तुझ्या माझ्या ठरलेल्या भेटीला
आधी पावसाने भेट दिली
भिजलो आधीच चिंब मी
समोर तुला भिजताना पाहिली
पाहत होतो पळत येत होती तू
तोल सावरत वर पाहताना मला
क्षणभर वाटलं पाहता आलं असतं तर
SLOW MOTION मध्ये येताना तुला
पावसात भिजली जमीन
गंध मातीचा आला
सजली फुले सभोवती
जशी तुझ्या स्वागताला
वेले लपेटावी कोण्या निपर्ण झाडाला
अन रंगत यावी त्याच्या जगण्याला
कृष्ण धवल जगण्यात माझ्या
उमटवलस तू इंद्रधानुला
हातात माझ्या हात तुझा
नयन नयनाशी भिडले होते
मिठीत माझ्या तुला घेताना
वाटे हात तोकडे होते........
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1689
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह.... शेवटचं कडवं सहीच बरं
+१
In reply to वाह.... शेवटचं कडवं सहीच बरं by महासंग्राम
धन्यवाद.....
चांगलीय
धन्यवाद.
In reply to चांगलीय by एक एकटा एकटाच