✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गाणी आणि आठवणी - भाग २

स
समीरसूर यांनी
Tue, 01/27/2009 - 15:14  ·  लेख
लेख

Book traversal links for गाणी आणि आठवणी - भाग २

  • ‹ गाणी आणि आठवणी - भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11174 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

छान

सहज
Tue, 01/27/2009 - 15:25 नवीन
समीर दोन्ही लेख आवडले. मन-हृदय-मेंदु-आठवण या चारही ठिकाणी "कॅच कॅच" खेळल्यासारखे वाटले. ज्यांना वाक्य समजणार नाही त्यांनी ही एका ओळीची कविता आहे समजावे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

समीरसूर
Wed, 01/28/2009 - 09:52 नवीन
धन्यवाद, सहज! असेच काहीतरी असावे असा माझादेखील कयास आहे. :-) --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

संदर

दिपक
Tue, 01/27/2009 - 15:49 नवीन
सुंदर लेख! ऎकलेल्या बहुतेक गाण्यांशी निगडीत कुठलीतरी आठवण असतेच. ’दिवाना’ चित्रपटातली ’पायलिया...’ , ’कोई ना कोई चाहिये...’ गाणी ऎकली की दुपारी ऑटो रिक्षात बसुन केलेली थट्टा मस्करी आठवते.. ’ऎ काश के हम...’ गाणे ऎकले की ऎन थंडीच्या दिवसात पडद्यावर पाहिलेला ’कभी हा कभी ना’ आठवतो. ’साजन’ मधले ’देखा हे पहली बार’ आणि ’सांवली सलोनी तेरी...’ ऎकले की व्हिडियोकॉनच्या वॉकमन (अजुनही आहे)वर ही गाणी ऎकत केलेला मुंबई-संगमनेर यस्टीचा प्रवास आठवतो. आठवणींच्या जगात घेऊन गेल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

होय

समीरसूर
Wed, 01/28/2009 - 09:44 नवीन
'दीवाना' चित्रपट माझ्या अंदाजानुसार १९९२-९३ ला आला होता. आम्ही मित्र आमच्या गावाकडे एका मित्राच्या शेतात भरीत पार्टीला गेलो होतो तेंव्हा या सिनेमाची गाणी खूप वेळा ऐकली होती. ही गाणी ऐकली की त्या पार्टीची आठवण हमखास येते. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला (डिसेंबर २००६) आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. प्रचंड थंडी आणि एमटीडीसीचे ब्रिटीशकालीन रिसॉर्ट! त्यामुळे बराच वेळ आम्ही खोलीतच राहत असू. तेंव्हा 'काबूल एक्सप्रेस' चे "काबूल फिजा, ये है काबूल फिजा..." हे गाणे टीव्हीवर सारखे लागायचे. त्यामुळे हे गाणे ऐकले की ती महाबळेश्वरची सहल आठवते आणि तिथली थिजवणारी थंडी आठवते. "आ आ जाने जाना, ढूंढे तुझे दीवाना..." हे गाणे ऐकले की आम्ही मित्रांनी कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत असतांना केलेली गणपतीपुळ्याची सहल आठवते कारण प्रवासात आम्ही हे गाणे खूप वेळा ऐकले होते. "दिलबर, दिलबर..." (सिर्फ तुम), "हम दिल दे चुके सनम...", "लडकी बडी अंजानी हैं..." (कुछ कुछ होता हैं), "अरेरे अरे ये क्या हुआ, मैने न ये जाना..." (दिल तो पागल हैं), "लडकी...शहर की लडकी..." (रक्षक)... ही गाणी ऐकली की कराडच्या प्रभात, रॉयल, राजमहाल या चित्रपटगृहांची आणि फन एन फूड नावाच्या मिनी थिएटरची आठवण आवर्जून येते. कराडला ४ वर्षात आम्ही खूप सिनेमे पाहिले. 'परिंदा' मी रॉयलला सलग तीन दिवस पाहिला कारण त्यातले "प्यार के मोड पे, छोडोगे जो बाहें मेरी..." हे आशा भोसलेंनी गायिलेलं नितांतसुंदर गाणं मला बघायचं, अनुभवायचं आणि लक्षात ठेवायचं होतं. त्यामुळे 'परिंदा' आमच्या कराडच्या दिवसांपेक्षा खूप जुना असला तरी हे गाणे ऐकले की मला कराडचे दिवस आणि कृष्णेच्या जवळ असलेलं रॉयल थिएटर आठवतं. खूप छान थिएटर होतं. अजूनही आहे. पुण्याच्या मंगला टॉकीजच्या मालकांचे ते थिएटर आहे आणि तिथे मंगलाचा फोटो देखील लावलेला आहे. 'जमाई राजा' मधलं "प्यार हुआ हैं मुझे और तुझे, ये मान भी जा तू, नजरे तो मिला तू..." हे लक्ष्मीकांत्-प्यारेलाल यांचं गाणं ऐकलं की मला मंगलामध्ये पहिलेला 'जमाई राजा' आठवतो........यादी खूप मोठी आहे आणि आणखी मोठी होतच जाणार आहे कारण अजून बरीच गाणी ऐकायची आहेत, मनात साठवायची आहेत आणि वेळप्रसंगी आठवून आठवणींची सहल अनुभवायची आहे. :-) --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

खुपच छान!!!

किट्टु
Tue, 01/27/2009 - 15:39 नवीन
समीर, तुमचे दोन्ही लेख खुप आवडले! खरचं काही गाणी अशी असतात जी एकुन त्याच्याशी जुळलेल्या आठवणी जाग्या होतात. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

समीरसूर
Wed, 01/28/2009 - 09:46 नवीन
धन्यवाद, किट्टू! --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किट्टु

"आवारगी...",

अनंत छंदी
Tue, 01/27/2009 - 16:35 नवीन
"आवारगी...", "हंगामा हैं क्यूं बरपा...", "चुपके चुपके..." या अप्रतिम गझलांचा मी फॅन झालो आणि (काहीच काम नसल्याने) वारंवार ऐकून अगदी मधल्या संगीतासकट मी त्या गझला पाठ करून टाकल्या. "चमकते चाँद को टुटा हुआ तारा बना डाला..." ऐकून ही आपलीच तर कहाणी नाही असे वाटून डोळ्याच्या कडा ओलावत असत. त्यातले "मैं इस दुनिया को अक्सर देखकर हैरान होता हूं, न मुझसे बन सका छोटासा घर, दिन्-रात रोता हू, खुदाया तुने कैसे ये जहाँ सारा बना डाला...चमकते चाँद को टुटा हुआ तारा बना डाला..." हे कडवे रात्रीच्या गडद अंधारात चटका लावायचे. जियो मेरे यार! गुलाम अली, मेहदी हसन म्हणजे क्या बात है!!
  • Log in or register to post comments

मैंने कहा, आवारगी!

समीरसूर
Wed, 01/28/2009 - 09:50 नवीन
गुलाम अली म्हणजे गझलचा बादशाह आहे. त्यांच्या गझला ऐकून माझ्या आयुष्यातला एक मोठा कालखंड सुसह्य झाला. "ये दर्द की तनहाईयां, ये दश्त का वीराँ सफर, हम लोग तो उकता गये, अपनी सुना, आवारगी!!" अशी अवस्था झाल्यानंतर ही गझल ऐकणे हा काय अनुभव असतो हे शब्दात सांगणे अवघड आहे. :-) धन्यवाद. --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी

सुंदर

दशानन
Tue, 01/27/2009 - 16:45 नवीन
सुंदर ! ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
  • Log in or register to post comments

धन्यवाद

समीरसूर
Wed, 01/28/2009 - 09:51 नवीन
धन्यवाद, जैनाच कार्ट! --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मस्त लेख

मैत्र
Wed, 01/28/2009 - 11:05 नवीन
समीर तुमचे दोन्ही लेख छान आहेत! अजून लिहा... आता एक ठराविक प्रकारची गाणी / गायक / संगीतकार असं घेऊन लिहा... गुलाम अली पासून सुरु करता येइल. दिल में इक लहर सी उठ्ठी है अभी... कोई ताजा हवा चली है अभी..
  • Log in or register to post comments

सुंदर

मिथिला
Wed, 01/28/2009 - 11:43 नवीन
आठवणी जाग्या झाल्या! "मुझे नींद न आये..दिल".."कह दो की तुम हो मेरी वरना..तेझाब"..
  • Log in or register to post comments

समीरराव, दो

विसोबा खेचर
Wed, 01/28/2009 - 12:23 नवीन
समीरराव, दोन्ही भाग सुंदरच..! कृपया लिहिते रहा... तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, तात्या!

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:36 नवीन
धन्यवाद! --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

होशवालों को खबर क्या...

एक
गुरुवार, 01/29/2009 - 12:10 नवीन
सरफरोश मधलं हे गाणं आमचं फेवरेट.. या गाण्याचं पिक्चरायजेशन तर केवळ अप्रतीम. जुने दिवस आठवतात.
  • Log in or register to post comments

होय!

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:46 नवीन
हा चित्रपट मी ६-७ वेळा टॉकीजवर पाहिला. यातली सर्व गाणी छान होती. मी कराडला असतांना तृतीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालो परंतु एक गोची झाली होती. द्वितीय वर्षाचा एक विषय काही केल्या मला सोडायला तयार नव्हता. खूपच प्रेमात पडला होता बहुधा माझ्या. मी विचार केला की मुली आपल्या प्रेमात पडत नाहीत; हा बापुडा पडला आहे तर कशाला त्याचे दिल दुखवावे? म्हणून मी पण त्याचे खूप लाड केले. नंतर मात्र हा विषय अवघड जागेचे दुखणे होऊन बसला. मग कधी हे पुस्तक, कधी अमक्याच्या नोट्स, कधी गणिते पाठ करून तर कधी थिअरी पाठ करून मी या विषयाशी काडीमोड घेण्याचा प्रयत्न केला. त्याने पण निकराने झुंज दिली आणि शेवटच्या अटेंप्टला ते ही फेरतपासणीमध्ये त्याने माझी पाठ सोडली. तेंव्हा जर त्याने मला रीतसर घटस्फोट दिला नसता तर मात्र मला एक वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा झाली असती. फेरतपासणीचा निकाल लागेपर्यंत काय करायचे म्हणून मी वेळ न दवडता सिनेमे बघण्याचा सपाटा लावला. त्यात सरफरोश खूपदा पाहिला. त्यामुळे यातली गाणी ऐकली की मला माझा तो विषय आठवतो ज्याने माझी झोप उडवली होती. :-) --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

दोन्ही लेख उ त्त म..

ढ
गुरुवार, 01/29/2009 - 14:27 नवीन
गुलाम अली म्हणजे गझलचा बादशाह आहे. खरं आहे. ये आलम शोख का देखा ना जाए वो बुत है या खुदा देखा ना जाए । ये किन नजरोंसे तूने आज देखा के तेरा देखना देखा ना जाए । हमेशा के लिए मुझसे बिछड जा ये मंझर बारहाँ देखा ना जाए । ही त्यांची गजल केवळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments

सुंदर

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:46 नवीन
सुंदर गझल! --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ

माषाअल्लाह !

वाहीदा
गुरुवार, 01/29/2009 - 16:05 नवीन
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ । रंजिश=enmity पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ । मरासिम=agreements/relationships, रस्म-ओ-रह-ए-दुनिया=customs and traditions of the society किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ । सबब=reason, ख़फ़ा=angry कुछ तो मेरे पिन्दार-ए-मुहब्बत का भरम रख तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ । पिन्दार=pride एक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ । लज़्ज़त-ए-गिरिया=taste of sadness/tears, महरूम=devoid of, राहत-ए-जाँ=peace of life अब तक दिल-ए-ख़ुश'फ़हम को तुझ से हैं उम्मीदें ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ । दिल-ए-ख़ुश'फ़हम=optimistic heart, शम्में=candles That's great poetry ! Magnificient expression of melancholy ! And Runa Laila's silken voice just weaves magic…This was also sung by Mehdi Hasan but was immortalized by Runa Laila
  • Log in or register to post comments

खरं आहे, वाहीदा!

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:48 नवीन
धन्यवाद ही गझल लिहिल्याबद्दल! सुंदर शायरी आणि अप्रतिम गायकी! --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

वाह काय

दशानन
Mon, 02/02/2009 - 14:54 नवीन
वाह काय गझल आहे ! सुंदर ! मेहंदी हसन ह्यांची "अल्फ़ाज़ कहाँ से लाऊँ मैं,छाले की टपक समझाने को " प्ले करा ! खुप सुंदर आहे गझल ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

वाह मार

सखाराम_गटणे™
Mon, 02/02/2009 - 16:23 नवीन
वाह मार डाला. आज तो वाहीदा जी ने मा रडाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

व्वा गटणे

शंकरराव
Tue, 02/03/2009 - 17:00 नवीन
व्वा गटणे ! बेशक ये जिहाद हि है ईश्क निभाने के लिये देखो कितने आशिक है तैयार कुर्बान होने के लिये शंकरगालिब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

गझल अतिषय

शंकरराव
Mon, 02/02/2009 - 20:58 नवीन
गझल अतिषय आवडली :-) जमाने की रस्म या पाकइश्क मेरा बादेसबा ए अलहिदा ... तुमने तो जितेजी मार डाला पाकइश्क = pure love बादेसबा = fresh air शंकरगालिब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

गझलेचा अर्थ

संदीप चित्रे
Wed, 02/04/2009 - 00:48 नवीन
आज खर्‍या अर्थाने कळला. मनापासून धन्यवाद वाहीदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

उत्तम लेख..

आकाशस्थ
Sun, 02/01/2009 - 14:44 नवीन
समीर, दोन्ही लेख खूपच आवडले. 'तू चीज बडी है मस्त मस्त...' ऐकलं की आपण फर्गसन ला १२ वी ला असतानाचे गणपतीचे दिवस मला आठवतात. हे गाणं ज्या गणेश मंडपाच्या लाऊड्स्पीकर वर सुरु असेन तिथे अगदी रस्त्यावर थांबून पूर्ण गाणं ऐकूनच आपण पुढे जात असू. 'बगळ्यांची माळ....' हे गीत मी पूर्वी ऐकलं होतं. या गीताशी माझ्या कुठल्याही आठवणीची नाळ जोडलेली नव्हती. पण आता जेव्हा मी हे गीत ऐकतो, तेव्हा लेक मिशिगन ला त्या झुडूपाखाली तू हेच गीत गातानाचा आठवतो. सुंदर !!! आकाश.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, आकाश!

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:35 नवीन
'तू चीज बडी हैं मस्त मस्त..." ऐकलं की मला देखील आपले बारावीचे फर्गसनचे दिवस आठवतात. आपण पायीच पिंजून काढलेला पुण्याचा गणपतीमय परिसर आठवतो. जिथं हे गाणं सुरू असेल तिथं थांबून ते पूर्ण ऐकून पुढे जाण्याची लगबग आठवते. :-) खरचं खूप मस्त दिवस होते ते. बारावीचा शेवटचा पेपर संपल्यावर मी समोरच्या योगेश्वरीमध्ये चहा पीत असतांना तिथल्या टीव्हीवर रवीना टंडनचे "टीप टीप बरसा पानी, पानी ने आग लगायी..." हे गाणे सुरू होते. अजूनही हे गाणे ऐकले किंवा चिंब भिजलेल्या रवीना टंडनचे जाडजूड पाय त्या अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या स्लॅबवर धपाधप आदळतांना पाहिले की मला योगेश्वरीमधला चहा आठवतो. :-) समस्त मिपाकर मंडळी, माझ्या लेखात जो माझ्या अमेरिकास्थित मित्राचा उल्लेख आलेला आहे तो हाच आकाशस्थ! याचे खरे नांव डॉ. आकाश पांढरे. आम्ही दोघांनी खूप चित्रपट सोबत पाहिले आणि खूप धमाल केली. नुकतेच त्याने अमेरिकेत एमएस पूर्ण केले आणि आता पीएचडी साठी त्याने बाह्या सरसावल्या आहेत. :-) आम्ही शिकागोला भेटल्यावर तीन दिवस खूप गाणी ऐकली, गायिली आणि गतस्मृतींना परत एकदा उजाळा दिला. --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाशस्थ

राह बनी

महेंद्र
Sun, 02/01/2009 - 15:55 नवीन
राह बनी खुद मंझिल , पिछे रह गई मुश्किल.. हे गाणं मला खुप आवडायचा. तसेच एक मराठी गाणं माझी आजी गुणगुणायची.. हिरव्या साडी ला पिवळी किनार गं.. कडू लिंबाला आला बहार गं... मला वाटतं गदिमांचं गाणं आहे हे. कुणाकडे एम पी ३ मधे असेल तर क्रुपया लिंक पोस्ट कराल कां? लेख छान आहे. किप इट अप!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:49 नवीन
धन्यवाद, महेंद्र! --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र

मेहदी हसन

अनंत छंदी
Sun, 02/01/2009 - 18:00 नवीन
मेहदी हसनच्या रंजीश ही, ये धुआं कहासे उठता है, भूली बिसरी चंद उम्मीदे या गझला प्रसिद्ध आहेतच पण त्याची फराजने लिहिलेली शोला था जल बुझा हूं ही गझल म्हणजे केवळ अप्रतिम!
  • Log in or register to post comments

छान

चित्रा
Sun, 02/01/2009 - 19:37 नवीन
दोन्ही लेख आवडले (आधीच्या लेखात प्रतिक्रिया द्यायची राहिली).
  • Log in or register to post comments

धन्य्वाद

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:50 नवीन
धन्यवाद, चित्रा! --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अतिशय सुंदर लेखन..

प्राजु
Sun, 02/01/2009 - 21:15 नवीन
दोन्ही लेख अप्रतिम जमले आहेत. तुम्ही सांगितलेली सगळी गाणी अगदी जशीच्या तशी माझ्याही मनाच्या एका कोपर्‍यात आठ्वणींच्या हिंदोळ्यावर झुलु लागल्या. खरंच, गाणं कानावर पडलं की, आपण ताबडतोब गतकाळात रममाण होतो. मी अहमदनगर ला गेले होते तेव्हाची आठवण "आपकी ऑखोमे कुछ, महके हुए से राज है" या गाण्याशी निगडीत आहे. ते गाणं लागलं की, मला माझी मैत्रीण लेखा आठवते आणि "आपकी बदमाशीयोंके ये नये अंदाज है" या ओळीवर दोघिंनी एकमेकीकडे "किती छान आहे कल्पना..." अशा नजरेने पाहून एकदम खुदकन आलेले हसू आठवते. गाणी.... आठवणींच्या अनमोल ठेवा.. फक्त स्वतःसाठीचा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा!

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:53 नवीन
वा, खुदकन हसू आणि 'बदमाशियाँ'...सहीच काँबिनेशन आहे. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ते गाणं अप्रतिम आहेच. गुलजारसाहेबांनी खरच काही (बहुधा सगळीच) उत्तम गाणी लिहून ठेवली आहेत. इजाजत मधली सगळी गाणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सुरेख लेख!

यशोधरा
Sun, 02/01/2009 - 22:33 नवीन
सुरेख लेख!
  • Log in or register to post comments

समीरसूर ,

रामदास
Sun, 02/01/2009 - 23:55 नवीन
हंगामाच्या नंतर वेस्टन ऑडीओ कॅसेटनी गुलाम अलीसाहेबांच्या चार कॅसेट बनवल्या होत्या.त्यावेळी मी रात्री स्टुडीओ असीस्टंट म्हणून नोकरी करत होतो.रमझानचे दिवस होते. उपास सोडल्यावर रात्री वरळीच्या स्टुडीओत रेकॉर्डींग सुरु व्हायचे. अरेंजर जॉली मुकर्जी आणि अन्नू मलीक .रात्रभर रेकॉर्डींग चालायचं.मध्यंतरात सोनाली जलोटा गजल शिकायला यायची. त्यावेळी,एकगजल मला फार आवडली होती. एक पगली मेरा नाम जो ले शरमाए भी घबराए भी गलीयो गलीयो मुझसे मिलने आये भी गह्बराए भी. नंतर गुलाम अलींचे बरेच कार्यक्रम मी बघीतले पण ही गजल परत ऐकायला मिळाली नाही. तुमचा लेख वाचल्यावर परत त्या रेकॉर्डींगच्या रात्री आठवल्या.पण आपल्या आवडत्या गाण्यांबद्दल किती लिहावं ते कमीच. लेख आवडला.आणखी लिहा. कदाचीत तुमचे लेख वाचता वाचता आणखी काहीतरी आठवेल.
  • Log in or register to post comments

इक पगली....

ढ
Mon, 02/02/2009 - 16:27 नवीन
रामदासजी, रात गए घर जानेवाली गुमसुम लडकी राहोंमें अपनी उल्झी जुल्फोंको सुलझाए भी घबराए भी । कौन बिछडकर फिर लौटेगा क्यूं आवारा फिरते हो रातोंको इक चांद मुझे समझाए भी घबराए भी । पगली ह्या अल्बम मधील ही गजल अप्रतिम आहे. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगच्या वेळी आपण तेथे उपस्थित होता हे भाग्य मला लाभले असते तर..... असो. हर किसी को जहाँ नही मिलता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

भाग्यवान आहात

अनंत छंदी
Mon, 02/02/2009 - 20:22 नवीन
रामदासभाई नमस्कार गुलाम अलींचे रेकॉर्डींग प्रत्यक्ष पाहण्याचा तुम्हाला योग आला भाग्यवान आहात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

सुन्दर लेख

trendi.pravin
Sun, 02/01/2009 - 23:59 नवीन
खरच लेख खुप सुन्दर आहे...आठवणी जाग्या झाल्या.. "बाजिगर ,जान तेरे नाम ,फूल और कान्टे यान्ची सुध्दा गाणी मस्त होती..उल्लेख हवा होता... धन्यवाद trendi.pravin **************** style मे रहने का........ always!
  • Log in or register to post comments

होय

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 14:57 नवीन
त्यांचा उल्लेख हवा होता. फूल और कांटे माझ्या दहावीच्या परीक्षेनंतर आला होता आणि खूप गाजला होता. म्हशीसारख्या 'रेकणे' या ध्वनीप्रकारात समाविष्ट होऊ शकणार्‍या कुमार सानू नामक गायकाची यातली गाणी खूप लोकप्रिय झाली होती. ती मला आवडायची पण कुमार खूपच नाकात गायचा. "तुमसे मिलने को दिल करता हैं..." ऐकल्यावर अजूनही गुदगुल्या होतात. :-) --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: trendi.pravin

साला हा

बिपिन कार्यकर्ते
Mon, 02/02/2009 - 00:09 नवीन
साला हा धागा इतके दिवस वाचायचा राहूनच गेला होता. आज वाचला. उगाच वाचला असं झालं. जीव कासाविस झाला. समीर, खूपच सुंदर लिहितोस. प्लीज लिहित रहा असाच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आठवणीतील गाणी!

शशिधर केळकर
Mon, 02/02/2009 - 01:19 नवीन
हाही लेख सुरेख जमलाय. मन्ना डे हा एक सॉलिड मोठा ग्रेट असा गायक - जो मला प्रचंड भावतो. त्यांची गाणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आणि खरेतर कालातीत आहेत. आणि अगदी भावनांनी ओथंबलेली. प्रसंग डोळ्यासमोर उभे करणारी; आपल्या अनुभवांमधे घेऊन जाणारी आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

समीरसूर
Mon, 02/02/2009 - 15:01 नवीन
यशोधरा, अनंत छंदी, ट्रेंडी प्रवीण, बिपिन कार्यकर्ते, शशिधरजी आणि समस्त प्रतिसादक मंडळी, आपल्या सगळ्यांच्या उत्साह वाढविणार्‍या प्रतिसांदांबद्दल शतशः धन्यवाद! --समीर
  • Log in or register to post comments

अप्रतिम

चाणक्य
Tue, 02/03/2009 - 16:51 नवीन
अप्रतिम लेख. खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि प्रतिक्रीया वाचताना पण मजा आली. सुंदर... पु.ले.वा.ब.आ.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा