सुश्याचं प्रेमपत्र
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
"सुश्या फुगाला प्रपोज करणार"
हि बातमी संजीवनच्या होस्टेलमध्ये वणव्यासारखी पसरली.सुश्याच्या नेभळटपनाकडे बघून आणि त्याचा पूर्वेतिहास माहित असल्याने मी तिकडे फारसं लक्ष दिलं नाही.पण त्याला भेटून त्याचा रागरंग त्या बातमीवर विश्वास ठेवावाच लागला.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षीतरी ती आपल्याला 'हो' म्हणेल या भोळ्या आशेपोटी हा बहाद्दर हे नसतं धाडस करतोय हे मला कळून चुकल.खरतर आमचा सुश्या आणि फुगा दोघेही कॉलेजमध्ये प्रचंड फेमस! अभ्यासात सतत टोप केल्यामुळे सुश्या आणि आपल्या जरा जास्त नखर्यामुळे फुगा कॉलेजमध्ये प्रचंड फेमस झाले होते. फुगाच हे जगावेगळ नाव आम्ही पोरांनी पाडलं होत, कारण फस्ट यीअरला चवळीच्या शेंगेप्रमाणे असणारी फुगा जेव्हा मेसचं जेवण जेवून जेवून जेव्हा हळूहळू फुगू लागली तेव्हा कम्परीझनसाठी आम्हाला दुसरा शब्दच सापडला नाही.मेसमध्ये तिला जेवताना बघून जगात २५ कोटी भूकबळी आहेत याची खात्री पटायची,आणि ते का आहेत याचं कारणदेखील समजून यायचं.सुश्याला फुगात काय आवडल हे माहित नव्हत पण या वयात गाढवी पण अप्सरेसारखी दिसते हे समजून आलं होत.
तर अस हे कपल कॉलेजमधल्या इतर कपल्सपेक्षा जरा वेगळ होत,कारण हे एक सिझनल कपल होत,ह्यांच्या दोस्तीचा सिझन फुगाच्या गरजेवर अवलंबून असायचा.म्हणजे सबमिशन ,प्रोजेक्ट,टयुटोरीअल अशावेळी दोघे हमखास एकत्र दिसायचे.पण जेव्हा या गोष्टी नसतील तेव्हा या दोघांतील अंतर मोजायला कोनात इंस्तृमेंट वापरावं हा यक्षप्रश्न आम्हाला पडत असे.कदाचित प्रेमाच्या भरती ओहोटीचा हा प्रकार असेल म्हणून आम्हीही तिकडे दुर्लक्ष करायचो.तरस हे सिझनल कपल अजून कन्फर्म नव्हत त्याच महत्वाच कारण म्हणजे नेभळट स्वभाव.एरवी तीन तीन तास गप्पा मारणाऱ्या सुष्याला ती तीन अक्षर उच्चारायला तीन वर्षात एकदापण जमल नव्हत.म्हणूनच गेले तीनही valentine day स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून घेणारा सुश्या हा valentine day गाजवेल अशी कुणाचीही अपेक्षा नव्हती.पण आता हि बातमी ऐकून "आज कूच तुफानी होगी " हे मी ताडलं.
प्रेमाचा प्रक्टिकल अनुभव शून्य असूनही थिअरीत प्रचंड विद्वान असणारे बुद्धीजीवी इन्जीनियर सुश्याच्या रुममध्ये न बोलविता फुकटचा सल्ला द्यायला जमा झाले.अगदी शोलेपासून थ्री इडीयटच्या प्रपोज स्टाइलवर विचार करणे सुरु झाले.पण कॉलेजजवळ कुठेच पाण्याची टाकी नसल्याने आणि त्यातही सुष्याला उंचावर चक्कर येत असल्यामुळे शोलेचा ऑप्शन बाद झाला.थ्री इडीयट प्रमाणे गर्ल्स होस्टेलवर जाण्याचा बेत सुश्याने सांगितला पण गर्ल्स होस्टेलच्या वोचमनच्या हातात हा सापडला तर याचं काय होईल या काळजीपोट आम्ही त्याचा हा बेत हाणून पाडला.कारण हा वोचमन खली चा दुरून नातेवाईक लागतो असं आमच्या कानावर आलं होत.आणि त्याची अगडबंब शरीराकडे भागून ऐकणाऱ्याला ते पटायचं देखील.
शेवटी जगन्नाथाने दिलेला प्रेमपत्र लिहिण्याचा सल्ला सर्वांनी उचलून धरला.खरतर हा मार्ग आउटडेटेड असला तरी निर्धोक आहे आणि सुश्यला मार बसण्याची शक्यता फारच कमी असल्याने आम्ही याला मान्यता दिली.प्रेमपत्र कस लिहायचं आणि कस पोचवायच हे प्रश्न आता समोर उभे होते.पहिला प्रश्न इंद्रजीतने लगेच सोडविला आणि गुगल वर love-letter असं टाइप करताच ७०००० रिझल्ट आले,मग सुश्याने टेबलवरील जर्नल पेपर उचलला आणि इमानदार इन्जीनियरिंग स्तुडंटप्रमाणे कॉपी करायला सुरुवात केली.शेवटी कसाबस त्याचं ते तीन पाणी फर्ड्या इंग्लिश मधील प्रेमपत्र तयार झालं.आणि मग शेवटी दिपकने दिलेला दोघांचाही नाव न टाकण्याचा सुरक्षित सल्ला मान्य करून तो ते पत्र पोचवायला तयार झाला.
ते प्रेमपत्र त्याने मग नुकत्याच लिहिलेल्या टयुटोरीअलमध्ये अलगद ठेवून दिलं,टयुटोरीअल लिहील कि तो ते पहिल्यांदा फुगालाच देतो हे आतापर्यंत संपूर्ण पन्हाळा तालुक्याला माहित झालं होत.एवढ महान कार्य पार पडून सुशान्तराव शेवटी झोपी गेले.पण मला झोपी जाऊन चालणार नव्हत,मी पहिल्यांदा जाऊन होस्टेलच्या टेरेसला कुलूप लावलं,होस्तेलमधल्या सगळ्या दोऱ्या लपवून ठेवल्या.कारण त्या पत्राच उत्तर काय असेल ह्याचा अंदाज मला आतापर्यंत आला होता.पुढचे काही दिवस असेच शांततेत गेले .फूगाने ते पत्र वाचले अशी काही बातमी एकू आली नाही कारण सुश्याच्या रूममधून ना रडण्याचा आवाज वगैरे आला होता ना तो टेरेसकडे जाताना दिसला होता .त्यामुळे जसजसा वेळ जात होता तसं सर्वांची उत्सुकता वाढत चालली होती.शेवटी फूगाने ती टयुटोरीअल परत आणून दिली,तरीसुद्धा काहीच झाल नाही बिचारा सुश्या तर टेन्शनने मरायला आला होता पण तिने ती टयुटोरीअल आधीच लिहिली असेल अस सांगून त्याची समजूत काढण्यात आली.आणि आता परीक्षा जवळ आल्यामुळे तुझ्या प्रपोजचा कार्यक्रम जरा लांबणीवर टाकू असं सांगून त्याला अभ्यासाला बसविण्यात आलं.
असेच काही दिवस शांततेत गेले.preparation leave सुरु झाली होती.सर्व topper लोक आता वाघ जसा शिकारीवर तुटून पडतो तसे अभ्यासावर तुटून पडले होते.आणि मग थोड्याच दिवसात मी आमच्या नेहमीच्या कट्ट्यावर अभ्यास(?) करीत बसलेलो असताना फुगा तिथे आली.कदाचित सुष्याला शोधत तिथे आली,नक्कीच अभ्य्सात काहीतरी डाउट असेल असं मला वाटल.मला पाहताच ती माझ्याजवळ आली,आणि म्हणाली,
"अरे सुश्या कुठाय?"
"तो रूमवर अभ्यास करतोय,का? काही काम होत का?"
"अरे काही नाही,त्याला हि पत्रिका द्यायची होती "
"कसली?"
"अरे लग्नपत्रिका,माझं लग्न ठरलंय "
मी ताडकन उभं राहिलो.हि वेळ येणार हे माहित होत पण येवढ्या लवकर येईल हि अपेक्षा मी काय कुणीच केली नव्हती.अंतर्बाह्य हादरने या लहानपणी शिकलेल्या वाकप्रचाराचा अनुभव मला आत्ता पहिल्यांदाच येत होता.बिचाऱ्या सुश्याचा चेहरा सारखा समोर येत होता आणि या धक्क्यातून स्वत:ला कसाबसा सावरून घेत होतो तोच शेजारी बसलेल्या उम्याने स्वत:च्या मंद,मूर्ख आणि अतिशहाण्या स्वभावाला अनुसरून प्रश्न विचारलाच,
"कुणाशी?"
"घुमे सरांशी!"
प्रमाणापेक्षा जास्तच लाजत फुगा उत्तरली.हे तीच उत्तर ऐकून आत्ताच्या आता हि धरती दुभंगावी आणि तिने मला पोटात घ्यावं असं वाटल नाहीतर कमीत कमी पुढच्या भिंतीवरून उडी टाकून जीव द्यावा अशी इच्छा मनात उफाळून आली.पण माझ्या आईला नातवंडांचा चेहरा पहायची इच्छा असल्याने मी स्वत:ला आवरलं.या सलग दोन धक्क्यातून सावरायच्या आतच फुगा माझ्या नावाची पत्रिका देऊन निघूनही गेली होती.
पंधरा मिनिटानंतर सावरलो,पण हे कस घडल याचा विचार करू लागलो.मग तिच्या काही मैत्रीण आणि माझे स्टाफरूम मधील सोर्स वापरून मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे जेव्हा वस्तूस्थितीच जे काही चित्र उभं राहिलं तेव्हा तर मी बेशुध्द पडायचा बाकी राहिलो होतो. खरी गोष्ट अशी होती कि,सुश्याने जेव्हा टयुटोरीअलमधून प्रेमपत्र फुगला तील तेव्हा तिने ते उतरून उतरून काढलं पण ते लिहिताना "सबमिशन करताना त्यातील माहित हि गोपनीय आहे असे समजून मी ती कधीच वाचणार नाही "या इंजिनियरिंग स्तुडंतच्या प्रतीत्नेची तिने पुरेपूर आठवण ठेवली होती.आणि सुश्याच ते दोन पाणी प्रेमपत्र उतरून काढताना त्यातील एक अक्षरही वाचण्याचा त्रास तीन आपल्या अवजड शरीराला दिला नाही . आणि लिहून झाल्यावर ते घुमे सरांना सबमिट केल.आणि सरांनी आपल्या महाखडूस,महा........,महा............. (teacher's day जवळ आला असल्याने शब्द आणि भावना आवरल्या आहेत) स्वभावाला अनुसरून तीच एक ना एक अक्षर वाचून काढलं आणि त्या पत्रात नावं नसल्याने गैरसमज करून घेतला.त्यावेळी नक्की काय झाल असेल माहित नाही पण नक्कीच हा माणूस मायकल ज्याक्सनचा बाप बनून नाचला असणार हे नक्की! कारण अभ्यास करून पडलेल टक्कल ,रात्री जागरणं करून(कशासाठी जागत असेल हे कृपया विचारू नका ) डोळ्याभोवतीची वर्तुळ आणि जरा जास्तच शिकल्याने लग्नाचं उलटून गेलेलं वय असं तगड आणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या माणसाला अशावेळी हर्षवायू होणे स्वाभाविकच आहे.
मग काय! घुमे सर आपला सारा गोतावळा घेऊन फुगाच्या घरी हजार झाले.आणि सोयरिक जमवूनच बाहेर पडले.कारण ५०,००० पगाराचा जावई मिळन तसं भाग्याचाच लक्षण.म्हणून फुगाच्या वडिलांनी लगेच होकार कळवू टाकला आणि एवढा वेल सेटल(कि मेंटल) नवरा मिळाल्यामुळे फुगाच्या नकाराचा प्रश्नच नव्हता.अश्या प्रमाणे फुगाच लग्न सरतेशेवटी ठरलं,घुमे सराच्या चेहऱ्यावरील आनंद कारंज्याप्रमाणे फुटून येत होता खरतर त्यांना हसताना आम्ही सगळे पहिल्यांदाच पाहत होतो..
आता हसावं कि रडावं हेच समजेनास झाल म्हणून शांतपणे बाहेर पडलो,सागरच्या दुकानातून दोन पाकीट घेतली आणि सुश्याची समजूत कशी काढायची या विवंचनेत त्याच्या रूमकडे चालू लागलो.........................
प्रतिक्रिया
मी इंजिनीरिंगला असताना एका
आयला आज वाचलं हे!! कसलं सही
बाकी संजीवन कॉलेज ऑफ
संजीवन इंजिनीरिंग अँड
मेकॅनिकलला आर एस के आहेत का
कुलकर्णी सर का?
भट्टी जमलिय मस्त...
मस्त.. मजेशीर :)
एकदम फ्रेश...एक नंबर!!
वाचताना खूप हसले.लगेच college
वाचताना खूप हसले.लगेच college
वाचताना खूप हसले.लगेच college
वाचताना खूप हसले.लगेच college
धन्यवाद
छान लिहीलीये कथा !
Pagination