Skip to main content

आणखी एक पुणेरी पाटी...

लेखक ओंकार देशमुख यांनी रविवार, 01/02/2009 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो... आज बय्राच दिवसानी ब्लॉग वर काहीतरी लिहायला आलोय... सद्या आमच्या मोठ्या शाळेत म्हणजे कॉलेज मधे सब मिशन आणि ज्युरींच वार वहात असल्यामुळे तिकडे थोडं लक्ष द्याव लागत...असो... तर..आज रविवार असल्यामुळे बाहेर जेवायचा बेत ठरला होता... तेव्हा वाट बघत असताना भरत नाट्य समोरच्या सी-लाइ च्या शोरुम च्या काचेवरची ही मजेदार पाटी वाचली...पाटी वाचून ही पाटी पुण्यातली आहे हे सांगायची काही गरज वाटत नाही ......आणि नाही समजलं तर द्या सोडून... "आमच्या येथे कोणालाही समजावून सांगण्याचा ठेका घेतलेला नाही"- धन्यवाद. http://pune-marathi-blog.blogspot.com/2009/02/blog-post.html

वाचने 3437
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

आम्ही सगळ्याच लेखांना वा वा म्हणण्याचा ठेका घेतला नाही. --अवलिया

In reply to by टारझन

मला शंका आहे टार्‍या, तुझंच दुकान वगैरे असणार आणि तूच लावली असेल ती पाटी. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तो फक्त त्याचा एक बॅकपोझ मधला 'वी' कटवाला फोटू लावतो. त्याच्याकडे बघूनच लोक गाडी तिथे लावत नाहीत! ;) चतुरंग

भन्नाटच पाटी आहे ! आणी रोहिणीताई म्हणतात त्याप्रमाणे खरच त्यांच्या दुकानातली पाटी असेल तर त्यांच्या बुद्धीमत्तेला मानाचा मुजरा ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

काय बे परा ... तुला पण "काम णाही" का ? आय डी चेंजव ... "परा_काम_नाही_मुजरे_करतो" हा आयडी कसा वाटला ? - टारू_काम_आहे