आमची प्रेरणा
मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. तिचा नवरा चिन्मय (माझ्या दुसऱ्या एका मित्राचा मुलगा) लहानपणी आमच्या मांडीवर खेळलेला असल्याने आम्हा दोघांना त्यांचे नवीन घर बघण्याची फार उत्सुकता होती.
आम्ही सगळे घर बारकाईने बघितले. कुठे काय कसे घर सजवले आहे हे बघत आम्ही नवरा-बायको आपसात बोलत होतो. ऋतुजा ( तिची मुलगी) कुठल्या शाळेत जाते ? आम्ही विचारले, पण तिने तिकडे दुर्लक्ष केले. रुचिराकडे तीन मोबाईल आहेत. एक खास सेल्फी आणि व्हाट्सअँप साठी, एक टॅब फेसबुक आणि सिरियल्स बघण्यासाठी आणि एक ऋतुजाला कार्टून्स बघण्यासाठी. माय-लेकी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यातच बिझी असतात. भूक लागली की पिझ्झा, चिप्स, कोक मागवून घेतात... आणखी काही करायला वेळच मिळत नाही ... वगैरे कौतुकाने सांगत होती.
या गप्पा चालू असतानाही तिचे माना वेळावून सेल्फी घेणे, त्या लगेच व्हाट्सअँप वर पाठवणे वगैरे चालूच होते. त्यातूनच क्षणभराची गॅप पकडून मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे, हे मला ठाऊक होते, पण नवीन घराचे मात्र आजच कळत होते. .
मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो, ब्रेकफास्ट तयार करतो, तिला आठवड्याची अंघोळ घालतो, सर्वांसाठी स्वयंपाक करून जेवायला वाढतो. दोन दिवस घराची पूर्ण साफसफाई, कपडे धुणे वगैरे त्यानेच करायचे. शनिवार रविवार मला पूर्ण फ्री.
माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो, कारण व्हाट्सअँप, फेसबुक आणि सिरियल्स मधून तिला इतर काही करायला तिला अजिबात फुरसत नसते हे तिने सांगितलेच होते.
बाहेर पडल्यावर बायको म्हणाली ही घरीच तर असते (होम मेकर आहे). नवरा बिचारा पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो, भरपूर पैसे मिळवतो. ही इथे हिरॉईन सारखी राहते. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे.
तीन मोबाईल असल्याने नऊ हजार रुपये वायफाय आणि मोबाईल डाटावर खर्च करते आहे. मुलगी चार तास शाळेत असते, त्या वेळात ती आपल्या मैत्रिणींबरोबर मॉल्स मध्ये शॉपिंग आणि किट्टी पार्टी वगैरे आटोपते, किंवा माहेरी जाऊन बसते... पाची दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवऱ्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा ?
मी अजून विचार करतो आहे.आपल्याच मित्राची भाची आहे. ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर?
वाचने
14720
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखनप्रकार
बरं... पाच दिवस घराची साफसफाई
+११११११
In reply to बरं... पाच दिवस घराची साफसफाई by मराठी कथालेखक
+११११११
In reply to बरं... पाच दिवस घराची साफसफाई by मराठी कथालेखक
एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी
चित्रगुप्ताचा हिशेब हँहँहँ।
निरिक्षण
सॉरी टू से... पण म्हातारं
In reply to निरिक्षण by चित्रगुप्त
म्हातारपण
In reply to सॉरी टू से... पण म्हातारं by संदीप डांगे
साहेब, तुम्ही तुमचे जीवन
In reply to म्हातारपण by चित्रगुप्त
डांगे अण्णा
In reply to साहेब, तुम्ही तुमचे जीवन by संदीप डांगे
ब्वॉर्र!
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
आपला हा प्रतिसाद आवडला. चार
In reply to म्हातारपण by चित्रगुप्त
वरील प्रतिसाद चित्रगुप्त
In reply to आपला हा प्रतिसाद आवडला. चार by अमितदादा
+11111
In reply to सॉरी टू से... पण म्हातारं by संदीप डांगे
dange saranna
In reply to +11111 by क्षमस्व
अरे वा मस्तच की.
वस्तुस्थिती दर्शविणारा लेख
"वृत्ती"च्या गोग्गोड अन
बापूसाहेब
In reply to "वृत्ती"च्या गोग्गोड अन by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
वा बापूसाहेब,
In reply to बापूसाहेब by कैलासवासी सोन्याबापु
शितावरून भाताची परिक्षा.
In reply to वा बापूसाहेब, by सुबोध खरे
पेठकर साहेब
In reply to शितावरून भाताची परिक्षा. by प्रभाकर पेठकर
अरेच्या! हे शितावरून भाताची
In reply to शितावरून भाताची परिक्षा. by प्रभाकर पेठकर
:)
In reply to अरेच्या! हे शितावरून भाताची by कैलासवासी सोन्याबापु
अभ्या भौ
In reply to :) by अभ्या..
असो, आमचा अभ्या म्हणतो तसेच म्हणतो गणपती नंतर बदलणारे मी स्वभाव :)हे वरती सोन्याबापु जे प्रतिसादात म्हणाले ते नेमक काय आहे कृपया स्पष्ट करावे हि विनंती.म्हणींची गंमत असते त्या दोन्ही बाजुंनी असतात
In reply to शितावरून भाताची परिक्षा. by प्रभाकर पेठकर
मग टोकाचे उदाहरण देऊन
In reply to वा बापूसाहेब, by सुबोध खरे
माझा मुद्दा यात कुठे आला ? मी
In reply to मग टोकाचे उदाहरण देऊन by कैलासवासी सोन्याबापु
प्रतिसाद डांगेंना आहे का मला?
In reply to माझा मुद्दा यात कुठे आला ? मी by सुबोध खरे
तुम्ही त्या उदाहरणाचे
In reply to प्रतिसाद डांगेंना आहे का मला? by कैलासवासी सोन्याबापु
सुबोध सर आपले प्रतिसाद दुर्बोध वाटत आहेत.
In reply to माझा मुद्दा यात कुठे आला ? मी by सुबोध खरे
डांगे साहेब कोण किती शिकलेले आहेत ते मला माहित नाही परंतु चित्रगुप्त साहेबांची फारशी माहिती नसताना त्यांच्या एक न पटलेल्या मुद्द्या वर हि अशी भाषा ?काय झालं की काल रात्री भला
In reply to माझा मुद्दा यात कुठे आला ? मी by सुबोध खरे
आपण थोर सर्वज्ञ असे आहात. मी
In reply to काय झालं की काल रात्री भला by संदीप डांगे
हाच फरक आहे आयटी आणि नॉन
In reply to काय झालं की काल रात्री भला by संदीप डांगे
रातीचा हंगोवर हो! दुसरं काय
In reply to हाच फरक आहे आयटी आणि नॉन by मोदक
=))
तिला आठवड्याची अंघोळ घालतोआठवड्यातून एकदाच अंघोळ करणे/घालणे प्रकृतीच्या दृष्टीने बरे नाही असे सांगा त्या नवराबायकोंना ;) :)हा: हा: हा:
In reply to =)) by डॉ सुहास म्हात्रे
चित्र मिस केली..