✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा

प
प्रचेतस यांनी
Wed, 08/31/2016 - 16:43  ·  लेख
लेख
औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच. १. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्‍याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं. २. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार ३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत. ४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे. मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात. ५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती. ६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस ७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर. ८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे. ९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला. हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
38591 वाचन

💬 प्रतिसाद (202)

प्रतिक्रिया

धाग्याच्या द्विशतक

महासंग्राम
Wed, 09/07/2016 - 15:01 नवीन
धाग्याच्या द्विशतक पूर्तीनिमित्त वल्ली शेठ आणि गणामास्तर यांचे उकडीचे मोदक देऊन सत्कार करणेत येईल. अखिल मिपा सत्कार संघटना अध्यक्ष : नाखु प्रेरणा स्थान : जेपी
  • Log in or register to post comments

ज्जेब्बात्त्त धागा आहे हा. :

झकासराव
गुरुवार, 09/08/2016 - 19:30 नवीन
ज्जेब्बात्त्त धागा आहे हा. :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा