बाप्पाचा नैवेद्यः आंबा मोदक
.
साहित्यः
आटवलेला आंब्याचा रस एक वाटी,
साखर दोन वाट्या,
वेलची पावडर,
पाणी,
मोदकाचा साचा
.
.
कृती:
दोन वाट्या साखर कढईत घ्या. त्यात एक वाटी पाणी घाला. मध्यम गॅसवर ठेवून ढवळत रहा. साखरेचा गोळीबंद पाक करायचा आहे. एका वाटीत अर्धी वाटी पाणी घ्या. पाकाचा थेंब पाण्यात टाकून पाहा. पाकाची घट्ट गोळी झाली की गॅस बंद करा.
आता या पाकात चिमूटभर वेलची पावडर घाला आणि लगेच रसाचा गोळा मिसळा. खाली उतरून घोटत राहा.
चांगला गोळा झाला की मोदकाच्या साच्यात घालून मोदक करा. याच्या वड्या करायच्या असतील तर गोळा झाल्यावर ताटाला तूप लावून त्यात गोळा थापा आणि वड्या पाडा.
आमरसाचा सुंदर स्वाद आणि रंग येतो या मोदकांना!
.

वाचने
22621
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
वा! मस्त पाककृती!
फोटो भारी आलेत!
वा. वा. !!!
जब्रा....आवडले मोदक.
-दिलीप बिरुटे
चविष्ट दिसताहेत. मस्तच.
मुख्य म्हणजे जमण्यासारखे..
ता.क. आटवलेला रस म्हणजे "देसाई बंधूंचा " विजय पलप समान काही का? नक्की काय नावाने मागायचा दुकानात?
(अगदी बाळबोध प्रश्न आहे पण निराकरण व्हावे म्हणून विचारले.
वरील प्रश्न देसाई बंधूंची जाहीरात नाही हे समजून घेणे..
जाहीर आत नाखु
In reply to मस्त आणि by नाखु
देसाई बंधू माझ्या माहेरच्या गावचे पण त्यांच्याकडे कोणत्या नावाने मिळतो हे नाही माहित. रस आटवलेला असावा पण त्यात वरून पिठीसाखर मिसळलेला नको. आटवलेला रस विचारल्यावर कळेल देसाईबंधूना!
मस्तं दिसतायेत आंबा मोदक
बाप्पा खुष होणारचं :)
फोटो ही सुरेख आलेत.
मस्त पाकृ!
In reply to मस्त पाकृ! by पैसा
अनन्न्या ताई
तुम्ही आटवलेला आंब्याचा रस घरी कसा बनवता ?
In reply to +1 by रुस्तम
चुलीवर मोठ्या पराती ठेऊन त्यात आंब्याचा रस काढून आटवत ठेवला जातो हा रस खूप उडतो म्हणून लांब दांडयाचे लाकडी उलथे वापरतात. रस आटत आला की त्यात साखर घालून परत आटवतात. घट्ट होत आला की गार करायला ठेऊन मग गोळे करून ठेवतात. हे गोळे वर्षभर चांगले टिकतात.
माझ्या माहेरी असा आटवलेला रस करून विकायला
ठेवतात तो मी आणते.घरी करताना कढईत थोड्या प्रमाणात करता येतो पण मी मे महिन्यात माहेरी जाऊन तिथून करून आणते.
In reply to उन्हाळ्यात बनवून ठेवते by अनन्न्या
धन्यवाद ताई
In reply to उन्हाळ्यात बनवून ठेवते by अनन्न्या
असं आटवल्यावर खमंग चव येते का मस्त?!
फारच आवडले हे मोदक!
अनन्या ,
छान झाले आहेत मोदक
फोटो चांगले,
पट्कन एक उचलावसा वाटतोय. प्लिज मिपाने ही सोय करुन द्यावी ;)
थाळीतले मधले मोदक मी फस्त केले आहेत असे समजुन घ्यावे, बाकीचे उरलेले प्रसाद म्हणुन वाटण्यास हरकत नसावी ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माझा गणपती... :- मी येतोयमस्त दिसताहेत मोदक.पाकृ. छान.
मस्त दिसताहेत मोदक.पाकृ. छान.
गणेश उत्सवाच्या खुप खुप शुभेच्छा आणि आंबा मोदक खासच झाले आहेत. तोंपासू फोटो
या सर्वांनी गणपती बघायला आणि मोदक खायला!
झकास.. तोंडाला पाणी सुटले..!!!!
मस्त दिसताहेत मोदक.पाकृ. छान.
मोदक सुरेखच दिसत आहेत. पाकॄ तर छानच! बाप्पाच्या नैवेद्याची सुरूवात झकास!
स्वाती
अनन्या, मस्तच दिसताहेत मोदक.
मस्त सुरुवात नैवेद्यासाठी.
मस्त, माझ्याकडे साचा असायला हवा होता, आता लाडू करावे लागतील:)
In reply to मस्त, माझ्याकडे साचा असायला by सप्तरंगी
लाडूपेक्षा
सुंदर पाकृ.बाप्पाच्या नैवेद्याची छान सुरूवात मोदकाने!
।।गणपती बाप्पा मोरया।।
सुंदर आहे पाकृ.
नैवेद्य आवडला.
मस्त पाककॄती
बाप्पा खूश होईल!
सुरेख आणि नाजूक नैवेद्य !
तोंडाला पाणी सुटलं ना!!
आख्खं ताट भरून आंबा बर्फी संपवू शकेन (एका वेळेस बास होतील कदाचित)
मस्त!
आवडलं.
सुंदरच!! सध्या उकडीच्या मोदकाच्या सारणात नारळाचा चव+आमरस असं करण्याचा विचार चालू आहे. बघू कसं जमतंय.
In reply to सुंदरच!! सध्या उकडीच्या by सूड
कर आणि नक्की सांग! पातोळ्या पण अशा वेगवेगळ्या सारणाच्या छान लागतात म्हणून विचार करत होते की मोदक पण चांगले लागतील.
In reply to सुंदरच!! सध्या उकडीच्या by सूड
फार सुरेख लागतात रे असे मोदक. हवे तर उकडीत किंचित केशरी रंगही घाल. फार सुरेख दिसतेही आणि चव तर भन्नाटच येते.
तसेच नारळाच्या सारणात गुलकंद घालूनही छान होतात. उकडीचे,तळणीचे मोदक, करंज्याही.. :)
स्वाती
तोंपासु :)
वा.. सुंदर :)
चविष्ट पाक्रु !!!
सुरेख,देखणी,चविष्ट पाककृती.
फार, फार सुरेख. तुझ्या सगळ्याच पाकृ अप्रतिम असतात आणि मला तुझं त्यातलं साधेपणातलं सौंदर्य फार भावतं.
एवढ्या साध्या पाकृला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल! माझी आई हे मोदक करून विकायची गणपतीत, त्यामुळे मी देणारच नव्हते.
In reply to धन्यवाद! by अनन्न्या
साधी?!! अगं तुझ्या पाकृ पाहुन असं वाटतं की हे जमेल आपल्याला! खुप काही तरी फॅन्सी बघायला भारी वाटलं तरी पटकन करावं वाटत नाही. पण तुझ्या पाकृ मात्र अगदी आईनेच समजावुन सांगितलंय असं वाटतं!
साधं.. सोपं.. आणि सुंदर!
आंब्याचे सगळेच पदार्थ मला फार आवडतात. मोदक फारच सुरेख आणि रुचकर दिसतायेत.
मस्त पाकृ!
भारी लागत असणार हे मोदक.
वा! मस्त पाककृती!