकी वर्षे कपिल शर्माचे बांधकाम बेकायदेशीर होते म्हणे. पण लाचखोरीचा आरोप नव्हता, आता पाच लाखाच्या लाचखोरीचा आरोप झाल्यावर सेना मनसे म्हणतात की त्याचे बांधकाम बेकायदेशीर आहे. याची नेमकी संगती कशी लावायची ?

जामोप्या ...अत्यंत अभ्यासू विवेचन

काही दिवसापूर्वी भारत अमेरिकेत लिमोओ करार झाला त्याविषयी वाचायची इच्छा होती, पण चांगले लेख सापडले नाहीत. ह्या कराराचे समर्थन करणारे लेख इंग्रजी वर्तमानपात्रात वाचले होते पण काही उत्तम वाटले नाहीत. आज लोकसत्तात ह्या कराराची विरुद्ध बाजू मांडणारा लेख आलाय त्याची हि लिंक. विंग कमांडर अभय जोशी यांनी लिहलाय. http://epaper.loksatta.com/933542/loksatta-pune/11-09-2016#page/7/2

In reply to by अमितदादा

कमांडर साहेबाच्या म्हणन्यानुसार आपण अक्साई चिन आपण चिनला द्यायला हवे होते. मग लगेच सिक्कीम व अरुनाचल प्रदेश पन देउन टाकावे उगाच आपन "महासत्तेशी" पंगा घ्या. मग लगेच काश्मीर आणी पंजाब पाकिस्तानला द्यायला काय हरकत आहे. बाकी हे देश फार सज्जन आहेत.

In reply to by अमित भोकरकर

पहिली गोष्ट, आज चीन आणि पाकिस्तान ची भारतविरोधी युती होत असताना भारताला जपान, अमेरिका, व्हिएतनाम यांच्याशी सहकार्य वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं माझं मत आहे. वर दिलेला लेख माझ्या विचाराशी समांतर नाहीये, परंतु कधी कधी विरोधी मते/लेख समजून घ्यावी लागतात कारण ती आपल्या विचारातील दोष किंवा धोके लक्षात आणून देतात. उदारणार्थ आपण अमेरिकेशी केलेल्या करारानुसार दोन्ही देश एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकतो. अमेरिका भारतीय तळाचा वापर चीन विरुद्ध करू शकते पण भारत अमेरिकन तळाचा वापर कशासाठी करणार कॅनडा, आफ्रिका, कि मेक्सिको वरील निगराणी साठी? लेखकाने ह्या करारातील दाखवून दिलेला दोष नक्कीच विचारात घेण्यासारखा आहे. कोणताही करार करताना आपला स्वार्थ पहिला पाहिजे मित्र राष्ट्राचे हित नव्हे. दुसरी गोष्ट, सिक्कीम, अरुणाचल, काश्मीर द्या असं लेखक कुठं म्हणतोय हे दाखवून द्या. हे तुमचं interpretation आहे. मुळात लष्करी अधिकारी अस मत कधीच व्यक्त करणार नाही. अटलबिहारी वाजपेयी नीं तिबेट ला मान्यता देऊन सिक्कीम ची मान्यता पदरात पाडून घेतली, त्याच तत्वावर लेखक सूचित करतो की aksai chin हा भाग वरच चीन च अस्तित्व मान्य करून चीन बरोबरचा सीमा प्रश्न सोडवून घ्यावा. अर्थात हे चूक कि बरोबर ह्यावर चर्चा होऊ शकते, पण लेखकाचे हे मत काही कचारापेटीत टाकण्यासारखं नाही. भारत सरकार ला ह्याची जाणीव असल्याने आता पर्यंत कोणत्याच सरकार ने अधिकृत रित्या aksai chin चा विषय द्विपक्षीय वाटाघाटीत चर्चिला नाही (मोदींनी हि नाही). कोणताही देश सज्जन नाही, भारत हि नाही. तसेच कोणताही देश कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो हे काळाने सिद्ध केलं आहे. अवांतर जेव्हापासून भारत अमेरिका संबंध सुधारू लागले आहेत, तेंव्हापासून रशिया आणि पाकिस्तान ची जवळीक वाढू लागली आहे. मागे रशिया ने पाकिस्तान ला हेलिकॉप्टर विकण्या संदर्भात चाचपणी केली होती. आता आलेल्या बातमी नुसार रशिया आणि पाकिस्तान मध्ये पहिली जॉईंट मिलिटरी excersize होण्याची श्यक्यता आहे. भविष्यात भारत अमेरिका जपान व्हिएतनाम यांचा एक गट आणि रशिया चीन पाकिस्तान यांचा विरोधी गट तयार होतोय कि काय याची शंका येतीय.

In reply to by अमितदादा

रशिया आणि पाक यांच्यात होणारा हा संयुक्त युद्धाभ्यास रद्द करण्याचा निर्णय रशियाने उरी हल्ल्यानंतर घेतला. रशिया भारताचा एकमेव विश्वसनिय, ऑल वेदर मित्र आहे हे पुन:पुन्हा सिद्ध होते. काही काळापासून रशिया-पाक-चीन अशी तिहेरी फळी भारत-अमेरिका जवळिकीमुळे निर्माण होताना दिसत होती. आता राजनयाच्या द्रुष्टीने भारताने आपल्या रशियाशी असलेल्या मित्रत्वाचा फायदा करुन घ्यावा आणी पाकिस्तानला चीन आणि रशिया दोहोंपासून दूर करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात चीन-पाकिस्तान संबंध cpec मुळे शिखरावर आहेत, तरीही चीनला पाकपासून तोडण्यासाठी आणखी कोणते राजनयिक पावले उचलता येतील?

In reply to by पुंबा

मुळात आंतराष्ट्रीय संदर्भाबाबतीत ऑल वेदर मित्राची व्याख्या वेदर पाहून मैत्री असा करायला हवा , कोण कायमचा शत्रू नाही कोण कायमचा मित्र नाही, सर्व काही काळाचा महिमा:). असो काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तान मध्ये रशिया च्या नाकीनऊ आणणारा पाकिस्तान आज रशिया बरोबर चांगले संबंध हळूहळू प्रस्थापित करत आहे. चीन ला पाकिस्तान पासून तोडणे नजीकच्या काळात श्यक्य नाही कारण भारतविरोधी राजकारणात पाकिस्तान चीन च एक हुकमी पत्ता आहे. तसेच CPEC प्रोजेक्ट चीन च्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.

श्रीगुरुजी, आता मलालाचा विषय निघालाच आहे तर थोडी माहिती झाडतो. ही अतिशय दुर्दैवी मुलगी आहे. ब्रिटनचा माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन हा संयुक्त राष्ट्रसंघाचा शिक्षण दूत आहे. याला पाकिस्तानात खाजगी शाळांचं जाळं विणायचं आहे. त्याकरिता कोणतरी एक चेहरा हवा म्हणून झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप) यास गळ घातली. हाही पाकिस्तानातला एक शिक्षणसम्राट आहे. तर मलालाच्या बापाने मलालाला विकायला काढली. हे तालिबान्यांना आवडलं नाही. त्यांनी त्यांच्या परीने (= डोक्यात गोळ्या झाडून) तिला थोपवण्याचा प्रयत्न केला. न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मलालाचं नाव छापून आल्यावर तिला एकटी सोडायला नको ना? मग ही अक्कल झियाउद्दीनला नव्हती का? छेछे, त्यानेच तर पोटच्या पोरीला विकायला काढली! मलाला हे लांडग्यांच्या हाती सापडलेलं कोकरू आहे. बस एव्हढीच जाणीव ठेवावी ही वाचकांना विनंती. ती जे बोलते ती सगळी पढवलेली पोपटपंची (= script) आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुमच्या ह्या प्रतिसादात मलालाच्या बापाच्या ऐवजी 'अडानी अंबानी' व मलालाच्या जागी मोदींचे नाव घालायची माझी इच्छा होत आहे.

In reply to by चंपाबाई

आई आई ग! लांडग्यांच्या हाती सापडलेलं कोकरू चंपाबाईना मोदी साहेब म्हणजे कोकरू वाटले हे वाचून डोळे पाणावले. गहिवरून आले, दिल भर आया आणि असे जे काही होऊ शकते ते सर्व झाले. चंपाबाई मोदी साहेब अख्ख्या काँग्रेस,समाजवादी, सुडोसेक्युलर, डावे, अति डावे या सर्वाना गुजरात मध्ये पुरून जमिनीवर ५फूट ६ इंच उंच आणि ५६ इंच रुंद असे दिल्लीत उरले आहेत. तुम्ही चिंता करणे सोडुन द्या

In reply to by गामा पैलवान

गामा जी , "झियाउद्दीन युसुफझाई (=मलालाचा बाप)" हे मलालाच्या वडील आहेत म्हणून "(=मलालाचा बाप)". बाकी त्यांची पार्श्व भूमी काही का असेनात आपण आपला सुसंस्कृतपणा सोडावा का? नार्कोटेक औषध तीर्थ, चहा आणि अन्नामध्ये देऊन साधक मंडळी जमावणाऱ्या आद्य गुरूं आणि जागतिक हिंसेला खतपाणी घालणाऱ्या मौलवींपेक्षा शिक्षण सम्राट नक्कीच किती तरी पटीने चांगलेच म्हणावे लागतील.

In reply to by विशुमित

विशुमित, तुमचा रोख सनातन संस्थेकडे आहे हे प्रतिसादातून दिसतं. तसंही पाहता, निरपराध साधकांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या पोलिसांशी सुसंस्कृतपणे वागून काही उपयोग नाहीच्चे मुळी. त्यामुळे मी आजिब्बात सुसंस्कृत नाही बरंका. बाकी, औषधात वा तीर्थात अंमली पदार्थ सापडल्याचा काही पुरावा वगैरे मिळाला का? की आपली बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

इतके दिवस "संस्थेत" राहून सुद्धा जी व्यक्ती सुसंस्कृत नाही बनू शकली तर मग इतर कथित साधकांनी आपले आयुष्य गुरु चरणी लीन करण्यात काय हासील? "नमस्कार कसा करावा" असले बौद्धिक दुसऱ्यांना पाजणाऱ्यापासून कथित अध्यात्म प्रेमींनी दूर राहिलेलेच बरं..!! विचार नाही पटले की झोडून काढा अशीच प्रतिमा असणाऱ्यांनाचा संग खरंच मोक्षाकडे घेऊन जाईल का ? गुन्हा सिद्ध झाला तरच दोषी असं असेल तर छगन बाप्पा निर्दोषच म्हणावे लागतील नाही.

In reply to by विशुमित

विशुमित, तुमच्या प्रतिसादाचा उद्देश कळला. त्याचं काय आहे की सनातनवाले सगळं सनदशीर मार्गाने करतात. म्हणून सुहेल शर्मासारख्या काही पोलिसांना फुकटची चरबी चढली आहे. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवण्यापर्यंत सुहेल शर्माची मजल गेली आहे. याची चरबी उतरवण्यासाठी संस्कृती कामाची नाही. आज डॉक्टर तावडे जात्यात आहेत. काल साध्वी, आणि प्रसाद पुरोहित होते. उद्या कोण असेल? संस्कृतीच्या बाता मारणाऱ्यांनी आगोदर या तिघांचा गुन्हा काय आहे ते सांगावे. आ.न., -गा.पै.

४० वर्षांची तपश्चर्या वाया!--- इति नाथा बाबा..!! म्हणे माध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवल्यामुळे सरकारची कारवाई. माध्यमांवर विश्वास नाही ठेवायचा तर मग कोणावर ठेवायचा "तावडेंवर "???? http://www.loksatta.com/maharashtra-news/eknath-khadse-5-1300387/

http://www.loksatta.com/maharashtra-news/one-dead-in-malegaon-due-to-el… गुटखा खाऊन मारलेली पिचकारी एका तरुणाच्या जीवावर बेतली असून, विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. मालेगावमध्ये रविवारी ही घटना घडली. मोहम्मद यासिन असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आपल्या भावाला भेटण्यासाठी रविवारी मालेगावातील रमझानपुऱ्यामध्ये आला होता. भाऊ ज्या इमारतीमध्ये राहात होता. तिथे गेल्यावर मोहम्मदने गुटखा खाल्ला. इमारतीच्या खिडकीतून खाली थुंकत असताना जवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांवर त्याची पिचकारी उडाल्याने त्याला तीव्र दाबाचा विजेचा धक्का बसला. यामुळे तो जागीच कोसळला. नातेवाईकांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. गुटख्याची पिचकारी विजेच्या तारांवर पडल्याने विजेचा दाब उलटा आला आणि त्यामुळे मोहम्मदला विजेचा धक्का बसला. यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केलेली आहे. हेच का ते 'अच्छे दिन'? अजून केजरीवालांचे ट्विट कसे नाही आले? मुस्लिम असल्यामुळे मोदीजींनी मुद्दामच पिचकारी मारताना तारेत हाय करंट सोडल्याचा आरोप अजून कसा केला नाही? सारांश - गुटखा खाल्ल्यावर तारांवर पिचकारी न मारता जिन्याच्या कोपर्‍यात किंवा तारा नाहीत हे बघून खिडकीतून थेट रस्त्यावर पिचकारी मारावी. म्हणजे जिवानिशी जायचा धोका टळे.

In reply to by श्रीगुरुजी

हेच का ते 'अच्छे दिन'? अजून केजरीवालांचे ट्विट कसे नाही आले? मुस्लिम असल्यामुळे मोदीजींनी मुद्दामच पिचकारी मारताना तारेत हाय करंट सोडल्याचा आरोप अजून कसा केला नाही? छान पिचकारी मारलीय तुम्ही पण.

याचसाठी होता केला अट्टाहास

आधीच वादात अडकलेल्या किंवा शोच्या सेटवर वाद निर्माण करु शकतील अशाच काही स्पर्धकांची निवड ‘बिग बॉस’मध्ये केली जाते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई बिग बॉसच्या आगामी सिझनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. टीआरपीचे गणित साधण्याच्यादृष्टीने तृप्ती देसाई यांना ‘बिग बॉस ९’साठी विचारणा करण्यात आल्याचे वृत्त आहे. आता खरी मजा येईल. बिग बॉसमधील इतर स्पर्धक पहिल्याच दिवशी पळून जातील. तृप्ती देसाईच्या बरोबरीने बिग बॉसमध्ये केजरीवाल, कन्हैय्या कुमार व पप्पू सुद्द्धा हवेत. http://www.loksatta.com/manoranjan-news/trupti-desai-will-be-participat…

प्रवाशाच्या एका ट्विटमुळे रेल्वेच्या टीटीवर काही तासांत निलंबनाची कारवाई

रेल्वेमधून प्रवास करताना शुल्क आकारून त्याची पावती न दिल्याची तक्रार थेट ट्विटरच्या माध्यमातून एका प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली आणि पुढच्या दोन तासांत संबंधित टीटीआय (ट्रॅव्हेलिंग टिकट इन्स्पेक्टर) अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईही झाली. अगदी वेगाने झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून गोविंद नारायण हे शनिवारी बाडमेरहून बिकानेरला निघाले होते. नियमाप्रमाणे सामान्य तिकीट काढून गाडीमध्ये टीटीआयकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क भरून या गाडीतून प्रवास करता येऊ शकतो. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या डब्यामध्ये टीटीईकडे १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क जमा केले. पण टीटीआय श्यामलाल यांनी त्याची कोणतीही पावती गोविंद नारायण यांना दिली नाही. त्यामुळे लगेचच त्यांनी सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना मेन्शन करून या संदर्भातील ट्विट केले. या एका ट्विटमुळे सरकारी कार्यालयातील सूत्रे वेगाने फिरली. लगेचच गोविंद नारायण यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून फोन आला आणि त्यांच्याकडे सविस्तर माहिती विचारण्यात आली. संबंधित विभागाचे अधिकारी मुकेश गेहलोत हे लगेचच टीटीआय श्यामलाल यांच्यासोबत संबंधित डब्यामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी गोविंद नारायण यांच्यासह इतरही प्रवाशांकडे चौकशी केल्यावर त्यांना समजले की अनेक प्रवाशांकडून १५ रुपयांचे अतिरिक्त शुल्क गोळा करून त्यांना त्याबदल्यात कोणतीही पावती देण्यात आलेली नव्हती. टीटीआय यांच्याकडील रोकड तपासल्यावर अतिरिक्त रक्कम त्यांच्याकडे जमा असल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर लगेचच गेहलोत यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/railway-tti-suspended-after-co…

छान

गोविंद नारायणाने मोदींच्या सांगण्यावरुन १५ (अक्षरी पंधरा- आहे ना लक्षात १५ लाख) रुपयांसाठी टीसीला आणी त्याच्या मासुम कुटुंबियांना रस्त्यावर आणण्याची कट-कारस्थाने केली. (भले सुरेश प्रभु भाजप सरकारात असेना, आमच्या पंजाब आणी गोवा येथील प्रचाराला खीळ घालण्यासाठी खास फ्रान्स मधुन डास मागवुन दिल्लीत चिकनगुनिया पसरवला)

In reply to by इरसाल

कपिल शर्माने मोदीना ट्विट केले तर मोदीभक्त हसत होते... डायरेक्ट मोदीना ट्विट ? अआता हे चालते का ?

गेल्या काहीवर्षापासून संरक्षण आणि शस्त्रास्त्रे खरेदीसाठी अमेरिकेकडे झुकलेला भारत रशिया कडे परत एकदा वळतोय. हि भारत रशिया संबंधासाठी चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काही महिन्यात भारत रशिया बरोबर काही महत्वाचे आणि मोठे डिफेन्स करार करेल. बहुदा रशियाचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेलं महत्व, चीन आणि पाकिस्तान शी होणारी जवळीक भारताच्या लक्ष्यात आलेली दिसतेय. ह्या बातमीनुसार भारत आणि रशिया मध्ये पाचव्या पिढीतील अत्याधुनिक विमानानंच उत्पादन आणि कामोव हेलिकॉप्टर संधर्भात वाटाघाटी ऍडव्हान्स स्टेज वर आहेत . तसेच येत्या काही महिन्यात भारत रशिया कडून S-400 Triumf हि अत्याधुनिक मिसाईल संरक्षण प्रणाली विकत घेऊ शकतो, तसेच एक अणुपाणबुडी भाडेतत्वावर घेऊ शकते . आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे भारत विकसित करत असलेल्या INS विशाल ह्या अणू उर्जेवर चालणाऱ्या aircraft carrier साठी रशिया ची मदत होऊ शकते. अवांतर १. भारतीय नौदल ची नवीन आणि अत्याधुनिक विनाशकेची माहिती वाचा इथे २. रफाले बरोबर येणाऱ्या अत्याधुनिक air to air क्षेपणास्त्राची माहिती इथे

महाराजांचे आशिर्वाद घेऊ .. सेना भाजपाला निवडून देऊ ... तुरुंगातून कैदी फरार होण्यामध्ये महाराष्ट्राने बिहारला मागे टाकले. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news…

In reply to by चंपाबाई

हे अधिकृत आकडे आहेत. एकदा बिहारला जाऊन प्रत्यक्ष पहा. काही लोकांसाठी तुरुंग हा बाहेरपेक्षा जास्त चांगला आहे. दोन वेळच्या जेवणाची सोयही होते. आणि दुसरीकडे काही लोकांचे तुरुंगात राहूनहि राजेशाही थाट चालू असतात जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हि लाजवतील. .

In reply to by सुबोध खरे

महाराजांचे आशिर्वाद मोदीना मिळाले की कैद्याना ? कैदी पसार होत आहेत.

आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असूनही वर्तमानपत्रात एकही जाहिरात नाही, रस्त्यावर एकही फ्लेक्स नाही ... काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

बर्थडे फ्लेक्स राजकारण्यांचे लागतात... अंबानीच्या जाहिरातीत काम करुन मोदी आता प्रोफेशनल मॉडेल झालेत

In reply to by श्रीगुरुजी

या इकडे अहमदाबादेत, किंवा गुजरातेत, म्हणाल तितके फ्लेक्स दाखवतो, नुसते साधे फ्लेक्स नाहीत तर मोठी मोठी होर्डींग्स सुद्धा लागलेली आहेत. जिथे अच्छे दिन म्हणायचे तिथे म्हणा. अतिरेक करून किमान मोदी साहेबांना तरी कमीपणा आणू नका

In reply to by फेदरवेट साहेब

भाद्रपदाच्या महिन्यात मोदिंच्या वाढदिवसाचे बॅनर लागल्याने बरेच चवताळलेत कि नाही.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

ही असली माणसे पाहिली का आम्हाला कुत्रे जातीत जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो. आम्ही किमान भाद्रपदात माजतो, माणसे बारोमास माजलेलीच असतात हे पुन्हा एकदा ठळक रित्या स्पष्ट झाले. कॉमेंट काय आहे ती मोदींविरोधी आहे का मोदींच्या अंधभक्ती विरोधी जिच्यामुळे खुद्द मोदींना त्रास होऊ शकतो, हे न पाहता आरडणे म्हणजे आमच्या भुंकण्यावरताण आहे. शिकुची इच्छा असलेली गुणग्राहक लोकं कुत्र्याकडून इमानी असणे, मायाळूपणा, मिताहार, कार्यनिष्ठा , वगैरे शिकतात अन भोट माणसे फक्त भाद्रपदाकडे लक्ष देऊन असतात, विकृती हो, दुसरं काय म्हणा, अन फरकही काय पडतो म्हणा, Dhelya's life is an open book. (चावरा/विचारवंत/किलर ऑफ माणसाच्या डोक्यातील जंत) ढेल्या

In reply to by फेदरवेट साहेब

पण एकाच कुत्र्याचे किति क्लोन असावेत ह्यालाहि काही मर्यादा आहेत कि नाही.

In reply to by फेदरवेट साहेब

या इकडे अहमदाबादेत, किंवा गुजरातेत, म्हणाल तितके फ्लेक्स दाखवतो, नुसते साधे फ्लेक्स नाहीत तर मोठी मोठी होर्डींग्स सुद्धा लागलेली आहेत. जिथे अच्छे दिन म्हणायचे तिथे म्हणा. अतिरेक करून किमान मोदी साहेबांना तरी कमीपणा आणू नका
ते नंतर दाखवा. मला आधी बाबासाहेब पुरंदर्‍यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा जो तुमचा दावा आहे ती कात्रणे बघायची आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

ती कात्रणे तूर्तास हाताशी नाहीत, त्यामुळे मी माझा मुद्दा सपशेल मागे घेतो अन पुरावा हाती नसतानासुद्धा बाबसाहेबांबद्दल बोललो ह्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मी ऐकीव माहितीवर विधान करायला नको होते, मी मनःपूर्वक माफी मागतो आहे. (दिलगीर) ढेल्या

In reply to by श्रीगुरुजी

उद्यापासून आठ दिवस डिप्लोमा प्रॅक्टिकल्ससाठी अहमदाबादेत जात आहे. ब्बघून सांगतो. महाराष्ट्रात त्यांचे फ्लेक्स लावणार कोण ? शिवसेना भाजपा आता वेगळ्या चुलीची भाषा बोलत आहेत.. त्यात ते विदर्भ वगैरे प्रकर्णानंतर मराठी भाजपे मूग गिळून बसलेत.

In reply to by चंपाबाई

चंपाबै D.M.L.T ;) आठ दिवस डिप्लोमा प्रॅक्टिकल्ससाठी अहमदाबादेत जात आहे. ब्बघून सांगतो. सुंता झालयवर पाय झाला का रे बरा ? जंत कसे आहेत.

In reply to by चंपाबाई

ब्बघून सांगतो...........कि सांगते ....... नक्की काय ??? खूपच शंका येतात मनात हो बाई / बुआ .....

https://www.thequint.com/uri-attack/2016/09/21/uri-avenged-2-india-para… हि बातमी चंदन नंदी या पत्रकाराने लिहिली असून, अन्य कोणत्याही वृत्तपत्रात आलेली नाही. नक्की काय प्रकार असावा? (In light of the reactions to this article, The Quint decided to reconfirm the information from its sources. We stand by our story.) At least 20 terrorists have been neutralised in a daring cross-LoC operation by the Indian Army in response to the Uri attack. Two units of the elite 2 Paras comprising 18-20 soldiers flew across the LoC in the Uri sector in military helicopters and carried out an operation that killed at least 20 suspected terrorists across three terror camps in Pakistan Occupied Kashmir (PoK). The Quint: Exclusive: Uri Avenged. Special Forces Cross LoC; Kill 20 Terrorists Total casualties, including those injured, could be as high as 200, sources said. Military sources revealed to The Quint, which confirmed this information from two other independent sources, that the operation happened during the intervening hours of 20 September and 21 September. Indications that the Indian Special Forces struck across LoC came in the form of Pakistan declaring a no-fly zone over PoK on 20 September night. Pakistan’s national flag carrier, Pakistan International Airlines (PIA), had cancelled flights to northern Pakistani cities, including to Gilgit and Skardu in PoK, due to “airspace restrictions”. PIA called off flights to Gilgit and Skardu in Gilgit-Baltistan region in PoK and Chitral in Khyber-Pakhtunkhwa province. PIA spokesperson Danyal Gilani had tweeted this information late Tuesday evening. Pakistan Prime Minister Nawaz Sharif held a telephonic conversation with the country’s powerful Army Chief General Raheel Sharif on Tuesday night ahead of his speech at the UN in which he raised the Kashmir issue. It is understood that they are likely to have discussed this cross-border raid as well. Soldiers guard on tip of their vehicle outside the army base which was attacked by suspected militants at Uri. (Photo: AP) Soldiers guard on tip of their vehicle outside the army base which was attacked by suspected militants at Uri. (Photo: AP) Speaking at an event earlier on Wednesday, Defence Minister Manohar Parrikar said the Uri attack may need a “knee-jerk” reaction. “Won’t go into details of what India can do, but sometimes knee-jerk reaction is required,” he said. Also Read: Sometimes a Knee-Jerk Reaction is Needed: Parrikar on Uri Attack Hours after the attack on Sunday morning by four terrorists that killed 18 Indian soldiers, Prime Minister Narendra Modi had tweeted that those behind the act “would not go unpunished”. Geeta (centre), wife of Ravi Paul, an army soldier who was killed in Sunday’s attack at an Indian Army base in Kashmir’s Uri, reacts upon seeing the body of her husband in Sarwa village in Samba district, south of Jammu. (Photo: Reuters) Geeta (centre), wife of Ravi Paul, an army soldier who was killed in Sunday’s attack at an Indian Army base in Kashmir’s Uri, reacts upon seeing the body of her husband in Sarwa village in Samba district, south of Jammu. (Photo: Reuters) India has blamed the Pakistan-based Jaish-e-Mohammed terrorist outfit for the attack in Uri. A statement issued by the Ministry of External Affairs listed the items recovered from the terrorists, including GPS tracker with coordinates that indicate the point and time of infiltration across the LoC and the subsequent route to the terror attack site; grenades with Pakistani markings; communication matrix sheets; communication equipment; and other items made in Pakistan, including food, medicines and clothes. Foreign Secretary S Jaishankar had summoned Pakistani High Commissioner Abdul Basit on Wednesday and conveyed India’s demand for action by Pakistan to crack down on the terror infrastructure in its territory.

In reply to by बोलबोलेरो

बोलबोलेरो, हा प्रकार काय आहे ते माहीत नाही. बहुधा भारतीय उच्चस्तरावर कमालीची गुप्तता राखली गेलीये. पाकिस्तानी सैन्य तातडीच्या इशाऱ्यावर (= हाय अॅलर्ट) आहे. काहीतरी शिजतंय खरं. आपला स्वत:चा स्थाननिर्देश (=जीपीएस) प्रणालीचा उपग्रह असल्याने भारत यशस्वीरीत्या गुप्तता पाळू शकला. यापूर्वी परदेशी उपग्रहामार्गे विदा येत असे. त्या मार्गावर नजर ठेवून पाकिस्तानी हेरखात्यास माहिती पुरवली जाई (अशी शंका आहे). आता हा पर्याय बंद झाल्याने पाकी बावचळले असावेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

असा एकूण बातमीचा स्वरूप आहे. परंतु, लढाऊ विमानाची धावपळ व प्रवासी विमानोड्डाणावर बंदी वगळता, पाकिस्तानचा काहीच प्रतिसाद नाही. चंदन नंदीसह , अजूनही काही आयडी वरून या बातमीचे अनुषंगाने सांकेतिक ट्विट्स पाहायला मिळाले. काही कळत नाही.

A new era in medical science... Eggs from a mother with damaged mitochondria and a donor with healthy mitochondria are collected. The majority of the genetic material is removed from both eggs. The mother's genetic material is inserted into the donor egg, which can be fertilised by sperm. (News summary) First 'three person baby' born using new method

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ह्या संशोधनाचा मुख्य हेतू आई-वडील मध्ये असणारे genetic problem मुलामध्ये येवू न देणे आहे. उदारणार्थ वरील केस मध्ये आईच्या च्या सेल मध्ये असणार्या Mitochondria (आपल्या सेल च इंजिन) मध्ये दोष होता, त्यामुळ Mitochondria हा डोनर च्या सेल मधून घेतला जेणेकरून जन्मणार्या मुलात हा defect नसेल. माझा ह्या विषयाशी सबंध विद्यापीठात काही कोर्सेस घेतल्यामुळे आहे आणि मला यातील फक्त जुजबी माहिती, मात्र भरपूर उत्सुकता आहे. या विषयातील तज्ञ च याचे फायदे तोटे , किंवा भविष्यातील उपयुक्तातात सांगू शकतील. मला मात्र ह्या संशोधकांना आज ना उद्या नोबेल मिळेल असे वाटतंय कारण हा क्रांतिकारी शोध आहे (जर ते मुल काही वर्ष without any problem वाढलं तर). अवांतर> Mitochondria बद्दल जालावर वाचा रोचक माहिती हाती लागेल.

जयललिताच्या आजाराबद्दल सामाजिक माध्यमातून बर्‍याच अफवा पसरत आहेत. जयललिता गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर आजारी असून रूग्णालयात दाखल आहे. काही काळ ती सिंगापूरला उपचारासाठी गेली होती. ९२ वर्षीय करूणानिधी आजाराची माहिती जाहीर करावी अशी मागणी करीत आहे. एकंदरीत बर्‍याच शक्यता आहेत. समजा हा आजार दीर्घकाल टिकून जयललिता रूग्णालयातच राहिली तरीसुद्धा ती मुख्यमंत्रीपद सोडून काळजीवाहू मुख्यमंत्र्याची नेमणूक करणार नाही. १९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचारासाठी गेले होते परंतु मुख्यमंत्रीपद सोडले नव्हते. आताही तसेच होईल. जयललिताच्या अद्रमुक पक्षात ती स्वतः सोडली तर इतर एकही जण जगाला माहिती नाही. आपल्या पक्षात तिने जाणूनबुजून प्रतिस्पर्धी निर्माण होऊन दिलेला नाही. त्यामुळे यदाकदाचित या आजारात तिचे काही बरेवाईट झाले तर पुढील मुख्यमंत्री कोण होणार हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत करूणानिधी अद्रमुकचे १५-२० आमदार फोडून स्वतः मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे. सध्या एकूण २३४ पैकी द्रमुककडे अंदाजे १०० व काँग्रेसकडे ७-८ आमदार आहेत. अद्रमुककडे १२० च्या आसपास आमदार आहेत. त्यामुळे द्रमुकला बहुमतासाठी जेमतेम १३-१४ आमदार हवे आहेत. जर अशी फोडाफोडी व अश्व खरेदी-विक्री सुरू झाली तर केंद्र सरकार तामिळनाडू विधानसभा बरखास्त/स्थगित करण्याचा निर्णय घेऊ शकते. १९८७ मध्ये एमजीआर च्या देहावसनानंतर अद्रमुकमध्ये सुंदोपसुंदी माजल्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने विधानसभा बरखास्त करून १ वर्षाने मध्यावधी निवडणुक घेतली होती. यावेळीही तसेच होऊ शकते.

लोकहो, वेस्ट ब्यांकेत नवीन वसाहत रचण्याच्या इस्रायलच्या बेताचा अमेरिकेकडून (कधी नव्हे तो) निषेध : http://www.nytimes.com/2016/10/06/world/middleeast/obama-israel-west-ba… अमेरिकेस याची भारी किंमत मोजावी लागेल. आ.न., -गा.पै.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/shiv-sena-pitches-for-2nd-term… प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी फेरनिवड करण्यात यावी, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढील आठवड्यात प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. प्रणव मुखर्जी हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. __________________________________________________________________________________ शिवसेनेने भाजपला अडचणीत आणण्यासाठीच हे पिल्लू पुढे आणले आहे हे उघड आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणुक जुलै २०१८ मध्ये आहे. भाजप निश्चितच स्वतःच्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी उभा करणार हे निश्चित आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेचे सर्व खासदार व सर्व राज्यांचे दोन्ही सभागृहातील आमदार मतदान करतात. भाजपकडे लोकसभेत स्पष्ट बहुमत आहे. राज्यसभेत बहुमत नसले तरी मित्रपक्षांच्या सहाय्याने भाजप बहुमताच्या आकड्यापासून फार लांब नाही. बरीच मोठी राज्ये भाजपच्या ताब्यात असल्याने आमदारांची बरीच मते भाजपकडे आहेत. २०१७ मधील उ.प्र., उत्तराखंड व पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर रालोआची पंजाबमधील आमदार संख्या निश्चितच बर्‍याच प्रमाणात कमी होईल, परंतु त्याची भरपाई खूप जास्त प्रमाणात उ.प्र. व उत्तराखंड मधून होईल. एकंदरीत भाजपकडे राष्ट्रपतीपदासाठी बरीचशी कुमक आताच तयार आहे. भाजप अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा अशा जुन्या नेत्यांपैकी कोणाला तरी राष्ट्रपतीपदासाठी उभे करेल असे वाटते. अर्थात पूर्णपणे अनेपेक्षित उमेदवार निवडण्याचे धक्कातंत्र अवलंबण्याचे तंत्र मोदी-शहा वापरू शकतात व ते कोणतातरी वेगळाच उमेदवार पुढे आणू शकतात. महाराष्ट्र, हरयाना व झारखंड मधील मुख्यमंत्री निवडताना त्यांनी असेच धक्कातंत्र वापरले होते. शिवसेनेने खोडा घातला तर शिवसेनेच्या महाराष्ट्रातील अंदाजे ७० आमदारांची व संसदेतील अंदाजे २२-२३ खासदारांची मते भाजपला गमवावी लागतील. हे ओळखून शिवसेनेने आताच फासे टाकले आहेत व राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निमित्त करून भाजपला ब्लॅकमेल करता येईल असा उधोजींचा बेत दिसतो. दुर्दैवाने उधोजींना नुसतीच पोकळ प्रक्षोभक भाषणे करणे एवढेच जमत असलाने व राजकारणातील खेळ्या खेळण्याचे नीटसे जमत असल्याने त्यांनी आपले हुकमाचे पत्ते खूपच आधी उघड केले आहेत. आता मोदी-शहा सावध होउन योग्य ती योजना आखून शिवसेनेला नेहमीप्रमाणे तोंडघशी पाडतील कारण निवडणुकीला अजून ९ महिने अवकाश आहे. उधोजींनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले पत्ते उघड केले असते तर कदाचित भाजपची अडचण होऊ शकली असती. दुर्दैवाने उधोजींनी पुन्हा एकदा खूपच घाई करून आपले हुकमाचे पान टाकून दिल्याने आता त्यांच्या हातात हुकमाचे पान शिल्लक नाही व पुन्हा एकदा मोदी-शहा याचा पुरेपूर फायदा उठविणार हे नक्की.

दंड भरून अघोषित धन उघड करायच्या योजनेत भाग्यनगरातल्या एका व्यक्तीने तब्बल दहाहजार कोटी ( म्हणजे १ वर ११ शून्ये बरंका) रुपये इतकी संपत्ती उघड केली आहे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/nation/hyderabad-individual-decl… ही व्यक्ती उद्योगपती असणं शक्य नाही असं चंद्राबाबू नायडू म्हणतात. माझ्या मते हा जगमोहन रेड्डी असावा. तो बराच पैसेवाला आहे. सोनिया गांधीने त्याला जाम खुन्नस दिली असल्याने नवीन पाठराखा शोधंत हिंडंत असावासं दिसतंय. मोदींच्या रूपाने आधार मिळाला खरा, पण जबर किंमत मोजावी लागलीये. अर्थात जिवापेक्षा जास्त किंमत कशाचीच नाही. वडील राजशेखर रेड्डींच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हे सत्य अधिकंच ठळकपणे जाणवलेलं असावं. पैसा काय परत कसाही मिळवता येईल. -गा.पै.

निवडणुक आय्गाने सचिव प्रकर्णात आपला नोटिस्काढलि. तसेच करुनही आसाम की त्कडल्याकुठल्या भाजपाला मात्र नोटिस नाही

बनावट पदवी प्रकरणी स्मृती इराणींना कोर्टाचा दिलासा, समन्स बजावण्याची याचिका रद्द http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-court-dismisses-plea-to-… स्मृती इराणींची पदवी बनावट असल्याच्या खटल्यातून इराणींना दिलासा मिळालेला आहे. आआप सारख्या पापाराझ्झींचा भरणा असलेल्या टॅब्लॉईड पक्षाने व इतर काही जणांनी मागील वर्षात खोटे आरोप करून बदनामी करण्याची मोहीम सुरू केली होती. नरेंद्र मोदींच्या पदव्या बनावट आहेत, स्मृती इराणींची पदवी बनावट आहे, विनोद तावडेंची पदवी बनावट आहे अशी सातत्याने बदनामी सुरू होती. त्या मोहिमेला आता न्यायालयानेच फटका दिला आहे. हाच आआप पक्ष आपल्या पक्षातील बनावट पदवीधारक जितेंद्र तोमर याची भलामण करीत होता.

In reply to by श्रीगुरुजी

न्यायालयाने दिल्ली विद्यापीठाला इराणी यांच्या पदवीबाबतचे सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पिक्चर अभी बाकी है !