उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम!
डिस्क्लेमरः-
इथे तुम्ही नेहमीच एकाहुन एक सरस पाकृ पहाता. पण ते म्हणजे कसं की सेलेब्रेटींचं आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहिल्या सारखं आहे. सामान्यांच्या व्यथा तुम्हाला कशा कळाव्यात? तर समाजातलया तळागाळातल्या लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण ह्या पाकृ मध्ये आहे. हृदय हेलावणारे काही फोटो आहेत. कोमल मनाच्या लोकांनी पाहु नका!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तर काय झालं की गणपती आले.. मग सगळीकडे मोदकांचे फोटोच फोटो.. साधेसुधे नाही, उकडीचे! आम्ही इथे अमेरिकेत, जिथे आई नाही की चितळे नाहीत की मोदक करुन आयते खाऊ घालतील. (आय ब्लेम अमेरिका!). त्यात पुन्हा वॉट्सअॅपवर मेसेज की कसं कोकणातल्या समुद्र किनार्यावरच्या वातावरणामुळे तिकडे उकडीचे आणि घाटावर तळणीचे मोदक असतात. मग मी म्हणलं की आपण आता घाटावरुन काठावर आलो ना (अॅझ इन इस्ट कोस्ट!) मग करावे का उकडीचे? (आय ब्लेम वॉटसॅप). मग काय झालं की मोदकांचे फोटो पाहुन पाहुन शेवटी एकाक्षणी माझ्या रिकाम्या (अॅझ इन प्रचंड रिकामटेकड्या!) मनाने निर्णय घेतला की आपण सुद्धा यंदा उकडीचेच मोदक करायचे.
एक भारतात फोन, एक स्रुजाला, एक माबोच्या लिंकला भेट आणि एक युट्युब रेसेपी ह्यावरुन माझं मत असं झालं की उकडीच्या मोदकांची उगाच हाईप आहे, हे काय कुणालाही जमतील. स्रुजाला जमले हे कळल्यावर तर माझा आत्मविश्वास दुप्पट झाला! ;) त्यात वर कुणीतरी म्हणे की इडीअप्पमच्या पीठाचे म्हणे फार छान मोदक होतात. आणि काय योगायोग बघा, घरात इडीअप्पमचं पीठ! त्यावर घटक पदार्थ - तांदुळ पीठ असं लिहीलेलं. म्हणलं असेल अजुन काहीतरी बारिक वगैरे दळलेलं पीठ.
तर तमाम जनतेने सांगितल्या प्रमाणे जाड बुडाच्या भांड्यात दोन कप पाणी उकळायला ठेवलं, त्यात तुप आणि मीठ टाकलं. उकळलं की त्यात बरोब्बर दोन कप इडीअप्पम पीठ टाकलं. टाकता क्षणी हलवलं आणि तत्क्षणी ते उपम्यासारखं दिसु लागलं!
म्हणलं वाफ काढलं की होत असेल बुवा नीट. म्हणुन त्यावर झाकण ठेवलं. हां आता इंडक्शन कमी करायला विसरले मी जराशी पण म्हणुन काय ३० सेकंदात त्या पिठाने करपावं?? (आय ब्लेम इंडक्शन!) अर्धं पीठ जीवाच्या आकांताने तळाला चिकटलं होतं. मी जरासं हलवुन काय पाहिलं, सगळ पीठ काळं काळं दिसायला लागलं. मन घट्ट करुन ह्याचे काही मोदक होत नाहीत हे सत्य मी स्वीकारलं आणि नवर्याला फोन लावला. उकड चुकेल किंवा मोदक फुटतील अशा अपेक्षा त्याला होत्याच, पण उकड जळाली?? त्याचं खदाखदा हसुन झालं की म्हणलं बाबा तू घरी ये लवकर. आपण परत नुसतं तांदुळाचं पीठ घेऊन करुन पाहु.
ह्यावेळेस कुकरच घेतला डायरेक्ट. मागच्या वेळेस जे भांड घेतलं त्याचं बुड पुरेसं जाड नव्हतं वाटतं (आय ब्लेम भांडं!). पुन्हा दोन वाट्या पाणी उकळायला ठेवलं. ह्या वेळेस मात्र एक वाटी पिठ (अपना बझार तांदुळ पीठ - आणि अर्थातच आय ब्लेम अपना बझार) घातल्या घातल्याच ते चांगलंच मिळुन आलं. मी जात्याच चाणाक्ष असल्याने रेसेपीने काहीही सांगितलं तरी अजुन पिठ टाकलं नाही. मला चांगलं आठवत होतं की स्रुजाने सांगितलं होतं "चांगली दणदणीत वाफ काढ!". मग खाली लागत नाही ना हे सतत बघत दणदणीत वाफ काढली. (ऑफकोर्स, आय ब्लेम स्रुजा!). मनासारखी वाफ काढली की त्याला ताटात घेतलं आणि शक्य तेवढं मळलं. एवढी गरम उकड, पण मी हुं की चुं केलं नाही. फार सोशिक आहे हो मी. फायनली घेतला एक लहानसा गोळा आणि अक्षरशः तुपात बुडवुन बुडवन, चारदा मळुन, गोल गोल गरगरीत करुन मोदक करायला घेतला. पण हाय रे माझ्या कर्मा.. त्याला बारिक बारिक तडे जायला लागले. पहिला मोदक भुताचा म्हणुन दुसरा घेतला तर त्याचाही तोच अवतार..! वाफच कमी पडली बै म्हणुन परत ते सगळं प्रकरण पुन्हा कुकर मध्ये टाकुन परत दणदणीत वाफ काढली (स्रुजाच.. टु बी ब्लेमड )परत ते सगळं ताटात घेतलं आणि परत मोदक करण्याचा प्रयत्न चालवला.
उद्या तुम्हाला कुणी भाताची मुद देऊन ह्याचा मोदक करुन दाखव आणि कळ्या नाजुक काढ हं असं सांगितलं तर तुम्ही त्याच्या डोक्यात काय घालाल? मी कुकर घालेन..! भाताला आकार दिल्यासारखा आम्ही आपला प्रयत्न करतोय करतोय, त्या मोदकाचे तुकडेच व्हायला लागले. तरी मी बळं बळं सारण भरुन एक मोदक सदृश आकार बनवला. पण पुढच्याला मात्र सारण सुद्धा बाहेर येउन "काय चेष्टा लावलीये राव?" म्हणु लागलं.. मग त्याला "गप रे..गप" म्हणुन लाडु कसे वळतो आपण, तसं वळुन गप्पं करुन टाकलं. ह्या नादात त्याचा लाडुच झाला. तिकडे नवरा गेले साडे अकरा मिनिटं एक मोदक करायचा प्रयत्न करत होता.. मी जोरजोरात कुणा कुणाला ब्लेम करता येईल त्याची लिस्ट काढत होते..
"एक म्हण आहे ना ग!! आठवत नाही मला नीटशी.. काही तरी वाकडं.. कुणाचा तरी नाच.."
आय डेफिनाईटली ब्लेम नवरा..!
अखेर बर्याच झटापटीनंतर "उकडीचे लाडु" झाले. ते आधीच इतके शिजले होते की नाममात्र रेसेपी सेक ३० सेकंद वाफ काढुन आम्ही ते खायलाही घेतले. खाताना बाजुला सारणाचं भांडं घेतलं. एक घास मोदकाचा घेतला की एक बकाणा वर सारणाचा भरायचा.
सुंदरच लागत होते लाडु.. आपलं.. उकडीचे मोदक!
------------------------------------------------------------------------------------
ताजा कलमः-
मी मोदक लाडुंची पाककृती टाकल्यावर ४-५ तासातच मला इतके सल्ले मिळाले की का कोण जाणे परत एकदा मला "उकडीचे मोदक काही अवघड नाहीत" असं वाटायला लागलं. (स्रुजाला जमतात म्हणजे काय!!) ताडकन उठुन मी वाटीभर पाणी मीठ आणि तुप घालुन उकळलं. त्यात बरोब्बर एक वाटी पीठ टाकलं आणि लगेच इंडक्शन बंद करुन पटापट हलवलं. इंडक्शन बराच वेळ चांगलंच तापलेलं रहातं म्हणुन भांडं बाजुला सरकवलं आणि झाकुन ठेवलं. साधारण ५-६ मिनिटांनी ताटात घेऊन मळलं. सुमारे ५ मिनिटं पाणी आणि तुपाचा हात लावत लावत पुष्कळ मळल्यावर छोटा गोळा घेतला आणि मोदक करायला सुरवात केली. अगदी सुगरणीसारख्या मोदकाच्या कळ्या आल्या नसल्या तरी किमान कळ्या करता तर आल्या! सारण भरुन हलक्या हाताने मोदक बंद केला. असे ६-७ मोदक झाले. आणि मग ५ च मिनिटं वाफ काढली कारण मुळ उकडीत फार कच्चटपणा नसल्याने फार उकडायची गरज वाटली नाही.
आता बाप्पा करो आणि मला अमेरिकेतल्या भिकार सोना मसुरी नामक फडफडीत तांदुळाच्या ऐवजी भारतातल्या सुरेख तांदुळाची पिठी मिळो आणि बारिक बारिक कळ्या असणारा टप्पोरा मोदक माझ्या हातुन घडो!!
बघा तीन पैकी दोन मोदक किती चांगले जमलेत! आता एक भुताचा म्हणुन सोडुन द्यायचा!!

वाचने
80624
वाचनखूण
प्रतिक्रिया
232
अरेरे
In reply to अरेरे by सामान्य वाचक
मावे म्हण, ओव्हन म्हण.. काय
जबरदस्त हो !!!!
In reply to जबरदस्त हो !!!! by इरसाल
ख्या: ख्या: ख्या:
In reply to जबरदस्त हो !!!! by इरसाल
=))
खुपच बुवा विनोदी लिहितेस तू.
In reply to खुपच बुवा विनोदी लिहितेस तू. by सही रे सई
आणि हो मोदक वळून झाले की
In reply to आणि हो मोदक वळून झाले की by सही रे सई
तू सांगतेस तर परत करुन पाहिन.
In reply to तू सांगतेस तर परत करुन पाहिन. by पिलीयन रायडर
मधे
In reply to मधे by रुस्तम
बरोबर
पिरा..=))))
पाकृ सोपी करून
अरेरे!!
In reply to अरेरे!! by सूड
चायला सुडक्याला पण जमतात आणि
In reply to चायला सुडक्याला पण जमतात आणि by टवाळ कार्टा
सुडक्याला "पण" म्हणु नकोस.
In reply to सुडक्याला "पण" म्हणु नकोस. by स्रुजा
सुडक्या"सर" यांना ब्रेच कैकै
In reply to सुडक्या"सर" यांना ब्रेच कैकै by टवाळ कार्टा
हाहाहा, फार च आवडलंय मला हे.
In reply to हाहाहा, फार च आवडलंय मला हे. by स्रुजा
कर कर...तू चायनीज मोदक कर
In reply to चायला सुडक्याला पण जमतात आणि by टवाळ कार्टा
आपण कुणाला बोल्ताय?!!
In reply to अरेरे!! by सूड
असे नावाला जागु नये रे
In reply to असे नावाला जागु नये रे by अभ्या..
नाही तर काय!
In reply to नाही तर काय! by पिलीयन रायडर
पी पी पिरा मोदकांच्या
In reply to अरेरे!! by सूड
शप्पथ सांगते हे लिहीताना मला
In reply to अरेरे!! by सूड
सूड, तुझी बात वेगळी आहे
कुणीही यावे आणि हसत खेळत
In reply to कुणीही यावे आणि हसत खेळत by अभिजीत अवलिया
दिवेआगर पण कोकणच आहे. पण इथे
In reply to कुणीही यावे आणि हसत खेळत by अभिजीत अवलिया
अरे पण असतंच काय एवढं खास या
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by अभ्या..
पुन्हा एकदा हाय कंबख्त ;)
In reply to पुन्हा एकदा हाय कंबख्त ;) by स्रुजा
बायको
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by अभ्या..
नाही ते चांगले करणारे हवेत..
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by अभ्या..
+१
In reply to +१ by रुपी
साधे तळलेले म्हणू नकात ना,
In reply to साधे तळलेले म्हणू नकात ना, by अभ्या..
मी नाही, नवरा म्हणतो .. आता
In reply to +१ by रुपी
तळलेलेच मोदक भारी असतात! वादच
In reply to +१ by रुपी
Black
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by अभ्या..
अगदी मनातले बोललात.
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by अभ्या..
अरे पण असतंच काय एवढं खास या
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by सूड
हे मोदक कुठे मिळतील हे ही
In reply to हे मोदक कुठे मिळतील हे ही by पिलीयन रायडर
पण सूड भौ, तिला रेसिपी
In reply to हे मोदक कुठे मिळतील हे ही by पिलीयन रायडर
ओके, तर रेसिपी!! सारणाची
In reply to ओके, तर रेसिपी!! सारणाची by सूड
तुमचेही मोदक हुकले होते हे
In reply to तुमचेही मोदक हुकले होते हे by पिलीयन रायडर
कोरडी असते पण मळल्यानंतर नीट
In reply to कोरडी असते पण मळल्यानंतर नीट by सूड
पक्षी: निवगर्या वैगरे
In reply to पक्षी: निवगर्या वैगरे by सूड
ओके! परत नक्कीच ट्राय करेन!
In reply to पक्षी: निवगर्या वैगरे by सूड
ओ , निवग्र्या "कराव्या लागत"
In reply to ओ , निवग्र्या "कराव्या लागत" by स्रुजा
त्या करायच्याच असतात,
In reply to त्या करायच्याच असतात, by सूड
हां, ते बरोबर च ;)
In reply to ओके, तर रेसिपी!! सारणाची by सूड
रेसिपी
In reply to ओके, तर रेसिपी!! सारणाची by सूड
भारी रेसिपी!
In reply to भारी रेसिपी! by रुपी
हो हो.. मंग.. मुंग.. असं
In reply to हे मोदक कुठे मिळतील हे ही by पिलीयन रायडर
कुठे मिळतील म्हणजे? शिकावे
In reply to कुठे मिळतील म्हणजे? शिकावे by अभिजीत अवलिया
सुकांता.. आहे की सोप्पं उत्तर
In reply to सुकांता.. आहे की सोप्पं उत्तर by पिलीयन रायडर
सोपं नाहीच. माझ्या बायकोला पण
In reply to सोपं नाहीच. माझ्या बायकोला पण by अभिजीत अवलिया
इतकं काही कम्पल्सरी नाहीये!
In reply to सुकांता.. आहे की सोप्पं उत्तर by पिलीयन रायडर
गौरव स्नॅक्सला सुंदर मोदक
In reply to गौरव स्नॅक्सला सुंदर मोदक by पिशी अबोली
कुठय ते? १००% जाईन बाई मी..
In reply to कुठय ते? १००% जाईन बाई मी.. by पिलीयन रायडर
हैला, मला वाटलं गौरव स्नॅक्स
In reply to हैला, मला वाटलं गौरव स्नॅक्स by पिशी अबोली
तुच माझी खरी मैत्रिण!
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by अभ्या..
अभ्या आपल्या सोलापूरकड्चे
In reply to अभ्या आपल्या सोलापूरकड्चे by स्मिता चौगुले
ते मस्तच असतात हो स्मिताताई
In reply to ते मस्तच असतात हो स्मिताताई by अभ्या..
खिक्क..
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by अभ्या..
जाऊ द्या राजे घ्या मिटवून
In reply to अरे पण असतंच काय एवढं खास या by अभ्या..
मोमो टाईप
शिवाय मी एकदा भेंडीची भाजी
In reply to शिवाय मी एकदा भेंडीची भाजी by स्रुजा
तू आधी तुझ्या मोदकांचे फोटो
In reply to तू आधी तुझ्या मोदकांचे फोटो by पिलीयन रायडर
तो उगारलेला कुकर माझ्यावर च
In reply to शिवाय मी एकदा भेंडीची भाजी by स्रुजा
गॅस कोणी पेटवला मग ;)
In reply to गॅस कोणी पेटवला मग ;) by टवाळ कार्टा
बायका लावल्यात तीन!! तीन हजार
In reply to बायका लावल्यात तीन!! तीन हजार by पिलीयन रायडर
९ गं ९ हजार वाल्या. एवढ्या
काय लोकं असतात. गण्पतीच्या
In reply to काय लोकं असतात. गण्पतीच्या by खटपट्या
गणपतीच मोदक बिघडवत असतो.. आय
In reply to गणपतीच मोदक बिघडवत असतो.. आय by पिलीयन रायडर
माझ्या आइने हे मोदक बघीतले
In reply to माझ्या आइने हे मोदक बघीतले by खटपट्या
यात २ एपिक मोमेंटस होत्या. एक
In reply to यात २ एपिक मोमेंटस होत्या. एक by स्रुजा
गप की!! फुकट मला घोड्यावर
In reply to गप की!! फुकट मला घोड्यावर by पिलीयन रायडर
शोधतेच थांब.
In reply to माझ्या आइने हे मोदक बघीतले by खटपट्या
लोळले
In reply to काय लोकं असतात. गण्पतीच्या by खटपट्या
ओक्के खटपट्याजी, मग कोणत्या
In reply to ओक्के खटपट्याजी, मग कोणत्या by रेवती
गणपतीच्या दीवसात मोदक
In reply to गणपतीच्या दीवसात मोदक by खटपट्या
रेवाक्का आणि पिरा भयंकर
In reply to रेवाक्का आणि पिरा भयंकर by स्रुजा
परत येता?
In reply to परत येता? by पैसा
अर्रेर्र्र्रे!!! =))
In reply to परत येता? by पैसा
लोल.. नको आता मला रेवाक्का
In reply to रेवाक्का आणि पिरा भयंकर by स्रुजा
निशेध म्हणुन परत जावं का ??
In reply to गणपतीच्या दीवसात मोदक by खटपट्या
भावनाबद्दल तुमच्या घरी माहिती
In reply to भावनाबद्दल तुमच्या घरी माहिती by रेवती
बघा, काढलीत ना खपली? :(
=))
In reply to =)) by पैसा
ठ्ठो!! ___/\__
In reply to =)) by पैसा
=))
In reply to =)) by पैसा
लोळ :)
या लेखमालेतली 'सैराट पाककृती'