Skip to main content

गुडगांव

गुडगांव

Published on गुरुवार, 08/09/2016 प्रकाशित मुखपृष्ठ
आपणच खरवडून काढावे आपल्या अजस्र जखमेवरच्या अपक्व खपल्यांचे तुकडे.... तसं हे शहर भयाण स्वप्नांच्या रात्रीनंतर दिवास्वप्नांच्या भीतीने टक्क जागे राहावे..... तसं हे शहर सागराचा थांग घेताना अथांग व्हावे नदीने अन् त्याचा माज करावा...... असं हे शहर उत्फुल्ल पाण्यात कळकट शेवाळी तवंग तरंगावा..... तेच हे नगर एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव.... .....गुडगांव
लेखनविषय:

याद्या 3067
प्रतिक्रिया 20

कवितेचं शीर्षक गुरुग्राम करा हो, गुडगांवच गुरुग्राम केलंय हरियाणा सरकार ने.. उगीच भावना दुखवायला नको ;)

In reply to by कंजूस

बर्‍यापैकी चालू शकेल. पण या कवितेत दिल्लीतून गुडगाव उगवले आहे याचे हिंट्स आहेत, त्यामुळे दिल्ली गॄहीत धरली तर अजून वेगळ्या पद्धतीने त्या ओळी पहाव्या लागतील. अर्थात, एका कवितेचे वेगवेगळ्या दृष्टिकोणातून आकलन नक्कीच शक्य असते. दिल्लीवर माझी एक कविता आहे, पण ती हिंदीत आहे. कधीतरी मराठीत अनुवाद करून टाकतो. नोइडाचा फार अनुभव नाही मला, त्यामुळे नोइडावर थेट अशी कविता लिहीलेली नाही अद्याप.

माणसांच्या जंगलात हरवलेलं शहर! शहर का जंगल म्हणावं हे! का मानवी भावनांचं वाळवंट?

मस्त!! ᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜ jv ᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜᵜ

In reply to by ज्योति अळवणी

आम्हाला आवडली (सगळी समजली नाही आणि सगळी समजलीच पाहिजे असा अट्टाहासही नाही,कधी कधी न कळण्यातही आनंद असतोच की) का आवडली नाही त्याचे एक दोन घटक्/मीमांसा सांगा ही विनंती. याचकाची पत्रेवाला नाखु

In reply to by ज्योति अळवणी

हाहाहा! कविता सकारात्मकच पाहिजे असे असते तर आपण पुष्कळशा अप्रतिम कवितांना मुकलो असतो. अख्खं विद्रोही साहित्यच गायब झालं असतं! हेहेहे!

In reply to by स्वामी संकेतानंद

कविता मला का आवडली नाही ते मी सांगितलं. एकूण विद्रोही किंवा नकारात्मक साहित्याची मीमांसा अपेक्षित आहे हे मला माहीत नव्हात. असो! चालुद्या

एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव. हा एक जबरदस्त षटकार आहे ह्या कवितेतला. वैश्विक सत्य वगेरे काय ते म्हणतात तसे. बाकीच्या एकेरी दुहेरी धावाही आवडल्या पैजारबुवा,

गुडगावात कुत्री असतात का हो? काय परिस्थिती आहे आमच्या समाजाची तिथे? (अखिल भारतीय कलुंगी कुत्री संघटना, संस्थापक अध्यक्ष) ढेल्या

दिल्ली आणि गुरूग्राम दोघांचे वर्णन - एके ठिकाणी महानगर आणी दुसरीकडे मागासलेली गाव असे आहे. बाकी द्रोणाचार्यांचे गाव म्हणाल तर एकी कडे युवराज अर्जुन तर दुसरी कडे सूतपुत्र कर्ण. एकाच नगरात राहतात. पण गुरूग्राम अत्यंत महागडे शहर आहे, हे म्हणू शकतो. नौकरी साठी हजारोंच्या संख्येने दिल्लीकर गुरूग्राम येथे येतात.

एका पराभवातून अलगद दुसऱ्या पराभवात ढकलणाऱ्या विजयाचा आनंदोत्सव.... शहरीकरण होताना होणारे शहारीकारण. अप्रतिम.