बाप्पाचा नैवेद्यः बर्लिनर डोनट्स
ह्या वर्षी बाप्पाच्या प्रसादाला काहीतरी वेगळे करावे असे मनात आले. (बाप्पाने तरी काय दर वर्षी तेच तेच खायचे? त्याला काही व्हरायटी हवी की नको?)
म्हणून मग बर्लिनर डोनटस करायचे ठरले, त्याची एकदम बर्लिनची, आकिम आजोबांच्या आईची पाकृ तुम्हाला माहीत करून दिली आहेच. त्यात काही फेरफार करून, ते त्सेंटाआजीकडून अॅप्रूव्ह करून घेतले आणि प्रसादायोग्य डोनटस तयार झाले.
साहित्य-
अडीच वाट्या मैदा, १ वाटी भरून साखर, ५ टेबलस्पून बटर, पाऊण ते १ कप कोमट दूध, १ चिमूट मीठ, तळणीसाठी तेल
२ वाट्या पिठीसाखर गार्निशिंगसाठी.
२ क्यूब्ज फ्रेश यीस्ट किवा २ पाकिटे ड्राय यीस्ट
(फ्रेश यीस्टचा ४० ते ४२ ग्रॅमचा क्यूब आमच्याकडे मिळतो. ड्राय यीस्ट घेतले तर छोट्या सॅशेमध्ये येतात.)
प्लम, चेरी, अॅप्रिकॉट किंवा कोणताही आवडीचा जॅम (४५० ते ५०० ग्रॅमची बाटली.)
पेस्ट्री बॅग, २-३ स्वच्छ फडकी, २-३ मोठे ट्रे किवा ताटे, १ वाटी
कृती -
कोमट दुधात साखर घाला. त्यात यीस्ट घालून रवीने घुसळा. मिश्रण एकजीव झाले पाहिजे.
मैद्यात चिमूटभर मीठ घाला व त्यावर हे मिश्रण ओता. एखादे फडके घालून झाकून उबेशी १५ ते २० मिनिटे ठेवा. बटर पातळ करून ते ह्या मिश्रणावर घाला आणि पोळीच्या कणकेपेक्षा थोडे सैल ठेवा. भरपूर मळावे लागते. गोळा परातीत दोन-चारदा आपटा. (कोणावरचा राग काढायचा असला, तर त्या गोळ्यावर काढा,:) ) मऊसर गोळा झाला पाहिजे. हा गोळा परत फडक्याने झाकून उबेशी १५-२० मिनिटे ठेवा.
पोळपाटावर किवा प्लॅटफॉर्मवर मैदा भुरभुरून घ्या. लाटण्यालाही मैदा चोळून घ्या. मिश्रण फरमेंट होऊन, हलके होऊन जवळपास दुप्पट फुगले की त्यातील एक मोठा गोळा काढून घ्या आणि बाकीचे मिश्रण झाकून उबेशीच ठेवा. हा गोळा परत एकदा पोळपाटावर आपटून जाडसर पोळी लाटा. वाटीने त्याचे गोल आकार कापून घ्या व ते एका ताटात अंतराअंतरावर ठेवून ते ताट फडक्याने झाकून उबेशी ठेवा. दुसरी पोळी लाटा व वाटीने डोनट्स कापा.
एकीकडे तेल तापत ठेवा व एका ताटलीत वाटीभर पिठीसाखर घालून ठेवा. पेस्ट्री बॅगेत जॅम भरून त्यावर लहान टिप बसवा. तेल तापले की मध्यम आचेवर हे डोनट्स तळा. गोल्डन ब्राउन झाले की टिश्यू पेपरवर घाला व गरम असतानाच, लगेच पिठीसाखरेत घोळवा. पेस्ट्री बॅगेची टिप त्यात घुसवून जॅम भरा.
डोनट गरम असतानाच जॅम आत भरला जातो व पिठीसाखरही त्यावर नीट बसते. त्यामुळे ही स्टेप वेळेत करणे महत्त्वाचे आहे.
असे सर्व डोनटस करून पेपरवर पसरून ठेवा. गार झाले की एखाद्या फ्लॅट डब्यात भरून ठेवा.
बाप्पाला नेवैद्य दाखवा आणि आता काय बघता? खा!


वाचने
23933
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
मस्त पाकृ.
भारी!
जबरा हं ! और भी आने दो.
अवांतर : ले गई दिल 'दुनिया' जापानकी..नंतर तुम्ही दीर्घ लेखन केलं नाही, अशी तक्रार करून ठेवतो.
-दिलीप बिरुटे
I am a berliner आठवले
फक्त ती जॅमवाली स्टेप नाय शिरत डोस्क्यात....जरा विस्कटून सांग त्या स्टेपचा फोटू असता तर कळले असते.
In reply to मस्त आणि सोपी वाटतेय by अनन्न्या
डोनट तळून पेपरवर टाकला की लगेचच गरम असतानाच त्याच्या पोटात जॅमने भरलेली पेस्ट्री बॅगेची नोझल घुसवायची आणि पिठीसाखरेत घोळवायचा की डोनट तयार झाला. हे काम जरा नाजूकपणे करायला लागते. मग हा डोनट पेपरवर बाजूला ठेवून द्यायचा. असे सगळे डोनट्स भरायचे. पूर्ण गार झाले की पोळ्यांच्या / चपट्या डब्यात भरून ठेवायचे.
गणपतीआधी २-३ दिवस करून ठेवू शकतेस कारण शांतपणा आणि भरपूर वेळ लागतो.
स्वाती
अप्रतिम प्रकार वाटतोय हा! बाप्पा international असल्यामुळे बाप्पाला international नैवेद्य दाखवायलाच पाहिजे.
In reply to Danke Frau Swati! by बोका-ए-आझम
+१
डोनट्स भारतीय पद्धतीत करून नैवेद्याला करायची तुझी आयडिया भन्नाट!
मस्तच पाकॄ ताई. नक्की करुन बघणार.
लेकर!! दा एरिनंरं इश मिश दिजन बेह्र्युम्टंन डियालोग ज्विशन त्स्वाय बेर्लिनर्न.


अरे काय हे, आज डोनट्सचा नैवेद्य उद्य चिकन तंदूरी कराल...श्या संस्क्रुति बुडवणार अश्याने तुम्ही
In reply to अरे काय हे, आज डोनट्सचा by टवाळ कार्टा
आहात कुठे ?????
In reply to अहो भारतीय गौरींना मटणाचा नैवेद्य दाखवतात की ! by माम्लेदारचा पन्खा
तो ती संस्कृती का कोण बुडायची वाट बघत असेल, म्हण्जे हा लगेच पाण्यात उडी मारेल तिच्या मागोमाग.
In reply to अहो भारतीय गौरींना मटणाचा नैवेद्य दाखवतात की ! by माम्लेदारचा पन्खा
हो,माझया माहेरी मटण वडे लागतात गौरीच्या नैवेद्याला.
कसले यम्मी दिसते आहेत डोनटस.. मस्तच
मस्त दिसतायत डोनटस! बॉस्टन क्रीम पाय च्या डोनट प्रकारात असेच फिलींग डोनटच्या आत भरतात व वरून चॉकलेट फासतात त्याची आठवण झाली. वरील साहित्यात किती डोनट्स होतात?
In reply to मस्त दिसतायत डोनटस! बॉस्टन by रेवती
आपल्या जेवणातल्या नेहमीच्या आमटीच्या वाटीने कातले तर साधारण २५ डोनट्स होतात.
स्वाती
मला असं नेहमी वाटायचं की काय तेच ते पारंपारिक पदार्थ करायचे. काही वेगळं हवं.. पण इथे बेसिक स्वयंपाकाच धन्यवाद आहे तिथे... असो..
तर आज तू असे खत्रा डोनट्स बनवुन ती इच्छा पुर्ण केलीस! आणि दिसतही अगदी सुंदर आहेत!
स्वाती,मस्त आणि गणपतीला खुश करणारी पाककृती.
मस्त ग
जॅम-फिल्ड डोनट्स अत्यंत आवडता प्रकार आहे.
मस्त पाकृ व फोटो.
सुंदरच दिसत आहेत डोनट्स एकदम!
डोनट्समध्ये अंडे असल्यामुळे कधीच खाल्ले नाहीत. ही पाकृ पाहून खावेसे वाटत आहेत... पण शांतपणा आणि भरपूर वेळ या दोन्ही गोष्टी मिळणे अवघड आहे.
प्रिमा, दाट लाईक्ट अर्ख लेक्कर! वानीर झाल इक नार डाउट्स्लांड वीर खान फोर झेकर झाल हेट ईटन. हील बडांक्ट!!!!
-मेट फ्रिंडलीकं ख्रूटं,
बॅटमॅन. (फ्लीरमाउसमान)
In reply to प्रिमा, दाट लाईक्ट अर्ख by बॅटमॅन
प्रिमो, दाट लाईट आक्खं लेकरु, पनीर झालं, एक नार असलेला वीर खान फोर्जेकर झालं हिला बंडात.
-मेटला फ्रेंड म्हणतेत कुठं,
अभ्या (मीच्माझ्यासमान).
.
अबे काये ते सांगा तरी हे. ;)
In reply to प्रिमो, दाट लाईट आक्खं लेकरु, by अभ्या..
वरती सूडपंत लिहितेत ते जर्मण आन आमी लिवल्यालं डच.
प्रिमा, दाट लाईक्ट अर्ख लेक्कर! वानीर झाल इक नार डाउट्स्लांड वीर खान फोर झेकर झाल हेट ईटन. हील बडांक्ट!!!! -मेट फ्रिंडलीकं ख्रूटं, बॅटमॅन. (फ्लीरमाउसमान)भारी, एकदम टेस्टी दिस्तेय. जेव्हा जर्मनीस पुन्हा जाणे होईल तेव्हा हे नक्कीच खाईन. अनेक धन्यवाद. -आपलाच, बॅटमॅन (वाल्गुदेय). डच भाषेत वटवाघूळ = फ्लीरमाउस = (शब्दशः) उडणारा उंदीर.
In reply to वरती सूडपंत लिहितेत ते जर्मण by बॅटमॅन
हील बडांक्ट!!!!
मस्त पाकृ. :)
डोनट्स का प्रकार मला खूप आवडतो. पण आपल्या भारतात हे कुठे विकत मिळतात का?
In reply to डोनट्स का प्रकार मला खूप by अभिजीत अवलिया
चॉकोलेट फॅक्टरीमध्ये. ह्या नावाचे दुकान आहे.
सर्वांना धन्यवाद.
ह्या वर्षी बाप्पासाठी हे डोनट्स करायचे ठरवले पण भारतात गणपतीसाठी जाणे जमणारे नव्हते. आमचा एक मित्र कामानिमित्त मुंबईला जाणार होता, मग तसेच त्याच्या घरचे गणपती करून येणार असे त्याने सांगितल्यावर त्याला हे डोनट्स घरी नेशील का? असा प्रश्न विचारला. त्यांच्या गणपतीलाही २१ डोनट्सचा नैवेद्य पाहिजे ह्या अटीवर तो कबूल झाला. :) मग काय? डोनट्सचे शतकच केले पूर्ण आणि पाठवले बाप्पासाठी.
आमच्याकडे गणपतीच्या दुसर्या दिवशी दरवर्षी सहस्त्रावर्तन असते, ब्रह्मवृंद असतो. त्यावेळी सर्वांना प्रसाद म्हणून हे डोनट्स वाटले. गणपतीसकट सगळ्यांना हा प्रसाद खूप आवडला असा रिपोर्ट आला भारतातून. :)
स्वाती
In reply to धन्यवाद. by स्वाती दिनेश
आवडण्यासारखाच आहे प्रसाद!
In reply to धन्यवाद. by स्वाती दिनेश
शतक?
बापरे! सोपे नाही ते!
मस्त मस्त. हा आगळा-वेगळा नैवेद्य पाहून बाप्पा नक्कीच खुश होणार. फारच रुचकर दिसतेयेत.
मस्त दिसतायत डोनट्स...
आमच्या जर्मन ज्ञानाचा उजेड पाडायच्या नादात एक विचारायचं राहून गेलं, जॅमऐवजी क्रीम भरलं तर चालतं का ह्यात?
In reply to आमच्या जर्मन ज्ञानाचा उजेड by सूड
म्हणजे व्हिप्ड क्रिम म्हणतो आहेस? काही ठिकाणी चॉकलेट, कस्टर्ड किवा व्हिप्ड क्रिमचे फिलिंग करतात. पण पारंपरिक बर्लिनर फानकुकन म्हणजे बर्लिनर डोनट मध्ये मार्मालाड/ जॅम चे फिलिंग घालतात.
व्हिप्ड क्रिमचे फिलिंग लवकर वितळेल आणि पेस्ट्री बॅगेतून गरम डोनटमध्ये भरताना जास्त काळजी घ्यावी लागते. तसेच
टिकण्याच्या दृष्टीने जॅम/मार्मालाडचे फिलिंग जास्त बरे पडते.
स्वाती
In reply to क्रिम? by स्वाती दिनेश
होय, व्हिप्ड क्रिमच म्हणत होतो. पण ते गरम भरायचं म्हटल्यावर उपयोगाचं नाही.
मस्तच दिसताहेत डोनट्स!
मस्तच दिसताहेत डोनट्स!
बाप्पा नक्कि खुष झाला असेल.
मस्त पाकृ.