गणेशचित्रमाला
नमस्कार मंडळी,
मिपागणेशचित्रमालेतील पहिले पुष्प गणेशचरणी अर्पण करताना अत्यंत आनंद होत आहे. मिपाकरांमध्ये असलेल्या विविध कला, कलेच्या सादरीकरणात असलेला त्यांचा उत्साह पाहता अशा कित्येक चित्रमाला मिपावर येऊ शकतील, हा विश्वास आहे.
विविध कलांचा स्वामी गणाधिदेव गणेशाचे हे प्रथमरूप आहे ओरिगामीतील. कागदाला केवळ घड्या घालून साकारलेली ही त्रिमित शिल्पे बनवण्यात आपले मिपाकर सुधांशुनूलकर ह्यांचा हातखंडा आहे. त्यांनी ओरिगामीत साकारलेला हा गणेश व मोदक समुच्चय. आपल्या मिपाच्या विशेषांकांच्या मुद्रितशोधनात सुधांशूदादांचा सिंहाचा वाटा आहे. कीटक/पक्षी/निसर्गनिरीक्षण ह्या त्यांच्या निस्सीम छंदांबद्दल मिपाकरांना माहीत आहेच.
-------
०६/०९/२०१६
.
.
पारदर्शक काचेवर मेहंदीसारख्या दाट रंगाने बाह्यरेषा रेखाटून त्यात पारदर्शक रंग भरणे म्हण्जे ग्लास पेंटिंग. हा छंद जोपासलाय आपल्या मिपाकर सूड ने. प्रभावी व अनवट शब्दकळा लाभलेल्या ह्या मिपाकराची गती स्वयंपाकघरातही चालते. अनेक लेख, कविता, विडंबने आणि पाककृती मिपावर सादर करतानाच ग्लास पेंटिंग मध्ये सूडने साकारलेला हा गणेश तितकाच अप्रतिम आहे यात शंका नाही.
--------
०७/०९/२०१६
रंगीत कागदाच्या पट्ट्यांना गुंडाळ्यांचा आकार देऊन त्यांनाच विविध आकारात बसवायचे. पेपर क्विलिंग असे नाव असलेल्या या तंत्राने विविध आकारातून,रंगातून साकारलेल्या गणेशचित्रकृतीला सादर केलेय आपल्या मिपाकर कलावंत नूतन यांनी. लहानपणापासूनच निसर्गरंगांशी गोडी लागली की प्रत्येक कृती कशी कलाकृती बनत जाते हे जाणवून देणारा अनोखा बाप्पा. पेपरक्विलिंग बाप्पा.
--------
०८/०९/२०१६
मिपा बाप्पा मोरयाच्या ह्या उपक्रमात अगदी नवीन/अपरिचित आयडींनी पण उत्साहाने आपल्या कलाकॄती पाठवल्यात. भिंतीवर लावण्यासाठी केलेले हे बाप्पाचे सुंदर म्युरल बनवले आहे आपले मिपाकर झुमकुला यांनी. एकदम साध्या भौमितिक आकारांचा, आकर्षक रंगाचा व पोताचा (टेक्ष्चर) वापर केलेले हे म्युरल नजर वेधून घेतेय एवढे मात्र नक्की.
---------
०९/०९/२०१६
कुलाबा (अलीबाग) किल्ल्यातील उजव्या सोंडेचे गणेश पंचायतन. आपण सहसा विष्णूपंचायतन बघीतलेले असते पण गणेश पंचायतन कमी आहेत. हे किल्ल्यातील गणेश मंदीराच्या गाभार्यात आहे आणि हे मंदीर रघुजी आंग्रे (कान्होजी आंग्र्यांचा नातु) यांनी १८व्या शतकात बांधले आहे. हा फोटो टिपलाय आपला भटकंतीचा ज्ञानकोष असलेल्या स्वच्छंदी_मनोज ने. डोळस भटकंती आणि अफाट माहितीचा खजिना हा मिपावरच्या अनेक लेख व प्रतिसादातून कायम दिसतो.
त्याचे ह्या फोटोसोबतच मांडलेले विचार वाचायला हरकत नाही.
..................................
"गणेश चित्रमालेची मिपावर घोषणा झाली आणि आपल्या जवळील गणपतीची चित्रे, फोटो पाठवण्याची विनंती झाल्यावर माझ्या मनात विचार आला की आपण काय पाठवू शकतो. मग असे सुचले की आपण एवढे ट्रेक करतो आणि इतक्या वर्षात अनेक वेळा अनेक ठिकाणी गणपतीच्या मुर्ती बघीतल्या आहेत, मग त्या किल्ल्यावर असोत, कि कुठल्या घाटवाटेत असोत, की कुठल्या लेण्यात असोत की कुठल्या गावातल्या मंदीरात, मग त्याच पाठवायला काय हरकत आहे.
सध्या आजूबाजूला वर्षागणीक वाढत जाणारा गणपती उत्सवाचा आनंद बघितला की वाटून जाते की एखाद्या मुर्तीलापण मिरवून घ्यायला तिचे स्वतःचे नशीब लागत असावे. कोणे एके काळी (फार नाही हो फक्त काहीशे वर्षेच झाली असतील) ह्या किल्ल्यांवरच्या, आडवाटेवरच्या, कुठल्यातरी गुहेतल्या, दुर्गम आणि कोपर्यातल्या गावातल्या मंदीरातल्या ह्या गणेशमुर्ती पुजल्या जात होत्या, नवस बोलल्या जात होत्या. पण जशी जशी माणसांची गळती गावातून शहराकडे होऊ लागली तशी ही गणेश मंदीरे ओस पडू लागली. एके काळी ज्यांच्या समोर दिपमाळा लागल्या, नैवैद्य ठेवले गेले, आरत्या म्हटल्या गेल्या, नवस बोलले/फेडले गेले, गावातल्या पोरापासून थोरापर्यंत ज्यांनी त्याला तुच आमचा रक्षणकर्ता, तुच आमचा कर्ता-धर्ता, भाग्यविधाता असे म्हटले त्या गणाधीशाला असे वर्षभर भक्तांच्या दर्शनापासून वंचीत बघीतले की वाईट वाटते. ज्या मंदीरांनी विजयगाथा ऐकल्या, ज्या गणेशाने विघ्नहर्ता आणि सुखकर्ता अशी भुमीका बजावली, ज्याच्यात तिथे मंत्रानी प्राणप्रतिष्ठा करून देवत्व फुंकले त्याच गणपतीला तिथेच त्याच जागी असे भक्तवंचीत बघून वाईट वाटते.
शहरातल्या डिजेंच्या कोलाहालात, खिशातल्या पैश्यांच्या वजनावर भक्त जोखणारा, आमचाच राजा कसा श्रेष्ठ असे हिरीरीने ओरडणार्या कार्यकर्त्यांमधे हरवलेला गणपती उत्सव त्याला तरी आवडेल काय याची शंका वाटते. गणेशोत्सव हा सण न गणेश केंद्रीत न राहाता सत्ता आणि पैसा केंद्रीत झालाय किंवा होतोय की काय अशी शंका शहरातले उत्सव बघून वाटते.
शेवटी देव हा देखील भक्तांचा भुकेला असतो हे खरे, पण न जाणे का पण माझे हात ह्या शहरातल्या मंदीरांपेक्षा त्या दुर्लक्षीत मंदीरातल्या एकदंताला जास्तच भक्तीभावाने जोडले जातात."
-----------
१०/०९/२०१६
हरिश्चंद्रगडावरचा हा बाप्पा राकट, कणखर, दगडाच्या देशाचा बाप्पा वाटतो कि नाही? अगदी त्याच्या ह्या शेंदूरमाखल्या रुपाला कॅमेर्यात उतरवलेय आपला मिपाकर मंदार भालेराव याने. सोबत कुणा अनामिक भक्ताने लावलेल्या अगरबत्तीचा दरवळ दिसतोय ह्या प्रकाशचित्रात. मंदारचे अनेक सुंदर अनुवाद मिपावर वाचायला मिळतात. प्रतिसादातून अन लेखनातून नवीन मिपाकराच्या पिढीचे प्रतिनिधित्व तो करतोय असे म्हणायला हरकत नाही.
------------
११/०९/२०१६
मिपाकरांच्या वाढत्या अन उत्साही प्रतिसादाने आज मात्र मिपाचित्रमालेचे रूपांतर एका चित्रगॅलरीत झाले आहे. आज या गॅलरीत तीन सुंदर चित्रे विराजमान झाली आहेत. डावीकडून पहिले जे गणेशचित्र आहे, ते पाठवले आहे amol gawali यांनी. राजकारणावर आणि सामाजिक कार्टून्स काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. मध्यभागीचे जे चित्र आहे ते रेखाटले आहे ज्येष्ठ मिपाकर राजेश घासकडवी यांनी. उत्क्रांतीविषयक अभ्यासपूर्ण लेखमाला लिहिणार्या घासकडवी गुरुजीकडून ही सरप्राईज गिफ्ट म्हणायला हरकत नाही. उजव्या बाजूचा झेंटँगल या चित्रकला शैलीतला गणेश आहे मिपाकर मोक्षदा यांचा. रासायनिक प्रदूषण टाळून नैसर्गिक गोष्टींचा पुरस्कार करणार्या चित्रकर्तीकडूनच गणेशाचे हे रूप आलेले आहे.
-------------
१२/०९/२०१६
उत्तराखंड राज्यामध्ये, रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये, मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांच्या खोऱ्यामध्य १२,०७३ फूट उंचीवर तुंगनाथाचे शिखर उभे आहे. शिखराच्या माथ्यावर पंच- केदारांपैकी तिसरेे म्हणून गणले जाणारे १००० वर्षांचे जुने शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील हा द्वारपाल गणराया.
ह्या अप्रतिम गणेशाला आपल्या भेटीसाठी आणलेय मनाने हिमालयातच मुक्काम ठोकून असलेल्या मिपाकर यशोधरा यांनी.
-------------
१३/०९/२०१६
आजचे प्रकाशचित्र कुणी पाठवले असावे ते सांगायची गरज नसावी. अर्थातच प्रचेतस. लेण्या, मंदीरे आणि इतिहासावर अत्यंत अभ्यासू लेखांचा धनी असणार्या प्रचेतसला भुलेश्वराने पाडलेली भूल मिपाकरांना परिचयाची आहे. पुणे-सोलापूर रोडवरील यवतनजिक असलेल्या भुलेश्वर मंदिरातील हे अप्रतिम वैनायकी/गणेशिनी शिल्प. जशा मातृका ह्या त्यांच्या पुरुष रुपाच्या शक्ती असतात तशी ही गणेशाची शक्ती शाक्त वा तंत्र पंथीयाकडून मानली जाते.
--------------
१४/०९/२०२१६
ह्या रॉकस्टार गणेशाला फोटोशॉप वापरुन सजवलेय मिपाकर कलावंत नीलमोहर यांनी. नेहमीच्या रंगीत माळांच्या उजेडात असणारा बाप्पा आज निऑनग्लो मध्ये स्टार बनलाय.
--------------
१५/०९/२०१६
आज समारोपाचे हे बॅनर देताना मला अतिशय समाधान वाटतेय. आपल्या मिपाचा हरहुन्नरी कलाकार स्पा याने खास मिपासाठी वेळात वेळ काढून ही गणेशाची प्रतिमा पाठवली आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर, थ्रीडी मॉडेलर आणि भयकथा लेखक म्हणून स्पा यांची मिपाला ओळख आहेच. सोबतच ह्या चित्रात ज्या काव्यमाला दिसताहेत त्या आहेत आपल्या मिपाकर साहित्यिक माधुरी विनायक यांच्या. जडणघडण सारख्या प्रांजळ लेखमालेतून आपला एक ठसा उमटवणार्या माधुरी विनायक यांनी ह्या भक्तीपूर्ण ओळी खास मिपाचित्रमालेसाठी लिहिल्यात हे विशेष.
वाचने
56097
वाचनखूण
प्रतिक्रिया
181
दोन्ही कलाकृती अप्रतिम!
सूडने काढलेला गणपतीही भारी दिसत आहे.
In reply to सूडने काढलेला गणपतीही भारी by किसन शिंदे
तू नुसते भारी म्हण आणि तसाच बस.
सुरूवात तर झकासच! गणेशाची रुपे पाहण्यास उत्सुक आहे.
स्वाती
ग्लासगणेश मस्त हो!
दोन्ही बॅनर आवडले.
ही कल्पनाच खुप आवडली आहे! मिपाकरांच्या कलाकृतींमधुन बनलेले बॅनर्स!
जब्रा
सूड्राव कलाकार आहेत हे माहीत नव्हते. जबरदस्त पेंटींग...
दोन्ही बॅनर्स खूपच सुंदर आहेत. कलाकारांची आणि रंगभुषा मंडळाची हरकत नसेल तर नुसत्या कलाकृतींचे फोटो मोठ्या आकारात पाहायला मिळतील का?
In reply to दोन्ही बॅनर्स खूपच सुंदर आहेत by रुपी
अवश्य येतील. अपेक्षेपेक्षा खूपच जास्त प्रवेशिका आल्या. काहीजणांनी आपल्या पाल्यांनी रेखाटलेले गणेश पाठवले.(त्यानी नाराज होऊ नये, हि चित्रमाला मिपाकरांसाठीच होती. बच्चेपार्टीसाठी दिवाळीच्या सुट्टीत काहीतरी अवश्य करुयात) आता बोर्डावर येणार्या दहा प्रवेशिका आणि उरलेल्या चित्रकृती ह्याच धाग्यात पाहायला मिळतील. सर्वात शेवटी मूळ चित्रे पण पब्लिश करु. त्यामुळे रंगभूषा मंडळाने ह्यात नक्की काय केले हे तरी मिपाकरांना कळेल. आणि तशा पध्दतीने काम करायला अजून काहीजण प्रेरित झाले तर बाप्पाचीच कृपा.
In reply to अवश्य येतील. अपेक्षेपेक्षा by अभ्या..
वाह !! हा विचार खूप आवडला. रंगभूषा मंडळाचे खास कौतुक. केवळ आपली कला सादर करत न राहता तुम्ही मिपाकरांना त्यात सामील करुन घेतलं, त्यांना प्रवृत्त केलं यासाठी अभिनंदन. मुळ सकस कलाकृती वर रंगभूषाचा सिग्नेचर स्ट्रोक हे समीकरण प्रचंड जुळुन आलं आहे.
नूलकर काका, सूड आणि नुतन चे बॅनर्स अप्रतिम झाले आहेत. तिन्ही कलाकारांचे अभिनंदन आणि कौतुक. नूलकर काका तर हरहुन्नरी कलाकार आहेत हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ___/\___
अॅल्युमिनियम फॉइलसारखं टेक्स्चर सेलेक्ट केल्याबद्दल आणि झालेल्या कौतुकाबद्दल प्रचंड आभारी आहे. आता पुढल्या चित्रांबद्दल उत्सुकता आहे.
मागच्या वेळेसारखं टिळक स्मारक मध्ये ओरिगामी प्रदर्शन असलं तर नक्की कळवा नूलकरकाका.
मस्त सूडराव
नूतन, सुरेख कलाकृती! बाप्पा फारच सुरेख!
आजचा पेपरक्विलिंग बाप्पा १ नंबर आहे :)
प्रचंड मेहनतीचं काम आहे पेपर क्विलिंग म्हणजे, बहोत खुब नूतन :)
फार सुंदर! मस्त आहे ही संकल्पना
नूतन, सुरेख कला! अतिशय सुंदर झालाय बाप्पा!
मस्त जमलाय गणपती. खूप बारीक आणि कठीण काम आहे.
पेपर क्विलिंग ,ग्लास पेंटिंग दोन्ही बाप्पा देखणे.
आजचा बाप्पा खूप छान आहे ! एकाहून एक सरस कलाकृती पहायला मिळत आहेत या कल्पक प्रकल्पाच्या निमित्ताने !
In reply to आजचा बाप्पा खूप छान आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
होय नव नवीन माध्यमे आणि नवीन कलाविष्कार!
पेपर क्विलिंंग बाप्पा सुंदर बनवलाय.
सुन्दर!!
नूतनताई सुंदरच बनवलायस ग बाप्पा!!
क्विलिंग एकदम पर्फेक्ट!!
तिनही कलाकृती जबरदस्त आवडल्या. नुलकर काकांचा ओरीगामी, सूडचे ग्लास पेंटींग आणि नुतन यांचे क्विलींग.
शिवाय या धाग्याची मांडणीही सुंदर केली आहे.
याच कलाकृती जशा आहेत तश्या पहायला मिळतील का? (म्हणजे त्यांचे वरीगीनल फोटो)
गणपती बाप्पा मोरया.
पैजारबुवा,
पेपरक्विलिंग बाप्पा सुरेख आहे नूतन!
स्वाती
सर्व कलाक्रुती अतिशय सुरेख !!!
तीनही चित्रं एकापेक्षा एक सरस.
चित्रावर क्लिक केल्यावर त्याची मोठी आवृत्ती पाहायला मिळण्याची सोय करता येईल का? विशेषतः पेपर क्विलिंगच्या चित्रात खूप बारकावे आहेत. मोठ्या चित्रात ते दिसायला मदत होईल.
पेपर क्विलिंग
__/\__
सुरेख !!!
आजचे बॅनर फारच आवडले. फारच "फेस्टिव्ह" वाटत आहे!!
ह्या उपक्रमाचे परत कौतुक करावे वाटते. नुतन सारख्या, फारशा मुख्य बोर्डावर न लिहीणार्या आयडींकडे इतकी सुंदर कला आहे हे ह्या उपक्रमामुळेच कळाले. खरं तर अभ्या सारखे व्यावसायिक कलाकार असताना आणि रंगभुषा मंडळच अशा कलाकारांनी समृद्ध असताना, संपुर्ण गणेशोत्सवात त्यांनी एकाहुन एक सरस बॅनर्स दिले असते आणि संपुर्ण मिपाने त्यांना नावाजले असते.. पण अशावेळी स्वतःचे कौतुक मागे सारुन मंडळाने मिपावरच्या ह्या लपलेल्या कलाकारांना वाव देणे अत्यंत कौतुकास्पद आहे! मिपाकरांच्या कलाकृती आणि रंगभुषा मंडळाचे कौशल्य ह्यातुन अप्रतिम बॅनर्स बनत आहेत.
अशा सर्वसमावेशक उपक्रमाबद्दल रंगभुषा मंडळाला धन्यवाद!
पेपर क्विलिंगचा गणपतीही सुरेख आहे!
खरंच हा उपक्रम फारच आवडला.
शिवाय रोज एक-एक लेख, पाकृ आणि बॅनर येत असल्यामुळे वाचायला वेळही पुरेसा मिळत आहे.
म्युरल फारच आवडलं.मस्त.
आजचेही बॅनर मस्त!
वा, मस्त म्युरल!
म्युरल फारच भारी आहे!
कामाच्या व्यापातून वेळ मिळाला की असे एखादे स्वतःच्या घरासाठी बनवायची माझी इच्छा आहे.
"झुमकुला" आयडी पण फारच भारी ;)
सर्वप्रथम या उपक्रमासाठी संचालक मंडळ व रंगभूषा मंडळाचे आभार. गणेशचित्रमाला या उपक्रमाने नवनवीन कलाकारांना एक व्यासपीठ लाभले आहे. आतापर्यंतच्या सर्वच कलाकृती खूप आवडल्या. मी हौस म्हणुन क्विलींग शिकायला सुरूवात केली व नातेवाईक तसेच मित्रमंडळींसाठी शुभेच्छा पत्र, वाचन खूणा, की चेन, गिफ्ट टॅग्स, निरनिराळ्या प्रकारचे कानातले, गाडीत लावायच्या बाप्पाच्या मस्तकावर टांगण्यासाठी छत्री असे अनेक प्रकार केले. मिपाच्या या उपक्रमामुळे मला क्विलींगचा बाप्पा करायची प्रेरणा मिळाली व गजाननाच्या चरणी अल्प सेवा रुजू झाली. सर्व सदस्यांचे व कौतुक करणार्यांचे मनःपूर्वक आभार.
मिपाकरांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा प्रयत्न आवडला. मिपाकरांनीही या संधीचं सोनं केलं. नुलकर काका, सूड, नुतन यांची कलाकारी आणि आजचे म्युरल अतिशय आवडले.
या धाग्याचा दुवा कुठे सहज दिसेल असा देता येईल का?
नविन चित्र पाहिले की त्याच्या मागचा कलाकार कोण आहे जाणण्यासाठी हा धागा शोधावा लागतो.
In reply to अतिशय स्तुत्य उपक्रम !! by सतिश गावडे
गणेशचित्रमालेच्या चित्राला या धाग्याची लिंक द्या
In reply to गणेशचित्रमालेच्या चित्राला या by मोदक
डन
धन्स मोदका
In reply to डन by प्रशांत
धन्यवाद हो..!! :)
खुपच छान
अमोल
हे म्यूरल विकत घ्यावेसे वाटत आहे. अतिशय सुंदर!
झुमकुला, म्युरल आवडले. कसे केलेत तेही थोडक्यात सांगा प्लीज!
In reply to झुमकुला, म्युरल आवडले by पैसा
सर्वप्रथम सगळ्या प्रतिसादकांचे आभार,
पैसाताई हे म्युरल टाकाऊतून टिकाऊ ह्या प्रेरणेतून बनवले होते.
घरी फर्निचर चे काम चालू असताना राहिलेल्या लाकडी पट्ट्या आडव्या कापून पाठीमागे लावल्या. POP वापरून बाप्पा मोल्ड केला आणि थोडा ओबड धोबड मोल्ड केला जेणेकरून त्याला एक दगडी texture येईल. नंतर एक उरलेला सनमायकाचा तुकडा कापून त्यावर textured कागद चिटकवून त्यावर बाप्पा चिकटवले आणि वर्तनमानपत्रांचा कागद वापरून बाजूचे दोन आकार बनवले आणि वरून हॅन्डमेड पेपर चिटकवले. सगळ्यात शेवटी रंगकाम करून बाप्पाला भिंतीवर विराजमान केले.
In reply to सर्वप्रथम सगळ्या by झुमकुला
अतिशय आवडलंय.
सुंदर म्युरल !
झक्कास आहे आजचा बॅनरही
मस्त!